नियमित लसीकरणाचे काय करायचे सध्या लहान मुलांचे नियमित लसीकरण घ्यावे की नाही असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. नियमित लसीकरण घेण्यास मुळीच हरकत नाही. फक्त रेड झोन व त्यातच मुंबई व पुण्यामध्ये ते ३ मे पर्यंत पुढे ढकलावे. लसीकरण घेण्यास अशा वेळी थोडा उशीर झाला तरी चालेल. लसीकरणाची तारिख ढळली म्हणून फार काळजी करू नये.यासाठी पुढील गोष्टी समजून घ्या व पाळा.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
१. अनेक बालरोगतज्ञांनी लसीकरणाची व इतर आजार असलेल्या लहान मुलांना तपासण्याच्या वेळा वेगळ्या ठरवलेल्या आहेत. तापाचे व नॉर्मल बाळांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून हे केले आहे. त्यामुळे शक्यतो बालरोगतज्ञांना फोन करून व वेळ घेऊनच जावे.
२.जाताना मुलगा दोन वर्षांपेक्षा मोठा असल्यास सोबत एकाच पालकाने जावे. त्यापेक्षा लहान असल्यास आई – वडील दोघांना जावे लागेल. दोघे गेले तरी रुग्णालयाच्या आत एकाच पालकाने जावे.
३. लसीकरणाच्या वेळी बाळाला सर्दी खोकला नाही याची काळजी घ्यावी. तसेच कुठल्या ही पालकाला ताप, सर्दी, खोकल्या पैकी काहीही असल्यास त्याने सोबत येऊ नये.
रुग्णालयात, डॉक्टर समोर सोशल डीस्टन्सिंग पाळा
४. लसीकरणासाठी आजी आजोबांनी सोबत येऊ नये
५.लसीकरणासाठी रुग्णालयात आत जाताना व बाहेर आल्यावर हँड सॅनीटायजर चा वापर करावा. हॉस्पिटलच्या आत गेल्यावर कुठे ही हात लावू नका.
५.डॉक्टरच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसू नका. लस घेताना डॉक्टर तपासतात त्या बेड वर घरून आणलेला एक कपडा टाका. त्यावर तुम्ही बसा व मुलाला मांडीवर घ्या म्हणजे बाळाचा कुठे ही संपर्क येणार नाही. घरी गेल्यावर हा कपडा गरम पाण्यात टाकून धुवून घ्या.
६.मुलांना रुग्णालयाच्या वेटिंग मध्ये इकडे तिकडे फिरून खेळायची सवय असते. हे टाळा व मुलाला वेटिंग मध्ये हात पकडून स्वतः जवळच ठेवा.
७. नियमित लसीकरणाचे काय करायचे २ वर्षा पेक्षा मोठ्या मुलांना केबिनमध्ये डॉक्टरांचा स्टेथोस्कोपशी खेळणे, ते तोंडात टाकणे , डॉक्टरांच्या टेबल वरील वस्तू उचलून खेळणे अशी सवय असते. त्यामुळे डॉक्टरांच्या केबिनमध्ये मुलांचा हात सोडू नका व त्यांना कुठे ही हात लावण्यापासून रोखा. शक्य असेल तेव्हा बाळाला केबिनमध्ये कड्यावरून खाली उतरवूच नका.
८..लसीकरणा नंतर थोडा ताप येणे नॉर्मल असते. म्हणून पुढच्या दिवशी ताप आल्यावर काही झाले का? म्हणून घाबरून जाऊ नका. कारण हा लसी मुळे येणारा नॉर्मल ताप आहे.
9. लसीकरणाचे पैसे नोटा हाताळून देण्यापेक्षा डिजिटल पद्धतीने द्या
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता