कोरोनानंतरचा थकवा सध्या कोरोना मधून बरे झालेल्या अनेक जणांना लक्षणां नंतर १४ दिवस संपल्यावर पुढे अजून १५ दिवस ते २ महिन्यांपर्यंत बराच त्रास जाणवतो . बरे झाले तरी कामाचे तास बुडत असल्याने व या थकव्या मुळे माणूस मानसिक दृष्ट्या ही खचून जात असल्याने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोनातून बरे झाल्यावर जाणवणारे त्रास –
- दिवस तीव्र स्वरूपाचा थकवा, अंगदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी असा.
- थोडे चालल्यावर किंवा कष्टाचे काम केल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे.
- नैराश्य येणे , मानसिक थकवा येणे.
- वजन कमी होणे व स्नायू कमी होणे. एक दिवस पूर्ण झोपून राहिले कि १ ते १.५ % स्नायू कमी होतात. ज्यांना १० ते १४ दिवस पडून राहावे लागले त्यांचे २५ % स्नायू कमी होऊ शकतात.
- बुद्धी क्षमतेच्या कामात रस न येणे किंवा अवघड जाणे.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
कारणे –
कुठल्या ही व्हायरल आजारा नंतर काही दिवस असा थकवा येतोच पण कोरोना मध्ये बऱ्याचदा उपचारात दिली जाणरे औषधे त्यातच स्टीरॉईड दिले जाते. स्टीरॉईड बंद केल्यावर शरीराचे संप्रेरकांचे संतुलन काही प्रमाणात बिघडते व ते पूर्ववत होण्यास २ ते ४ आठवडे लागतात . पण जीव वाचवण्यासाठी व उपचार म्हणून ही औषधे देणे ही गरजेचे आस्ते.
कोरोना नंतरच्या परिणामावर उपचार –
- कोरोनानंतरचा थकवा रोज दिवसातून दोन वेळा १ ग्लास नारळ पाणी प्यावे.
- विटामिन सी ५०० मिलीग्राम ची एक गोळी थकवा असल्यास चालू ठेवावी.
- कोरोना होण्या आधी विटामिन डी घेतलेले नसेल तर ६०,००० IU दर आठवड्याला एकदा ८ आठवडे
- रोज उच्च प्रथिने युक्त आहार घ्यावा.
- सतत पडून राहण्यापेक्षा थोडा वेळ उठून घरात फिरावे , घरातील छोटी मोठी कामे करण्याचा प्रयत्न करावे.
- रोज हळूहळू ब्रेक घेत १० मिनिटे.
- फिजियोथेरपिस्टचा ( व्याय्यामाचे डॉक्टर ) सल्ला घेऊन श्वासाचे व्याव्याम करावे. यासाठी वेगळे साहित्य मिळते . उदाहरणार्थ फुकून एका नळीतील बॉल हवेत तरंगत ठेवणे.
- रोज १० मिनिटे दीर्घ श्वसनाचा व्यायाम करणे.
- स्नायू दुखत असताना अंगाला तेलाने मसाज करू नये पण झोपताना हाताला व पायाला तिळाचे तेल फक्त लावायला हरकत नाही.
- रोज झोपताना दोन मुठ खडे मीठ कोमट पाण्यात टाकून घोट्या पर्यंत पाय या पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवावे.
- जास्त दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासीटॅमॉलची गोळी काही दिवस घेण्यास हरकत नाही.
- मानसिक थकव्या साठी रोज ५ मिनटे ध्यान करावे व आपण यातून बरे झालो याबद्दल आभार व्यक्त करून मन कृतज्ञ स्थितीत राहावे . मानसिक स्थिती साठी हा एक उपचार आहे
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.