फाविपिरावीर औषध : म्हणजे म्हैस अजून पाण्यातच “नुकतेच भारतात फाविपिरावीर या औषधाची विक्री करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे औषध तोंडावाटे घेण्याचे आहे व सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्यांनी घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. पण या औषधाविषयी सर्व सामान्यांनी व डॉक्टरांनी अत्यंत सतर्कतेने पाऊले टाकावी व या विषयीच्या सर्व गोष्टी नीट समजून घ्याव्या –
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- सध्या हे औषध फक्त पुढील मध्यम व सौम्य कोरोना रुग्णांसाठीच वापरले जाते आहे :
- लठ्ठपणा ,
- वय ६० वर्षांच्या पुढे
- मधुमेह / उच्च रक्तदाब /फुप्फुसाचे आजार
- प्रतिकारशक्ती कमी असलेल्या स्थिती
- न्यूमोनिया
- सिरीयस व्हेंटिलेटरवरील रुग्ण व आॅक्सिजनची पातळी ९३ खाली असलेल्यांना हे औषध दिले जात नाही.
- हे औषध घेतले की आपल्या शरीरातील कोरोना नाहीसा होणार व कोरोनाचा धोका १०० % नाहीसा होणार असे मुळीच समजू नये. म्हणजे जसे मलेरियासाठी क्लोरोक्विन किंवा टायफॉइसाठी सेफट्रायएक्झोन आहे तसे कोरोनासाठी हे औषध नाही.
- या औषधाला मान्यता देताना मर्यादित रुग्णांवरील प्रयोगाचा आधार घेऊन मान्यता दिली असली तरी ही मान्यता महामारीच्या दृष्टिकोनातून देण्यात आली आहे. भारतात केवळ १५० रुग्णांवर प्रयोग करण्यात आला आहे.
- या औषधाची मान्यता प्रक्रिया जलद मान्यता प्रक्रियेअंतर्गत करण्यात आली आहे. म्हणजेच आजाराच्या महामारीचे स्वरूप , तीव्रता आणि इतर चांगल्या उपचाराचा अभाव लक्षात घेऊन तातडीची मान्यता दिलेली आहे.
- ही औषध लक्षणविरहीत रुग्णांनी मुळीच घेऊ नये.
- जरी हे औषध सौम्य व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांसाठी सांगितले गेले असले तरी प्रयोग करताना प्रयोगामध्ये परदेशातील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना वर व मर्यादित रुग्णसंख्येवर प्रयोग झाले आहे.
- फाविपिरावीर औषध : म्हणजे म्हैस अजून पाण्यातच मान्यता घेताना एवढेच एकच औषध द्या असे सांगितले असले तरी प्रयोग करताना मात्र या सोबत इंटरफेरोन अल्फा हे महागडे औषध वाफेच्या स्वरूपात रुग्णाला देण्यात आले आहे.
- संपर्कात आलेल्यांसाठी हे औषध मुळीच वापरले जाऊ नये. त्यासाठी याला मान्यता ही दिलेले नाही.
- कोरोना संसर्गित होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांनी स्वत:हून हे औषध घेऊ नये. त्यांना हे औषध द्यायचे कि नाही याचा निर्णय उपचार करणाऱ्या डॉक्टरवर व आरोग्य खात्यावर सोडावा. डॉक्टर योग्य निर्णय घेतील.
- हे औषध किडनीचे आजार, यकृताचे आजार, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांमध्ये वापरता येते.
- हे औषध टीबीचे औषध पायरॅझिनॅमाइड व दम्यासाठी नियमित घेतले जाणारे औषध झ्र थिओफायलीन सोबत घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.
- गरोदर राहण्याच्या बेतात असलेल्या स्त्रिया व जोडप्यांनी उपचार सुरु असताना व त्यानंतर ७ दिवस संतती नियमनाची साधने वापरावी. कारण उपचार सुरु असताना किंवा किंवा त्या ७ दिवस गर्भधारणा झाल्यास जन्माला येणाºया बाळामध्ये जन्मजात व्याधी होऊ शकतात.
- गाऊट या सांधेदुखीचा आजार, पूर्व इतिहास व रक्तात युरीक अॅसिडचे प्रमाण जास्त असलेल्यांमध्ये हे औषध सांभाळून दिले जावे. कारण या औषधामुळे अशा रुग्णांमध्ये युरीक अॅसिडची पतळी वाढू शकते.
- हे औषध घेण्याआधी एका कन्सेंट फॉर्मवर म्हणजेच परवानगी पत्रावर रुग्णाला सही करावी लागते. हा फॉर्म शक्यतो मराठीत मागून त्यावर वाचून सही करावी.
- लहान मुलांसाठी हे औषध वापरण्याचे निर्देश नाहीत. तसेच लहान मुलांमधील बहुतांश केसेस या लक्षणविरहीत किंवा सौम्य असल्याने लहान मुलांमध्ये कुठल्याही औषधाची गरज नाही.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.