चाचण्यांचे विश्लेषण पीसीआर, आयजीएम व आयजीजी यांचे एकत्रित विश्लेषण कसे करावे हे पुढे सांगितले आहे. यात + म्हणजे टेस्ट पॉजिटीव्ह व – म्हणजे टेस्ट निगेटिव्ह समजावे.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- चाचण्यांचे विश्लेषण पीसीआर +, आयजीएम – , आयजीजी – संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण संसर्ग होऊन ७ दिवस होऊन गेले आहे.
- पीसीआर +, आयजीएम + , आयजीजी – रुग्णावर जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे कारण संसर्ग होऊन ७ दिवस झाले आहेत व आठव्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत गुंतागुंतीची शक्यता जास्त आहे.
- पीसीआर टेस्ट केली नाही, आयजीएम + , आयजीजी – संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण आरटी पीसीआर करून निदान निश्चित करणे गरजेचे आहे.
- पीसीआर +, आयजीएम + , आयजीजी + संसर्गाची अॅक्टीव स्टेज.
- पीसीआर टेस्ट केली नाही. आयजीएम + , आयजीजी + संसर्गाची अॅक्टीव स्टेज, पण आरटी पीसीआर करून निदान निश्चित करणे गरजेचे आहे.
- पीसीआर – , आयजीएम + , आयजीजी – संसर्गाची सुरुवातीची स्टेज पण आरटी पीसीआर ३० टक्के केसेस मध्ये रुग्ण कोरोना संसर्गित असून ही निगेटिव्ह येऊ शकते. टेस्ट फॉल्स निगेटिव्ह म्हणजे रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह तरीही आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असे असू शकते. अशा वेळी आरटी पीसीआर परत एकदा करायला हवी.
- पीसीआर -, आयजीएम – , आयजीजी + जुना संसर्ग झाला आहे , रुग्ण आता बरा झाला आहे. तसेच रिपोर्ट पॉजिटीव्ह येऊन १४ दिवस झाले असतील तर रुग्णाकडून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नाही.
- पीसीआर – , आयजीएम + , आयजीजी + रुग्ण रिकवरी फेज मध्ये आहे. पण लक्षणे सुरु असतील तर इतरांना संसर्गित करू शकतो.
- पीसीआर -, आयजीएम – , आयजीजी – संसर्गित झालेला नाही किंवा संसर्गाच्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या ४ दिवसात रुग्ण आहे .
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.