पल्स ऑक्सिमीटरचा वापर

पल्स ऑक्सिमीटीरचा वापर

पल्स ऑक्सिमीटरचा वापर शरीरातील ऑक्सिजनची पातळी व ह्रदयाचे ठोके  मोजण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरण म्हणजे  पल्स ऑक्सिमीटर. लक्षणविरहीत तसेच सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या होम आयसोलेशन मधील व्यक्तीला स्वतःच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.

कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची पातळी मोजणे का गरजेचे असते ?
कोरोना मध्ये श्वास घेण्यास त्रास सुरु होण्या आधी कमी झालेल्या ऑक्सिजन वरून न्युमोनिया किंवा ऑक्सिजन कमी करणाऱ्या इतर गुंतागुंतीचे निदान करता येते.

नॉर्मल ऑक्सिजनची पातळी किती असते ?
सहसा ९४ – १०० ही नॉर्मल ऑक्सिजनची पातळी असते , कधी ९३ पर्यंत ही चालते. पण ९० च्या खाली मात्र तातडीने रुग्णालयात जायला हवे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रीडिंग कशी बघावी?
पल्स ऑक्सिमीटर ह्र्दायचे ठोके व ऑक्सिजनची पातळी अशा दोन्ही रीडिंग दाखवते. ऑक्सिजन दाखवले जाते तिथे SPO2 असे लिहिलेले असते. सहसा वर दाखवलेली रीडिंग ऑक्सिजनची असते आणि खाली दाखवलेली ह्रदयाच्या ठोक्याची असते. काही पल्सऑक्स मध्ये हे उलटे असू शकते व कुठली पातळी कशाची आहे हे मशिनच्या कव्हर वर लिहिलेले असते. हे ओळखण्यासाठी पल्स आणल्यावर घरातील एक दोन स्वस्थ व्यक्तींना लावून बघावे. जिथे सगळ्यांची रीडिंग ९० च्या पुढे दिसते आहे ती ऑक्सिजनची पातळी दाखवणारी रीडिंग आहे हे मार्क करून घ्यावे. हे नीट समजून घेण्याचे कारण म्हणजे ह्रदयाचे ठोके ही ऑक्सिजनची पातळी समजून रुग्ण घाबरून जातात.
रीडिंग दाखवण्यासाठी किमान ३० सेकंद लागतात.
पल्स ऑक्सिमीटीर लावण्याआधी बोटे तळ हातावर चोळून गरम करून घ्यावे.

ऑक्सिजनची पातळी कमी दाखवत असेल तर ?
पल्स ऑक्सिमीटरचा वापर ऑक्सिजनची पातळी कमी दाखवली तरी दर वेळी ती बरोबर असेल असे नाही. व्यक्ती नॉर्मल , स्वस्थ असताना ही पातळी कमी दाखवण्याची खालील करणे असू शकतात –

  • मशीन बोटाला नीट लावलेले नसेल.
  • हाताला मेहेंदी / नखाला नेल पॉलीश लावलेले असेल.
  • हात थंड असतील.
  • शरीरात लिपीड – चरबीचे प्रमाण जास्त असणे.
  • नख मोठे असल्याने पल्सऑक्स बोटावर नीट न बसने.
  • खोलीतील जास्त प्रमाणात असलेला प्रकाश / सूर्यप्रकाश पल्सऑक्स च्या लाईटशी ढवळाढवळ करत असणे.
    म्हणून ऑक्सिजन कमी दाखवले तर लगेच घाबरून जाऊ नये व मशीन योग्य रित्या काम करते आहे का हे तपासून पहावे.

घरात प्रत्येकाने पल्सऑक्स विकत घ्यावे का ?
प्रत्येकाने घरोघरी विकत घेण्याची गरज नाही पण पूर्ण सोसायटीत सगळ्यांनी मिळून एखादे पल्सऑक्स किंवा काही कुटुंबांच्या ग्रुपने मिळून एखादे घेण्यास हरकत नाही. कारण सगळ्यांना हे एकाच वेळी लागणार नाही.

काहीही लक्षणे नसलेल्यांना प्रतिबंध म्हणून रोज पल्सऑक्सने ऑक्सिजनची पातळी तपासावी का ?
याची मुळीच गरज नाही आणि याचा वापर फक्त कोरोना संसर्ग झाल्यावरच करावा.

स्मार्टफोन मध्ये अॅप मध्ये ऑक्सिजनची पातळी मोजावी का ?
फोन मधील ऑक्सिजनची पातळी दाखवणारे अॅप हे सदोष आहेत व त्यामुळे चुकीची पातळी दाखवण्याचे प्रमाण आहे म्हणून शक्यतो हे अॅप वापरू नये .
एका पेक्षा जास्त जन वापरणार असेल तर पल्स ऑक्सिमीटीर सॅनिटायजरने क्लीन करून घ्यावे.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग २

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग २

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग २ होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णापेक्षा नातेवाइकांचा रोल महत्वाचा असतो.

  • ज्या खोलीत रुग्णाचे आयसोलेशन करणार आहे त्या खोलीत कमीत कमी सामान ठेवावे व मोबाईलचे चार्जर, लॅपटॉप अशा गोष्टींची तजवीज आधीच करून ठेवावी.
  • तसेच आयसोलेशन खोलीतील इतर सदस्यांच्या गोष्टी , इतरांचे कपडे, पैसे , एटीएम अशा गोष्टी ही बाहेर काढून ठेवाव्या म्हणजे चौदा दिवस कोणाला ही या खोलीत जाण्याची गरज पडू नये.
  • आयसोलेशन खोली मध्ये शक्य झाल्यास एक बेल लावावी.
  • दर सहा तासांनी रुग्णाच्या तब्येतीची चौकशी करावी व धोका दर्शवणाऱ्या गोष्टी जाणवल्यास कुठे फोन करायचे याची नोंद करून ठेवावी व हे नंबर सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लिहून ठेवावे.
  • रुग्णाला जेवण देणे सोडले तर इतरांनी रुग्णाच्या थेट संपर्कात राहू नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • ६० वर्षावरील , गरोदर स्त्रिया , लहान मुले व इर आजर असणाऱ्यांनी शून्य संपर्क ठेवावे.
  • होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग २ शून्य संपर्क येणाऱ्यांनी घरात २४ तास मास्क वापरण्याची गरज नाही पण जेवण देणे किंवा इतर गोष्टी साठी संपर्क येणाऱ्यांनी संपर्क येईल तेव्हा मास्कचा वापर करावा.
  • आयसोलेशन संपले कि ती खोली, रुग्णाने वापरलेले स्वच्छतागृह १ % सोडियम हायपोक्लोराईट पाण्यात टाकून त्याने स्वच्छता करावी, खोलीतील सगळ्या वस्तू सॅनीटायजरने पुसून घ्याव्या व सॅनीटायजर स्प्रे कपाट, फर्निचरवर मारावा.
  • घरात पाहुणे येत असल्यास किंवा भेटायला कोणी येणार असल्यास नकार द्यावा.
  • आयसोलेशन मध्ये असलेली व्यक्ती करत असलेली कामे कोण करणार याचे नियोजन ठेवावे.
  • घरातील वातावरण आनंदी ठेवावे . सर्वांनी बाहेरून म्हणजे दार बंद ठेवून अधून मधून रुग्णाशी बोलावे, गप्पा माराव्या, त्याला मनोरंजनासाठी आवडणारी गाणी, चित्रपट उपलब्ध करून द्यावे व रुग्णाचा मूड चांगला ठेवावा.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग १

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग १

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग १ जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला व सौम्य लक्षणे / लक्षणविरहीत असाल तर डॉक्टरांकडून होम आयसोलेशनचा सल्ला दिला जाऊ शकतो. असे रुग्ण व नातेवाईकांसाठी पुढील सूचना –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग १ रुग्णाने वेगळी खोली वापरावी व उपलब्ध असल्यास वेगळे स्वच्छता गृह वापरावे. खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या.
  • रुग्णाने सतत मास्क वापरावा व तो दर ८ तासाने बदलावा. वापरून झाल्यावर १ % सोडियम हायपोक्लोराईट मध्ये तो बुडवावा किंवा एक छोटे भांडे ठेवून त्यात जाळावा. हे करत असताना सावधानता बाळगावी.
  • रुग्णाला जेवण / सामान देण्यासाठी घरातील सगळ्यात तरूण आणि स्वस्थ व्यक्तीने जबाबदारी स्वीकारावी.
  • रुग्णाने घरातील ५० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीशी किंवा इतर जोखीम वाढवणारे आजार असणाऱ्यांसाठी संपर्कात राहू नये.
  • रुग्णाने एकटे असले तरी वाचन करणे, फोन वर चित्रपट बघणे / इतर आवडतील अशा गोष्टी कराव्या. आराम करावा व झोपताना शक्यतो पालथे झोपावे.
  • रुग्णाने या काळात जास्त थकवणारा व्यायाम करू नये.
  • रुग्णाने रोज किमान ६ ते ८ ग्लास किंवा २ ते ३ लिटर पाणी प्यावे.
  • थोड्या थोड्या वेळाने हात धुवावे व हँड सॅनिटायझरचा वापर करावा.
  • खाण्यासाठी शक्यतो ताट वाट्यांपेक्षा डिस्पोजेबल वस्तूंचा वापर करावा व एक एक दिवसाने हे एका बंदिस्त बॅग मध्ये दाराजवळ म्हणजे कोरोना रुग्ण राहते त्या खोलीत आतून  ठेवून द्याव्या. घरातील व्यक्तीने ग्लोव्हज घालून या वस्तू घेऊन  घराबाहेर नेऊन त्या जाळाव्या.
  • रुग्णाने आपल्या डॉक्टर / हॉस्पिटलशी संपर्कात राहावे व पुढील त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांना कळवावे –
  • श्वास घेण्यास त्रास.
    छातीत सतत दुखणे / छातीत दाब जाणवणे.
  • झोपेतून उठण्यास खूप वेळ लागणे / रुग्णाला गोंधळल्या सारखे वाटणे.
  • ओठ / चेहरा/ हाता / पायाची बोटे  निळी पडणे.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी?

कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी?

कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी? कोरोनाची जोखीम वाढवणारे काही आजार / इतर घटक आहेत. पण हे नेमके तपासून जोखीम किती आहे हे ओळखण्यासाठी खालील तक्त्याचा उपयोग करता येईल –

जोखीम  वाढवणारे घटक मार्क
वय ५० – ५९ वर्षे
वय ६० च्या पुढे
पुरुष
गरोदर असल्यास
ह्रदयाचा आजार – उच्च रक्तदाब / ह्रदयाचे ठोके अनियमित असणे – एट्रीयल फिब्रीलेशन / हार्ट फेल्यर /आधी ह्र्दय विकाराचा झटका आलेला असणे / अर्धांगवायू / तात्कालिक मेंदूला रक्त प्रवाह कमी झाल्याचा पूर्व इतिहास ( ट्रांन्झीयंट इशेमिक अॅटॅक)
मधुमेह टाईप १ व २
दीर्घकालीन फुफ्फुसाचे आजार ( दमा / सीओपीडी / इंटरस्टीशियल लंग डिसीज )
दीर्घकालीन किडनीचे आजार / डायालिसीस चालू असणे  ( कुठलीही स्टेज )
सिकल सेल / थॅलॅसीमिया / इतर तत्सम रक्ताचे आजार
लठ्ठपणा – बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त / पोटाचा घेर पुरुष – ९० सेमी , स्त्रिया – ८८ सेमी पेक्षा जास्त असणे.
कॅन्सर
एकूण मार्क  
  • 0- ३   –         जोखीम आहे पण कमी
  • ४ – ६    –         जास्त जोखीम
  • ७  पेक्षा जास्त – खूप जास्त जोखीम

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

टीप –

  • कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी? वरील तक्ता देशातील ६ महिन्याच्या साथीच्या अभ्यासावरून काढला आहे व पुढे यात बदल होऊ शकतील.
  • जे यात बसत नाहीत त्यांना जोखीम नाहीच असे समजण्याचा कारण नाही व त्यांनी ही प्रतिबंधक उपाय वापरायचे आहेतच.
  • जोखीम आहे हे घाबरण्यासाठी नाही तर अधिक काळजी घेण्यासाठी व सावध होण्यासाठी आहे.
  • जोखीम असली तरी कमी करता येण्यासारखे व नियंत्रित करता येण्यासारखे आजार नियंत्रित केले तर जोखीम कमी होते.
  • गरोदर असणे जोखीम वाढवणारे असले तरी या काळात गर्भधारणेस हरकत नाही.
  • वरील जोखीम वाढवणारे घटक नाही म्हणजे कोरोना होणारच नाही असे नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

झटके आणि औषधोपचार

झटके आणि औषधोपचार

झटके आणि औषधोपचार झटक्यांचे निदान झाल्यावर त्यावर त्याचा प्रकार बघून योग्य औषध सुरू करावे लागते. गोळ्या सुरू झाल्यावर पालकाला एक डायरी करावी लागते. सुरुवातीला उपचार ठरलेल्या डोसपासून सुरू करूनही झटके येत असल्यास डोस वाढवावा लागतो किंवा एकापेक्षा जास्त झटक्यांचे औषध सुरू करावे लागते. बालरोगतज्ज्ञ किंवा लहान मुलांचे झटक्याचे तज्ज्ञाच्या (पिडीयाट्रीक न्यूरॉलोजीस्टच्या) सल्ल्याने उपचार पूर्ण केल्यास झटके पूर्ण बरे होतात.

उपचार किती काळ घ्यावे लागतात
सहसा उपचार २ वर्ष झटके बंद होईपर्यंत घ्यावे लागतात. काही झटक्यांच्या प्रकारामध्ये २ वर्षांपेक्षा जास्त काळ औषधे देण्याची गरज पडू शकते. औषधे अचानक बंद करता येत नाही. हळूहळू बंद करावी लागतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

उपचार न घेण्याची मुख्य कारणे

  • अनेकदा उपचार सुरू केल्यावर झटके बंद होतात. ते बंद झाल्याने पुढे उपचारांची गरज नाही असे पालकांना वाटते व उपचार थांबविले जातात. काही काळानंतर परत झटके येतात. म्हणून आपल्या डॉक्टरांच्या परवानगी शिवाय झटक्यांची औषधे बंद करू नये. 
  • काही पालक औषधांचे दुष्परिणाम होतील या भीतीने औषधे बंद करतात. 

औषधांच्या दुष्परिणामांचे काय?
आता झटक्याची नवी औषधे आहेत त्यांचे दुष्परिणाम खूपच तुरळक आहेत. काही  दुष्परिणाम जाणवले, तर औषध बदलून देता येते. म्हणून साइट इफेक्टपेक्षा इफेक्ट महत्त्वाचा मानून दुष्परिणामांना घाबरू नये. दुष्परिणामांपेक्षा झटके आल्यास ते जास्त घातक ठरू शकतात. 

मुलांनी काय काळजी घ्यावी

  • झटके येत असलेल्या मुलांनी पाणी, उंची, आग यांपासून सावध राहावे. कारण अशा गोष्टींच्या जवळ असताना झटके आल्यास ते घातक ठरू शकते. 
  • अशा मुलांनी सहसा पोहणे टाळावे, नॉर्मल मैदानी खेळ ते खेळू शकतात. 
  • झटके येत असल्याची माहिती शाळेत द्यावी. शाळेत झटके आल्यास काय करायचे व कुठल्या क्रमांकावर फोन करायचा ही माहिती दिलेली असावी.
  • अशा मुलांनी रात्री उशिरा जास्त वेळ टीव्ही, फोन बघणे किंवा जास्त वेळ व्हिडिओ गेम खेळणे टाळावे. 

झटक्यांसाठी शस्त्रक्रिया
झटके आणि औषधोपचार झटक्यांसाठी शस्त्रक्रियेचा पर्याय असला तरी प्रत्येकाला शस्त्रक्रियाची गरज नसते. काही विशिष्ट प्रकारचे झटके आणि त्यातच मेंदूच्या विशिष्ट भागातून झटक्यांच्या लहरी येत असल्यासच करता येते. कुठल्याही झटक्यांना शस्त्रक्रिया करता येत नाही व यात विशेष प्रशिक्षण घेतलेले न्यूरोसर्जन अनेक गोष्टी बघून शस्त्रक्रियेला लायक रुग्ण निवडतात. बहुतांश झटके औषधोपचाराने बरे होतात.

गैरसमज – झटके आल्यावर कानात चांदी, लोखंडाची बाळी घालणे हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसते. हा गैरसमज असून औषधोपचाराशिवाय कोणत्याही इतर उपायांनी झटके कमी होत नाहीत.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे डेक्झामिथॅझोन हे औषध ‘कोविड-१९’ या महामारीवर रामबाण औषध ठरते आहे, अशा मथळ्याची बातमी एका परदेशी इंग्रजी वृत्तसमूहाने प्रकाशित केली. ती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण यातून असा अर्थ कोणीही काढू नये की कोरोना झाला की, लगेच डेक्झा हे औषध द्यायचे… तसेच हे औषध दिले की लगेचच आजार बरा होणार. हे औषध मग प्रतिबंधासाठीही वापरता येईल, असाही अनेकांचा गैरसमज होण्याच्ची शक्यता आहे.डेक्झामिथॅझोन हे औषध आधीपासूनच कोरोना संसर्गावरील उपचारात वापरले जाते. जे रुग्ण गंभीर होतात, ज्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते अशांनाच दिले जाते. काही रुग्णांमध्ये प्रतिकारशक्तीचा व कुठल्याही विषाणू संसर्ग झाल्यास शरीरात आवश्यक प्रमाणात निर्माण होणारे सायटोकाइन हा घटक जास्त प्रमाणात निर्माण होतो व या घटकाचे वादळ येते, ज्याला सायटोकाइन स्टॉर्म असे म्हणतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे यासाठी डेक्झामिथॅझोन किंवा काही वेळा मिथाइल प्रीडनीसेलोन हे स्टेरॉइड वापरले जातात. पण लक्षणविरहीत व सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचे लक्षण असलेल्या रुग्णांना याची गरज नसते.फक्त डेक्झामिथॅझोनक नव्हे इतर अनेक गोष्टी या ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी वापरल्या जातात… ज्या जीव वाचवण्यास उपयोगी ठरू शकतात. म्हणून डेक्झामिथॅझोन हे उपयोगी पडत असले तरी ते रामबाण उपाय आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डेक्झामिथॅझोन इतर स्टेरॉइड हे बºयाचदा स्वैरपणे व गरज नसताना वापरले जाते. पण ते एक दुधारी शस्त्र आहे. गरज असेल तेव्हा वापरले तर जीव वाचवणारे ठरू शकते व गरज नसताना वापरल्यास गुंतागुंत वाढवणारे ठरू शकते. या आजाराच्या बाबतीत हे खरे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व ठरलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणेच वापरले गेले पाहिजे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब ‘कोरोना’चे बरेच रुग्ण हे जुलाब व उलट्या हे पहिले लक्षण घेऊनही येत आहेत; पण हे उलट्या-जुलाब कसे असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजे. साधारणत: उलट्या या जेवल्यावर किंवा पोटात काहीतरी अन्न असताना होतात. पण कोरोनामध्ये मात्र पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात. जुलाब हे दोन प्रकारचे असतात. पहिला ज्याचा उगम छोट्या आतड्यांमध्ये अन्न न पचल्याने होतो. हे छोट्या आतड्यांच्या कार्यातील बिघाडामुळे होणारे जुलाब पाण्यासारखे, कुठल्याही प्रयत्नाशिवाय अपोआप होणारे व रक्त किंवा शेम नसलेले असतात. जे जुलाब पाण्यासारखे नसतात, घट्ट असतात, जुलाब होताना दुखते आणि शेम पडते, असे जुलाब मोठ्या आतड्याची कार्यक्षमता घटल्यामुळे होतात. शक्यतो कोरोनासारख्या व्हायरसचा परिणाम छोट्या आतड्यांवर होतो व बॅक्टेरियाचा परिणाम हा मोठ्या आतड्यांवर होतो. म्हणून कोरोनामुळे पाण्यासारखे पातळ, वेदना न होता, शेम नसलेले जुलाब होतात. हे जुलाब पातळ असले तर कोलेरासारखे एकाच वेळी जास्त प्रमाणात होत नसून त्या मानाने कमी प्रमाणात असतात. दिवसातून ४ ते ५ वेळा होतात आणि ५ ते ७ दिवस चालतात. यासोबत ताप, पोटदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही असतात. बऱ्याचदा श्वासाशी निगडित लक्षणे जुलाब असलेल्या रुग्णांमध्ये उशिरा येतात. जुलाब कोरोना सोडून इतर कारणांमुळेही असू शकतात व कोरोना रुग्णाचा संपर्क जुलाब कोरोनामुळे आहेत का, याची शहानिशा करण्यास महत्त्वाचे ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

जुलाब असल्यास

  • आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
  • संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब शौचालय भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावे.
  • दिवसातून एकदा शौचालयात ब्लिचिंग सोल्यूशन किंवा सोडियम हायपोक्लोराइटयुक्त पाणी टाकावे.
    शौचालयाच्या नळावर व दाराचे हँडल दिवसातून काहीवेळा सॅनिटायजर स्प्रे मारून पुसून घ्यावे.
  • कमोड वापरत असल्यास शौचालयाचे झाकण फ्लश केल्यावर बंद करावे.
  • एक लिटर पाणी, सहा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी तहान लागेल तसे वारंवार प्यावे व दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाचे पाणी प्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या लॉकडाऊन सैल झाल्या पासून अनेक दुकान उघडली आहेत. किराणा , कपडे , दागिने अशा अनेक ठिकाणी स्त्रिया निवांत खरेदी करत असताना दिसायला लागले आहेत. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही कि कोरोनाची साथ पूर्ण संपलेली नाही  पुढील किमान सहा महिने आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. आणि प्रतिबंधक उपायांचा एक महत्वाचा भाग असणार आहे, गर्दीच्या ठिकाणावरून लवकरात लवकर काम संपवून काढता पाय घेणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या घरातील महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीची जबाबदारी गृहिणींवर असते. या आवश्यक वस्तू खरेदी करताना तसेच कपड्यांसारख्या इतर गोष्टी खरेदी करतांना पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त वेळ लावतात. स्त्रिया हे मुद्दाम करत नसतात तर याला काही मानसशास्त्रीय कारण असतात. स्त्रियांचा टेम्पोरलं व परायटल लोब हा मेंदूचा भाग पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतो. त्यामुळे रंग, हाताला लागणारे संवेदना, वास, एखाद्या वस्तूतील विविधता हे स्त्रियांना लवकर कळते व त्याविषयी त्या जास्त जागरूक असतात. तसेच कुठल्या ही वस्तूच्या खोलात जाऊन ति गोष्ट पाहणे हा स्त्रियांच्या मेंदूचा गुणधर्म असतो. म्हणून कुठली ही खरेदी करताना त्या जास्त चौकस असतात. तसेच त्यांना त्यातले वैविध्य अपेक्षित नसल्याने त्यांना खरेदी करतांना निर्णय घेण्यास वेळ लागतो. पण ही गोष्ट कोरोनाच्या या साथीच्या काळात तापदायक ठरू शकते. याचे कारण कोरोनाची लागण तुमच्या संपर्का पेक्षा ही  किती वेळ संपर्क येतो यावर अवलंबून असते. म्हणूनच आहे. यासाठी पुढील स्त्रियांना या सवयीला काही काळ तरी मुरड घालायला हवी. व ही सवय लावून घेतल्यास शक्य गोष्टी पाळाव्या

  • खरेदी ला जातानाचा आपल्याला दुकानाच्या आत जाताना बाहेर येण्याचा वेळ निश्चित करून घ्यावा. हा वेळ अर्ध्या तासापेक्षा कमी असावा.
  • कुठल्या ही ठिकाणी ४५ मिनिटा पेक्षा जास्त वेळ घालवल्यास जोखीम वाढते.
  • काय खरेदी करायचे आहे हे यादी करून आधीच ठरवून ठेवावे.
  • कपड्यांना सारख्या गोष्टी बघण्यासाठी फोन वर मागवून घ्याव्या.
  • जेव्हा शक्य होईल तेव्हा फोन वर / ई कॉमर्स च्या माध्यमातून खरेदी करावी.
  • दुकानांनी त्यांच्या संकेतस्थळावर थ्रीडी गॅलरी तयार करून वस्तू / कपडे सर्व बाजूंनी बघता येतील अशी सोय करावी म्हणजे ग्राहक घरी बघून काय खरेदी करायचे आहे हा निर्णय दुकानात येण्या आधीच नक्की करू शकतील.
  • छोट्या गावांमध्ये ही फोन नंबर देऊन स्थानिक पातळीवर वस्तू घरपोच देण्याची सोय करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

घटवा वजन, संसर्ग हटवा

घटवा वजन, संसर्ग हटवा

घटवा वजन, संसर्ग हटवा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर जास्त भीती व जास्त मृत्युदर हा इतर जीवनशैलीचे आजार असलेल्यांना आहे. यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या वाहिन्या रुंद असण्याचा आजार (इशेमिक हार्ट डिसीज), कॅन्सर, किडनीचे आजार जे मधुमेहामुळेच जास्त प्रमाणात होतात. कोरोना संसर्ग झाला तर तो गंभीर व जीवघेणा होण्याची शक्यता ज्या या मुख्य पाच आजारांमध्ये आहे, त्या सर्वांच्या मुळाशी लठ्ठपणा हा प्रमुख आजार आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

घटवा वजन, संसर्ग हटवा आजार नसलेल्या व लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्येही कोरोना झाल्यावर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. आज आपण प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि त्यासाठीची औषधे शोधत आहोत. पण याचा सगळ्यात चांगला मार्ग हा आपले वजन नियंत्रणात ठेवणे हा आहे. मुळात कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांसाठी लठ्ठपणा हे एक कल्पवृक्षच असते.आपल्या शरीरात लठ्ठपणा सुरू झाला आहे हे कसे ओळखायचे याचे प्रत्येकाला सहज मोजता येईल, असे एक माप बुलडाणा येथील लठ्ठपणा तज्ज्ञ (ओबेसिटी कन्सल्टंट) डॉ. विनायक हिंगणे सांगतात. डॉ हिंगणे यांच्या मते नाभीच्या खाली १ इंच म्हणजे २.५ सेंटिमीटर खाली पोटाचा घेर पुरुषांसाठी ९० सेंटीमीटर व स्त्रियांसाठी ८० सेंटिमीटर लठ्ठपणा आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज दर्शवते.खरे तर हे प्रमाण पुरुषांसाठी ७८ व स्त्रियांसाठी ७२ च्या पुढे गेले की जागरूक व्हायला हवे आणि जीवनशैली तपासून पाहायला हवी. पण आधीचीपुरुष : ९० व स्त्री : ८० ही मर्यादा मात्र जीवनशैलीत मोठे बदल करणे तातडीने आवश्यक ठरेल. कोरोनापासून बचावासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. हे खरी असले तरी घाबरून जाऊन एक महिन्यात अघोरी पद्धतीने वजन घटवणेही चुकीचे ठरेल. त्यासाठी टप्प्याने प्रयत्न करून जीवनशैलीत बदल आवश्यक असतो. यात प्रामुख्याने आहार, व्यायाम, बैठी जीवनशैली सोडून हालचाल करणे, योग्य प्रमाणात झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन असे अशा अनेक गोष्टी असतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच व्यावसायिक क्षेत्र अनिश्चिततेचा सामना करत आहेत . त्यामुळे नैराश्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच प्रत्येकाला स्वतःची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे  व गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञ – यासाठी पुढील प्रश्नावली वापरता येईल –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                                                            प्रश्न             कधीही नाही बरेच दिवस महिन्यातून अर्धे दिवस जवळपास प्रत्येक दिवस
कुठल्याही कामात / गोष्टीत फार रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे.         २
  निराश वाटणे / उदास वाटणे.     
झोप लागण्यास वेळ लागणे / सतत झोपमोड होणे / खूप जास्त झोप येणे / सतत झोपावे वाटणे.
 थकलेले वाटणे / शरीरात उर्जा नसल्या सारखे वाटणे.
भूक नाहीशी होणे/ खूप खाणे.
स्वतः बद्दल कृतक भावना मनात येणे / वाईट वाटणे / स्वतः अपयशी असल्या सारखे वाटणे / कुटुंबाला आपल्यामुळे नुकसान / हिरमोड झाला असे वाटणे.
कामावर लक्ष केंद्रित न होणे / पेपर वाचणे / टीव्ही बघण्यासारख्या गोष्टी करताना ही लक्ष न लागणे.
 इतके हळू बोलणे की इतरांना नीट ऐकू येत नाही किंवा खूप मोठ्याने बोलणे व सतत इकडून तिकडे चकरा मारणे / नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ असणे.
आपण नसलेलो / मेलेलोच बरे असे विचार मनात येणे / स्वतःला इजा करणे / स्वतःला इजा करण्याची इच्छा होणे.

                                                                                                                                        +              +

Total Score Depression Severity
१-४ अगदी सुरुवातीचे थोडे नैराश्य – minimal depression
५-९ सौम्य नैराश्य – mild minimal depression
१०-१४ मध्यम नैराश्य – moderate depression
१५-१९  मध्यम स्वरूपाचे तीव्र नैराश्य – moderately severe depression
२०-२७ तीव्र नैराश्य – severe depression

वरील सुरुवातीचे नैराश्य असले तरी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता