घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे घोरण्यामुळे झोपेत श्वास गुदमरण्याचा त्रास असणाऱ्यांमध्ये कोरोनाचा मृत्यू दर जास्त आहे. याचे साधे कारण म्हणजे कोरोना मध्ये श्वसन यंत्रणेवर परिणाम होऊन ऑक्सिजनची पातळी कमी होते व घोरताना श्वास गुदमरण्याचा त्रास असल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होण्यात अजून एका कारणाची भर पडते. त्यामुळे कोरोना नसला तरी स्लीप एपनियाचे उपचार करायला हवेच. म्हणजे कोरोनामुळे मृत्युच्या प्रमाणात काही प्रमाणत घट होईल.
प्रत्येक घोरणे म्हणजे स्लीप एपनिया नव्हे
३० ते ४० % भारतीयांना घोरण्याची सवय असते. पण घोरणाऱ्या प्रत्येकाला स्लीप एपनियाचा त्रास नसतो. पण घोरणे हे स्लीप एपनियाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणून घोरण्याचा त्रास असणाऱ्या सर्वांनी आपल्याला स्लीप एपनिया आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
स्लीप एपनिया ची लक्षणे काय –
- झोपताना घोरणे
- रात्री शांत झोप न होणे दिवसा झोप येणे.
- श्वास गुदमरून झोप मोडणे व जाग येणे.
- सकाळी तोंड व घसा कोरडा पडलेला असणे.
- सकाळी उठल्यावर डोके दुखणे.
- दिवसा कामात लक्ष न लागणे.
- मूड बदलत राहणे , नैराश्य , चिडचिड
- घोरताना श्वास अडकत किंवा थांबत असल्याचे इतरांना जाणवणे.
स्लीप एपनिया ची कारणे –
-लठ्ठपणा , जास्त वेळ बैठी काम , व्यायामाचा अभाव , मनोरंजनाची बैठी साधन, हालचाल कमी करणाऱ्या भौतिक सुखसोयी हे याचे मूळ कारण आहे.
– या व्यक्तीं मध्ये लठ्ठपणा सोबतच घशाच्या आतील स्नायू झोपल्यावर शिथिल होतात व त्यामुळे जीभ , पडजीभ मागे पडते , श्वसन मार्गाच्या वरच्या स्नायू शिथिल झाल्याने एकमेकांच्या जवळ येऊन श्वसन मार्ग रुंद होतो व श्वास गुदमरतो.
– नाकाचे हाड वाढलेले किंवा मधला पडदा वाकलेला असणे.
– लहान मुलांमध्ये टॉन्सील वाढलेले असणे.
निदान –
घोरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला झोपेत श्वास गुदमरून ऑक्सिजन कमी होते आहे का हे बघण्यासाठी झोपेचा काही उपकरणांच्या सहाय्याने अभ्यास केला जातो. याला स्लीप स्टडी असे म्हणतात.
उपचार –
-जीवनशैली बदल – वजन कमी करणे , व्यायाम करणे.
– मद्यपान , धुम्रपान सोडणे.
– थंड वातावरणात झोपू नये.
– झोपतना पाठीवर न झोपता एका अंगावर झोपणे.
– एक घरी वापरता येण्यासारखे मशीन वापरून श्वसन मार्ग झोपताना मोठा ठेवणे.
– शस्त्रक्रिया करून श्वसन मार्गातील आतील स्नायू कमी करणे.
कोरोना साठी स्लीप एपनियाचे उपचार महत्वाचे –
घोरताना झोपेत श्वास गुदमरणे धोक्याचे स्लीप एपनियाचा व्यक्ती च्या पूर्ण तब्येतीवर फरक पडतो व कोरोनाची लागण झाली तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणारे एक मोठे कारण स्लीप एपनियाच्या उपचाराने कमी होते व मृत्यू दर कमी होतो.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.