मास्क हँकरचीप यांचा गोंधळ अजून तरी मास्क हा ज्यांना काही त्रास नाही त्यांना वापरण्याची गरज नाही. मास्कचा वापर हा सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्तीला काही होऊ नये म्हणून नाही तर आजारी व्यक्ती कडून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून आहे. मास्क फक्त खालील लोकांनीच वापरायचा आहे
– जे कोरोना पाॅजिटिव्ह आहेत. – जे अशा निदान निश्चित झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत व ज्यांना होम क्वारंटाइन चा सल्ला दिला आहे.- ज्यांना सर्दी खोकला आहे. – अशा रुग्णांचे उपचार करणारे व त्यांच्या संपर्कात असणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ अशा मास्कची गरज असणाऱ्यांना घालताना त्याच्या बाजूला दोरीने धरून घालावा व काढताना मध्ये हात न लावता काढावा. घातलेला मास्क काढल्यावर इतरत्र कुठे ही टाकू नये व मुलांनी त्याला हात लावू नये याची काळजी घ्यावी. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलला पाहिजे. त्यानंतर मास्क ब्लिचिंग सोल्युशन मध्ये थोडा वेळ ठेवून थोड्या वेळाने जाळावा किंवा पुरावा.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
सध्या मास्क हँकरचीप यांचा गोंधळ सुरु आहे बाजारात उपलब्ध असलेले कॉटन चे मास्क, साधे मास्क व तोंडाला लावलेला हातरुमाल हा काहीही उपयोगाचा नाही. जो मास्क तीन पदरांचा म्हणजे तीन लेयर्स चा असतो तोच उपयोगाचा असतो. सध्या रस्त्यावर एक पदरी मास्क विकले जाऊन खूप लोकांची फसवणूक होते आहे. हे मास्क विकत घेऊ नये. बरेच जन कपड्याचे मास्क वापरून ते रोज धुऊन वापरत आहेत. हे चुकीचे आहे व उपयोगाचे नाही. – अनेक जन एन ९५ मास्क मिळवण्यासाठी ही धडपडत आहेत. पण हा फक्त डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ साठीच गरजेचा आहे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता