हात धुण्याचे नियम सध्या हात धुणे हे कोरोना टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे. वारंवार हात धुवावे म्हणजे नेमके किती वेळा धुवावे व कसे धुवावे हे समजून घेतले पाहिजे. हात धुण्यासाठी साबण आणि पाणी पुरेसे आहे. त्यासाठी हँड सॅनीटायझर किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनीटायझरची मुळीच गरज नाही.
त्यातच लिक्विड सोप असल्यास बरे पण नसल्यास साधा साबण ही पुरे. याउलट असे काही विषाणू आहेत जे साबण आणि पाण्याने प्रभावी पणे हातावर निष्प्रभ होतात पण सॅनीटायझरने होत नाहीत. हात कसे धुवावे यासाठी आदर्श ७ स्टेप्स आहेत. त्या नेमक्या काय आहेत हे खाली क्युआर कोड स्कॅन करून व्हिडीओ मध्ये बघता येतील. या सगळ्या स्टेप्स पूर्ण करायला किमान १ मिनिट लागायला हवा. हात धुताना प्रत्येक वेळेला ते एकमेकांवर घासले जाणे महत्वाचे असते. शक्य असल्यास हात धुवून झाल्यावर नळ त्याच धुतलेल्या हाताने नव्हे तर कोपराने बंद करावा. हात धुतल्यावर तो स्वच्छ नॅपकीन ला पुसावा. घरात प्रत्येकाचा शक्यतो वेगळा छोटा नॅपकीन ठेवावा. रोज तो गरम पाण्यात ठेवून, पिळून वळवायला ठेवावा.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
हात धुण्याचे नियम समजून घेणे महत्वाचे आहे हात बाहेर जाऊन आले तेव्हा, घरात एखादी नवीन व्यक्ती येऊन गेली असल्यास, जेवणा आधी व शौचानंतर धुवायचे आहेत. अगदी घरात असताना दर अर्ध्या एक तासाला हात धुण्याचीही गरज नाही. तसेच हात धुवून झाल्यावर जिथे शक्य आहे तिथे हाता ऐवजी कोपराचा वापर करावा, उदाहरणार्थ दरवाजा ढकलणे, लाईट चालू , बंद करणे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता