ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सध्या राज्यातील काही भाग हा ऑरेंज व ग्रीन झोन आला असला तरी या भागासाठी आता कोरोनाचा धोका १०० % टळला असे अनेकांना वाटते आहे. या विषयी आपला भाग अमुक अमुक झोन मध्ये आल्या बद्दल शुभेच्छा, अभिनंदनाच्या इमेजेस ही समाज माध्यमांवर काही जणांनी प्रसारित केल्या. पण ऑरेंज म्हणजे गेल्या १४ दिवसात १५ केसेस पेक्षा कमी केसेस अढळल्या नाहीत आणी ग्रीन झोन म्हणजे गेल्या २८ दिवसात एक ही रुग्ण अढळला नाही एवढाच आहे. रुग्ण संख्या कमी असल्याने स्थानिक उद्योगांना चालना मिळावी म्हणून काही गोष्टींना परवानगी दिली आहे. पण याचा अर्थ इतर भागातून आत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीतून आपला कोरोना बाधिताशी संपर्क येणारच नाही म्हणून साजरीकरण करू नये व नियम धुडकावून लावू नये. या दोन्ही झोन मधील लोकांनी पुढील गोष्टी पाळाव्या –
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! ज्या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी मिळतात, नित्य सेवा, खरेदी तिथेच कराव्या, गरज नसताना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये.
- परवानगी असली तरी अनावश्यक प्रवास टाळावा.
- कुठल्याही झोन मध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी आहे या सूक्ष्म गोष्टीचा विसर पडू देऊ नये.
- परवानगी असली तरी गरज नसलेल्या गोष्टी, कपडे, चैनीच्या गोष्टी उगीचच ई कॉमर्सच्या माध्यमातून मागवू नये.
- कुरिअर व पोस्ट सेवा ही सर्व झोन मध्ये सुरु झाल्या असल्या तरी उगीचच या सेवेचा लाभ घेऊ नये. अत्यावश्यक गोष्टींसाठीच याचा वापर करावा. कागदपत्रे उगीचच पोस्टाने पाठवू नये. त्यासाठी इ- मेलचाच वापर करावा.
- ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सोशल डीस्टन्सिंगच्या नियमाची सर्वात जास्त तुडवणूक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर होण्याची शक्यता आहे व अचानक या दुकानां भोवती मोठी गर्दी उसळते आहे. या साठी मद्य विक्रेत्यांनी स्वतःला शिस्त लावून सोशल डीस्टन्सिंग व दुकानांभोवती लोक एकमेकांपासून लांब उभे राहतील याची काळजी घ्यावी .
- कुठल्या ही झोन मध्ये असले तरी ताप, सर्दी, खोकल्याच्या व्यक्तीने घरा बाहेर निघायचे नाही आहे व स्वतःला कटाक्षाने इतरांपासून १४ दिवस लांब ठेव्याचे आहे.
- डॉ. अमोल अन्नदाते
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता