फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! नुकताच कोरोना सदृश लक्षणे व मधुमेह हा कोरोनाची शक्यता वाढवणारा घटक असलेल्या एका रुग्णाचा संपर्क झाला. शासनाच्या फिवर क्लिनिकला जाऊन तपासणीचा सल्ला देऊनही अशा वेळी फक्त शक्य तितके गरम पाणी प्या असा सल्ला वाचल्याने एवढेच करून मी ठीक होईल अशा या रुग्णाच्या हट्टामुळे जवळचे नातेवाईक ही वैतागले. कोमट / गरम पाण्यासह अनेक उपचारांबद्दल समाज माध्यमांवर सल्ले दिले जात आहेत. कुठल्या ही ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णाने शासनाच्या जवळच्या फिवर क्लिनिक किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन दाखवावे. तसेच संशयित व कोरोना बाधित लक्षण विरहीत तसेच लक्षणांसह असलेल्या रुग्णाचे नेमके काय उपचार करायचे हे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अॅलोपॅथीचे उपचार ठरलेले आहेत . गरम पाणी, आयुर्वेद, होमिओपथी हे प्रतिबंधासाठी ठीक आहेत व त्यासाठी जरूर वापरावे  तसेच उपचार म्हणून ही सोबत घेण्यास हरकत नाही. आयुष चे काय उपचार अॅलोपॅथी सोबत घ्यायचे आहेत हे ठरवण्यासाठी शासनाने एक कृती गट ही स्थापन केला हे व तो लवकरच या विषयी निर्णय घेईल . पण हे इतर व आयुष  उपचार सुरु करायचे म्हणजे अॅलोपॅथीचे उपचार बंद करायचे असे नाही. तसेच डॉक्टरांच्या माहिती शिवाय समाजमाध्यमांवर सांगितले जाणारे घरगुती उपचार अॅलोपॅथीचे उपचार बंद करून घेऊ  नये. फक्त घरगुती उपचार  घेत घरी बसने  खूपच धोका दायक ठरू शकते .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

      फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! हे सर्व कोरोनावर अॅलोपॅथी मध्ये उपचारच नाहीत या गैरसमजा पोटी होते आहे. उपचार नाहीत असे म्हणण्यापेक्षा हा व्हायरल आजार असल्याने इतर कुठल्याही व्हायरल आजरा प्रमाणे वेळेप्रमाणे आपोआप बरा होणारा आजार आहे. पण आजार बरा होत असताना शरीराला,  फुफ्फुस व इतर आजारांना  इजा होऊ नये म्हणून रुग्णाचे निरीक्षण आवश्यक असते. तसेच कोरोनावर उपचार ही आहेत व काहीं उपचारांवर संशोधन सुरु आहे . बरीच औषधे ही काही प्रमाणात विषाणूची संख्या कमी करतात व ती वापरली जात आहेत. तसेच संसर्गा नंतर शरीराला इजा होण्याची चिन्हे दिसत असली तर ती इजा कमी करणारी किंवा रोखणारी औषधे ही दिली जात आहेत. काही रुग्णांना केवळ ऑक्सिजन कमी पडते व तेवढे काही दिवस दिले तरी ते बरे होतात. म्हणूनच उपचार नाहीत या भ्रमात केवळ घरगुती उपाय करत कोणीही घरी थांबू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ?

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे?

इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे? सध्या अनेक ऑफिस, घरांमध्ये इन्फ्रारेड थर्मामीटर वापरले जाते आहे. अनेक ऑफिस मध्ये केवळ सोपस्कार म्हणून लांबून हे थर्मामीटर शरीरावर कुठे ही मारले जाते. त्यामुळे या थरमॉमीटरचा योग्य वापर करण्यास शिकले पाहिजे. तसेच इतर पद्धतीने ताप कसा मोजायचा हे ही कळले पाहिजे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? इन्फ्रारेड थर्मामीटर वापरण्याचा एक फायदा असा आहे की यामुळे ताप असलेल्या व्यक्तीचा आणि थर्मामीटरचा संपर्क येत नाही. पण याचा तोटा हा आहे कि सार्वजनिक ठिकाणी याचा वापर करताना सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अर्थात याला ही उपाय आहे. हे थर्मामीटर कसे वापरावे हे जाणून घेऊ –

  • इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? आधी थर्मामीटर खाली अंगठा ठेवण्यासाठीचे बटन हलक्याने दाबून सुरु करावे. हे थर्मामीटर जोरात दाबून सुरु करण्याची गरज नाही व अगदी हलक्याने हाताळायचे असते.
  • आधी फॅरनहाईट की सेल्सियस याचे सेटिंग निश्चित करून घ्यावे
  • शक्यतो फॅरनहाईटचीच सेटिंग वापरावी. आपल्या देशातील डॉक्टर फॅरनहाईट मध्ये शरीराच्या तापमानाला सरावलेले आहेत. यामुळे तुमच्या डॉक्टरला तापमान लगेच कळेल.
  • तापमान घेतना इन्फ्रारेड थर्मामीटर हे कपाळाच्या मध्यभागी किमान ३ ते कमाल १५ सेंटीमीटर लांब पकडावे . कपाळ सोडून शरीराच्या इतर भागावर या थर्मामीटरने तापमान मोजू नये
  • तापमान घेताना अगदी बाहेर उन्हात किंवा उन्हातून आल्या आल्या किंवा ऑफिस मध्ये एसी / सेन्ट्रल एसी चालू असताना घेऊ नये. तापमान हा नॉर्मल रूमच्या तापमानाला घ्यावे .
  • तापमान घेताना कपाळावर घाम किंवा नुकतीच अंघोळ केली असल्यास किंवा चेहरा धुतला असल्यास तो पुसून वाळू द्या व त्यानंतर १० मिनिटांनी तापमान घ्या.
  • हे थर्मामीटर बऱ्यापैकी नेमकेपणाने तापमान मोजू शकत असले तरी खऱ्या तापमानात ०.१ डिग्रीचा फरक असू शकतात असे थर्मामीटर बनवणाऱ्या कंपन्या सांगतात. वास्तवात हा फेरफार १ डिग्री पर्यंत ही होऊ शकतो. तरी ही घरी सुरुवातीच्या तापमान चाचणी साठी हे थर्मामीटर वापरण्यास हरकत नाही.
  • तापमान जास्त आल्यास परत एकदा तापमान तपासावे.
  • तापमान १०२ च्या पुढे दाखवत असल्यास घरातील इतर नॉर्मल व्यक्तींचे तपासून पाहावे. ते नॉर्मल आल्यास हा मशीनचा बिघाड नसून दाखवलेले तापमान योग आहे असे समजावे.
  • इन्फ्रारेड थर्मामीटर कसे वापरावे ? सार्वजनिक ठिकाणी / ऑफिस मध्ये तापमान घेतना सोशल डीस्टन्सिंग पाळले जाण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे राहणे पेक्षा एका रांगेत एकमेकांच्या बाजूला विरुद्ध दिशेने तोंड करून उभे राहावे. याने तापमान ही योग्य मोजता येईल व समोरासमोर संपर्क ही येणार नाही. जास्त लोकांची रोज तपासणी करावी लागत असल्यास फक्त हातच बाहेर येईल असे चेंबर तयार करता येतील.
  • तापमान मोजताना थ थर्मामीटरचा बाजूला करताना प्रकाशाचा झोत  डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण इन्फ्रारेड प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
  • घरामध्ये हे थर्मामीटर उंचीवर किंवा कपाटात ठेवावे म्हणजे ते लहान मुलांच्या हाती लागणार नाही असे ठेवावे कारण लहान मुले यासोबत खेळतात थर्मामीटर चालू करून इन्फ्रारेड  प्रकाश एकमेकांच्या डोळ्यात / स्वतः च्या डोळ्यात टाकू शकतात. त्यामुळे मुलांच्या डोळ्याला इजा होऊ शकते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनावर उपचार

कोरोनावर उपचार

कोरोनावर उपचार”कोरोना हा ‘व्हायरल’ म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. जगातील कुठल्याही ‘व्हायरल’ आजारावरचे  पहिले व सगळ्यांत मोठे औषध म्हणजे वेळ.  हा आपोआप बरा होणारा आजार असला, तरी  तो बरा होताना शरीरातील अवयवांना इजा होते. पण कोरोनामुळे नेमके काय नुकसान होते  यावर संशोधन व अभ्यास सुरू आहे.  पण मग सध्या कोरोनावर कोणते उपचार सुरू आहेत? कोणती औषधे त्यावर प्रभावी ठरताहेत? प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे कोणती? संशोधन सध्या कुठल्या पातळीवर आहे आणि  भारतातली आजची स्थिती काय?

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनावर उपचार कोरोना हा एक असाध्य आजार आहे आणि यासाठी उपचारच नाहीत असा एक गैरसमज सगळीकडे पसरला आहे. उपचारांच्या संदर्भात एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, कोरोना हा सर्दी-खोकल्यासारखा व्हायरल म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. मात्न तो सर्दी-खोकल्यापेक्षा तीव्र आणि जास्त हानिकारक आहे. कोरोना व सर्दी-खोकलाच नव्हे तर जगातील इतर कुठला ही व्हायरल यावर पहिले व सगळ्यात मोठे औषध असते ते म्हणजे वेळ. अर्थात हा आपोआप बरा होणारा आजार आहे. पण तो बरा होत असताना त्यामुळे शरीरातील अवयवांना इजा होते व त्यातून शारीरिक, मानसिक पातळीवर या आजारामुळे हानी होते. कोरोनामुळे नेमके कुठल्या पातळीवर नुकसान होते यावर ही निरीक्षण व संशोधनातून अभ्यास सुरू आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू व शारीरिक हानीचे व्यवच्छेदक लक्षण आहे शरीरातील लाल पेशींची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करणे. म्हणून शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्त व रक्तवाहिन्यांना इजा होऊन फुफ्फुस्साच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहाचा वेग मंदावतो व रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कोरोनावर विविध पातळ्यांवर सध्या सुरू असलेले उपचार

अ. व्हायरसची संख्या कमी करणारी औषधे

ब. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपचार

क. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणे

ड. गुंतागुंत व शरीराला होणारी इजा टाळणे

इ. लक्षणांवर उपचार

अ. व्हायरसची संख्या कमी करणारी औषधे

1. रेमडेसिवीर :– हे औषध कोरोना सोडून कशासाठी वापरले जात होते – इबोला संशोधन सध्या कुठल्या पातळीवर – नुकतेच अमेरिकेतील एका संशोधनात रेमडेसिवीर हे औषध दिलेले रुग्ण औषध न दिलेल्या इतर रुग्णांपेक्षा अधिक वेगाने बरे झाले. कॅनडामध्ये झालेल्या दुसर्‍या संशोधनात हे औषध शरीरात कोरोनाची वाढ होण्यापासून रोखत असल्याचे आढळून आले. शिकागो विद्यापीठात 125 कोरोना रु ग्णांना हे औषध देण्यात आले. त्यापैकी 123 रु ग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले. तरीही या औषधाबद्दल निश्चितपणे सांगण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.भारतातील स्थिती- भारताने फेब्रुवारी महिन्यात गिलियाड या कंपनीला पेटंटसाठी मंजुरी दिली आहे. पण हे औषध अजून भारतात उपलब्ध नाही.

2. लोपिनावीर / रेटीनोवीर :- कोरोना सोडून कशासाठी वापरले जात होते – एचआयव्ही संशोधन सध्या कुठल्या पातळीवर – ऑक्सफर्ड विद्यापीठात ट्रायल्स सुरू आहेत; पण अजून अंतिम निष्कर्ष हाती नाहीत. चीनमधील जीन यीन-टान रुग्णालयात 199 रुग्णांना हे औषध देण्यात आल्यावर लक्षणांमध्ये सुधारणा दिसून आली. मेड या र्जनलमधील संशोधनात मात्न या औषधांचा फारसा फायदा न झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.भारतातील स्थिती- औषध उपलब्ध आहे, देशात काही ठिकाणी वापरलेही जाते आहे. पण भारतात अजून पेटंटसाठी कोणालाही मंजुरी नाही.

3. फावीपीरावीर :- कशासाठी वापरले जाते – फ्लू – जास्त प्रमाणातील सर्दी, खोकला संशोधन सध्या कुठल्या पातळीवर – चीनमध्ये 340 रुग्णांवर झालेल्या अभ्यासात विषाणूचा शरीरात गुणाकार रोखण्यास व पसरण्याचे प्रमाण कमी करण्यास हे औषध प्रभावी ठरले.भारतात स्थिती – सध्या जपानमध्ये या औषधाची निर्मिती होते. भारतीय कंपन्या याच्या निर्मितीसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

4. वॅलप्रोइक अँसिड (सोडियम वॅलप्रोएट) :– कशासाठी वापरले जाते? – झटके संशोधन – जनुकीय तंत्नज्ञान व जैव तंत्नज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राने एका पत्नाद्वारे या औषधाचे क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची मागणी करून हे औषध प्रभावी ठरू शकण्याची शक्यता वर्तवली आहे. पण अजून भारतात याचे कोरोनासाठी ट्रायल्स सुरू झालेले नाहीत.भारतात स्थिती – हे औषध भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व स्वस्तही आहे; पण अजून वापर किंवा संशोधन सुरू झालेले आही. भारतात स्थिती – आयसीएमआरने हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून आरोग्य क्षेत्नात काम करणारे व कोरोनाशी थेट संपर्क येणारे सर्व कर्मचारी यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील धारावी व इतर हॉटस्पॉट्समध्ये हे सर्व जनतेला प्रतिबंध म्हणून देण्यात आले आहे. पण अजून संशोधनात याची सर्व लोकसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी देण्याची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही. भारतात हे औषध मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहे. म्हणून या औषधावर संशोधन करण्याची आपल्याला चांगली संधी आहे. पण अजून अभ्यास सुरू झालेले नाहीत.

6. अँझिथ्रोमायसीन :- वापरले जाते- सर्दी, खोकला, न्युमोनिया, श्वसनाचा खालच्या व वरच्या बाजूचा जंतुसंसर्ग संशोधन – फ्रान्समधील एका अभ्यासात अँझिथ्रोमायसीन तसेच काही रुग्णांमध्ये या सोबत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केल्यास उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पण संशोधनातील रुग्णसंख्या खूपच कमी असल्याने यावर अजून संशोधन आवश्यक आहे. भारतात स्थिती- हे औषध काही प्रमाणात वापरले जात असले तरी अजून संशोधन सुरू झालेले नाही. कॅनडामधून अँझिथ्रोमायसीन व हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन यांचा एकत्रित वापर करून जगभरातून रु ग्णालय एका मोठय़ा संशोधनात्मक अभ्यासात सहभागी होणार आहेत. पण भारतातून एकाही रुग्णालयाने यात अजून सहभाग नोंदवलेला नाही. आपल्या देशाने यात सहभागी व्हायला हवे कारण यामुळे निश्चित निष्कर्ष हाती येतील.

5. हायड्रॉइक्सिक्लोरोक्वीन :– कशासाठी वापरले जाते- मलेरिया, संधिवात संशोधन – ब्रिटिश मेडिकल र्जनलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात या औषधाचा मृत्यूच्या प्रमाणावर काहीही परिणाम झालेला नाही. काही अभ्यासात मात्न हे औषध दिल्याने 70 टक्के रुग्णांमध्ये विषाणू संख्या शरीरात बर्‍यापैकी कमी झाल्याचे दिसून आले. फ्रान्समधील 30 रुग्णांवर केलेल्या अभ्यासात या औषधाचा वापर फायदेशीर असल्याचे दिसून आले. पण 30 ही रुग्णसंख्या खूप कमी असल्याने हे औषध फायदेशीर ठरेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. हृदय अचानक बंद पडणे व हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे हे या औषधाचे दोन प्राणघातक दुष्परिणाम आहेत. पण 14 ते 60 या वयोगटात हृदयरोग नसल्यास हे औषध सुरक्षित आहे. भारतातस्थिती – आयसीएमआरने हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून आरोग्य क्षेत्नात काम करणारे व कोरोनाशी थेट संपर्क येणारे सर्व कर्मचारी यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील धारावी व इतर हॉटस्पॉट्समध्ये हे सर्व जनतेला प्रतिबंध म्हणून देण्यात आले आहे. पण अजून संशोधनात याची सर्व लोकसंख्येला प्रतिबंध करण्यासाठी देण्याची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही. भारतात हे औषध मोठय़ा प्रमाणावर वापरले जात आहे. म्हणून या औषधावर संशोधन करण्याची आपल्याला चांगली संधी आहे. पण अजून अभ्यास सुरू झालेले नाहीत.

7. आयवरमेकटीन :–कशासाठी वापरले जाते- जंत, खरु ज संशोधन – या औषधावरचे सर्व संशोधन शरीराच्या बाहेर व शरीरातून पेशी बाहेर काढून झाले आहे. अशा संशोधनात 24 तासात विषाणू संख्या कमी व 48 तासात पूर्ण नाहीशी झाल्याचे दिसून आले आहे. जीवित व्यक्तीवर संशोधन अजून सुरू आहे व कुठलेही निष्कर्ष अजून हाती आलेले नाहीत. भारतात स्थिती- अजून या औषधाचा वापर व संशोधन सुरू झालेले नाही.

. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपचार

  • इंटरफेरोन बिटा :- कशात वापरले जाते – या आधी सार्स व कोरोनाच्या इतर जातकुळीतील विषाणूमुळे होणारा र्मस संशोधन- जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला उपचारामध्ये महत्त्वाचे स्थान दिले असून, लोपिनावीर, रेटीनोवीर व इंटरफेरोन बिटा अशा तिन्हींचा एकत्रित वापर करून काय परिणाम होतो यावर ट्रायल्स सुरू आहेत. आधी सार्सच्या अनुभवावरून हे औषध चांगले काम करू शकेल, असा अंदाज आहे. इंटरफेरोन बिटा शरीरात काय करते- इंटरफेरोन बिटा हे शरीरात विषाणू संसर्ग झाल्यावर नैसर्गिक प्रतिकारशक्तीची यंत्नणा कार्यरत करण्यासाठी व ती चालवण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे प्रोटीन आहे. एरवी इतर विषाणू संसर्गात हे नैसर्गिकरीत्या निर्माण होते. पण कोरोनामध्ये हे निर्माण होण्याचे प्रमाण कमी असल्याने फुफ्फुसांना इजा होते. भारतात स्थिती – भारतात हे औषध उपलब्ध असले तरी ते खूप महागडे आहे व जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. काही ठिकाणी वापरले जाते आहे.

2. प्लाज्मा थेरपी :– कोरोनाच्या बर्‍या झालेल्या रु ग्णांच्या शरीरात कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. ही अँण्टिबॉडीजच्या माध्यमातून प्लाज्मामध्ये असते. बर्‍या झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाज्मा वेगळा करता येतो. यासाठी थोड्या प्रमाणात रक्तदान करावे लागते. हा प्लाज्मा कोरोनाग्रस्त रुग्णाला दिल्यास त्याच्यात ही प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. चीन व अमेरिकेत यावर काही प्रमाणात प्रयोग झाला; पण अजून खूप कमी लोकांना हा दिला गेल्याने याची निश्चित उपयुक्तता सांगता येणे कठीण आहे. कोरोनावर उपचार आयसीएमआरने या उपचाराला क्लिनिकल ट्रायल म्हणजे प्रयोगासाठी परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात प्लाज्मा थेरपी दिलेला पहिला रुग्ण अजूनही अत्यवस्थ आहे.

. शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवणे

1. ओझोन थेरपी :- लाल ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने ऑक्सिजन देऊनही उपयोग होत नसल्यास ओझोन द्यावे असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. यावर र्जमनीमध्ये काही प्रयोग सुरू आहेत व संशोधन केले जात आहे. भारतात अजून याचा वापर सुरू झालेला नाही.

. गुंतागुंत शरीराला होणारी इजा टाळणे

1. स्टीरॉइड – व्हेण्टिलेटरवर टाकण्याची वेळ आलेल्या रुग्णांना व फुफ्फुसांना इजा होत असलेल्या काही रु ग्णांना स्टीरॉइड्स देऊन उपचार केले जात आहेत. यावर संशोधन सुरू आहे व अंतिम निष्कर्ष आले नसले तरी परदेशातील डॉक्टरांना  याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हेण्टिलेटरवरील रु ग्ण वाचवण्यास यामुळे मदत होते आहे.

2. टोकलीझूमॅब – कोरोनामध्ये सार्स ही जीवघेणी स्थिती निर्माण होते तेव्हा शरीरात सायटोकाइन या पेशींची वाढ होते. याला सायटोकाइनचे वादळ असे म्हटले जाते. त्यासाठी टोकलीझूमॅब हे औषध वापरले जाते. सध्या या औषधाचे परदेशात ट्रायल्स सुरू आहेत. भारतातही हे औषध वापरले जाते आहे.

इ. लक्षणांवर उपचार – यासाठी पॅरासिटॅमॉल व सर्दी-खोकल्याची इतर साधी औषधे वापरली जातात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही

विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन डी म्हणजेच ड जीवनसत्व हे प्रतिकारशक्ती साठी खूप महत्वाचे असते. विटॅमिन  डी घेतल्यावर कोरोना होणारच नाही असे म्हणता येणार नाही. पण मात्र कोरोनाचा संसर्ग झाला तर विटॅमिन  डी ची पातळी शरीरात नॉर्मल असल्यास कोरोनाशी लढण्यास त्या व्यक्तीचे शरीर अधिक सक्षम असेल. तसेच कोरोना मधील मृत्यू साठी कारण ठरत असलेली ‘एआरडीएस’ म्हणजे फुफ्फुससाला इजा होऊन ती निकामी होण्याचे प्रमाण ही विटॅमिन  डी शरीरात नॉर्मल असल्यास कमी प्रमाणात होऊ शकते. किंवा ते झाले तरी बरे होण्यास विटॅमिन  डी ची मदत होऊ शकते. याशिवाय सायटोकाईन या कुठल्याही जंतुसंसर्गात थोड्या प्रमाणात स्त्रवणाऱ्या एका घटकाचे  कोरोनाच्या गंभीर होणाऱ्या रुग्णांमध्ये मात्र  शरीरात वादळ येते.याला सायटोकाईन स्टॉर्म असेच म्हणतात. हे थोपवण्यात ही विटॅमिन  डी उपयोगी पडते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन  डी हे आपल्याला अन्नातून फारसे मिळत नाही. याचा महत्वाचा स्त्रोत असतो सूर्य प्रकाश. पण सूर्यप्रकाशातून विटॅमिन  डी पुरेशा प्रमाणात मिळवण्यासाठी रोज सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान कधीही अर्धा तास कमीत कमी ( अर्ध्या बाहीचा पातळ शर्ट व अर्धी चड्डी ) कपडे घालून उन्हात थांबून आपल्या त्वचेचा जास्तीत संपर्क सूर्य प्रकाशाशी येऊ दला पाहिजे. पण आजच्या युगात हे कोणाला ही शक्य नाही. म्हणून देशातील ८० टक्के लोकांमध्ये विटॅमिन  डी ची कमतरता आहे. खर तर या कमतरतेमुळे हाडांच्या ही अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून कोरोनाच्या साथी आधी विटॅमिन  डी कमतरतेची दुर्लक्षित साथ अनेक दशकांपासून आपल्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या निमित्ताने सगळ्यांनी विटॅमिन  डी घेऊन ही विटॅमिन  डी कमतरतेची  साथ संपवता येईल. यासाठी ६०,००० IU विटामीन डी दर आठवड्याला ८ आठवडे १२ वर्षा पुढील सर्वांनी घेण्यास हरकत नाही. या नंतर दर महिन्याला एकदा ६०,००० IU घ्यावे. विटॅमिन डी घेण्यास हरकत नाही विटॅमिन  डी घेताना रिकाम्या पोटी घेऊ नये. जेवणानंतर घ्यावे कारण ते चरबीत विरघळणारे विटॅमिन  असल्याने जेवणा सोबत शरीरात चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाते. शक्य झाल्यास दर वाढदिवसाला आपल्या रक्तातील विटॅमिन  डी ची पातळी तपासून पहावी. तिचे प्रमाण पुढील प्रमाणे असते

अपेक्षित नॉर्मल पातळी – ५० – ६० नॅनो ग्रॅम प्रती मिलीलीटर ( ng / ml )

पातळी कमी / अपुरी  असणे – २० – ३० ng/ml तीव्र कमतरता – २० ng / ml पेक्षा कमी

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक

कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक म्हणजे नेमके काय?

कोरोना हा व्हायरस असून ज्याप्रमाणे सर्दी खोकला हा त्रास व्हायरसमुळे होतो तसाच कोरोना मुळे ताप, श्वास घेण्यास त्रास होणे असा श्वसन यंत्रणेचा त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे पँन्डेमीक जाहीर केले आहे. पँण्डेमिक म्हणजे नेमके काय तर जो आजार आंतरराष्ट्रीय सीमा पार करून इतर अनेक देशात कमी वेळात पसरतो त्याला पँण्डेमिक असे म्हटले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कुठल्याही आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्यासाठी तीन मुख्य गोष्टी जबाबदार असतात. जो विषाणू नवा असतो, एकापेक्षा जास्त देशात कमी वेळात पसरतो , आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याचा संसर्ग होतो तेव्हा पँण्डेमिक जाहीर केले जाते. कोरोना व्हायरस चे पँण्डेमिक जाहीर झाले याचा अर्थ एवढाच की हा आता जगभरात सर्व देशांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. पँन्डेमीक म्हणजे या आजारामुळे खूप जास्त मृत्यू होणार आहेत असे नाही. पण मात्र प्रतिबंध न केल्यास थोड्या कालावधीमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या आजाराचे पँण्डेमिक जाहीर करण्याचा हेतू हा इतर देशांना सतर्क करणे व ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशांमध्ये शासन व सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर सतर्कता वाढवणे हा असतो

डॉ. पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने…

Amol Annadate Articles

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातीवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का , यावर अजून चौकशी सुरु आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

डॉ. पायल तडवी
डॉ. पायल तडवी साठीचा जनआक्रोश

जर डॉ. पायल तडवी च्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे. पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरु असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे टाकणार नाहीत याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्या वरून उभी फुट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रा सारख्या थेट जगण्या मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकरे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्का साठी लढा यातून कधी नव्हे ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते. आरक्षण हवे नको हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत , आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवी सारख्या तरूण डॉक्टरचा जीव जातो तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मा पलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये. तसेच कुठला ही बदल आणताना तो अचानक आणला तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडा ही शासनाने यातून घ्यायला हवा.

Amol Annadate Aticles
डॉ. अमोल अन्नदातेंचे वैद्यकीय क्षेत्रावरील इतर लिखाण वाचण्यासाठी क्लीक करा.

या पलीकडे जाऊन या घटने मध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कांगोरे ही तपासून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येत जाती चा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला तरी तिच्यावरील ताण ही नाकारला जाऊ शकत नाही. तसेच काहीही कारण असले तरी सोबत काम करणार्या कनिष्ठ , वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले हा सगळ्या कारणां पलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक , शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दर वर्षी केईम, सायन, नायर येथील तीन – चार निवासी डॉक्टरांना टी.बी चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दर वर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणा पायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधून मधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सिनियर – ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी ही भावना असली तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातीवाचक शेरे म्हणा, किव्हा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायल सारख्या निरागस डॉक्टरच्या अत्म्हत्यातून कधीतरी समाजा पुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्या मोठ्या डिग्रीची रांग नवा मागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे तर चांगला संवेदनशील माणूस व समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्व ही तयार करायचे आहे हे वूसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे , मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन ही करावे लागणार आहे. तसेच काही ही झाले तरी समोर आलेल्या आपल्या कनिष्ठ – वरिष्ठ, जात – धर्म हे भेदभाव सोडून आपल्या सहकारी डॉक्टरशी प्रेमाने व सह –वेदनेची ( एमपथी ) भावना ठेवून वागण्याचे धडे गिरवावे लागणार आहेत. आपल्या सहकार्यासाठी माणुसकीची भावना हीच रूग्णा साठी प्रेमाची आणी पुढे आपल्या व्यक्तिगत, व्यवसायिक यशाची पहिली पायरी आहे.

आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत डॉ. पायल तडवी सारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच नव्हे तर समाजाचा या क्षेत्रा विषयीचा दृष्टीकोन हि पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचार पूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे. तसेच या वर केवळ तात्पुरत्या मलम पट्ट्या नव्हे तर याच्या मुलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता मानसिक दृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायल च्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे .

सदरील लेख ३० मे, २०१९ रोजी लोकमत च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

Amol Annadate

डॉ.अमोल अन्नदाते | www.amolannadate.com
reachme@amolannadate.com