मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा सध्या सर्वांना मास्क घालण्यास सांगितले आहे. पण अनेकांना मास्क कसा घालावा हे अजून माहित नाही. मास्क घालताना व काढताना दोरीला धरूनच वापरावा. तो मास्कच्या तोंड झाकण्याच्या भागावर हात लावून वापरू नये. घालताना नाकाच्या शेंड्याच्या वर पर्यंत म्हणजे नाक सुरु होते तिथे वर पर्यंत यायला हवा. खाली हनुवटी पूर्ण झाकली जाऊन खालचा भाग पूर्ण ह्नुवटीच्या मागे जायला हवा.मास्क घालताना चुका टाळा कानाच्या मागे दोऱ्या लावताना किंवा बांधताना इतक्या घट्ट लावाव्या की चेहऱ्या वर दोन्ही बाजूला मास्क येईल तिथे फार मोकळी जागा सुटायला नको. मास्क काढत असताना परत मधल्या भागाला हात न लावता काढावा. एकदा मास्क काढल्यावर तो थोडा वेळ इतरत्र घरात ठेवला, परत वापरला – असे करू नये. घरात वापरलेला मास्क काढून ठेवल्यावर सगळ्यात मोठा धोका, लहान मुलांनी त्याला हात लावण्याचा आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मास्क लावताना पुढील चुका टाळा –

  • मास्क घालताना चुका टाळा मास्क नाकाखाली म्हणजे नाकपुड्या उघड्या राहतील असे लावू नका
  • .  मास्क हनुवटीच्या वर ठेवू नका. मास्क लावल्यावर हनुवटी दिसता कामा नये
  • मास्क लावताना सैल लावल्यामुळे दोन्ही बाजूंना तो मोकळा , हवेची ये जा होऊ शकेल असा लावू नका.
  • नाकाच्या शेंड्यावर किंवा त्याच्या थोडेसे वर ठेवू नका. जितका शक्य होईल तितका शेंड्याच्या वर म्हणजे नाक सुरु होते तिथपर्यंत घ्या.
  • चष्मा नको असल्यावर जसे डोक्यावर ठेवतात तसा मास्क थोडा वेळ नको आहे म्हणून खाली ओढून मानेच्या पुढे लटकू दिला आणी नंतर परत घातला , असे करू नका .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *