अनलॉक होत असतानाचा मानसिक तणाव कसा हाताळावा?

अनलॉक होत असतानाचा मानसिक तणाव कसा हाताळावा? “लॉकडाऊन-५ मध्ये प्रवेश करताना आता अनलॉक होण्यास आपण सुरू झालो आहोत. एकीकडे आयुष्य पूर्वपदावर कधी येईल असे वाटत असताना; मात्र जसे लॉकडाऊन मध्ये घरी बसण्याचा ताण आला होता, तसाच आता बाहेर पडतानाही संसर्गाची भीती, तणाव अनेकांना जाणवतो आहे.काम करण्याच्या जागेवर बदलले नियम, बाहेर सार्वजनिक स्वच्छता कशी असेल, गर्दीचा सामना करावा लागेल का, संसर्गाचा धोका असेल का अशी भीती अनेकांच्या मनात असल्याने कामाला लागताना आणि न्यू, नॉर्मल स्वीकारताना तणावाचा सामना अनेकांना करावा लागतो आहे. सर्व प्रथम याचे स्पेनमध्ये निदान झाले आणि याला तणावाला ‘री एन्ट्री पॅनिक सिंड्रोम’ असे नाव देण्यात आले. तीन महिने घरात सर्वांच्या काम करण्याच्या सवयी आणि दिनचर्या बदलली आहे. त्यामुळे नवे आयुष्य व कामाची पद्धत स्वीकारण्यास अनेकांना त्रास होणार आहे.
यासाठी पुढील गोष्टी समजून घ्या व करा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • अनलॉक होत असतानाचा मानसिक तणाव कसा हाताळावा? बदल स्वीकारा व परत आयुष्य पूर्वपदावर येतानाची भीती, चिंता, काळजी ही एक नैसर्गिक भावना आहे असे वाटण्यात चूक काही नाही हे समजून घ्या; तसेच जे सगळ्यांचे तेच आपले हे समजून बाहेर पडणाऱ्यांमध्ये आपण एकटे नाही, सर्व देश आपल्या सोबत हळूहळू कामासाठी  घरा बाहेर पडतो आहे, हे समजून घ्या.
  • एका दिवसात सध्या त्या दिवसापुरताच विचार करा. पुढे काय, हा विचार करत बसू नका. तसेच, चिंता करण्यापेक्षा प्रतिबंधाच्या मूलभूत उपायांवर लक्ष केंद्रित करा व त्या गोष्टी लक्ष देऊन करा.
  • कामाच्या ठिकाणी गोष्टी, नियम तशाच असतील अशी अपेक्षा ठेवू नका. नव्या सवयींसाठी तयार राहा.
  • नव्या आयुष्याशी जवळून घेताना सुरुवातीला थोडा संघर्ष असणार आहे, हे गृहीत धरून चला. झोप, व्यायाम, नियमित व उच्च प्रथिनेयुक्त आहार.
  • बाहेर पडल्यावर, प्रतिबंधक उपायांच्या बाबतीत समोरचा माहीत नसलेला कोरोनाबाधित असू शकतो अशी काळजी घ्या; पण वागताना मात्र तसे वागू नका. मोकळे, हसून व नॉर्मल वागा. कारण, समोरचाही कामाच्या ठिकाणी तुमच्या बाबतीत तसाच विचार करतो, असे शक्य आहे.
  • मनात भीती, चिंता दाटून येत असल्यास विचार लिहून काढा व हे विचार तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असल्यास व समुपदेशकांचा सल्ला घ्या.
  • झोपेच्या वेळा बदलल्या असल्यास परत कामाच्या वेळेप्रमाणे त्या बदलाव्या लागणार असल्यास त्याला महिनाभराचा वेळ जाईल. म्हणून त्याविषयी फार काळजी करत बसू नका.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *