कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.
कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही, एका प्रसिद्ध आयुर्वेद कंपनीने मोठी जाहिरात करून बाजारात आणलेले कोरोनावरील औषध अजून कोरोना साठीचे अंतिम औषध किंवा रामबाण उपाय म्हणून मान्यता मिळालेले नाही. आयुष मंत्रालय व आयसीएमआरने या औषधाची जाहिरात थांबवावी, असे निर्देशही या कंपनीला दिले आहेत.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही आयुर्वेदाचा कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.संबंधित कंपनीने आणलेल्या औषधांचे ट्रायल घेतले आहे, असा दावा त्यांच्याकडून केला गेला आहे. पण, एखादे क्लिनिकल ट्रायल यशस्वी आहे व संबंधित औषध आता वापरले जाऊ शकते, यासाठी काही निकष असतात. यात किती लोकांवर ते केले आहे (सॅम्पल साईज), त्या अभ्यासाचा प्रकार कसा होता (स्टडी डिझाईन), त्या क्लिनिकल ट्रायलचे विश्लेषण करण्यासाठी हाती आलेल्या निकालाचे कसे विश्लेषण केले आहे. (स्टॅटीस्टीकल मेथड), त्याचे नंतर टीकात्मक विश्लेषण (क्रिटीकल अॅनॅलिसीस) झाले का व याचे स्टॅस्टीटीक्स म्हणजे संशोधनातील आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्यां कडून चाचपणी व इतर तज्ज्ञांकडून मते मागवणे (पीर रिव्हीव्यू) या कुठल्याही पद्धतीने या औषधाचे क्लिनिकल ट्रायल केलेले दिसत नाही. या कंपनीचे आयुर्वेदिक औषधच काय, पण इतर कुठले ही अॅलोपॅथीचे औषध ही अजून या निकषात बसून कोरोनासाठी शंभर टक्के उपचार म्हणून मान्यता पावलेले नाही. नुकतेच जे औषध एका कंपनीने बाजारात आणले आहे त्याचा प्रचार समाज माध्यमांवर व वैयक्तिक पातळीवर सुरु झाला आहे. पण, अशा औषधापासून सर्वांनी सावध राहायला हवे. आयुर्वेद नक्कीच पुरातन चिकित्सा पद्धती आहे व आयुष मंत्रालय यावर वेळोवेळी निर्देश देते आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे सोडूनइतर कुठले ही कंपनीचे कोरोनासाठी उपाय म्हणून बाजारात आणलेले औषध घेऊ नये. तसेच आयुष मंत्रालयाचे बहुतांश निर्देश हे प्रतिबंधासाठी आहेत. हे घेत असताना अॅलोपॅथीचे उपचार सोडू नये.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता