उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर सध्या अनेक जण मास्क म्हणून रुमाल, ओढणी, साडीचा पदर, गमचे, उपरणे असे घरगुती कपड्याचा तात्पुरता मास्क म्हणून वापर करताना दिसत आहेत. रुग्णालयात येणारे ५० टक्के असेच आत किंवा डॉक्टरसमोर येतात. या गोष्टी संसर्गापासून रक्षण करू शकत नाही.अशा गोष्टी मास्क म्हणून का चालत नाहीत. कुठलाही मास्क हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्याचे तीन पदर असावे लागतात. यातील मधला पदर हा अर्ध सच्छिद्र म्हणजेच सेमीपरमीएबल असायला हवा .
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर मधला पदर हा तोंड व नाकातून बाहेर येणारे श्वासकण फक्त रोखतच नाही तर ते पकडून ठेवतो. म्हणजेच ते शोषून घेतो आणि मास्क बाहेरून ओला होऊ देत नाही. बाहेरून ओला झालेला मास्क ही हवेतील धूळ त्यावर बसून त्रासदायक ठरू शकतो. तीन पदरांचे हे तत्त्व रुमाल, ओढणी, साडीचा पदर व अशी कुठलीही गोष्ट तोंडाभोवती बांधल्यास पाळली जात नाही. आम्ही अशा गोष्टीचे तीन पदर बनवून तोंड व नाकाभोवती गुंडाळू असे कोणी म्हणत असल्यास त्याचाही उपयोग होणार नाही. कारण या तीन गुंडाळ्यात मधला पदर अर्धसच्छिद्र नसतो. म्हणून असे घरगुती कपड्याचे मास्क न वापरता व्हाल्व नसलेले तीन पदरी मास्कच वापरावे.रुमाल, गमचे, ओढणी मास्क म्हणून वापरल्यास कामाच्या ठिकाणी, इतरांशी बोलताना रुमाल खाली करावा लागतो व अशी सवय लागते; पण मास्कच्या बाबतीत सहसा असे करावे लागत नाही.मास्क घालून नीट बोलता येते. रुमाल, ओढणी वापरल्यास ती वारंवार अॅडजस्ट करावी लागते.उपरणे, ओढणी, पदराचा मास्क मास्क आता आपल्या जीवनशैलीचा भाग बनत चालल्याने नियमित वापरल्यास त्याची सवय लागेल. पण रुमाल, ओढणीची सवय लागणे अवघड आहे. मास्कच्या अवतीभवती संसर्गकण बाहेर जाणार नाहीत; पण श्वास घेण्यास थोड्या फार हवेची ये-जा होईल इतकी जागा राहते म्हणून श्वास व हवेसाठी तो वारंवार खाली करावा लागत नाही. घरगुती कपडे घट्ट बांधल्यास अशी हवेची ये-जा होण्यास जागा राहत नाही. नाकाचे वरचे टोक ते हनुवटीच्या खालपर्यंत नाक व तोंड झाकलेले असावे, हे तत्त्व घरगुती कपडे वापरून पाळता येत नाही.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.