मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच व्यावसायिक क्षेत्र अनिश्चिततेचा सामना करत आहेत . त्यामुळे नैराश्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच प्रत्येकाला स्वतःची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे व गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञ – यासाठी पुढील प्रश्नावली वापरता येईल –
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
प्रश्न | कधीही नाही | बरेच दिवस | महिन्यातून अर्धे दिवस | जवळपास प्रत्येक दिवस |
कुठल्याही कामात / गोष्टीत फार रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे. | ० | १ | २ | ३ |
निराश वाटणे / उदास वाटणे. | ० | १ | २ | ३ |
झोप लागण्यास वेळ लागणे / सतत झोपमोड होणे / खूप जास्त झोप येणे / सतत झोपावे वाटणे. | ० | १ | २ | ३ |
थकलेले वाटणे / शरीरात उर्जा नसल्या सारखे वाटणे. | ० | १ | २ | ३ |
भूक नाहीशी होणे/ खूप खाणे. | ० | १ | २ | ३ |
स्वतः बद्दल कृतक भावना मनात येणे / वाईट वाटणे / स्वतः अपयशी असल्या सारखे वाटणे / कुटुंबाला आपल्यामुळे नुकसान / हिरमोड झाला असे वाटणे. | ० | १ | २ | ३ |
कामावर लक्ष केंद्रित न होणे / पेपर वाचणे / टीव्ही बघण्यासारख्या गोष्टी करताना ही लक्ष न लागणे. | ० | १ | २ | ३ |
इतके हळू बोलणे की इतरांना नीट ऐकू येत नाही किंवा खूप मोठ्याने बोलणे व सतत इकडून तिकडे चकरा मारणे / नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ असणे. | ० | १ | २ | ३ |
आपण नसलेलो / मेलेलोच बरे असे विचार मनात येणे / स्वतःला इजा करणे / स्वतःला इजा करण्याची इच्छा होणे. | ० | १ | २ | ३ |
+ +
Total Score | Depression Severity |
१-४ | अगदी सुरुवातीचे थोडे नैराश्य – minimal depression |
५-९ | सौम्य नैराश्य – mild minimal depression |
१०-१४ | मध्यम नैराश्य – moderate depression |
१५-१९ | मध्यम स्वरूपाचे तीव्र नैराश्य – moderately severe depression |
२०-२७ | तीव्र नैराश्य – severe depression |
वरील सुरुवातीचे नैराश्य असले तरी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता