कोरोनानंतरचा थकवा

कोरोनानंतरचा थकवा

कोरोनानंतरचा थकवा सध्या कोरोना मधून बरे झालेल्या अनेक जणांना लक्षणां नंतर १४ दिवस संपल्यावर पुढे अजून १५ दिवस ते २ महिन्यांपर्यंत बराच त्रास जाणवतो . बरे झाले तरी कामाचे तास बुडत असल्याने व या थकव्या मुळे माणूस मानसिक दृष्ट्या ही खचून जात असल्याने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनातून बरे झाल्यावर जाणवणारे त्रास  –

  • दिवस तीव्र स्वरूपाचा थकवा, अंगदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी असा.
  • थोडे चालल्यावर किंवा कष्टाचे काम केल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे.
  • नैराश्य येणे , मानसिक थकवा येणे.
  • वजन कमी होणे व स्नायू कमी होणे. एक दिवस पूर्ण झोपून राहिले कि  १ ते १.५ % स्नायू कमी होतात. ज्यांना १० ते १४ दिवस पडून राहावे लागले त्यांचे २५ % स्नायू कमी होऊ शकतात.
  • बुद्धी क्षमतेच्या कामात रस न येणे किंवा अवघड जाणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कारणे –
कुठल्या ही व्हायरल आजारा नंतर काही दिवस असा थकवा येतोच पण कोरोना मध्ये बऱ्याचदा उपचारात दिली जाणरे औषधे त्यातच स्टीरॉईड दिले जाते. स्टीरॉईड बंद केल्यावर शरीराचे संप्रेरकांचे संतुलन काही प्रमाणात बिघडते व ते पूर्ववत होण्यास २ ते ४ आठवडे लागतात . पण जीव वाचवण्यासाठी व उपचार म्हणून ही औषधे देणे ही गरजेचे आस्ते.

कोरोना नंतरच्या परिणामावर उपचार –

  • कोरोनानंतरचा थकवा रोज दिवसातून दोन वेळा १ ग्लास नारळ पाणी प्यावे.
  • विटामिन सी ५०० मिलीग्राम ची एक गोळी थकवा असल्यास चालू ठेवावी.
  • कोरोना होण्या आधी विटामिन डी घेतलेले नसेल तर ६०,००० IU दर आठवड्याला एकदा ८ आठवडे
  • रोज उच्च प्रथिने युक्त आहार घ्यावा.
  • सतत पडून राहण्यापेक्षा थोडा वेळ उठून घरात फिरावे , घरातील छोटी मोठी कामे करण्याचा प्रयत्न करावे.
  • रोज हळूहळू ब्रेक घेत १० मिनिटे.
  • फिजियोथेरपिस्टचा ( व्याय्यामाचे डॉक्टर ) सल्ला घेऊन श्वासाचे व्याव्याम करावे. यासाठी वेगळे साहित्य मिळते . उदाहरणार्थ फुकून एका नळीतील बॉल हवेत तरंगत ठेवणे.
  • रोज १० मिनिटे दीर्घ श्वसनाचा व्यायाम करणे.
  • स्नायू दुखत असताना अंगाला तेलाने मसाज करू नये पण झोपताना हाताला व पायाला तिळाचे तेल फक्त लावायला हरकत नाही.
  • रोज झोपताना दोन मुठ खडे मीठ कोमट पाण्यात टाकून घोट्या पर्यंत पाय या पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवावे.
  • जास्त दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासीटॅमॉलची गोळी काही दिवस घेण्यास हरकत नाही.
  • मानसिक थकव्या साठी रोज ५ मिनटे ध्यान करावे व आपण यातून बरे झालो याबद्दल आभार व्यक्त करून मन कृतज्ञ स्थितीत राहावे . मानसिक स्थिती साठी हा एक उपचार आहे 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय? सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र शासनातर्फे सुरू आहे. एखाद्या भागात किती लोकसंख्येला आता संसर्ग झाला आहे हे तपासणे म्हणजे सीरोसर्व्हीलंस होय.

हे कसे केले जाते ?
यासाठी बाधित झालेले तसेच न झालेले जनतेतून सहजगत्या कुठला ही व्यक्तींचा समूह निवडला जातो व त्यांच्या शरीरात संसर्ग होऊन गेला आहे हे व प्रतिकारशक्तीचे घटक – अँटिबॉडीचे प्रमाण तपासण्यात येते. त्यामुळे एखाद्या गावात किंवा शहरात किती लोक आता बाधित होऊन गेले आहेत याचा अंदाज येतो. तसेच या अँटिबॉडीचे प्रमाण जास्त आहे की कमी, हेही मोजले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

याचा उपयोग काय होतो?
सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय? तीन गोष्टी यावरून समजतात किती टक्के जनता बाधित झाली आहे यावर प्रतिबंधाचे धोरण ठरवता येते.
सर्व समाजाची एकत्रित व बहुतांश लोकसंख्या संसर्गित झाल्याने निर्माण होणारी हर्ड इम्युनिटी म्हणजे सर्वांना सामूहिक प्रतिकारशक्ती बहाल करणारी कळप प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे कि नाही हे लक्षात येते.
अँटिबॉडीचे प्रमाण किती निर्माण झाले आहे व किती काळ टिकते हे मोजून, एकदा संसर्ग झाल्यावर परत किती काळ संसर्ग होण्याची शक्यता हे लक्षात येते अर्थात पहिला संसर्ग किती काळ पुढच्या संसर्गापासून नैसर्गिक प्रतिकारशक्ती बहाल करतो हे लक्षात येते.
यावरून लस परिणामकारक राहील की नाही हे ही कळते. सीरोसर्व्हीलंसचे निष्कर्ष काय ?
लक्षणविरहीत संसर्ग झालेल्यांमध्ये अँटिबॉडीचे प्रमाण फारसे नाही व ते एक महिन्यापर्यंतच टिकते आहे व सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्यांमध्ये ही अँटिबॉडीचे प्रमाण असले तरी ते तीन महिन्यात कमी होते आहे.

याचा परिणाम काय होऊ शकतो?
सीरोसर्व्हीलंस सुरु असल्याने याचे अंतिम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. पण आतापर्यंतच्या मर्यादित निकालांवरून पहिल्या कोरोना संसगार्तून मिळणारी प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकेलच असे खात्रीशीर रित्या सांगता येत नाही. म्हणून संसर्गित झालेले व न झालेले असे दोन्ही गटांना प्रतिबंधाचे सर्व उपाय चालू ठेवणे गरजेचे आहे. अजून
६ महिने ते वर्षभर सीरोसर्व्हीलंसनंतर चित्र अजून स्पष्ट होईल.

सीरोसर्व्हीलंसला सहकार्य करा
काही भागांमध्ये कशासाठी रक्त घेत आहेत, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्हाला कुठे घेऊन जातील, अलगीकरण / विलगीकरण करतील अशा गैरसमज व भीतीमुळे नागरिकांना सहकार्य केले नाही व रक्ताचे नमुने देण्यास नकार दिला. पण ही रक्ताची तपासणी तुमच्या आताच्या संसर्गाच्या निदानासाठी नव्हे तर होऊन गेलेल्या संसर्गासाठी आहे. तसेच या चाचणीचा आधार घेऊन कोणालाही बळजबरीने रुग्णालयात दाखल केले जात नाही. म्हणून सर्वांनी शासकीय कर्मचारी येतील तेव्हा सहकार्य करावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर सध्या अनेक जण मास्क म्हणून रुमाल, ओढणी, साडीचा पदर, गमचे, उपरणे असे घरगुती कपड्याचा तात्पुरता मास्क म्हणून वापर करताना दिसत आहेत. रुग्णालयात येणारे ५० टक्के असेच आत किंवा डॉक्टरसमोर येतात. या गोष्टी संसर्गापासून रक्षण करू शकत नाही.अशा गोष्टी मास्क म्हणून का चालत नाहीत. कुठलाही मास्क हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्याचे तीन पदर असावे लागतात. यातील मधला पदर हा अर्ध सच्छिद्र म्हणजेच सेमीपरमीएबल असायला हवा .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर मधला पदर हा तोंड व नाकातून बाहेर येणारे श्वासकण फक्त रोखतच नाही तर ते पकडून ठेवतो. म्हणजेच ते शोषून घेतो आणि मास्क बाहेरून ओला होऊ देत नाही. बाहेरून ओला झालेला मास्क ही हवेतील धूळ त्यावर बसून त्रासदायक ठरू शकतो. तीन पदरांचे हे तत्त्व रुमाल, ओढणी, साडीचा पदर व अशी कुठलीही गोष्ट तोंडाभोवती बांधल्यास पाळली जात नाही. आम्ही अशा गोष्टीचे तीन पदर बनवून तोंड व नाकाभोवती गुंडाळू असे कोणी म्हणत असल्यास त्याचाही उपयोग होणार नाही. कारण या तीन गुंडाळ्यात मधला पदर अर्धसच्छिद्र नसतो. म्हणून असे घरगुती कपड्याचे मास्क न वापरता व्हाल्व नसलेले तीन पदरी मास्कच वापरावे.रुमाल, गमचे, ओढणी मास्क म्हणून वापरल्यास कामाच्या ठिकाणी, इतरांशी बोलताना रुमाल खाली करावा लागतो व अशी सवय लागते; पण मास्कच्या बाबतीत सहसा असे करावे लागत नाही.मास्क घालून नीट बोलता येते. रुमाल, ओढणी वापरल्यास ती वारंवार अ‍ॅडजस्ट करावी लागते.उपरणे, ओढणी, पदराचा मास्क मास्क आता आपल्या जीवनशैलीचा भाग बनत चालल्याने नियमित वापरल्यास त्याची सवय लागेल. पण रुमाल, ओढणीची सवय लागणे अवघड आहे. मास्कच्या अवतीभवती संसर्गकण बाहेर जाणार नाहीत; पण श्वास घेण्यास थोड्या फार हवेची ये-जा होईल इतकी जागा राहते म्हणून श्वास व हवेसाठी तो वारंवार खाली करावा लागत नाही. घरगुती कपडे घट्ट बांधल्यास अशी हवेची ये-जा होण्यास जागा राहत नाही. नाकाचे वरचे टोक ते हनुवटीच्या खालपर्यंत नाक व तोंड झाकलेले असावे, हे तत्त्व घरगुती कपडे वापरून पाळता येत नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा सध्या अनेक लोक होम क्वारनटाईन व होम आयसोलेशन मध्ये आहेत. होम आयसोलेशन मध्ये असलेल्यांनी रोज २ वेळा  तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या सौम्य कोरोना रुग्णांनी दिवसातून २ वेळा आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांच्या रुग्णांनी दर सहा तासांनी आपली ऑक्सिजनची पातळी तपासून पहावी. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी घटत असल्यास ती लवकर लक्षात येऊन त्याचे उपचार सुरु करता येतात. तसेच या सर्वांनी रोज दोन वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा पण हे सर्व करत असताना नेमक्या कुठल्या बोटाला पल्सऑक्सीमीटर लावायचा हे माहित असायला हवा. यासाठी जो हात आपण कामासाठी जास्त वापरतो व ज्या हाताने लिहितो, त्या हाताचे मधले बोट वापरायला हवे म्हणजे सर्वात मोठे बोट. पल्सऑक्सीमीटर हे बोटाच्या टोकाला म्हणजे नख व त्या मागच्या भागावर लावून पाहिले जाते. यात मधल्या बोटाला हाताच्या दोन्ही मुख्य रक्त वाहिन्यांचा प्रवाह आसतो . तुलनेने इतर बोटांना कमी असतो. म्हणून लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मधल्या बोटाला सर्वात अचूक पल्सऑक्सीमीटर ची रीडिंग येते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कोरोना हवेतून पसरतो का?

कोरोना हवेतून पसरतो का?

कोरोना हवेतून पसरतो का? पूर्वी मानले जायचे की, संसर्गित व्यक्तीतून बाहेर पडणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा व्यास हा ५ ते १० मायक्रोमीटर असल्याने तो १ मीटरपेक्षा जास्त जागेत उडत नाही व ३ ते ४ तासांत खाली बसतात. असे होऊ शकते की कोरोनाबाधित व्यक्तीच्या श्वसनातून बाहेर पडणारे काही (५ ते १० टक्के ) संसर्गकण हे ५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असतील आणि म्हणून ते १ मीटरपेक्षा जास्त अंतरावर उडून लांबवर जातील आणि ८ तासांपर्यंत हवेत तरंगत राहतील.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना हवेतून पसरतो का? कमी व्यास असलेले संसर्गकण १ मीटरच्या पुढे जाऊन इतरांना संसर्ग करण्याच्या या प्रक्रियेला हवेतून संसर्ग म्हटले आहे.हवेतून संसर्गाची जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता वर्तवल्याची बातमी आल्यापासून अनेकांचा गैरसमज झाला आहे की, कोरोना काही किलोमीटर दूर व एका गावातून दुसºया गावापर्यंत उडून संसर्ग करू शकतो. पण असे मुळीच नाही. तो हवेतून जात असला तर आधी १ मीटरच्या थोडा पुढे कदाचित ३, ४ किंवा ५ मीटर पुढे जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता जागा किती बंद आहे यावर अवलंबून आहे.हवेतून संसर्गाची शक्यता असली तरी मुख्य संसर्गाचा स्रोत हा आधी सांगितलेला मोठ्या संसर्गकणांचा म्हणजे १ मीटरच्या अंतरावरच आहे. हवेतून प्रसाराची शक्यता ही कमी जागेत व वारे वाहण्यास फार वाव नाही अशा बंद जागेतच जास्त आहे. तसेच हवेतून संसर्गित होणाºया कणांची संसर्गक्षमता ही १ मीटरच्या आत मोठ्या संसर्गकणांपेक्षा कमी असणार आहे. म्हणून एकमेकांपासून एक मीटरपेक्षा जास्त अंतराने उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व अबाधित राहणार आहे. हवेतून संसर्गाच्या अल्पशा शक्यतेचे महत्त्व काय ?हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे.हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज सध्या दोन वेळा वाफ घेतल्याने तसेच जास्त धोका असल्यास दर दोन तासांनी वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो, असा संदेश मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पण हा गैरसमज असून दोन वेळा वाफ घेतल्याने कोरोनाला प्रतिबंध होतो, याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. यावर करायला काय हरकत आहे, फायदा झाला नाही तरी तोटा होणार नाही, अशी अनेकांची भावना असते.पण असा विचार करून चालणार नाही. म्हणून आपण कुठलाही प्रतिबंधक उपाय स्वीकारताना तसेच समाज माध्यमांवर फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्य- असत्यता पडताळून पाहावी. अशा खोट्या प्रतिबंधक उपायांचे काही तोटे असतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज एक तर अशा निरुपयोगी उपायांमुळे उपयोगाच्या प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होते. तसेच यामुळे सुरक्षेची खोटी भावना निर्माण होते. तसेच यात कमी खर्च असला तरी या जेव्हा सार्वजनिक पातळीवर अनेक जण हे उपाय स्वीकारतात त्यात एकत्रित राष्ट्रीय व नैसर्गिक संपत्तीचा नाहक अपव्यय होतो.रोज दोन वेळा वाफ घेण्याचा अजून एक दुष्परिणाम असा होऊ शकतो की ही वाफ वाफेच्या मशीनमधून घेत असतील तर घरात प्रत्येकासाठी वेगळे वाफेचे मशीन असणे अशक्य आहे. म्हणून सगळ्यांनी एकच मशीन वापरून कोणाला लक्षणविरहीत संसर्ग असल्यास त्यातून इतरांना संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच एक मीटरपेक्षा जास्त अंतर राखून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे, शक्य तिथे सॅनिटायझरचा वापर व कामासाठी व आवश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडणे या मुलभूत प्रतिबंधक उपायांपासून विचलित होऊ नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

बालदमा आणि उपचार

बालदमा आणि उपचार

बालदमा आणि उपचार काही मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे वातावरणातील ॲलर्जीन, फुलांचे परागकण,धूर, हवेतील प्रदूषणकण, गारवा, तीव्र वास व काही विषाणूंमुळे श्वसन मार्ग आकुंचन पावतो व त्याचा व्यास लहान होतो. जन्माच्या वेळी कमी वजन असणे व पहिल्या दोन वर्षांत गंभीर न्युमोनिया व इतर फुफ्फुसाचा संसर्ग व इतर अलर्जीचे आजर असल्यास बालदमा होण्याची शक्यता वाढते.
पुणे लहान मुलांमध्ये श्वसन मार्ग, वातावरणातील घटक जास्त संवेदनशील असल्याने वारंवार आकुंचन पावून छोटा होण्याच्या आजाराला बालदमा म्हणतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कारणे 
काही मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे वातावरणातील ॲलर्जीन, फुलांचे परागकण, धूर, हवेतील प्रदूषणकण, गारवा, तीव्र वास व काही विषाणूंमुळे श्वसन मार्ग आकुंचन पावतो व त्याचा व्यास लहान होतो. जन्माच्या वेळी कमी वजन असणे व पहिल्या दोन वर्षांत गंभीर न्युमोनिया व इतर फुफ्फुसाचा संसर्ग व इतर अलर्जीचे आजर असल्यास बालदमा होण्याची शक्यता वाढते.

दमा सुरू झाल्यावर पुढील गोष्टींमुळे तो वाढतो व या गोष्टींना श्वसनमार्ग संवेदनशील असतो. ते जितके टाळता येतील तितका दमा नियंत्रणात राहतो.

  • घरातील घटक – पाळीव प्राण्यांच्या केसातील कण, घरतील झाडताना उडणाऱ्या धुळीचे कण, झुरळे, थंडीतील लोकरी कपडे अनेक दिवस ठेवल्यावर त्याला लागणारा फंगस.
  • वातावरणातील घटक – फुलांचे परागकण, कॉंग्रेस गवत, झाड, घास यांच्यातून वातावरणात मिसळणारे कण, थंड व कोरडे वारे.
  • हवेतील प्रदूषण कण – सिगारेट , बिडी, तंबाखूचा धूर, ओझोन, लाकूड, कोळसा जाळल्यावर निर्माण होणारा धूर, रस्ताने उडणारी धूळ.
  • तीव्र वास – अत्तर, परफ्युम, डीओडरंट, हेअर स्प्रे, स्वच्छतेसाठी वापरले जाणारे वास असलेले क्लीनर.
  • शेतातील कण  – धान्य उफणताना उडणारे कण.
  • भावनिक / शारीरिक  बदल – व्यायाम, रडणे, जास्त हसणे, तणावामध्ये श्वास वाढणे.
  • औषधे – ॲस्पिरीन, इतर काही वेदनाशामक औषधे.

लक्षणे
– तापाशिवाय वारंवार सर्दी, खोकला. 
– फक्त कोरडा खोकला वारंवार येणे, पहाटे व संध्याकाळच्या वेळी जास्त येणे.
– श्वास घ्यायला त्रास होणे व त्यासोबत शिट्टीसारखा आवाज येणे. 
– शांत झोप न लागणे. 
– थकवा येणे. 

बालदमा आणि उपचार बालदमा नेमका काय आहे, हे पालकांना समजून सांगताना मी माणसाच्या स्वभावाचे उदाहरण देतो. जसा काही जणांचा रागीट स्वभाव असतो तसेच काही कारणाने तुमच्या मुलाचे फुफ्फुस व श्वसनमार्ग थोडे रागीट आहेत. रागीट माणसाला जसे जपावे लागत, कशाने राग येईल हे ओळखून त्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, तसेच बालदमा असलेल्या मुलाच्या श्वसन मार्गाला राग येऊ नये म्हणून वर दिलेले ट्रिगर्स, म्हणजे दमा वाढवणारे घटक सांभाळावे व नियंत्रणात ठेवावे म्हणजे, दमा नियंत्रणात राहील. जसा रागीट स्वभाव पूर्ण जात नाही, पण तो नियंत्रित करता येतो तसाच बालदमा ही नियंत्रित करता येतो. वय वाढते व प्रगल्भता येते तसा रागीट स्वभाव सौम्य होतो, तसेच वय वाढल्यावर फुफ्फुस प्रगल्भ होते आणि  बालदमा नाहीसा होतो. रागीट स्वभावाचा माणूस नॉर्मल आयुष्य जगतो व सगळे करू शकतो, तसेच दम्याचा रुग्ण हा नॉर्मल आयुष्य जगू शकतो.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे

घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे सध्या सॅनिटायझरशी निगडित अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. यात सॅनिटायझर स्प्रे, सॅनिटायझर पेन हे दोन प्रकार आहेत. आपण बाहेर गेल्यावर लाइटचे बटन, दरवाजे, लिफ्टचे बटन बंद करण्यासाठी प्लॅस्टिकचे आकडेही मिळत आहेत. या आकड्यांनी बटन चालू-बंद करताना ते परत आपण खिशात ठेवणार. त्यामुळे ज्या जागेवर आकडा वापरणार त्याचा संसर्ग शरीरात येणारच म्हणून अशा आकड्यांचा उपयोग नाही. यासाठी घरच्या घरी स्वस्तात सॅनिटायझर स्प्रे बनवता येईल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१. घरच्या घरीच बनवा सॅनिटायझर स्प्रे ३० एमएलची छोटी पुढे निमुळती आणि छिद्र पडण्याची सोय असलेली प्लॅस्टिक बाटली घ्या. ती होमिओपॅथी औषधांच्या दुकानावर सहज मिळते. डॉक्टर या बाटल्यांचा वापर पातळ औषध किंवा मदर टिंक्चरसाठी करतात.
२. ही बाटली अत्यंत स्वस्त असून
५० पैसे ते १ रुपयाला मिळते.
३. बाटलीच्या समोर छिद्रासाठी जागा असते, तिथे टाचणीने छिद्र करावे.
४. या बाटलीमध्ये सॅनिटायझर भरावे.
५. लाइटचे किंवा लिफ्टचे बटन बंद-चालू करताना या बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या टोकाने बटन दाबा.
६. बटन दाबाल तेव्हा बाटली पण हलकेच दाबली आणि थोडे सॅनिटायझर त्यातून बाहेर येतो.
७. असे करण्याचे तीन फायदे होतील. तुमचा त्या गोष्टीशी संपर्क येणार नाही व इतर व्यक्तीकडून ती जागा संसर्गित झाली असेल तर सॅनिटायझरनेच तुम्ही ती बंद-चालू केल्याने बाटलीचे टोकही संसर्गित होणार नाही. तिसरा फायदा असा की ती जागा सॅनिटाइझर झाल्याने निर्जंतुक झाली म्हणून तुमच्यानंतर स्पर्श करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा धोका नाही.
८. ही बाटली खिशात सहज मावते.
९. कारचे उघडण्याचे हँडल, सार्वजनिक किंवा आॅफिसच्या स्वच्छतागृहाचे दरवाजा उघडण्याचे हँडल अशा कुठल्याही ठिकाणी ही बाटली सहज वापरता येईल.
१०. बाटली शक्यतो खिशातच ठेवावी. आॅफिसमध्ये गेल्यावर टेबलवर किंवा इतरत्र ठेवू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. बऱ्याच जणांना हाच सर्वोत्तम मास्क असल्याचा ही गैरसमज झाला आहे. या मास्कचे नीट निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल कि श्वास आत घेताना हा व्हॉल्व बंद होतो व श्वास बाहेर सोडताना व्हॉल्व आपोआप उघडतो. त्यामुळे या मास्कच्या व्हॉल्व मधून कोरोना तसेच इतर विषाणू सहज बाहेर जाऊ शकतात. या मास्क मुळे मास्क घालणाऱ्या व्यक्तीला कदाचित संसर्ग मिळेल पण समोरच्या बाधित व्यक्तीला ही व्हॉल्व असलेल्या मास्कचा धोका माहित नसेल व तो हा मास्क वापरत असेल तर अशा कोरोना संसर्गित व्यक्ती पासून इतरांचे संरक्षण होणार नाही. मास्क वापरण्याचा हेतू फक्त स्वतःचेच संसर्ग नाही तर माझ मास्क तुला आणि तुझा मास्क मला संसर्ग देईल असे हे प्रतिबंधाच्या सहजीवनाचे तत्त्व आहे त्यामुळे हे मास्क कोणीही वापरू नये. तसेच शासनाने ही या मास्क वर बंदी घालावी. इतर कुठला ही नाकाच्या वरच्या टोका पासून हनुवटी च्या खाल पर्यंत व दोन्ही बाजूने तोंड व नाक पूर्ण झाकणारा व्हॉल्व नसलेला मास्कचा वापर करण्यास हरकत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्हॉल्व नसलेला मास्क वापरल्यास श्वास घेण्यास काही त्रास होईल का ?

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका मुळात व्हॉल्व असलेले मास्क हे जिथे जागा पूर्ण बंद आहे व हवेचा दाब कमी आहे अशा जागेत काम करणाऱ्यांसाठी बनवले गेले होते. खाणी मध्ये व खोदकामात , बोगद्यात काम करणाऱ्या कर्मचार्यांचा श्वास गुदमरू नये व त्यांच्या शरीरात C02 हा प्राणवायू साठून त्यांचा जीव गुदमरू नये  यासाठी ही मास्क मध्ये व्हॉल्वची योजना. कारण अशा खोलवर व पूर्ण बंद असलेल्या जागेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. बाहेर मोकळ्या वातावरणात किंवा ऑफिस मध्ये वातावरण पूर्ण बंद नसते व ऋण तापमानात ऑक्सिजनची पातळी पुरेशी असते. म्हणून तिथे व्हॉल्व नसलेले मास्क वापरले तरी श्वास घेण्यास त्रास होण्याची / जीव गुदमरण्याची भीती नाही. पण मात्र व्हॉल्व मधून कोरोना संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. म्हणून मास्क श्वास घेण्यास त्रास होण्याची भीती बाजूला ठेवून व्हॉल्व नसलेले मास्कच वापरावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ?

एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का

एकदा  कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ?सध्या कोरोना संसर्गातून अनेक जण बरे होत आहेत. यापैकी अनेकांचा गैरसमज आहे की मला कोरोना होऊन गेला आहे , आता मला काही काळजी घेण्याचे कारण नाही. पण तुम्ही कोरोना मधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डीस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनीटायजरचा वापर तसेच कोरोना होण्या अगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे . याची कारण पुढील प्रमाणे आहेत –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • जरी तुम्ही कोरोना संसर्गातून बरे झाले तरी तुम्हाला परत कोरोणाचा जो संसर्ग होऊ शकतो, त्यातून तुम्हाला फारसा धोका नाही कारण काही प्रमाणात तुमच्या शरीरात आधीच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. पण असे असले तरी तुम्ही त्या संसर्गाचे वाहक ठरून इतरांना आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबाला संसर्गित करू शकता.
  • जरी तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली  तरी तुम्हाला परत काहीही लक्षणे येणारच नाहीत असे नाही. तुम्हाला गंभीर स्वरूपाचा जीवघेणा कोरोना परत होणार नसला तरी तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा नक्कीच आसू शकतो. म्हणजे आठवडा भर ताप, सर्दी, खोकला, थकवा असे होऊ शकते. जरी जीवाला धोका नसला तरी याने कामाचे तास बुडतील, परत १४ दिवस अलगीकरण असा अनावश्यक त्रास होईल. जर काळजी घेणे सुरु ठेवले तर हा त्रास टळू शकेल.
  • एकदा  कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ? जरी एकदा कोरोना होऊन गेला तरी तो नेमक्या कुठल्या स्ट्रेन मुळे झाला हे माहित नसते. सध्या कोविड १९ च्या एक्स आणि वाय अशा दोन स्ट्रेन देशात आहेत. या राज्यांतर्गत वेगळ्या आहेत कि अगदी राज्यातच जिल्ह्य अंतर्गत आहेत कि अगदी एकाच तालुक्यात ही दोन स्ट्रेनचा संसर्ग सुरु आहे हे अजून नीटसे माहित नाही. पण देश व राज्य अंतर्गत प्रवास सुरु झाल्याने त्या इकडून तिकडे वाहून गेल्याच असणार. जर आधी एका स्ट्रेन चा कोरोना होऊन गेला तर दुसऱ्या स्ट्रेनचा नंतर होऊ शकतो . या नवीन स्ट्रेनचा संसर्ग फ्रेश / नवा  असल्याने त्याचा नक्कीच जीवाला धोका असू शकतो. म्हणजे एका स्ट्रेनने झालेला संसर्ग हा त्या स्ट्रेन साठीच पुढच्या वेळी प्रतिकारशक्ती देईल, दुसऱ्या स्ट्रेन साठी नाही.
  •       या सर्व कारणांमुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांनी काळजी घेणे सुरु ठेवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.