तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या अनेक मुलां-मुलीमध्ये तोतरेपणा किंवा बोलतानाच्या समस्या आढळून येतात. मात्र ही व्याधी गंभीर नसल्याने त्याच्या उपचारासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. परंतु, ही समस्या बरेच दिवस रेंगाळल्यास त्याचा मानसिकतेवर परिणाम होऊन न्यूनगंड निर्माण होतो. म्हणूनच अशी समस्या असलेल्यांना उपचार व मानसिक आधाराची गरज असते.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
तोतरेपणा
व बोलण्याच्या समस्या म्हणजे नेमके काय?
ज्या
मुलांमुलीना वाक्य सुरू करण्यास उशीर लागतो, बोलताना उच्चार स्पष्ट करता येत
नाहीत, वाक्य सुरू केल्यावर मध्येच अडखळते, एखादा शब्दच उच्चारता येत नाही
किंवा एखादा शब्द गरज व इच्छा नसताना पुनःपुन्हा उच्चारला जातो, असे असल्यास बोलण्याची समस्या
असल्याचे निदान केले जाते.
कारणे –
- तोतरेपणा व बोलण्याच्या समस्या आनुवंशिक असू शकतात.
- या मागे काहीतरी ताणतणाव असल्याचेही इतिहास नटी तपासल्यास दिसून येते.
- काही मुलांना शाळेत परीक्षेच्या काळात किंवा ताणतणाव वाढल्यानंतरच ही समस्या जाणवते.
- काही वेळा फक्त मनातील न्यूनगंड किंवा स्वतःला कमी लेखल्यामुळे ही समस्या दिसून येते. यावेळी चांगल्या समुपदेशनाने मुले बरी होतात.
- नीट तपासणी केल्यावर जीभ खाली जास्त प्रमाणात चिकटली असल्याने ही बोलण्यात तोतरेपणा दिसून येतो.
- क्वचितच डोक्याला मार, मेंदूतील गाठ किंवा एखाद्या औषधाचा दुष्परिणाम म्हणून तोतरेपणा दिसून येतो.
तपासण्या
व निदान
डोक्याला
मार लागल्याचा इतिहास असल्यास गरज भासल्यास तोतरेपणासाठी सीटी. स्कॅन किंवा एमआरआय
या तपासण्या कराव्या लागतात. रेटिंग स्केलवर तोतरेपणाची तीव्रता ठरवली जाते.
उपचार –
- स्पीच थेरपी हा तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्यांच्या उपचारांमधील महत्त्वाचा भाग असला तरी त्याला काही प्रमाणात औषधांची जोड द्यावी लागते.
- स्पीच थेरपीमध्ये रुग्णांना ते चुकत असलेले शब्द हळू व श्वासावर नियंत्रण ठेवून कसे म्हणायचे हे शिकवले जाते.
- याच्या बरोबरीने fluency shaping थेरपीसारख्या पद्धती वापरल्या जातात.
- बेन्झोडायझेपिन्स (Benzodiazepines), स्ट्रामोनिअम (stramonium) सारखी औषधे फायदेशीर ठरतात.
- याच्या बरोबरीने श्वास घेण्याची पद्धत खूप फायदेशीर ठरते.
श्वासाचा
व्यायाम
१ ते १०
पर्यंत आकडेमोड करत नाकाने हळू श्वास आत घ्यावा, डायफ्राम जितका खाली जाईल, तितका जाऊ द्यावा. त्यानंतर १ ते
१० पर्यंत मोजत तोंडाने श्वास बाहेर सोडवा. असे सलग दहावेळा करावे.
घरगुती उपचार
- तोतरेपणा किंवा बोलण्यातील समस्या ओठांच्या भोवती मध लावून जिभेच्या टोकाने ते चाटण्याचा प्रयत्न करावा.
- चमचाच्या मागे मध लावून ते तोंडासमोर ठेवून जिभेने त्याचा स्पर्श करावा. मुलगा ते स्पर्श करायचा प्रयत्न करताना तो चमचा दुसऱ्या व्यक्तीने मागे घ्यावा.
- जीभ दुमडून ती मागे घेऊन टाळूला लावावी व ती थोडी खाली घेऊन ताणलेल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- आवळा चूर्ण, वेखंड व मधाचे चाटण रोज द्यावे.
सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.