एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? परदेशात काही कोरना रुग्णांना परत संपर्क आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला. पण हे प्रमाण खूप कमी होते. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास काय? याचे उत्तर संशोधक प्रयोग करून शोधत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. पण या नंतर या आधी एकदा संसर्ग झालेल्या या माकडांना दुसऱ्यांदा संपर्क आल्यावर काहींना अत्यंत सौम्य व काहींना कुठलीही लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती दर्शवणारे घटक म्हणजेच अँटीबॉडिज या मानव बरे झाल्यावर निर्माण होतात तेवढ्याच पातळीच्या होत्या. यावरून परत कोरोना झाल्यास शरीरात आधी इतकाच प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळू शकतो असे दिसून येते. पण या अभ्यासाच्या मर्यादा या आहेत, की हे प्राण्यांवरील संशोधन आहे. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? तसेच ही शरीरातील प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते हे समजण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. तसेच मानवामध्ये काय होते हे सांगण्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो पण मानवात काय घडते हे साथ पुढे सरकेल तसे स्पष्ट होईल. तसेच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास तो तीव्र नसेल असे मानले तरी एकदा कोरोना झालेल्या रुग्णाला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे हे सर्व प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत. पण मात्र गोवर, कांजण्या या आजारांसारखे एकदा संसर्ग झाला की तो संसार्गच तुम्हाला आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करेल हे सांगता येणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको

” क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको अनेक वर्षांच्या सवयीप्रमाणे अनेक कारणांसाठी थुंकीचा वापर करण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण कोरोनानंतर आता ही सवय बदलावी लागणार आहे. याचे कारण थुंकीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि ज्या गोष्टीसाठी थुंकी वापरली ती कोरोना पसरवण्यासाठी वाहक ठरू शकते. पुढील गोष्टी करताना थुंकीचा वापर थांबवा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या ओव्हर्स संपल्यावर चेंडू प्रभावी पणे रिवर्स स्विंग व्हावा म्हणून खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी घाम किंवा थुंकीचा वापर करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. या ऐवजी ओव्हर संपल्यावर अम्पायर समोर चेंडू चमकवन्यासाठी कृत्रिम पदार्थ उपलब्ध करून देण्याची तयारी आयसीसीने केली आहे. त्यामुळे खेळाडूंनी असा  थुंकी व घामाचा वापर चेंडू चमकावण्यासाठी बंद करावे. अंतरराष्ट्रीयच नव्हे तर स्थानिक व गल्लीत मुले खेळत असलेल्या क्रिकेट मध्येही हा नियम पाळला जावा. अंतरराष्ट्रीयच क्रिकेट मध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे अपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.
  • बँके मध्ये किंवा घरात नोटा मोजताना थुंकीचा वापर करू नका.
  • पाकिटे, पोस्ट स्टॅम्प, कोर्टातील फी स्टॅम्प चिटकवण्यासाठी थुंकीचा वापर नको. दिल्ली हायकोर्टाने कोर्टात थुंकीचा वापर न करण्या विषयी आदेश काढला आहे.
  • यासाठी बँकेत, कोर्टात, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत, वाचनालये उघडल्यावर तिथे ही प्रत्येक टेबल समोर स्पंजचे तुकडे ओले करून ठेवायला हवे. हे स्पंज ओले करण्यासाठी पाण्याऐवजी  हँड सॅनीटायजर चा वापर करता येईल.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फळे भाज्यांसाठी सॅनिटायजर साबण वापरू नका!

फळे, भाज्यांसाठी सॅनिटायजर, साबण वापरू नका!

फळे भाज्यांसाठी सॅनिटायजर साबण वापरू नका! अनेक ठिकाणी फळे व भाज्या सॅनिटायजरने फवारणी करून किंवा साबणाने धुवून वापरली जात आहेत. हे करणे गरजेचे नाही व यामुळे शरीराला, आतड्यांना हानी होऊ शकते; तसेच बाजारात खास फळे, भाज्यांसाठी वेगळे सॅनिटायजरही विक्रीसाठी आले आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हे विकत घेऊ नये व वापरू नये; तसेच सॅनिटायजरचा वापर फक्त हात, धातू व स्टील यांवरचे व्हायरस नष्ट करण्यासाठीच होतो म्हणून इतर कुठेही हे वापरू नये.फळे व भाज्यांवर कोरोना व्हायरस ४ ते ६ तास राहू शकतो. त्यामुळे यासाठी करण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे फळे, भाज्या आणल्यावर आणलेल्या पिशवीतच ६ तास घरा बाहेर ठेवल्या जाऊ शकतात. त्यांनतर त्यांना कोमट पाण्यामध्ये बेकिंग सोडा किंवा पोटॅशियम परमँग्नेट टाकून त्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून नंतर वाहत्या पाण्याखाली धुवून वापरल्या जाऊ शकतात. फळे, भाज्यांसाठी सॅनिटायजर, साबण वापरू नका!त्यानंतर शक्य असल्यास हेअर ड्रायरची गरम हवा फळ-भाज्यांवरून फिरवली जाऊ शकते. हेअर ड्रायर उपलब्ध नसेल, तर ही स्टेप वगळली तरी चालेल. केळी किंवा कांद्यासारख्या गोष्टी पाण्यात टाकल्या जाऊ शकत नाहीत व पाण्यात टाकल्यास खराब होऊ शकतात. या वस्तू ६ तासाने घरात आणाव्या व केळी एक दिवसानी, कांदे तीन दिवसांनी वापरावे. तोपर्यंत घरात बंद डब्यात पडू द्यावे. फळे, भाज्या आणण्यासाठी पेपरच्या बॅग वापरणे योग्य ठरेल म्हणजे, त्या घराबाहेर जाळून टाकल्या जाऊ शकतात. पेपर बॅग वापरली जात नसेल, तर इतर बॅगा घराबाहेरच ठेवाव्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनाची ‘नवीन’ लक्षणे उघड

कोरोनाची 'नवीन' लक्षणे उघड

कोरोनाची ‘नवीन’ लक्षणे उघड ज्या कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जग हादरले आहे त्या व्हायरस ची आता नवीन नवीन लक्षणे दिसू लागली आहेत. आतापर्यंत कोरोनाची सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही प्रमुख लक्षणे सांगितली जात होती. मात्र आता त्यात बोलण्यास अडथळा येणे आणि चालता न येणे या नवीन लक्षणांची भर पडली आहे

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या नव्या माहितीनुसार, आता कोरोनाची काही नवीन लक्षणं समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेतील तज्ज्ञांच्या मते कोरोना संक्रमित व्यक्तींना बोलताना बराच त्रास होतो. धक्कादायक म्हणजे अनेकदा हे लक्षणं अगदी शेवटी समोर येतात. कोरोना रुग्णाला बोलायला, चव ओळखायला, चालायला देखील त्रास होणे, असं संशोधन समोर आलं आहे.

लक्षणं न दिसण्याच्या आणि तात्काळ निदान न होण्याच्या कोरोनाच्या गुणधर्मामुळे याचा सर्वात वेगानं प्रसार होतोय. त्यातच आता कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली आहेत. म्हणूनच कोरोनासंबंधी कोणतंही लक्षण दुर्लक्षित करुन चालणार नाही. शिवाय, सतत क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये ठेवल्यामुळे आणि संसर्ग झाल्याच्या भीतीने मानसिक आजार उद्भवू शकतात.

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

भारतात आतापर्यंत जवळपास 94 हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधीत झाले आहेत. तर, जगभरात 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या लक्षणांबाबत नवा इशाराही दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने छातीत दुखणे, बोलण्यास अडथळा, चालण्यास अडथळा ही नवी लक्षणे समोर आणली आहेत. त्यामूळे, किमान भारतात तरी कोरोना चाचणीचे निष्कर्ष बदलले पाहिजे अशी मागणी वैद्यकीय तद्य करत आहेत.

काय आहेत कोरोनाची संभाव्य लक्षणे ?

वैद्यकीय तज्ञ. अमोल अन्नदाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ही सध्या कोरोनाची राजधानी बनली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण हे राज्यात आहेत. सध्या राज्यात कोरोनाबाबतच्या चाचणीचे निष्कर्ष चुकीचे आहेत. फक्त लक्षणे असणार्यांच्याच चाचण्या केल्या जात आहेत. त्यामूळे, सुपर स्प्रेडर जे आहेत त्या या चाचणीतून निसटत आहेत.?

कोरोनाची ‘नवीन’ लक्षणे उघड अशक्तपणा, उलट्या, अनियंत्रित जुलाब, वास घेण्याची क्षमता कमी होते, चव लागत नाही, झपाट्याने तब्येत खालावते, निस्तेज वाटणे, झोपेत राहणे, मेंदूशी निगडित आजार ही संभवणे, सर्वात जास्त खोकला असणे, चालायला त्रास होणे, बोलायला त्रास होणे, ऑक्सीजन पातळी कमी होणे ही सर्व संभाव्य लक्षणे असू शकतात असे ही डॉ. अमोल अन्नदाते यांनी स्पष्ट केले आहे.

हा व्हायरस आरएनए प्रकारचा आहे. आणि कोणताही व्हायरस हा बहुरुपी असतो. तो त्याची लक्षणे बदलू शकतो. त्यामूळे कोरोना वरील तयार केल्या जाणार्या लसी किती कारणीभूत ठरू शकतील यावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यात 30 टक्के लोक करतात लॉकडाऊनचा फज्जा- राज्यात 30 टक्के लोक हे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पाळत नाहीत. शिवाय, राज्यातील होम क्वारंटाईन ही संकल्पना अयशस्वी ठरली आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीतील घरात 6 ते 7 जण राहतात. इथे सोशल डीस्टस्टींग पाळणे शक्यच नाही हे देखील डॉ. अन्नदाते यांनी स्पष्ट केले आहे.

सदरील माहिती आपण ई सकाळ मध्येही वाचू शकता

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

कोरोना तपासणीसाठी नवे निकष नुकतेच आयसीएमआर या कोरोनाविषयी तपासणी व उपचाराचे  वैद्यकीय धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्थेने कोणाची कोरोना तपासणी करायला हवी याचे नवे निकष जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. पुढील व्यक्तींची आता कोरोना तपासणी करावी असे आयसीएमआरचे निर्देश आहेत –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढील निर्देशात श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे याचा अर्थ १००.४ डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त ताप आणि खोकला असा आहे

  • गेल्या १४ दिवसात अंतरराष्ट्रीय प्रवास झाला असून अशा व्यक्तीला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • निदान निश्चित झालेल्या केस च्या संपर्कात आलेल्या कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • कंटेनमेंट भागात व कोरोना संदर्भात कार्यरत असलेले सर्व कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • सारी म्हणजे ताप, खोकला , श्वास घेण्यास त्रास
  • कोरोना तपासणीसाठी नवे निकष निदान निश्चित झालेल्या केसच्या थेट संपर्कात आलेली लक्षण विरहीत  आलेली आणि जोखीम वाढवणारे घटक ( ६० पेक्षा जास्त वय, ६० च्या खाली वय व इतर मोठे आजार ) असल्यास त्यांची संपर्क आल्या पासून पाचव्या ते चवदाव्या दिवसा पर्यंत तपासणी करणे
  • हॉटस्पॉट व कन्टेनमेंट झोन मध्ये कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • रुग्णालयात दाखल असलेल्या कुठल्या ही रुग्णाला  श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • स्थलांतरितांमध्ये कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • कुठलीही प्रोसिजर किंवा शस्त्रक्रिया करत असताना वरील कुठल्या ही निकषांमध्ये रुग्ण बसत असल्यास तपासणी करून प्रोसिजर करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण

जेष्ठांसाठी लसीकरण आपल्याला आजवर लहान मुलांसाठी लसीकरण माहित आहे. पण लसीकरण हे ज्येष्ठांसाठी ही असते याबद्दल कोणाला माहिती नसते. त्यातच कोरोना सारख्या साथीमध्ये या लसीकरणाला वेगळे महत्व आहे. पुढील लसी ६० वर्षा पुढील व ६० वर्षा खाली मधुमेह, किडनीचे आजार, कॅन्सरचे रुग्ण व  आधी कॅन्सरची औषधे घेतलेले ६० वर्षा खालील ज्येष्ठ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसी घेऊ शकतात .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

या लसी पुढील प्रमाणे आहेत

  • दर वर्षी फ्लू म्हणजे सर्दी, खोकल्याची लस
  • न्यूमोकोकल लस – दोन प्रकारच्या, एकदाच – एक डोस
  • टायफॉईड – एक डोस
  • कावीळ बी – आधी घेतला नसल्यास तीन डोस – पहिला, त्यानंतर १ व सहा महिन्यांनी
  • कावीळ ए – २ डोस
  • टीटॅनस व डीपथीरीया- टीडी दर १० वर्षातून एकदा

या लसी घेण्याचे फायदे –

  • जेष्ठांसाठी लसीकरण वया मुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे हे जंतुसंसर्ग टळतील
  • हे आजार कमी झाल्यामुळे कोरोना मुळे तणावाखाली असलेल्या आरोग्य व्यवस्थे वरचा ताण कमी होईल
  • कोरोना झाला तर न्युमोकोकल लसीमुळे त्यासोबत होणार्या बॅक्टेरियल जंतूसंसर्गाची शक्यता कमी होईल
  • कुठल्या ही आजारा नंतर प्रतिकारशक्ती कमी होते व आजार नंतर काही दिवस कोरोनाच नव्हे तर इतर सर्व व्हायरल आजारांची शक्यता वाढते. लसींमुळे आजार कमी झाल्या मुळे कोरोनच नव्हे तर इतर व्हायरल आजारांची जोखीम वाढवणारे घटक कमी होतील
  • आजारी रुग्णाला तपासताना व कोरोनाचे निदान करताना लस घेतली असल्याने ‘हे आजार नाही’ हा निष्कर्ष काढणे सोपे जाईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही फेब्रुवारी व मार्च महिन्यात केलेल्या एका अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला कि धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका व त्यामुळे मृत्यूची शक्यता कमी आहे. पण नंतर या अभ्यासाच्या त्रुटी लक्षात आल्या. व जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हणण्यास अजून कुठला ही संशोधनात्मक आधार नसल्याचे जाहीर केले. तसेच धुम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही असे जाहीर केले.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

फ्रांसच्या माध्यमांमध्ये सुरुवतीला या बातम्या आल्याने धूम्रपानाचे प्रमाण वाढले पण नंतर तिथे ही वैद्यकीय तज्ञांनी हा अभ्यस अपूर्ण असल्याचे सांगितले. एक तर या अभ्यासात केवळ ४८२ जणांचाच अभ्यास केला होती. ठामपणे निष्कर्ष काढण्यास ही संख्या कमी आहे. तसेच यात सामील असलेल्यांनी आधी धुम्रपान सोडले आहे अशांची ही बरे झालेल्यांमध्ये गणना करण्यात आली. तसेच प्रत्येक वैद्यकीय संशोधनात्मक अभ्यासाचे इतर संशोधक आणि तज्ञांकडून पडताळणी करूनच तो निश्चित मानला जातो. अजून या अभ्यासाची अशी कुठलीही पडताळणी झाली नसताना तो अति उत्साहात फ्रांसच्या माध्यमात छापण्यात आला. तिथून तो जग भर पसरला . पण कोणीही या भ्रमात राहू नये. उलट धुम्रपान करत असलेल्याल्यांना फुफ्फुसाला इजा झाल्यामुळे  कोरोनच नव्हे तर इतर कुठल्या ही जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. तसेच मधुमेह , ह्र्दयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर या सर्वांचा धोका जास्त असल्याने कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका जास्त असू शकतो. म्हणूनच मद्यपाना प्रमाणे कोरोना ही धुम्रपान सोडण्यास चांगली संधी आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका

उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका सध्या कोरोनाच्या भीती पोटी अनेक जन रोज मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेत आहेत. औषध दुकानांवर या गोळ्यांचा खप प्रचंड वाढला आहे. व्हिटामीन  डी व शाकाहारी लोकांना व्हिटामीन   बी १२ , फोलिक अॅसिड सोडले तर इतर सर्व व्हिटामीन   हे मुबलक प्रमाणात फळे , भाज्या, खाद्य पदार्थांमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही स्वस्थ असाल व तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला मल्टीव्हिटामीनच्या गोळ्यांची गरज नाही. सध्या अशा मल्टी व्हिटामीन   गोळ्या जाहिराती ही वाढल्या आहेत. एक मोठा हिंदी चित्रपट स्टार जिंसिंग सह मल्टीव्हिटामीन च्या महागड्या  गोळीची जाहिरात करतो जी वारंवार दाखवली जाते आहे. काही जाहिरीतींमध्ये आता कोरोनाचे संदर्भ दिले जात आहेत. अशा जाहिरातींना कोणीही भुलू नये.बरेच जन व्हिटामीन   सीच्या गोळ्यांचे ही सेवन करत आहेत. तुम्ही रोज अर्धे  लिंबू पाण्यात पिळून घेतले तरी तुम्हाला पुरेसे व्हिटामीन सी मिळते. तसेच चांगला आहार असणार्यांच्या शरीरात व्हिटामीन सी चा साठा चांगला असतो म्हणून रोजच लिंबू पाण्यात घ्यायला हवे असाही काही नियम नाही. आपण आपल्या नियमित आहारात अधू मधून लिंबू पिळून घेतोच. तेवढे ही पुरेसे ठरेल. तसेच प्रोटीन सप्लीमेंट्स घेण्याची ही गरज नाही.

मल्टीविटामिन गोळ्या सल्ल्याशिवाय घेतल्याने विटामिन ए सारख्या काही विटामिन्सचा ओवर डोस ही होऊ शकतो. त्यामुळे इतर वेळीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वितामिनच्या गोळ्या घ्याव्या. या शिवाय स्पिरुलीना , प्रतिकारशक्ती वाढवणारे हर्बल औषधे या ही कोरोना टाळण्यासाठी घेण्याची गरज नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

        उगीचच मल्टी व्हिटामीनच्या गोळ्या घेऊ नका व्हिटामीन डी मात्र सगळ्यांना घेण्याची गरज असते. हे  सोडून दुसरी घेण्याची गरज पडू शकते अशी गोष्ट म्हणजे लोह म्हणजे आयर्न. डॉक्टरांच्या परवानगीने फक्त पुढील काही जणांना काही सप्लीमेंट्सची गरज पडू शकते.  –

  • लहान मुले –आयर्न , कॅल्शियम
  • गरोदर माता – फोलिक अॅसिड , आयर्न , कॅल्शियम
  • गुटका , तंबाखू खाणारे – फोलिक अॅसिड
  • शाकाहारी – व्हिटामीन   बी १२
  • मद्यपान करणारे – फोलिक अॅसिड, व्हिटामीन   बी ६, ए , थायमिन
  • मधुमेह , किडनीचे आजार आणी कॅन्सर – यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार

म्हणजेच आजार असले तरी सर्वच नव्हे तर प्रत्येक आजारा प्रमाणे नेमक्या स्प्लीमेंट्सची आवश्यकता असते. म्हणूनच नियमित आहार घेणार्यांनी कुठले ही स्प्लीमेंट्स घेण्याची गरज नाही. आजार असणार्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नेमकी औषधे घ्यावी. 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

‘ड’ जीवनसत्व मुलांच्या प्रतिकारशक्तीचा आधार

'ड' जीवनसत्व मुलांच्या प्रतिकारशक्तीचा आधार

‘ड’ जीवनसत्त्व कशासाठी आवश्यक असते? ‘ड’ जीवनसत्व मुलांच्या प्रतिकारशक्तीचा आधार स्नायू व हाडांच्या वाढीसाठी जन्मापासून कुमारवयापर्यंत ‘ड’ जीवनसत्त्व अत्यावश्यक जीवनसत्त्व असते. लहान वयात ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रीकेट्स व कुमारवयात हाडांची ठिसूळता, हाडे नाजूक राहणे असा त्रास होतो. लहान वयात ‘ड’ जीवनसत्त्व कमी राहिल्यास त्याचा हाडांवर भावी आयुष्यात अगदी म्हातारपणापर्यंत परिणाम राहतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  ‘ड’ जीवनसत्व मुलांच्या प्रतिकारशक्तीचा आधार प्रतिकारशक्ती व त्यातच श्वसनाच्या जंतूसंसर्गाविरोधात ‘ड’ जीवनसत्त्वाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दमा असलेल्या मुलांमध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी नॉर्मल राहणे गरजेचे असते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘ड’ जीवनसत्त्वाचे खूप महत्त्व आहे. ‘ड’ जीवनसत्त्व घेतल्याने कोरोना संसर्ग होणारच नाही, असे नाही पण त्याची पातळी नॉर्मल असलेल्या बाळाचा कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क आल्यास त्याला प्रतिकारशक्ती चांगली असल्याने कोरोना बाधा होण्याची शक्यता कमी होऊ शकते. तसेच, कोरोनाची बाधा झाली तरी त्याचे शरीर कोरोनाशी लढण्यास अधिक सक्षम असेल. आईच्या दुधात इतर सर्व घटक असतात, पण ‘ड’ जीवनसत्त्वामध्ये मात्र ते कमी पडते. तसेच सकाळी १० ते ४ अर्धा तास मुलांना उन्हात ठेवणेही व्यावहारिक नाही. त्यामुळे सर्व वयोगटातील लहान मुलांना ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. याला रोज उन्हात अंघोळ घातली जाणारी नवजात बालके अपवाद असू शकतात. जन्मानंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनिटे सूर्यप्रकाश मिळू दिल्यास त्यांना ‘ड’ जीवनसत्त्वाचे औषध देण्याची गरज पडणार नाही. पण पहिल्या महिन्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्यास मात्र जन्मापासूनच ‘ड’ जीवनसत्त्वाचे औषध ४०० IU रोज एक वेळा पहिले वर्ष द्यावे. ‘ड’ जीवनसत्व मुलांच्या प्रतिकारशक्तीचा आधार या नंतर दररोज ४०० ते ६०० IU प्रती दिन देणे अपेक्षित आहे.पण दररोज औषध देण्याचे कोणालाही शक्य होत नाही व लक्षातही राहात नाही. यासाठी एक वर्षानंतर ६०,००० IU आठवड्यातून एकदा ६ आठवडे व नंतर दर ऋतू बदलला म्हणजे प्रत्येक वेळी ऋतू बदललल्यावर ‘ड’ जीवनसत्त्व एकदा द्यायला हवे. ढोबळपणे दर तीन महिन्यातून एकदा ६०,००० IU असा हा डोस येतो. याशिवाय मुलांनी उन्हात खेळायला हवे. शाळांमध्ये खेळण्याचे तास हे सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ठेवण्यात यावेत. एरवी कुठल्याही गोष्टीसाठी रक्त घेतले जात असेल, तेव्हा मुलांच्या रक्तातील ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण तपासून पाहावे. पण आवर्जून हे तपासण्यासाठी रक्त घेऊ नये. हे प्रमाण ५० mg / ml च्या वर असल्यास पुरेसे समजावे. त्याखाली असल्यास पूर्ण उपचारासाठी याप्रमाणे डोस द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. खरेतर कोरोनासोबतच अनेक वर्षांपासून लहान मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व कमतरतेची दुर्लक्षित साथ सुरू आहे. कोरोना साथीच्या निमित्ताने ही साथही संपवता येईल

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे!

फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! नुकताच कोरोना सदृश लक्षणे व मधुमेह हा कोरोनाची शक्यता वाढवणारा घटक असलेल्या एका रुग्णाचा संपर्क झाला. शासनाच्या फिवर क्लिनिकला जाऊन तपासणीचा सल्ला देऊनही अशा वेळी फक्त शक्य तितके गरम पाणी प्या असा सल्ला वाचल्याने एवढेच करून मी ठीक होईल अशा या रुग्णाच्या हट्टामुळे जवळचे नातेवाईक ही वैतागले. कोमट / गरम पाण्यासह अनेक उपचारांबद्दल समाज माध्यमांवर सल्ले दिले जात आहेत. कुठल्या ही ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णाने शासनाच्या जवळच्या फिवर क्लिनिक किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन दाखवावे. तसेच संशयित व कोरोना बाधित लक्षण विरहीत तसेच लक्षणांसह असलेल्या रुग्णाचे नेमके काय उपचार करायचे हे मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अॅलोपॅथीचे उपचार ठरलेले आहेत . गरम पाणी, आयुर्वेद, होमिओपथी हे प्रतिबंधासाठी ठीक आहेत व त्यासाठी जरूर वापरावे  तसेच उपचार म्हणून ही सोबत घेण्यास हरकत नाही. आयुष चे काय उपचार अॅलोपॅथी सोबत घ्यायचे आहेत हे ठरवण्यासाठी शासनाने एक कृती गट ही स्थापन केला हे व तो लवकरच या विषयी निर्णय घेईल . पण हे इतर व आयुष  उपचार सुरु करायचे म्हणजे अॅलोपॅथीचे उपचार बंद करायचे असे नाही. तसेच डॉक्टरांच्या माहिती शिवाय समाजमाध्यमांवर सांगितले जाणारे घरगुती उपचार अॅलोपॅथीचे उपचार बंद करून घेऊ  नये. फक्त घरगुती उपचार  घेत घरी बसने  खूपच धोका दायक ठरू शकते .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

      फक्त गरम किंवा कोमट पाणी हे कोरोना वर उपचार नव्हे! हे सर्व कोरोनावर अॅलोपॅथी मध्ये उपचारच नाहीत या गैरसमजा पोटी होते आहे. उपचार नाहीत असे म्हणण्यापेक्षा हा व्हायरल आजार असल्याने इतर कुठल्याही व्हायरल आजरा प्रमाणे वेळेप्रमाणे आपोआप बरा होणारा आजार आहे. पण आजार बरा होत असताना शरीराला,  फुफ्फुस व इतर आजारांना  इजा होऊ नये म्हणून रुग्णाचे निरीक्षण आवश्यक असते. तसेच कोरोनावर उपचार ही आहेत व काहीं उपचारांवर संशोधन सुरु आहे . बरीच औषधे ही काही प्रमाणात विषाणूची संख्या कमी करतात व ती वापरली जात आहेत. तसेच संसर्गा नंतर शरीराला इजा होण्याची चिन्हे दिसत असली तर ती इजा कमी करणारी किंवा रोखणारी औषधे ही दिली जात आहेत. काही रुग्णांना केवळ ऑक्सिजन कमी पडते व तेवढे काही दिवस दिले तरी ते बरे होतात. म्हणूनच उपचार नाहीत या भ्रमात केवळ घरगुती उपाय करत कोणीही घरी थांबू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता