वजनाबरोबर पोटाचा घेर हा किती असावा, याचे सुध्दा काही निर्देश आणि आयडियल व्हॅल्यूज आहेत. आपण दर दोन ते तीन महिन्यांने पोटाचा घेर मोजून बघणे आवश्यक आहे. आता हा पोटाचा घेर कसा मोजायचा याची आपण सविस्तर माहिती घेऊया.
पोटाचा घेर मोजण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी उठल्यावर शौचाला जाऊन आल्यावर पोटाचा घेर मोजायचा. घरातील एखाद्या व्यक्तीची मदत घेऊन बेंबीच्या खाली दोन बोटे / दीड इंचाखाली मेजरिंग टेप लावून पोटाचा घेर मोजायचा आणि किती आकडा येतोय तो लक्षात ठेवायचा. आता आपण पुरुष व महिलांसाठी आयडियल व्हॅल्यूज काय असतात ते पाहूया.
आयडियल व्हॅल्यूज दोन प्रकारच्या असतात. एक आदर्श व्हॅल्यूज आणि दुसरी जास्तीत जास्त वरची लिमिट काय असायला पाहिजे. आदर्श आकडे पुरूष ७८ सेंटीमीटर आणि महिला ७२ सेंटीमीटर हे आहेत. जास्तीत जास्त वरची लिमिट पुरुष ९० सेंटीमीटर व स्त्री ८० सेंटीमीटर तर याचा अर्थ काय ? पुरुषाच्या पोटाचा घेर हा ७८ ते ९० सेंटीमीटरच्या मधे असेल, तर तुम्ही ग्रे झोनमध्ये आहात. आता तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हालचाल केली पाहिजे किंवा जागृत झाले पाहिजे की, आपले कुठेतरी काही चुकतंय का? हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारले पाहिजे. तसेच स्त्रीया ७२ ते ८० सेंटीमीटरमध्ये ग्रे झोनमध्ये आहेत.
पुरुष ९० व स्त्रीया ८० सेंटीमीटरच्या पुढे पोटाचा घेर असेल. तर आपली धोक्याची घंटा वाजलेली आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्यामध्ये जीवनशैलीच्या आजारांनी प्रवेश केला आहे. मधुमेह, डायबिटिस, ह्रदयरोग, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांचे दार उघडायला सुरुवात झालेले आहे. पुरुष ९० व महिला ८० सेंटीमीटरच्या पुढे पोटाचा घेर गेला असेल. तर तुम्हाला युद्धपातळीवर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
(खाली दिलेल्या युट्यूब लिंकवर जाऊन व्हिडिओ सुध्दा पाहू शकता.)