कोरोनासाठी झिंक महत्वाचे

कोरोनासाठी झिंक महत्वाचे

कोरोनासाठी झिंक महत्वाचे झिंक आपल्या शरीरातील असा सूक्ष्म घटक आहे जो प्रतिकारशक्ती साठी महत्वाचा असतो. कोरोना वर अजून संशोधन सुरु असून झिंक व कोरोना उपचार व प्रतिबंधाचा थेट संबंध सिध्द होण्यास अजून वेळ लागेल. पण मात्र सर्दी, खोकला, न्युमोनिया व इतर सर्व श्वसनाचे जेवढे जंतुसंसर्ग आहेत, ते टाळण्यात झिंकचे महत्व सिध्द झाले आहे. लहान मुलांना मधील जुलाब झाल्यावर दररोज ५ मिलीग्राम असलेले झिंकचे टॉनिक आम्ही बालरोगतज्ञ देतोच. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी झिंकचे महत्व आहे. उपचारामध्ये ही झिंकचा वापर सध्या केला जातो आहे. पण कोरोना टाळण्यासाठी झिंकच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. पुढील अन्ना मध्ये झिंक जास्त प्रमाणात असते. या अन्नाचा नियमित आपल्या जेवणात समावेश असावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनासाठी झिंक महत्वाचे लसून , भोपळा, टरबुजातील बियांच्या मधला भाग ( मगजबी ), वाटणे , पॉलिश न केलेला भात , मशरूम , तीळ , कडधान्ये , पालक , बदाम, चीज, शेंगा व कडधान्यात फायटेट नावाचा घटक असतो ज्यामुळे त्यांच्यातील झिंक शरीरात शोषून घेतले जाऊ शकत नाही. त्यासाठी हे पाण्यात भिजवून, अंकुरित करून घेतल्यास झिंक आतड्यात शोषून घेतले जाते. मासे व अंड्यांमध्ये ही झिंक असते.

रोज ८ ते ११ मिलीग्राम झिंक मानवाच्या शरीराला लागते. पुढील व्यक्तीं मध्ये झिंक शरीरात कमी असण्याची शक्यता असते –

  • वय ६० पेक्षा जास्त असणे
  • गरोदर व स्तनदा माता
  • मद्यपान करणारे
  • कॅन्सर
  • मधुमेह
  • दीर्घकालीन किडनीचे आजार
  • सिकल सेल अॅनीमिया

झिंकचे सप्लीमेंट्स कोणी घ्यावे ?

  • वर दिलेले आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवस घेऊ शकता
  • कोरोनाशी संपर्क आला असल्यास किंवा लक्षण विरहीत कोरोना असल्यास शासकीय व्यवस्थेच्या निर्देशाप्रमाणे व तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

सलून व नाभिकांकडे जाताना…

सलून व नाभिकांकडे जाताना...

सलून व नाभिकांकडे जाताना ग्रीन व ऑरेंज झोन मध्ये सलून व नाभिकांची दुकाने आता उघडू लागली आहेत. तसेच नंतर नाभिकांकडे जावे लागेलच. त्यामुळे या विषयी नाभिक व केस कापण्यास आलेल्या दोघांनी काळजी घ्याव –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • सलून व नाभिकांकडे जाताना नाभिकांनी शक्यतो पूर्ण पीपीई म्हणजे वयक्तिक सुरक्षेचे कवच वापरावे. पण ग्लोव्हज प्रत्येक ग्राहकांसाठी नवे वापरता येतील असे डिस्पोजेबल प्लास्टीकचे वापरावे. या ग्लोव्हजची किंमत १- २ रु इतकी कमी असते.
  • शक्यतो प्रत्येक ग्लोव्हजसाठी डिस्पोजेबल टॉवेल वापरावा किंवा प्रत्येकाने घरून आपला धुतलेला टॉवेल सोबत घेऊन जावा.
  • सलून व नाभिकांकडे जाताना… जर तुम्ही तुमचे स्वतःचे टॉवेल, अंगावर टाकण्याचा ड्रेप, कात्री, कंगवा, वस्तरा, ब्लेड व स्प्रेयर हे सर्व साहित्य खरेदी केले तरी त्याची किंमत जास्तीत जास्त १००० रुपये असेल. व हे तुम्ही अनेक वर्ष वापरू शकता. म्हणून शक्यतो हे सर्व साहित्य स्वतः खरेदी करावे व वापरावे. याने सलून मधील सर्वांना वापरले जाणारे साहित्य वापरण्याची गरज पडणार नाही.
  • नाभिकांना सलून मध्ये आल्यावर खुर्चीवर बसण्या आधी हात धुऊन व मास्क घालूनच बसण्याची सक्ती करावी. हात धुतल्यावर हँड सॅनीटायजरचा वापर करावा.
  • जर ग्राहकांनी स्वतःचे सामान आणले नसेल तर प्रत्येक कटिंग नंतर साहित्य सॅनीटायजरने धुउन घ्यावे.
  • दर रोज सलून बंद करताना काच , खुर्ची आणि जमीन , काचे समोरचे टेबल १ % सोडियम हायपोक्लोराईटने धुवून घ्यावे.
  • शक्यतो आपला नंबर आल्यावर सलून मध्ये यावे. तो पर्यंत सलून मध्ये गर्दी करून बसू नये. सलून ने वेळ देऊन बोलावण्याची सवय लावावी.
  • कटिंग सुरु असताना आपल्याला काही तरी बोलण्याची , नाभिकाशी गप्पा मारण्याची सवय असते. ग्रामीण भागात तर नाभिकाची खुर्ची म्हणजे गावभरच्या गप्पा, गॉसीपसाठीचे ठिकाण असते. हा मोह टाळावा व शांत बसावे.
  • सलून मध्ये दाढी करणे टाळावे व दाढी शक्यतो घरीच करावी. सलून मध्ये दाढी करत असल्यास त्यासाठी  प्रत्येकाला नवा डिस्पोजेबल खोऱ्या वापरावा.
  • कटिंग किंवा दाढी करताना थोडी जखम झाल्यास त्यावर तुरटी लावू नये. स्वच्छ कापसाने स्पिरीट लावावे.
  • प्रत्येक कटिंग किंवा दाढी झाल्यावर ग्लोव्हज काढून नाभिकाने हात धुवावे.
  • केस कापून झाल्यावर सलून मधून बाहेर पडताना हँड सॅनीटायजर वापरावे व घरी गेल्यावर हात धुवून लगेचच अंघोळ करावी.
  • सर्दी, खोकला, ताप असल्यास सलून मध्ये जाऊ नये, नंतर केस कापावे. तसेच नाभिकाला ही लक्षणे असल्यास त्यांनी बरे वाटे पर्यंत कामावर येऊ नये.
  • ग्रामीण भागात व तालुका पातळीवर नाभिक थोडे अधिक पैसे आकारून घरी येऊन केस कापण्यास तयार असतात. अशी सेवा असल्यास ती घ्यावी व अशा वेळी बाहेर मोकळ्या वातावरणात वरील सर्व काळजी घेऊन केस कापावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगावमधील ‘कोरोना’ च्या प्रादुर्भावाबद्दल वैद्यकीय आणि  विज्ञाननिष्ठ चर्चा करायची झाली तर धार्मिक स्पर्श बाजूला ठेवून धीराने मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण आणि  त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. जसे मुंबई हे महाराष्ट्रच नव्हे तर देशाची कोरोना राजधानी ठरते आहे तशीच मालेगाव ही ग्रामीण व उर्वरित महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सुधारणा करायची  असेल तर या मुद्द्यांकडे जातीय दृष्टीकोनातून न पाहता तातडीने पावले उचलली पाहिजेत.

     डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगाव मध्ये कोरोना बाधितांचा अधिकृत आकडा ६९६ व कोरोना मृतांचा आकडा ४४  असला तरी खरा आकडा खूप मोठा आहे. मुस्लीम बहूल मालेगाव मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला ८ एप्रिलला म्हणजे रमजानच्या तोंडावर. क्वारनटाईन व आयसोलेशनची भीती, सणाच्या तोंडावर रुग्णालयात जाणे चांगले नाही अशा अनेक गैरसमजांमुळे इथला मुस्लीम समाज तपासणी साठी फारसा पुढे आला नाही. त्यातच जुन्या मालेगाव मध्ये दाटी वाटीने राहात असलेल्या मुस्लीम वस्त्यांमध्ये सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड आहे. यामुळे अधिकृत आकडे आणि  मृत्यू जरी कमी दिसत असले तरी मालेगाव मध्ये गेल्या दीड महिन्यात मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. मालेगावच्या बडा कब्रस्तान मध्ये एप्रिल महिन्यात ४५७ मृतदेहांचे दहन करण्यात आले आहे व तुलनेत एप्रिल २०१९ मध्ये केवळ १४० मृतददेहांचे दहन जाहले आहे. प्रशासना कडून मात्र मृतांचा आकडा ४४ सांगितला जात असला आणि  इतर मृत्यू हे कोरोना मुळे नव्हे तर इतर कारणांमुळे होत असल्याचे सांगितले जाते आहे. मुळात मालेगाव मध्ये मृतांचा आकडा हा ४०० – ५०० पेक्षा खूप अधिक आहे आणि  शासनाने खरच खरा आकडा शोधून काढला तर मालेगाव मध्ये  प्रती दशलक्ष मृत्यू दर हा मुंबई व न्युयोर्क पेक्षा खूप जास्त निघेल असे मालेगाव मधील डॉक्टर व काही जाणकार नागरिक सांगतात. आज मालेगावच्या बडा कब्रस्थान मध्ये मृतदेह पुरायला जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे. असे असेल तर मृतांचे स्वॅब घेऊन ते कोरोनाचे होते का  हे सिध्द करायला हवे आणि  खरच इतर कारण असतील तर त्या कारणांचा शोध घ्यायला नको का? इतर कारण आहेत हे प्रशासनाचे उत्तर ग्राह्य धरले तरी या इतर आजार असलेले रुग्णच कोरोनाच्या भक्षस्थळी पडतात.

     मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मृतांचा आकडा वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे साथ सुरु झाल्यावर शासकीय रुग्णालयात रुग्ण हाताळण्यासाठी कुठलीही सक्षम व्यवस्था नव्हती. त्यातच सर्दी खोकल्याचे रुग्ण खाजगी रुग्णालयात पहायचे नाहीत असा नियम असल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालयात जावे लागायचे. पहिल्या काही दिवसात कोरोनाचे जे मृत्यू झाले ते बहुतांश सायलेंट हायपॉक्सिया मुळे झाले. म्हणजेच रुग्णांना विशेष लक्षणे नाही पण ऑक्सिजनची पातळी मात्र खालावलेली. काही जण खूप उशिरा रुग्णालयात पोहोचत. त्यामुळे साथ सुरु होताच झपाट्याने मृत्यूचा आकडा वाढला. या मुळे शासकीय रुग्णालयात कोरोना चा रुग्ण दाखल झाला म्हणजे मृत्यूच होणार अशी भीती पसरली आणि  या भीती पोटी मुस्लीम समाजात रुग्णालयात दाखल होणे किंवा त्रास होत असल्यास टेस्टिंग साठी पुढे येणे याचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे केसेस व मृत्यू वाढतच गेले. यासाठी स्थानिक प्रशासन सुस्त असून फारसे काही पाऊले उचलत नाहीत हे दिसल्याने इथल्या मुस्लीम डॉक्टर्सने जन जागृतीचे काम सुरु केले. टेस्टिंग आणि  उपचारासाठी पुढे आला नाहीत तर आपल्यालाच धोका आहे हे समाजाला समजावून सांगितले. आता स्थिती काहीशी नियंत्रणात असली तरी अजून सगळे आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. मालेगाव मध्ये मुस्लीम लोकसंख्या ८० टक्के असली तरी टेस्टिंग झालेल्यांपैकी केवळ १० % मुस्लीम आहेत. अजून हे प्रमाण वाढलेले नाही. हा प्रश्न धार्मिक पेक्षा अज्ञानाचा आणि  असुरक्षिततेचा आहे. तो दूर करण्यासाठी कुठला हा आराखडा आणि  मोहीम शासनाने आखलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आणि  तेवढ्या पूर्ती चक्रे हलली पण परत सगळे जैसे थे झाले.

       मालेगाव हे दुसरे धारावी आहे असे मानून शासनाला वेगळे “मिशन मालेगाव“ आखावे लागणार आहे. राज्यात इतरत्र जसे एकसुरी कार्यक्रम राबवला जातो आहे तसे इथे करता येणार नाही. मालेगावचे प्रश्न वेगळे आहेत आणि  त्यात मुस्लीम समाजाला मोठ्या प्रमाणावर विश्वासात घेऊन पाऊले उचलावी लागणार आहेत. मालेगाव मनपा घरोघरी जाऊन होम स्क्रीनिंग ही करते आहे. पण तरी खरे आकडे बाहेर येणे आणि  त्याप्रमाणे कठोर पाऊले अजून उचल गेली पाहिजे . ‘मिशन मालेगाव’ चे अनेक पदर असू शकतात –

  • खाजगी संस्था / स्वयंसेवी संस्थांकडून वेगळे सर्वेक्षण करून वास्तव पुढे आणणे व खरी माहिती जाणून घेणे.
  • मुस्लीम समाजातील धार्मिक गुरु, मौलवी, डॉक्टर, नेते  यांना विश्वासात घेऊन समाजात टेस्टिंग साठी पुढे येण्या बाबत व मृत्यूची करणे, आजार न लपवण्याबाबत समाजात जन जागृती साठी सहकार्य मिळवणे.
  • मालेगाव मध्ये कापड व हँडलूम व्यवसाया मुळे इथे टीबी व फुफुसाची क्षमता कमी करणारे न्युमोकोनीयासीस या आजाराचे प्रमाण खूप जास्त आहे, ज्या कडे आजवर कधी लक्षच दिले गेले नाही. हे सर्व रुग्ण शोधून  त्यांच्यासाठी उपचाराची  स्वतंत्र सोय करणे गरजेचे आहे  कारण या रुग्णां मध्येच कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
  • मालेगाव मध्ये एका किलोमीटर मध्ये १० ते २०,००० व एका घरात २० त २५ जन राहतात असा मुस्लीम वस्तीचा मोठा भाग आहे. जर ही लोकसंख्येची घनता अशीच दाट राहिली तर भविष्यात मालेगाव मध्ये कोरोनाचा मोठा स्फोट होईल व असंख्य मृत्यू होतील. मालेगावच्या भोवती जागा उपलब्ध आहे. त्यामुळे मालेगावच्या नगर विकासाचा व मुस्लीम वस्त्यांच्या गर्दी व दाटी वाटीने राहण्याचे प्रमाण  कमी होईल अशा रीतीने पुनर्विकास प्रकल्प आखावा लागणार आहे.
  • रोज ३० ते ४० दहनांमुळे मालेगावच्या बडा कब्रस्तान मध्ये आता मृतदेह पुरण्यास जागा उपलब्ध नाही. तसेच कोरोनाचे समोर न आलेले मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचे दहन संसर्ग पसरू नये यासाठी कसे करायचे याचे नीटसे ज्ञान कोणालाही नाही. म्हणून याविषयी माहिती देऊन कब्रस्तानसाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे आणि  मृतदेहांच्या विल्हेवाटी विषयी जागृती निर्माण करावी लागणार आहे.

          मालेगाव व बसवंत पिंपळगाव ही दोन शहरे नाशिकचा आर्थिक कणा आहेतच तसेच इथल्या संपन्न , सधन बाजारपेठा महराष्ट्राच्या ग्रामीण अर्थचक्राचा मोठा आधार आहेत. मालेगाव मध्ये कोरोना प्रतिबंध गांभीर्याने घेतला नाही तर इथला कापड व इतर उद्योग ढासळून , इथे असणाऱ्या व्यापाऱ्यांची आवक थांबून त्याचा नाशिक व राज्याच्या अर्थकारणावर मोठा दुष्परिणाम होईल. म्हणून दडवून ठेवलेला मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट स्वीकारून तातडीने पाऊले उचलली गेली पाहिजे

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते!

डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते!

डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते! चीन मध्ये व जगात पहिल्यांदा कोरोना बद्दल जाहीरपणे नव्या व घातक विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे असा सुतोवाच करणारे डॉ. ली वेनलीआंग हे नेत्रतज्ञच होते. पुढे त्यांचा ही कोरोनाने मृत्यू झाला. आज दुखाची गोष्ट म्हणजे डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते याबद्दल अजून अनेकांना पुरेशी माहिती नाही. भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले कि त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती. तसेच अनेक नेत्ररोग तज्ञांनी डोळे आलेल्या म्हणजे कंजक्टीवायटीस झालेल्या रुग्णांना कोरोनाची शंका व्यक्त केली व तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

महाराष्ट्र ऑफथॅल्मिक सोसायटीचे राज्याचे सचिव नेत्ररोगतज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया सांगतात की सध्या साथीच्या वातावरणात डोळे आलेला रुग्ण कोरोनाचा असू शकतो ही शक्यता आहे. त्यातच जर तुमचा कोरोना रुग्णाशी संपर्क आला असेल, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे कोरोना असल्याचे निदान झाले असेल व तुमचे डोळे आले असतील तर हेच लक्षण कोरोनाची सुरुवात असू शकते. अजून डोळे येणे या लक्षणाची कोरोनासाठी टेस्टिंग करण्याच्या निर्देशात समावेश नसला तरी राज्यातील व देशातील नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेऊन तो करण्याची गरज आहे.

पुढील लोकांचे डोळे आल्यास जास्त शक्यता आहे की डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे – -डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ – पोलीस -स्वच्छता कर्मचारी -फिल्ड वर कोरोना वार्तांकन करणारे पत्रकार -थेट लोकांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते – हॉटस्पॉट, कन्टेनमेंट झोन मधील सर्व नागरिक

तुमचे डोळे आले असतील तर काय करावे

  • आपल्या नेत्र रोगतज्ञांना फोन द्वारे फोटो पाठवून टेली कन्सलटेशन घ्यावे.
  • आपण कोरोनाची जोखीम जास्त असलेल्या वर दिलेल्या घटकात आहात का ? हे सांगावे.
  • नेत्ररोगतज्ञ वैद्यकीय इतिहास जाणून तुम्हाला कोविड रुग्णालयात जायचे का व कोरोनाची तपासणी करणे गरजेचे आहे का ? या विषयी पुढील सल्ला देतील.
  • डोळे येण्यासाठी औषध दुकानातून प्रीस्क्रीपशन व नेत्र रोगतज्ञांच्या सल्ल्या शिवाय ओव्हर द काऊनटर डोळ्याचे ड्रॉप घेणे हे सर्रास केले जाते. पण साथीच्या या काळात व इतर वेळी ही असे मुळीच करू नये. याने डोळ्यांना इजा होऊ शकते .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता

पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता

पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता कुत्रे मांजर या घरातील पाळीव प्राण्यांना ही मानवा कडून कोरोना संसर्गाचा धोका आहे. म्हणून   पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हे समजून घ्यायला हवे . त्यासाठी खालील टिप्स –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता पाळीव प्राण्यांना कोरोना बाधित व्यक्ती कडून संसर्ग होण्याचे काही पुरावे इतर देशांमध्ये सापडले आहेत म्हणून अशी व्यक्ती अलगीकरणात राहते तेव्हा प्राण्यांपासून ही लांब राहावे.
  • पाळीव प्राण्यांकडून मानवाला संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे व अजून यावर पुरेसे संशोधन झालेले नाही. म्हणून पाळीव प्राण्यांना आधी सांभाळ करताय तसेच करायला हरकत नाही. मात्र पाळीव प्राणी आजारी असल्यास त्याचे त्वरित उपचार करावे.
  • पाळीव प्राण्याची तब्येत बरी नसल्यास त्याच्या जवळ जाताना मास्कचा वापर करावा व प्राणी हाताळल्यावर हात धुवून घ्यावे.
  • बाहेर गेल्यावर मानवाने जे इतरांना पासून ६ फुट लांब राहण्याचा सोशल डीस्टन्सिंगचा नियम पाळावे.
  • पाळीव प्राण्यांना इतर घरातील पाळीव प्राण्यांशी संबंध येऊ देऊ नये
  • पाळीव प्राण्यांना नियमित अंघोळ घालने व त्यांची स्वच्छता ठेवणे
  • ५ वर्षा खालील मुले व ६० वर्षा वरील ज्येष्ठांनी शक्यतो पाळीव प्राण्यांपासून लांब राहावे .
  • लॉकडाऊन नंतर प्रवास करायचा झाल्यास पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन प्रवास करणे टाळावे.
  • पाळीव प्राण्यांची व तुमची झोपण्याची जेवणाची जागा शक्यतो वेगळी ठेवा
  • वेटरनरी प्राण्यांच्या डॉक्टरांकडून घरातील पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण पूर्ण करून घ्या .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

माती, खडू खाण्याचा आजार

माती, खडू खाण्याचा आजार

माती, खडू खाण्याचा आजार लहान मुलांना माती किंवा इतर गोष्टी खाण्याची सवय असते. यात खडू, पाटीची पेन्सिल, पेपर, साबण, प्लॅस्टर, भिंत चाटणे, क्ले, कोळसा, राख, पेंट, खेळणी चाटणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. थोड्याफार प्रमाणात कळत नसल्याने दुसऱ्या वर्षापर्यंत या गोष्टी नॉर्मल असतात, पण दुसऱ्या वर्षानंतर सतत एक महिना अशी माती व इतर वस्तू खाण्याची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘पायका’ असे म्हटले जाते व उपचाराची गरज असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वय 
मुलांमुलींमध्ये २ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंत हा आजार कधीही दिसू शकतो. अनेक जणांना मोठे झाल्यावरही त्यातच महिलांना गरोदर असतना माती, खडू खाण्याची इच्छा होते. लहान मुलांमध्ये मतिमंदत्व, स्वमग्नता (ऑटिझम) तसेच इतर मानसिक आजारात याचे प्रमाण जास्त आढळून येते. 

कारणे 
– माती, खडू खाण्याचा आजार सहसा शरीरात लोहाची कमतरता माती व इतर गोष्टी खाण्याची इच्छा होण्यामागचे मुख्य कारण असते. त्यासोबत झिंक व काही प्रमाणात कॅल्शियमची कमतरता असते, पण कॅल्शियमपेक्षाही लोह हाच यात महत्त्वाचा घटक आहे. 
– मानसिक तणावामुळे ही मुले माती खातात. पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असेल, तर मुले लक्ष वेधून घेण्यासाठी माती खातात. दुष्परिणाम माती खाल्ल्यामुळे जंताचा त्रास तर होतोच, शिवाय जेवण कमी जाते व शरीरात इतर जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते. तसेच खडे किंवा खात असलेल्या इतर गोष्टी पोटात अडकून आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.   यासाठी ऑपरेशनही करण्याची गरज पडू शकते. 
– माती व इतर गोष्टी खाणाऱ्या मुलांमध्ये जुलाब व कुपोषणाचे प्रमाण जास्त असते. 

उपचार 
– यासाठी तीन महिने सहा मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम याप्रमाणे रोज रात्री झोपताना लोहाचे औषध द्यावे लागते. तीन महिन्यांनंतर गरज असल्यास १ मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम या कमी डोसमध्ये ते सुरू ठेवावे लागते. 
– यासोबत तीन दिवस रात्री झोपतना जंताची गोळी – अल्बेनदेझोल किंवा डोसाप्रमाणे पातळ औषध स्वरुपात द्यावी लागते. लोह दिल्यावर काही दिवसांनी माती खाणे कमी झाले तर जंताची गोळी तीन महिन्यांनी एकदा परत द्यावी लागते. 
– माती खाणाऱ्या मुलांना अधिक मानसिक आधार द्यावा. त्यांना माती खाताना बघितले तर लगेच रागावू नये. याविषयी त्यांना भीती दाखवून, मारून ही सवय जात नाही. 
– उपचार सुरु केल्यावर मुलाला माती खाण्याची संधी मिळणार नाही, याबद्दल दक्षता घ्यावी. 
– माती , खडू, पेन्सिल खाताना दिसला तर त्याला याबद्दल प्रेमाने सांगून, या गोष्टी त्याच्याकडून घ्याव्यात व त्याच्या आवडत्या खेळणी, वस्तू द्याव्यात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे?

आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे?

आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे आरोग्य सेतू हे कोरोना केसचा संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवण्यासाठी बनवलेले भारत सरकारचे अधिकृत अॅप आहे. हे अॅप आता हवाई प्रवासा दरम्यान व काही शासकीय कार्यालयांमध्ये सक्तीचे करण्यात आले आहे. हे अॅप पुढील प्रमाणे वापरता येईल

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • अॅप डाउनलोड करण्यासाठी ते गुगल किंवा अॅपलच्या प्ले स्टोर मधून डाउनलोड करावे.
  • लगेचच अॅप तुम्हाला तुमच्या पसंतीची भाषा विचारेल. मराठीत सह अॅप ११ भारतीय भाषेत उपलब्ध आहे.
  • रजिस्टर असे म्हंटल्यावर आपले लोकेशन म्हणजे आपण कुठे असणारा आहोत याला एक्सेस करण्याची अॅप ला परवानगी द्या.
  • पुढे मोबाईल नंबर अॅप मध्ये भरावा लागतो. या नंतर एक ओटीपी नंबरचा संदेश मोबाईलवर  येईल जो भरला कि अॅप सुरु होईल.
  • एकदा अॅप सुरु झाले कि तुम्हाला ब्लूटूथ सतत चालू ठेवायचे आहे तसेच लोकेशन शेअरिंग च्या फोन मधील सेटिंग ला  ‘ ऑलवेज ‘ असे ठेवायचे आहे.
  •  आरोग्य सेतू अॅप कसे वापरावे सर्व प्राथमिक माहिती भरल्यावर अॅप तुम्हाला गेल्या ३० दिवसातील परदेश प्रवासाला बद्दल विचारते.
  • यानंतर तुम्हाला सध्या ची लक्षणे असल्याची पडताळणी काही प्रश्न विचारून अॅप करते  तसेच तुम्ही स्वयंसेवक म्हणून कोरोनाच्या साथीत काम करण्यास तयार आहात का हे ही विचारते. तयार असल्यास परत २० सेकंदात तुमची स्व चाचणी साठी काही आरोग्य बाबत प्रश्न विचारते.
  • जर लक्षणांना वरून तुम्हाला कोरोना असल्याची शंका असल्यास तसे सांगितले जाते व टेस्ट करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
  • यानंतर जर तुमचा कोरोनाच्या रूग्णाशी संपर्क येत असेल तर तुम्हाला अॅलर्ट केले जाते किंवा तुमचा नुकताच संपर्कात आलेला कोरोना बाधित झाला असेल तर तुम्हाला त्या विषयी अॅलर्ट केले जाते. यानंतर विलगीकरण कसे करायचे याच्या सूचना दिल्या जातात.
  • यासोबतच देश भरातील कोरोना साठीच्या हेल्पलाईन नंबर्सची माहिती या अॅप वर दिलेली आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना विषयीचे सर्व ट्वीट ही अॅप वर दिसतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही पावसाळा सुरू झाल्यावर ताप आणि खोकला आल्यास हा नियमित ऋतूमानाप्रमाणे येणारा सर्दी खोकला की कोरोना हे निदान करणे अवघड जाईल. त्यामुळे सर्वांनी, त्यातच लहान मुलांनी आणि ज्यांना परवडत असेल त्यांनी फ्लू म्हणजे सर्दी खोकल्याची लस घेतलेली चांगली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

फ्लूची लस घेण्यास हरकत नाही या लसीचा एकच डोस घ्यावा लागतो. लस घेताना एक गोष्टीकडे लक्ष ठेवावे.फ्लूची लस उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशी दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असते. भारतासाठी उत्तर ध्रुवासाठीची लस वापरावी, असे निर्देश आहेत. हे एनएच म्हणजे नॉर्दन हेमीस्फीअर असे लसीच्या पाकिटावर लिहिलेले असते. हे तपासून किंवा डॉक्टरला विचारून लस द्यावी. चुकीने बऱ्याच ठिकाणी एसएच म्हणजे दक्षिण ध्रुवाची लस वापरली जाते.पण भारतीय नागरिकांसाठी या लसीचा उपयोग नाही. ही लस घेण्याचे दोन फायदे आहेत. नियमित होणारा सर्दी-खोकला टळेल. कुठल्या ही व्हायरल आजारानंतर प्रतिकारशक्ती कमी होते व अशावेळी कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. हा एक जोखीम वाढवणारा घटक कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

विमान प्रवासात घ्या काळजी

विमान प्रवासात घ्या काळजी

विमान प्रवासात घ्या काळजी आंतरदेशीय हवाई वाहूक टप्प्यात सुरु होत असल्याने आता हवाई प्रवास करणाऱ्या सगळ्यांना काही नियम समजावून घ्यावे लागणार आहेत. विमानात बसल्यावर ६ फुट हा सोशल डीस्टन्सिंगचा नियम पाळणे शक्य नसले तरी इतर अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे संसर्ग टाळला जाऊ शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • लक्षणे असलेल्या किंवा ताप असलेल्यांना विमान प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. म्हणून असे असल्यास माहिती लपवून प्रवास करण्यापेक्षा हवाई प्रवास टाळा.
  • विमानतळाच्या आत जाण्या आधी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करून घ्या कारण हे अनिवार्य आहे.
  • तापमान जास्त आढळल्यास किंवा लक्षणे आढळल्यास इंस्टीट्युशनल किंवा घरी विलगीकरणाचा सल्ला दिल्यास वाद घालू नका. दिलेल्या सल्ल्याचे पालन करा.
  • वेब चेक इन करा म्हणजे विमानतळावर संपर्क कमी येईल.
  • काही विमान कंपन्या त्यांच्या अॅप मधूनच बोर्डिंग पास व त्याचा क़्युआर कोड देतात. हे शक्य झाल्यास सेक्युरिटी चेक व पुढे ही इतरांशी संपर्क कमी येईल.
  • कमीत कमी सामानासह प्रवास करा.
  • सेक्युरिटी चेकच्या वेळी ट्रे चा वापर करण्या पेक्षा सर्व सामान स्वतःच्या बॅगेत टाका
  • सेक्युरिटी चेक झाल्यावर क्यूआर कोड असलेला पास असल्यास स्वतःच्या हाताने स्कॅन करा
  • विमानतळाच्या आत गेल्या पासूनपूर्ण प्रक्रिया झाल्यावर विमानात बसण्या आधी साबणाने स्वच्छ हात धुउन घ्या.
  • विमान प्रवासात घ्या काळजी विमानतळाच्या आत गेल्या पासून हात मागे एकमेकात बांधून किवा कुठे ही हात लावायचा नाही हे लक्षात राहील अशा प्रकारे घडी घालून फिरा
  • विमानतळावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर इकडे तिकडे खरेदी करत फिरू नका.
  • विमानाला वेळ असल्यास बसताना एकमेकांपासून लांब बसा. जागा भरपूर असल्याने हे शक्य आहे.
  • सीट घेताना शक्यतो खिडकी जवळची जागा घ्या. या जागेवर बसणाऱ्यांचा इतरांशी आणि दोन रांगेतून जाणाऱ्यांशी कमी संबंध येतो. ही सीट मिळाली नाही तरी काळजी करू नका.
  • विमानात बसण्या आधी विमानतळावरच शौचालयाचा उपयोग करून घ्या. कमी वेळेचा प्रवास असल्यास विमानातील शौचालयाचा उपयोग करू नका
  • हात दोन सीट मधल्या आर्म रेस्ट वर ठेवू नका. हात दोन्ही मांड्यांवर समोर ठेवा.
  • विमान प्रवासा दरम्यान पाण्यासाठी किंवा उगीचच केबिन कृला बोलवू नका. प्रवासा दरम्यान १०० एमएल पाणी सोबत ठेवण्यास परवानगी असते. म्हणून संपर्क टाळण्यासाठी स्वतःचे १०० एमएल पाणी सोबत ठेवा.
  • सोबत हँड सॅनीटायजर ठेवावा पण तो ३५० एमएल पेक्षा जास्त नसावा. प्रवास करतांना हँड सॅनीटायजर व मास्क अनिवार्य आहे.
  • उतरताना एकमेकांच्या मागे उभे राहून उतरू नये. दोन प्रवाशांमध्ये ६ फुट अंतर ठेवत उतरावे. शक्य असल्यास बसून राहावे व सगळे उतरल्यावर उतरावे.
  • प्रवासा दरम्यान नाक व तोंडाला हात लावणे टाळावे.
  • हवाई प्रवासात ग्लोव्हज अनिवार्य केले आहेत. पण या साठी महागडे सर्जिकल ग्लोव्हजची गरज नाही. विमान प्रवासात घ्या काळजी साधे प्लास्टिक डिस्पोजेबल ग्लोव्हज चालतील. हे स्वस्त असतात. बाहेर निघतांना हे विमानतळाच्या कचरा पेटीत काढून टाकले जाऊ शकतात. ग्लोव्हज काढल्यावर हात धुवावे.
  • हवाई प्रवासा दरम्यान शिंक आल्यास एका प्लास्टिकच्या पिशवीत शिंकावे. ही पिशवी खिशात ठेवावी व नंतर डीस्पोज करावी. विमान कंपन्यांनी सीट समोर स्नीज बॅग्जची सोय करावी. त्या कशा वापरायच्या याचे प्रशिक्षण सुरुवातीला केईन कृ माहिती सांगतात त्यात करावे .
  • घरी गेल्यावर सामान सोडियम हायपोक्लोराईट मध्ये बुडवलेल्या कपड्याने धुवून घ्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ग्लोव्हज वापरण्याची गरज नाही

ग्लोव्हज वापरण्याची गरज नाही

ग्लोव्हज  वापरण्याची गरज नाही सध्या अनेक सर्वसामान्य लोक, राजकीय नेते, पत्रकार, पोलीस   ग्लोव्हज  वापरताना दिसत आहेत. पण डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयात काम करणारा प्रशासकीय कर्मचारी व रूग्णालया बाहेर स्वच्छता कर्मचारी सोडल्यास इतर कोणीही हातमोजे म्हणजे ग्लोव्हज  वापरण्याची गरज नाही. जर ग्लोव्हज  वापरले तर वारंवार हात धुणे शक्य नाही व ते धुतले जाणार नाहीत. व न धुतलेल्या ग्लोव्हज  घातलेल्या हातांनी नाक, तोंड व डोळ्यांना हात लावण्याची शक्यता खूप जास्त आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

आपण किती ही प्रयत्न केला तरी मास्क नीट बसवण्यासाठी, मास्क खाली करण्यासाठी मास्कला किंवा तोंडाला हात लागतोच. अशा वेळी ग्लोव्हज  घालून हात लागल्यास संसर्गाची शक्यता जास्त आहे. याउलट ग्लोव्हज  न घालता वारंवार हात धुणे, बाहेर कुठे ही गेले कि आधी हात धुणे व बाहेरून घरात आले की लगेचच हात धुणे व नाका तोंडाला हात न लावने हा कोरोनाच्या प्रतिबंधाचा सर्वोत्तम आहे. ग्लोव्हज  घातल्याने मात्र हा मार्ग अवलंबिला जाण्याची शक्यता कमी आहे. बाहेर असताना इकडे तिकडे, पायऱ्या चढताना कुठेही हात न लावणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. ग्लोव्हज  घातल्यावर , मी ग्लोव्हज  घातल्याने कुठे ही हात लावू शकतो ही भावना मनात बळावते व ग्लोव्हज  घातलेले हात इतरत्र लागून तेच हात नाक व तोंडाला लागतात. ग्लोव्हज  योग्य प्रकारे नेमके कसे घालावे आणि काढावे  ही पद्धत किचकट असते आणि डॉक्टर अनेक वर्ष त्याला सरावलेले असल्याने त्यांना ते सहज जमते. सर्व सामान्य चुकीच्या पद्धतीने हे करण्याची शक्यता जास्त आहे .सर्वांनी ग्लोव्हज  वापरण्याची दुसरी समस्या म्हणजे वापरलेल्या ग्लोव्हज  हा जैविक कचरा असतो आणि त्यांची विल्हेवाट ही रुग्णालय जैविक कचऱ्या प्रमाणे  करावी लागते जी घरी करणे अवघड आहे.  

    ग्लोव्हज  वापरण्याची गरज नाही डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज  का वापरायचे कारण कोरोना बाधित व्यक्तींशी व त्या सोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू , सरफेसशी जास्त वेळ व सर्वाधिक संपर्क या वर्गाचा आहे. त्यांना दर १० – १५ मिनिटांनी व्यस्तते मुळे व सतत संपर्काचा स्त्रोत कायम असल्याने शक्य नाही. म्हणून ते ग्लोव्हज चा वापर करू शकतात. ग्लोव्हज  वापरून ही डॉक्टर , पॅरामेडिकल स्टाफ ने दोन रुग्ण तपासण्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे सॅनीटायजर वापरायला हवे. तसेच हॉस्पिटल मधून जाताना  रंगाच्या रुग्णालयातील जैविक कचरा जमा करण्याच्या बॅग / डब्यात टाकून जायचे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता