संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे नुकतेच सीडीसी ने कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर घातली आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • थंडी वाजून येणे
  • थंडी वाजून आल्याने वारंवार थर थर होणे
  • स्नायू दुखणे
  • डोके दुखणे
  • घशात खवखवणे
  • तोंडाची चव नाहीशी होणे
  • वास घेण्याची क्षमता कमी किंवा नाहीशी होणे

संसर्गाची नवी लक्षणे याशिवाय तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून इमर्जन्सी उपचार सुरु करण्याचे काही निकष ही सीडीसी ने संगीतले आहेत

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत सतत काही वेळ दुखणे / छातीवर दाब येणे
  • झोपेतून उठवून ही न उठणे किंवा नेहमी एवढे उठवले कि व्यक्ती लगेच उठून बसते पण आज तसे करत नाही आहे. झोपेतून उठवायला जास्त हलवावे,ओरडावे लागते आहे. भान न राहणे ,चक्कर येणे
  • चेहरा किंवा ओठ निळे पडणे

सीडीसिने सांगितलेली ही लक्षणे सोडून भारतातील डॉक्टरांना इतर ही काही लक्षणे आढळून येत आहेत –

  • ज्येष्ठ व्यक्ती सतत दिवस भर झोपेत राहणे
  • भूक पूर्ण नाहीशी होणे
  • अनियंत्रित जुलाब
  • तरुण व्यक्ती निस्तेज दिसणे
  • दोन दिवसात झपाट्याने  तब्येत खालावणे
  • सर्दी, खोकला झाल्यावर सहसा व्यक्ती कसा असतो , किती थकलेला असतो व कसा बरा होतो हा पॅटर्न घरातील व्यक्तींना माहित असतो. या वेळेला ताप , खोकला , सर्दी हि नेहमी सारखी वाटत नाही. नेहमी कुठल्या ही आजारा पेक्षा या वेळी जरा वेगळे आणी जास्त वाटते आहे . सुस्तपणा जास्त आहे. हे निरीक्षण नातेवाइकांच्या लक्षात येते. असे असल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवावे व सविस्तर सगळा वैद्यकीय इतिहास सांगावा
  • काहींना , ताप , खोकला व श्वास  घेण्यास त्रासासोबत अंगावर चट्टे ( रॅश ) ही येते आहे. हे गोवर किंवा कांजण्या सारखे अंगावर किंवा काहींना हात व पायांच्या बोटांवर ठिपक्यांसारखी रॅश येते आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या 'नशे' वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा कोरोनामुळे देशालाच नव्हे तर जगाला अर्थ शास्त्रज्ञांना अर्थ शास्त्राचे विश्लेषण आरोग्याच्या दृष्टीकोनातून करावे लागते आहे. नुकतेच राज ठाकरेंनी राज्याला आर्थिक गती देण्यासाठी मद्य विक्री सुरु करा अशी मागणी केली आहे. या मागणी कडे फक्त आता कोरोना संकटाच्या दृष्टीकोनातून नव्हे तर पुढे आरोग्य अर्थशास्त्राच्या मापात तोलून बघायाल हवे. मद्य विक्रीच्या महसुलाची चर्चा आज वर या दृष्टीकोनातून कधी झालीच नाही. सक्तीची दारू बंदी या पुढे मद्य व्यवसायाबद्दल चर्चा कधी पुढे जातच नाही. अनायासे कोरोनामुळे समाजाचे प्रत्येक अंग आपण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याच्या सवयीप्रत आलोच आहेत. म्हणून या निमित्ताने मद्य महसूला कडे निकोप आरोग्य अर्थ दृष्टी समाजाला देणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा महाराष्ट्र राज्याला मद्यातून महसूल सोडला तर इतर कुठला ही मोठा उत्पन्नाचा स्त्रोत नाही.  गेल्या वर्ष भरात हा महसूल १३ हजार कोटी आहे आणि सहसा १६ – १८  हजार कोटीं पर्यंत ही जातो. याला महत्व यासाठी आहे की मद्य विक्री हा राज्याच्या अखत्यारीत असतो व राज्य सरकारचे यावर नियंत्रण असते. केंद्र या महसुलात हस्तक्षेप करत नाही. व्यसन व अपायकारक गोष्टींवर जो उत्पादन खर्चाच्या सव्वापट अधिक कर लावला जातो त्याला ‘सीन टॅक्स’ म्हणजे पाप करण्यावर लादलेला कर असे म्हंटले जाते. लोकशाहीत पाप करण्यापासून रोखण्याला घटनात्मक मर्यादा आहेत तर किमान त्यावर ज्यादा कर लादून त्यातून लोक कल्याणकारी योजना राबवून पाप भिरुंचे आयुष्य सुसह्य करता येईल अशा विचाराने मद्य, तंबाखू, बिडी – सिगारेट व्यवसायला प्रोत्साहन देण्यात आले. अर्थात इतरांचे आयुष्य या महसूला मधून सुसह्य होते का ? हा विषय अलाहिदा. एवढ्या वर्षात व्यसन पूरक पदार्थ सोडून इतर सकारत्मक उत्पादकता, उद्योग, कारखाने असे महसुलाचे पर्याय उभे न राहिल्याने राज्याला महसूला साठी मद्य, तंबाखूच्या स्त्रोता वर अवलंबून राहण्याचे एक प्रकरे व्यसन लागेल. यामुळे याची मोजावी लागणारी सामाजिक आणि आरोग्य समस्यांच्या रूपाने आर्थिक किंमत हे आर्थिक त्रेराशिकच कोणी मांडलेले नाही. अर्थात याचा अर्थ सक्तीची दारू बंदी किंवा मद्य पिण्याविषयी नैतिकतेचे निकष या पलीकडे व्यसनमुक्तीसाठी ठरवून व नियोजन बद्ध प्रयत्न या विचारा चा अर्थ शास्त्राच्या दृष्टीने आपण किती विचार करतो या प्रश्नांचे उत्तर शोधण्यास हे चांगले निमित्त आहे.

       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा वैद्यकीय शास्त्रात  कुठल्या ही आजार व सवयीची आर्थिक किंमत मोजण्याची एक पद्धत आहे. कोरोनामुळे तर आजारांमुळे आर्थिक नुकसानीची व्याख्याच बदलून टाकली आहे. तशीच इतर आजार व सवयीमुळे होणाऱ्या तात्पुरत्या शारीरिक नुकसाना पलीकडे त्यामुळे होणारे disability associated life years म्हणजे त्यामुळे सर्व स्तरावर येणाऱ्या अधूपणा पायी खर्ची पडणारी आयुष्याची वर्षे व loss of man hours म्हणजे माणसाचे कार्यक्षमतेचे बुडणारे तास असे दोन निकष आजारामुळे होणर्या अर्थ हानीला लावले जातात. प्रत्येक आजार व सवयी साठी हे निकष लावून होणारे आर्थिक नुकसान याची गणना केली जाते. त्यावर उपाय योजनेचे प्राधान्य ठरवले जाते. मद्य व्यवसायाची आर्थिक समज मात्र १६ हजार ते १८ हजार कोटी या एकाच आकड्या भोवती व महसूलाचा  महत्वाचा स्त्रोत या निकषा पलीकडे गेलीच नाही. एक मद्यपी त्याच्याशी संबंधित १६ जणांचे आयुष्य बेचिराख करतो. ग्रामीण भागात कुटुंबावर भार बनून राहिलेला घरतील मद्यपी कर्ता असण्याची अपेक्षा असलेला पुरुष प्रत्येक घरात सापडेल. थेट मद्यपानामुळे होणाऱ्या आजारांची संख्या ६१ आहे आणि इतर २०० आजारांमध्ये मद्यपान हे भर घालणारा महत्वाचा घट आहे. देशात ३१ % लोक नियमित मद्यपान करतात. अधून मधून मद्यपान करणाऱ्यांची संख्या अजून जास्त आहे. आर्थिक गणित मांडायचे  झाल्यास एक जरी व्यक्ती मद्यपान करत असली तरी त्या घरातील ४५ टक्के हे मद्य व मद्य संबंधित समस्यांवर खर्च होते. आकडेवारी चा अभ्यास करून मद्यातून येणारे उत्पन्न व मद्यामुळे होणारे नुकसान हे गणित मांडण्यासाठी राज्यात आकडेवारी जमवण्याची तसदी ही आजवर आपण घेतलेली नाही. या उलट मद्यपान करणाऱ्या तरुण व कुमारवयीन मुलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने आपले राज्य मात्र या विषयात संशोधनासाठी अंतर राष्ट्रीय संस्थांना मात्र आकर्षित करते. मद्यपानामुळे होणारे मानसिक आजार , आत्महत्या याची तर काही मोजदादच नाही. देशात दर वर्षी १ लाख रस्त्यावर होणाऱ्या अपघातातील मृत्यू मध्ये चालकाने मद्यपान केलेले असते. आजारांच्या पलीकडे बहुतांश बलात्कार,  निर्भया सारख्या अमानुष  खून व बलात्कार , घरगुती मारहाणीच्या समस्या, इतर गुन्हे हे मद्याच्या अमला खाली केल्या जातात. आजारावर होणारा खर्च व कामाचे बुडणारे तास सोडून या सर्व समाजिक असंतुलनाची किंमत आपण मद्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानात पकडायची कि नाही हे ठरवावे लागेल.

                  गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा प्रत्येक युद्धात शत्रू धारातीर्थी पडल्यावर किंवा जखमी अवस्थेत असल्यास त्याला मृत्यू शय्येवर शेवटचे पाणी पाजण्याची एक युध्द नैतिकता अनंत काळा पासून युद्ध शास्त्रात अस्तित्वात आहे. राज्याला भरमसाठ महसूल देणाऱ्या बहुतांश मद्यपींना मात्र मृत्युच्या वेळी उपचार , पाणी देण्यास कोणीही नसते. केसरी या अक्षय कुमार अभिनित चित्रपटात शेवट पर्यंत शत्रूला पाणी पाजणारा सहकारी उत्तम चित्रित केला आहे. तरीही शेवटी शत्रू पक्षातील सरदार त्याची क्रूर हत्या करतो. महसुलाचे कारण पुढे करून मद्य विक्रीचे समर्थन करणारे शासन कित्येक वर्ष या क्रूर सरदाराच्या भूमिकेत मद्यपींची कत्तल करतेच आहे. किंबहुना त्या पाणी पाजणाऱ्या छोट्या सैनिका सारखे आपण व्यसनमुक्ती साठी काही शास्त्रीय प्रयत्न तरी करत आहोत का ? सक्तीची मद्य बंदी नकोच पण किमान या १६ हजार कोटींपैकी थोडा तुकडा तरी आपण व्यसनमुक्तीसाठी खर्ची घालणार आहोत का ? मुळात व्यसनमुक्ती वैद्यक मानस शास्त्रातील अशी अंधारी खोली आहे जिथे कोणाला ही प्रवेश करण्यात रस नाही. मद्यपान हा नैराश्य, मधुमेह , ह्र्दय रोग असा एक शारीरिक  – मानसिक आजार आहे आणि त्याला उपचारांची गरज आहे हे सत्य समजून घेण्याची कोणाची ही तयारी नाही. अल्कॉहॉलिक अॅनॉनिमस सारख्या संघटना यासाठी वर्षानूवर्षे झटत आहेत. आज शासकीय सोडाच पण खाजगीत ही एखाद्या मद्यपीला मद्य सोडण्याची इच्छा असेल तरी उपचार , सुविधा सहज उपलब्ध नाहीत. त्यावर निधीची तरतूद सोडाच पण चर्चा ही नाही. धर्मा सारखेच  बहुतांश जनता मद्याच्या अमला खाली राहणे हे राजकीय पक्ष , मद्य उद्योग व्यावसायिक, विक्रेते या सर्वांच्याच सोयीचे आहे. याचे समर्थन करताना महसुलाचे कारण आहेच. पापाचा कर वसूल केल्यावर हा कर पचवताना  व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांच्या रूपाने प्रायश्चीताचा विचार मनात आला तरी आर्थिक गणिते बदलण्यास सुरुवात होईल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान 'कोविड' मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी नुकताच रमजान चा पवित्र महिना सुरु झाल्याने रोजे ही सुरु झाले आहेत. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दृष्टीने रमजान मध्ये काय बदल करावे व काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून मौलवी व डॉक्टरांनी याला मान्यता दिली आहे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोना चे निदान झालेले, निदान होऊन बरे झालेले व निश्चित निदान झालेल्या केस च्या संपर्कात  येऊन सध्या होम क्वारनटाइनचा सला दिलेल्यांनी रमजान चा रोजा ठेवू नये.
  • साठ वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्यांनी तसेच ६० पेक्षा कमी वय असले तरी मधुमेह, ह्रदयरोग, कॅन्सरचा त्रास असलेल्यांनी शक्यतो रोजा टाळावा.
  • ६० वर्षा खालील काही त्रास नसणाऱ्यानी रोजा ठेवण्यास हरकत नाही.

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी पवित्र कुरानमध्ये ही आजारी व्यक्तींना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. या संकेतां शिवाय अजून काही गोष्टी रमजान दरम्यान  पाळण्यास हरकत नाही. मधुमेह नियंत्रित असणारे काही जण या काळात रोजा ठेवतात. अशांनी  रक्तातील साखर  ७० च्या खाली व ३०० च्या वर जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्वस्थ व्यक्तींनी रोजा करत असताना खोकला, ताप, सर्दी असल्यास लगेचच रोजा बंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वर्षी रमजान दरम्यान प्रार्थना, नमाज घरीच कराव्या व सणा दरम्यान एकमेकांच्या घरी जाणे व एकत्रित इफ्तारचे कार्यक्रम  टाळावे.पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी रमजान दरम्यान रोजा पाळता आला नाही. तरी पवित्र कुरानमध्ये कफारा ही तरतूद सांगितली आहे. कफारा म्हणजे पैसे किंवा जेवणाचे दान. कोरोना साथी साठी आवश्यक दान करून आपण रोजा न करता कफाराचे पालन करु शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी कोरोनामध्ये ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, सर्दी ही लक्षणे सोडून अजून एक महत्वाचे लक्षण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे ते म्हणजे अचानक वास घेण्याची क्षमता कमी होणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वास घेण्याची क्षमताही होते कमी कुठल्या ही व्हायरल संसर्गामध्ये चव आणि घ्राणशक्ती या दोन्ही विशेष इंद्रिय क्षमता ( स्पेशल सेन्सेस ) वर थोडा परिणाम होत असतो. पण तो न जाणवण्या इतपत असतो. कोरोनाच्या संसार्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतो आहे. ही घ्राणशक्ती चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीं वासांसाठी कमी होते.   यात सर्व प्रथम जेवण करताना त्याचा सुवास न जाणवणे, अंघोळ करताना साबणाचा किंवा टालकम पावडर चा वास न जाणवणे असे हे लक्षण आपल्या ध्यानी येते. यात वास येणे पूर्ण बंद होणे किंवा वास येणे कमी होणे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते. पण या सोबत ताप, खोकला ही लक्षणे असतातच. परदेशात मात्र काही रुग्ण हे इतर कुठले ही लक्षण सोडून फक्त घ्राणशक्ती कमी होणे एवढे एकच लक्षण असलेले कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात यावर अजून माहिती येण्यास वेळ लागेल. तसेच वास घेण्याची क्षमता कोरोना बरा झाला की पुरवत होते. हे लक्षण महत्वाचे यासाठी वाटते कि सर्दी , खोकला, तापाच्या कोरोना सोडून इतर व्हायरल आजार व फ्लू मध्ये हे जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. म्हणून ताप , सर्दी, खोकला  या पैकी कुठल्या ही लक्षणा सोबत वासाची क्षमता कमी झाली असल्यास आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. वास घेण्याची क्षमताही होते कमी नाकामध्ये पॉलीप म्हणजे लटकणारे गुच्छ असणे, अलर्जी मुळे असणारी दीर्घकालीन सर्दी, नाकातील हाड वाढलेले असणे, नाकाच्या मधला पट वाकडा असणे या आजारांमध्ये ही घ्राणशक्ती कमी होते. पण यात कुठल्या ही आजारामध्ये ताप नसतो.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना काही ठिकाणी ऑनलाईन खाण्याचे पदार्थ विक्री करणारे अॅप्स सुरु झाले आहेत. काही काळा नंतर इतरत्र ते सुरु होतील. शक्य असल्यास पुढील काही महिने बाहेरून व ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवणे टाळावे. जेवणातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. पण वस्तूच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणून  असे ऑनलाईन मागवलेल्या खाद्य पदार्थ स्वीकारताना कोरोना पासून बचाव करण्यासाठी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • डिलिवरी देणाऱ्या व्यक्ती कडून थेट खाद्य पदार्थाचे पॅकेज स्वीकारण्यापेक्षा त्याला ते बाहेरच ठेवून जायला सांगावे.
  • पैसे देताना शक्यतो डिजिटल पेमेंट ला प्राधान्य द्यावे.
  • शक्य असेल तर पॅकेज घरात आणूच नये. प्लास्टिक चे साधे ग्लव्ज घालावे.
  • त्यावर थोडे सॅनीटायजर ओतावे.
  • ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना एका वाइप किंवा कपड्यावर टाकून सॅनीटायजरने पॅकेज बाहेरून स्वच्छ करून घ्यावा. हे करत असताना आतील अन्नाचा सॅनीटायजरशी संपर्क येणार नाही हयाची काळजी घ्यावी.
  • गवळ्या कडून दुध घेतो तसे दारातच खाद्यपदार्थ घरच्या भांड्यात / ताटात काढून घ्यावे.
  • ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना पॅकेज व नंतर ग्लव्ज घरा बाहेरच डस्टबिन मध्ये वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकावे. यामुळे नंतर हे स्वच्छ करणाऱ्याला ही याचा धोका राहणार नाही. तसेच ते आपण सॅनीटायजरने स्वच्छ ही केले आहे.
  • सगळे झाल्यावर हात साबण व पाण्यान धुवून घ्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

उपवास नकोच

उपवास नकोच

 उपवास नकोच कोरोना मुळे अनेक धार्मिक चाली रीतींना छेद देऊन विज्ञानवादी आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त काय याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्यातली सध्या आपण सोडून द्यावी अशी गोष्ट म्हणजे उपवास. उपवास आणि मानवी शरीरावर होणारे परिणाम यावर बरेच संशोधन झाले आहे. त्यात एका विशिष्ट पद्धतीने व काही गोष्टी खाऊन केलेल्या जास्त दिवस उपवासाचे फायदे ही दिसून आले आहेत. पण त्यासाठी आदर्श वातावरण व रोज ठरलेल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे. सध्याच्या साथ सुरु असताना तसेच अस्थिर वातावरणात उपवास करणे हे तुमच्या प्रतिकारशक्ती वर नकारत्मक परिणाम करू शकते. म्हणून रोज नियमित व उच्च प्रथिने युक्त आहार घेणे सध्या खूप महत्वाचे आहे. उपवास नकोच घरातील वृध्द व्यक्तींना, मधुमेह असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो. नेमक्या घरातील अशा वृद्धांनी विविध वार व देवांचा उपवास वर्षानुवर्षे धरलेला असतो. त्यामुळे या लोकांना कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो. म्हणून किमान साथ सुरु असे पर्यंत अशा लोकांना काही काळ उपवास न करता नियमित आहार घ्यावा. आजारी असलेल्या व्यक्तींनी जितकी इच्छा होईल तितके खावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

नियमित लसीकरणाचे काय करायचे

नियमित लसीकरणाचे काय

नियमित लसीकरणाचे काय करायचे सध्या लहान मुलांचे नियमित लसीकरण घ्यावे की नाही असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. नियमित लसीकरण घेण्यास मुळीच हरकत नाही. फक्त रेड झोन व त्यातच मुंबई व पुण्यामध्ये ते ३ मे पर्यंत पुढे ढकलावे. लसीकरण घेण्यास अशा वेळी थोडा उशीर झाला तरी चालेल. लसीकरणाची तारिख ढळली म्हणून फार काळजी करू नये.यासाठी पुढील गोष्टी समजून घ्या व पाळा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 १. अनेक बालरोगतज्ञांनी लसीकरणाची व इतर आजार असलेल्या लहान मुलांना तपासण्याच्या वेळा वेगळ्या ठरवलेल्या आहेत. तापाचे व नॉर्मल बाळांचा एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून हे केले आहे. त्यामुळे शक्यतो बालरोगतज्ञांना फोन करून व वेळ घेऊनच जावे.

२.जाताना मुलगा दोन वर्षांपेक्षा मोठा असल्यास सोबत एकाच पालकाने जावे. त्यापेक्षा लहान असल्यास आई – वडील दोघांना जावे लागेल. दोघे गेले तरी रुग्णालयाच्या आत एकाच पालकाने जावे.

३. लसीकरणाच्या वेळी बाळाला सर्दी खोकला नाही याची काळजी घ्यावी. तसेच कुठल्या ही पालकाला ताप, सर्दी, खोकल्या पैकी काहीही असल्यास त्याने सोबत येऊ नये.

रुग्णालयात, डॉक्टर समोर सोशल डीस्टन्सिंग पाळा

४. लसीकरणासाठी आजी आजोबांनी सोबत येऊ नये

५.लसीकरणासाठी रुग्णालयात आत जाताना व बाहेर आल्यावर हँड सॅनीटायजर चा वापर करावा. हॉस्पिटलच्या आत गेल्यावर कुठे ही हात लावू नका.

५.डॉक्टरच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसू नका. लस घेताना डॉक्टर तपासतात त्या बेड वर घरून आणलेला एक कपडा टाका. त्यावर तुम्ही बसा व मुलाला मांडीवर घ्या म्हणजे बाळाचा कुठे ही संपर्क येणार नाही. घरी गेल्यावर हा कपडा गरम पाण्यात टाकून धुवून घ्या.

६.मुलांना रुग्णालयाच्या वेटिंग मध्ये इकडे तिकडे फिरून खेळायची सवय असते. हे टाळा व मुलाला वेटिंग मध्ये हात पकडून स्वतः जवळच ठेवा.

७. नियमित लसीकरणाचे काय करायचे २ वर्षा पेक्षा मोठ्या मुलांना केबिनमध्ये  डॉक्टरांचा स्टेथोस्कोपशी खेळणे, ते तोंडात टाकणे , डॉक्टरांच्या टेबल वरील वस्तू उचलून खेळणे अशी सवय असते. त्यामुळे डॉक्टरांच्या केबिनमध्ये मुलांचा हात सोडू नका व त्यांना कुठे ही हात लावण्यापासून रोखा. शक्य असेल तेव्हा बाळाला केबिनमध्ये कड्यावरून खाली उतरवूच नका.

८..लसीकरणा नंतर थोडा ताप येणे नॉर्मल असते. म्हणून पुढच्या दिवशी ताप आल्यावर काही झाले का? म्हणून घाबरून जाऊ नका. कारण हा लसी मुळे येणारा नॉर्मल ताप आहे.

9. लसीकरणाचे पैसे नोटा हाताळून देण्यापेक्षा डिजिटल पद्धतीने द्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त लॉकडाऊनच्या काळात मद्य उपलब्ध नसल्याने अनेकांवर सक्तीची व्यसनमुक्ती लादली गेली. यामुळे मद्य सोडल्या नंतर काही प्रमाणात या नंतरची शारीरीक व मानसिक लक्षणांचे ( वीड्रॉवल ) रुग्ण वाढले आहेत. पण या निमित्ताने आपण मद्या शिवाय राहू शकतो हा आत्मविश्वास बाळगून इथूनच व्यसनमुक्तीला सुरुवात करा. मद्य सोडण्याचे अजून एक कारण म्हणजे मद्य प्राशनामुळे शरीरात जीवन सत्वांची कमतरता निर्माण होते व त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून असे अप्रत्यक्षपणे म्हणता येईल की मद्यप्राशन तुम्हाला कोरोनाच्या  संसर्गाची शक्यता वाढवू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मद्यपान सोडण्यासाठी चांगले निमित्त मद्यप्राशन सोडल्यावर पुढील लक्षणे जाणवू शकतात – थरथरणे , झोप न लागणे, वाईट स्वप्न पडणे, बेचैन होणे, निराश वाटणे, रोजची ठरलेली मद्यप्राशनाची  वेळ झाली कि बेचैनी वाढणे.

घरचे सदस्य यासाठी अशा व्यक्तीला मद्य देण्याचा प्रयत्न करतात. पण अशा लक्षणांवर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेऊ शकता. याशिवाय घरी पुढील गोष्टी करता येतील –

  • भरपूर पाणी प्या ( दिवसाला ६ ते ८ लिटर ) यापैकी  – एक ग्लास पाण्यामध्ये चिमुटभर मीठ, १ चमचा साखर आणि अर्धे लिंबू – असे सकाळी व रात्री दोन ग्लास घ्या.
  • रोज एक तास व्यायाम करा.
  • कोणाशी तरी बोलून आपल्या भावना व्यक्त करा.
  • काय वाटते ते लिहिणे, चित्र काढणे, शांत संगीत ऐकणे अशा आनंददायक गोष्टी करा.
  • रोजच्या मद्य पिण्याच्या वेळेला काही तरी नवे वेळापत्रक बनवून ते करा व त्यावेळी फोन वरून जवळच्या मित्राची किंवा घरच्या सदस्याची मदत घ्या.

यानिमित्ताने मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने आपण तीन महिने जरी उपचार व समुपदेशन घेतले तरी मद्यपान सुटू शकते. प्रत्येक गावामध्ये या साठी अल्कोहोलीक अॅनॉनीमस हा मोफत काम करणारा स्वयंसेवकांचा समूह कार्यरत असतो. तो शोधून तुम्ही या साठी त्यांची मोफत मदत घेऊ शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास सध्या वारंवार हात धुणे व हँड सॅनीटायजर चा वापर करणे कोरोना टाळण्यासाठी आवश्यक आहे. पण वारंवार हात धुण्याने अनेकांच्या हाताला कोरडेपणा ( ड्रायनेस ) येऊ लागला आहे. याचे एक कारण असे ही आहे कि या पूर्वी आपल्याला हात धुण्याची सवय नव्हती. यासाठी हात धुतल्या नंतर लगेचच मुलायम कपड्याने पाणी पुसून घ्या व त्यानंतर लगेचच कुठले ही मॉईस्चरायजर लगेचच हाताला लावावे. ते ही नसेल तर डोक्याला लावायचे खोबऱ्याचे थोडे तेल हाताला लावले तरी चालेल. रात्री झोपताना तिळाचे तेल हाताला लावून झोपावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हँड सॅनीटायजर मध्ये अल्कोहोल असते व अनेकांना त्याची अॅलर्जी असते. काहींना त्यामुळे हात चुरचुरण्याचा त्रास होतो. असे होत असल्यास आणि नियमित हात धूत असल्यास हँड सॅनीटायजर वापरला नाही तरी चालेल. कोरोना साठी मुख्य प्रतिबंधक उपाय हा साबणाने हात धुणे हा आहे व हँड सॅनीटायजरचा वापर हा एक आधार आहे. जिथे बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नाही तिथेच त्रास होत असणाऱ्यानी हँड सॅनीटायजरचा वापर करावा.

हात धुण्यामुळे त्रास होत असल्यास हात धुण्याविषयी एक मानसिक समस्या वाढल्याचे ही मानसोपचार तज्ञांचे निरीक्षण आहे. एखादी गोष्ट इच्छा नसताना वारंवार करण्याची नियंत्रित न करता येणारी  भावना मनात येण्याची एक मानसिक समस्या असते. यात सर्वाधिक प्रमाण हे हात धुण्याची आणि स्वच्छतेची सवय असते. सध्या भीती पोटी गरजे पेक्षा जास्त वेळा हात धुण्याची इच्छा होण्याची मानसिक समस्या काहींना भेडसावते आहे. कोरोना टाळण्यासाठी हात धुणे आणि वारंवार उगीचच हात धुणे यात फरक आहे. हा फरक स्वतःला व कुटुंबातील इतरांना ही लगेच लक्षात येईल. असे होत असल्यास मानसोपचातज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक कोरोनाची मनातील भीती कमी करण्यासाठी भावनिक व्यवस्थापन  तज्ञ डॉ. संदीप केळकर पुढील रेन टेक्निक सुचवतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • A…Accept, Approve – स्वीकारणे
  • R…Recognize – म्हणजे ओळखणे
  • I….Investigate – पडताळणी करणे
  • N..Non attachment – भावना स्वीकारून त्या पासून स्वतःला वेगळे करणे

R..recognizeभावना ओळखा

ह्या संकटामध्ये कोरोना विषयी मी कुठल्या भावना अनुभवत आहे. भीती, नैराश्य, काळजी, चिंता. आपण अनुभवत असलेल्या भावनेला ओळखून आपण नाव देऊ शकलो तर त्याचा सामना करणे खूप सोपे जाते असे दिसून आले आहे.

A..Acceptस्वीकार करा

भावनांना दडपलं तर त्या आपल्याला दुप्पट वेगाने गिळंकृत करतात आणि दुर्लक्ष केलं तर, त्या चुंबाकासारख्या तुम्हाला खेचून घेतात. म्हणून त्यांचा योग्य वेळीच स्वीकार करा. अशा भावना मनात  येणे हे स्वाभाविक आहे हे स्वीकारा. अशा प्रकारे स्वीकार केल्याने त्याची तीव्रता कमी करता येते.

I..Investigateपडताळणी करा

ही भावना मला काय सांगायचा प्रयत्न करते आहे? मला काय संदेश देत आहे? ह्याची पडताळणी करा. संदेश ओळखला तर भावनेची तीव्रता कमी होण्यास मदत होइल.

N..Non Attachment

भीती घालवण्यासाठी वापरा रेन टेक्निक म्हणजेच… या भावना म्हणजे मी नाही. ती माझ्या मनात परिस्थिती मुळे उमटणारी एक तात्कालिक भावना आहे. आधी मी अनुभवलेल्या नकारत्मक भावना कायमच्या टिकल्या नाहीत. म्हणून या ही टिकणार नाहीत. म्हणून ही भावना म्हणजे कायमचा मी नाही. एकदा अशा प्रकारे भावनेकडे निर्लेप, तटस्थ आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले कि ती  भावना नियंत्रित करण्यास सोपे जाते  व  भावनांशी मैत्री करता येते. यापुढे जाऊन या चार पायर्यांमधून प्रत्येक भावनेचे विश्लेषण केले कि आपण त्यासाठी मदत घेण्यास ही तयार होतो, इतरांना त्या सहज बोलून दाखवू शकतो. कोरोना विषयी भीती, तणाव , नैराश्य अशा कुठल्या ही भावना मनात येत असतील तर कागद पेन घेऊन वरील चार पायर्यांवर त्यांचे स्वतःच विश्लेषण करा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता