वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी कोरोनामध्ये ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, सर्दी ही लक्षणे सोडून अजून एक महत्वाचे लक्षण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे ते म्हणजे अचानक वास घेण्याची क्षमता कमी होणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वास घेण्याची क्षमताही होते कमी कुठल्या ही व्हायरल संसर्गामध्ये चव आणि घ्राणशक्ती या दोन्ही विशेष इंद्रिय क्षमता ( स्पेशल सेन्सेस ) वर थोडा परिणाम होत असतो. पण तो न जाणवण्या इतपत असतो. कोरोनाच्या संसार्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतो आहे. ही घ्राणशक्ती चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीं वासांसाठी कमी होते.   यात सर्व प्रथम जेवण करताना त्याचा सुवास न जाणवणे, अंघोळ करताना साबणाचा किंवा टालकम पावडर चा वास न जाणवणे असे हे लक्षण आपल्या ध्यानी येते. यात वास येणे पूर्ण बंद होणे किंवा वास येणे कमी होणे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते. पण या सोबत ताप, खोकला ही लक्षणे असतातच. परदेशात मात्र काही रुग्ण हे इतर कुठले ही लक्षण सोडून फक्त घ्राणशक्ती कमी होणे एवढे एकच लक्षण असलेले कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात यावर अजून माहिती येण्यास वेळ लागेल. तसेच वास घेण्याची क्षमता कोरोना बरा झाला की पुरवत होते. हे लक्षण महत्वाचे यासाठी वाटते कि सर्दी , खोकला, तापाच्या कोरोना सोडून इतर व्हायरल आजार व फ्लू मध्ये हे जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. म्हणून ताप , सर्दी, खोकला  या पैकी कुठल्या ही लक्षणा सोबत वासाची क्षमता कमी झाली असल्यास आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. वास घेण्याची क्षमताही होते कमी नाकामध्ये पॉलीप म्हणजे लटकणारे गुच्छ असणे, अलर्जी मुळे असणारी दीर्घकालीन सर्दी, नाकातील हाड वाढलेले असणे, नाकाच्या मधला पट वाकडा असणे या आजारांमध्ये ही घ्राणशक्ती कमी होते. पण यात कुठल्या ही आजारामध्ये ताप नसतो.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *