नियमित बीसीजी सोडून घाई नको ज्या देशांमध्ये सार्वत्रिक बी.सी.जी लसीकरण अनेक वर्षांपासून केले गेले त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव इतर देशांच्या मानाने कमी प्रमाणात झाला असे एक निरीक्षण आहे.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
नियमित बीसीजी सोडून घाई नको बीसीजी शरीरातील इनेट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती बळकट करते व कोरोना टाळण्यास व झाला तरी शरीराला त्या विरुद्ध लढण्यास सक्षम बनवते असा एक कयास आहे. त्यातूनच आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोनाचा थेट संपर्क आलेल्यांना बीसीजी लस द्यावी का असा एक विचार जगभरात पुढे आला. पण लॅन्सेट या वैद्यकीय मासिकात ३० एप्रिल रोजी कोरोना टाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी व इतरांना बीसीजी देण्याविषयी सतर्कतेचा इशारा दिला. तसेच या बद्दल अजून पुरेसा संशोधनात्मक पुरावा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हे जाणून घेणे महत्वाचे यासाठी आहे कि माध्यमांमध्ये बीसीजी मुळे कोरोना टाळण्यास मदत होऊ शकण्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातमी आल्या असल्याने अनेक जन आम्ही ही लस परत घ्यावी का ? असे प्रश्न डॉक्टरांना विचारत आहेत. याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. नियमित बीसीजी सोडून घाई नको लहान मुलांना ही जन्माच्या वेळी लस दिलेलीच असते. त्यांना ही लस परत ज्ञाची गरज नाही. कोरोना टाळण्यासाठी जर बीसीजीने काही फायदा व्हायचा असेलच तर तो जन्माच्या वेळी आपण सगळ्यांनी घेतलेल्या बीसीजीनेच होईल. १९७८ पासून देशात सार्वत्रिक बीसीजी लसीकरण सुरु झाले. म्हणून त्या आधी जन्म झालेल्यांनी बीसीजी घेण्याची घाई करू नये. मात्र सध्या जन्मानंतर लहान मुलांना नियमित बीसीजी लसीकरण मात्र सुरु ठेवावे. सिद्ध झालेले नसताना उगीचच बीसीजी घेतल्याने त्याचा उपयोग होणार नाहीच व तुटवडा निर्माण होऊन नियमित लसीकरणासाठी बीसीजी उपलब्ध होणार नाही.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता