मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण कोरोनामुळे आत्महत्या टाळण्यासाठी नातेवाईकांसाठी व रुग्णांसाठी महत्वाच्या सूचना व लक्षणे

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना नसलेल्या व्यक्तींसाठी –

  • मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण सतत कोरोना बद्दल माहिती विचारणे व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू विषयी चर्चा करणे.
  • आपल्याला कोरोना आहे का? याची काहीही लक्षणे नसताना  खातरजमा करण्याचा डॉक्टरांकडे वारंवार हट्ट करणे.
  • आपले काही खरे नाही / मी नसल्याने कोणाला ही फरक पडणार नाही असे वारंवार सांगणे.
  • नातेवाईकांना फोन करून खुशाली विचारून हे शेवटचे बोलणे असल्याची सूचित करणे.
  • बँकेच्या खात्यांची, महत्वाचे पासवर्ड तडकाफडकी आपल्या नातेवाईकांना देणे.
  • निराश असलेली व्यक्ती अचानक मूड बदलून आनंदी होणे ही महत्वाची वॉर्निंग साईन अनेक जणांच्या लक्षात येत नाही असे मानसोपचार तज्ञ डॉ.शैलेश ओमाटे सांगतात.

कोविड असलेल्यांसाठी –

  • समुपदेशकाकडून बरे होण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याचे प्रमाण समजावून सांगणे.
  • कोविड रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाशी फोन, इंटरकॉम, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सतत बोलत राहणे.
  • मृत्यूची भीती किंवा आत्महत्येचे विचार येत असल्यास तातडीने मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यावा.

मानसिक तणावावर ठेवा नियंत्रण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि सगळ्यांनाच भीती वाटते आहे, असे समजून मानसिक तणावाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आत्महत्येचे विचार मनात येत असलेला रुग्ण ही मनसोपाचार शास्त्रात तातडीने उपचारांची गरज असलेला रुग्ण म्हणजे इमर्जन्सी असते. या उलट लक्षणे असताना मानसिक तणावामुळे असेल असे म्हणून तपासणी न करणे ही चुकीचे आहे. यात समतोल राखणे व कोरोना तसेच त्यामुळे मानसिक तणावावर नियंत्रण ठेवणे दोन्ही गरजेचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी

व्यायामाने श्वसनसंस्थेला आणा बळकटी

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी सध्या दमा, श्वसनाचे आजार, अॅलर्जी असे आजार असणारे जरा ही श्वास वाढला किंवा नाक चोंदल तर कोरोनाच्या भीतीने घाबरून जातात. तसेच अनेकांना भीती मुळे अस्वस्थ वाटते, झोप येत नाही. या श्वास घेण्याच्या व्यायामामुळे कोरोना टळेल असा दावा करता येणार नाही. पण या श्वास घेण्याच्या पद्धती मुळे फुफुसांना ऑक्सिजन हे नेहमी च्या श्वास घेण्याच्या पद्धती पेक्षा कित्येक पटीने जास्त मिळेल व म्हणून प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोना चा धोका नक्कीच कमी होईल. तसेच दमा, अॅलर्जी सारख्या आजारांमध्ये फुफुसांची क्षमता वाढवण्यास मदत होईल. ही पद्धत पुढील प्रमाणे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्यायामाने आणा श्वसनसंस्थेला बळकटी या पद्धतीत श्वास आत घेताना पोट फुगले पाहिजे ( छाती नाही ) आणि श्वास बाहेर सोडताना पोट आत गेले पाहिजे. श्वास आत घेण्याचे नंतर श्वास रोखून धरण्याचे व नंतर श्वास बाहेर सोडण्याची अशी एक सायकल पूर्ण होते. याचे प्रमाण १ : ४ : २ अशी असायला हवे . म्हणजे ५ सेकंद श्वास आत घेतला तर  पुढील २० सेकंद स्वस रोखून धरायचा आणि नंतर १० सेकंद श्वास बाहेर सोडायचा . हा श्वासाचा व्यायाम रोज १० मिनिटे केल्यास त्याचा उत्तम लाभ मिळेल. यामुळे भीती, ताण तणाव ही कमी होईल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे दोन आत्महत्या झाल्या. यातील एक कोरोना बाधित व्यक्तीची होती तर दुसरी कुठली ही कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती होती. हे विचार व पाउल काही विचार प्रक्रियेमुळे उचलले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार ही मनात दाटून आलेली भीती व निराशा. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व आपला कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वतःला संपवण्याची निराशे पोटी इच्छा दाटून येणे. या सोबत आधी पासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते. सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठले ही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना बाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की कोरोनाची बाधा व कोरोनाची  लक्षणे या वेगळ्या गोष्टी आहेत. कोरोना झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे कि तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्के मध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला सायको- न्युरो – इम्युनो एक्सीस असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर कोरोनाच नव्हे तर कुठल्याही आजारा विरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून कोरोनाची बाधा झाली तरी खचून न जाने हा उपचाराचाच भाग आहे असे समजावे. हे कळत असते पण वळत नसते अशी ती स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकाला भावना मन मोकळे पणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता

वैद्यकीय धोरणशून्यता सध्या कुठल्या ही खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्ण सापडला तर लगेचच रुग्णालय सील केले जाते व रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स , स्टाफला क्वारनटाइन केले जाते. यामुळे फक्त मुंबईत १७०० मोठ्या रुग्णालयांच्या खाटा आज बंद आहेत. आधीच राज्यात डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफचा तीव्र तुटवडा आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात डॉक्टरांच्या १७००० जागा रिक्त आहेत.  राज्यात १०० डॉक्टर व वैद्यकीय स्टाफ ला कोरोनाची लागण झाली आहे. खाजगी नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय सेवेतील अनेक डॉक्टर क्वारनटाइन मध्ये जात आहेत. धोरणशून्यते मुळे कोरोना विरुध्द या लढ्यात  सैनिकांची पहिली फळी आपण निष्क्रिय करत आहोत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     वैद्यकीय धोरणशून्यता हे सर्व टाळण्यासाठी धोरण व कार्यपद्धती मध्ये काही मुलभूत बदल तातडीने करण्याची गरज आहे. साथ आटोक्यात येई पर्यंत सर्वात आधी तापाचे रुग्ण आणि ताप नसलेले रुग्ण अशी रुग्ण तपासताना विभागणी आपल्याला करावी लागणार आहे. शासनाने यासाठी फिवर क्लिनिक शहरामध्ये विभागवार आणि प्रत्येक तालुक्यात एक असे सुरु करण्याची तातडीने गरज आहे. हे केले असे बोलले जाते आहे पण कुठे ही कार्यरत झालेले दिसत नाहीत. यामुळे ताप, सर्दी, खोकला म्हणजे कोरोनाची शक्यता असलेले रुग्ण या बाह्यरुग्ण विभागात जाऊ शकतात. मोठ्या खाजगी रुग्णालयांना ही रुग्णालयाच्या आवारात इतरत्र तापाचे रुग्ण वेगळे तपासण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. प्रत्येक खाजगी व शासकीय रुग्णालयात जो पर्यंत प्रवेशद्वारा जवळ तापाच्या रुग्णांचे वेगळे स्क्रीनिंग करून त्यातून कोरोना संशयीतांसाठी वेगळी व्यवस्था उभारली गेली  नाही तर हॉस्पिटल हे संसर्गाचा मोठा स्त्रोत ठरू शकतात. हे करण्या ऐवजी थेट हॉस्पिटलच सील करण्याचा विवेकशून्य सोपा मार्ग आपण स्वीकारत आहोत. ताप, खोकल्याचे सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवा असे सांगितले जात असले तरी यातील बरेच रुग्ण नाकारले जात असल्याने परत खाजगी रुग्णालयातच येत आहेत. तसेच ७० टक्के आरोग्य सेवा खाजगी क्षेत्र देत असताना अचानक सर्व रुग्ण शासकीय रुग्णालयात जाणे शक्य नाही. सवयी प्रमाणे रुग्ण आधी आपल्या ठरलेल्या खाजगी डॉक्टरचाच सल्ला आधी घेतात. यातून एखादा रुग्ण कोरोना बाधित अढळला तर लगेचच अख्खे हॉस्पिटल १४ दिवस सील करण्याची गरज नाही. सोडियम हायपोक्लोराईट ने फ्युमीगेशन  करून एका दिवसात तत्काळ हे रुग्णालय सुरु केले जाऊ शकते.वैद्यकीय धोरणशून्यता या पुढे जाऊन अति नील किरणांचा प्रकाश झोत पूर्ण रुग्णालयात फिरवला तरी काही तासात निर्जंतुक होऊन रुग्णालय सेवा देण्यास तयार होऊ शकते. साथ कमी झाली तरी प्रत्येक शहरात आणि प्रत्येक रुग्णालयात  कोरोनाचे रुग्ण आढळणारच आहेत. मग या प्रत्येक रुग्णालयाला आपण कुठल्या ही धोरणा शिवाय सील करत गेलो तर इतर आजाराच्या रुग्णांनी जायचे कुठे. निर्जंतुकीकरणातून काही तासात या भागातील कोरोनाची संसर्ग करण्याची क्षमता नष्ट होईल.

                  राज्य सरकारने डॉक्टरांच्या वयक्तिक सुरेक्षेचे कवच म्हणजे पीपीई च्या अनउपलब्धतेचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगळी पळवाट शोधून काढली आहे. फक्त कोरोना रुग्णांची काळजी घेत असलेल्या डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ लाच पीपीईची गरज आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. पण असे असेल तर कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ कोरोना पाँझीटीव येत आहेत त्याचे काय? सध्या कोरोनाचे रुग्ण इतके झपाट्याने वाढते आहे कि कुठला रुग्ण कोरोना बाधित असेल हे काहीच सांगता येत नाही. रुग्ण येतो तेव्हा तो कोरोनाचा आहे हे त्याच्या कपाळावर ( भाळी ) लिहिलेले नसते. तपासलेला रुग्ण चार पाच दिवसांनंतर कोरोना बाधित असल्याचे समजते आणि मग त्याला तपासलेले सर्व डॉक्टर, स्टाफ क्वारनटाइन केले जातात आणि हॉस्पिटल सील केले जाते. जर प्रत्येक रुग्ण तपासताना पीपीई वापरले तर ही वेळ येणार नाही कारण सुरेक्षेच्या कवचामुळे डॉक्टर, स्टाफ ला संसर्गाचा धोका राहणार नाही आणि डॉक्टर, स्टाफ ला क्वारनटाइन करण्याची गरज ही राहणार नाही. अनेक देशांमध्येच हेच धोरण राबवले जाते आहे. असे असताना आपल्याकडे ही धोरणशून्यता का? या शिवाय कोरोनाची बाधा असलेल्या ३० टक्के रुग्णांना कुठलेही लक्षण दिसून येत नाहीत. सुरक्षेशिवाय रुग्ण तपासताना या मुळे अनेक डॉक्टरांना बाधा झाल्याची उदाहरणे आहेत. या शिवाय डॉक्टरांनी सुरक्षेची साधने वापरली नाही म्हणून मला कोरोना झाला असे न्याय वैद्यक खटले दाखल करण्याची धमकी काही ठिकाणी रुग्ण डॉक्टरांना देत आहेत. हा प्रश्न फक्त डॉक्टरचा वयक्तिक संसर्गापासून सुरक्षेचा नाही तर यामुळे डॉक्टर हे संसर्गाचे  सगळ्यात मोठे स्रोत ठरू शकतात म्हणून हा प्रश्न सर्वांचा आहे. यासाठी राज्य सरकारने फक्त कोरोना कक्षातच पीपीई हे धोरण लवकरच बदलले नाही तर मोठा घात होणार आहे. यात डॉक्टरच नाही तर रुग्णालयाशी निगडीत इतर सर्व स्टाफ येतो. वैद्यकीय क्षेत्रात तीन पातळ्यांवर काम करणार्यांना किती जाडीचे व नेमके कुठले पीपीई वापरले पाहिजे याची मार्गदर्शक तत्वे उपलब्ध आहेत. राज्यात पहिला रुग्ण सापडून एक महिना व देशात दोन महिने उलटून गेले तरी आम्ही आरोग्य क्षेत्रातील पहिल्या फळीला अजून पीपीई देऊ शकलो नाही. एक वेळ खाजगी रुग्णालयांचा प्रश्न बाजूला ठेवला तरी शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न जास्त गंभीर आहे. ज्या उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४० ते ५० जणांचा स्टाफ आहे तिथे १५ – २० साधे मास्क पाठवले जात आहेत. रोज जाहीर होणाऱ्या हजारो कोटींचा निधी हा तातडीने प्राधान्यक्रम ठरवून पीपीई खरेदी साठी वळवणे गरजेचे आहे. रुग्णांचे स्वॅब जिथे घेतले जात आहेत तिथे कलेक्शन चेम्बर्स तातडीने उभारणे गरजेचे आहे. परदेशात तर स्वॅब घेताना डॉक्टरचा धोका कमी करण्यासाठी नेगाटीव प्रेशर असणारे व रुग्णाचा जराही संबंध येऊ न देणारे चेम्बर्स बनवले आहेत. केरळ मध्ये सगळे सँपल्स याच पद्धतीनेच घेतले जात आहेत. प्रेशर चेम्बर नसले तरी किमान साधे रुग्ण व डॉक्टर मध्ये भिंत निर्माण करणारे चेम्बर्स सर्व स्वॅब घेणाऱ्या सेन्टर्स वर राज्यात तातडीने उभारणे गरजेचा आहे. सुरक्षिततेची काळजी घेतल्यास काम करणार्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास, हिम्मत वाढेल आणी झोकून देऊन काम करण्यास नैतिक बळ मिळेल.

             वैद्यकीय धोरणशून्यता खाजगी डॉक्टर पीपीई विकत घेण्यास तयार आहेत पण त्या उपलब्धच नाहीत. सुरुवातीला पीपीईच्या खाजगी विक्रेत्यांना पीपीई शासन सोडून कोणाला ही विकू नये असे निर्देश देण्यात आले होते जे नंतर शिथिल करण्यात आले. तसेच सरकार ने ठरवलेले पीपीईचे दर आणी खाजगी विक्रेत्यांचे दर यात तफावत असल्याने ही पीपीईच्या खरेदीस उशीर होतो आहे. आयसीएमआरने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आरोग्य क्षेत्रात रुग्णांशी थेट संबंध येणार्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. पण मागच्या आठवड्यात खाजगी सोडाच पण शासकीय सेवेतील वैद्यकीय कर्मचार्यांसाठी हे औषध उपलब्ध नव्हते. अशात भारताने अमेरिकेला या औषधाचा साठा पाठवल्याची बातमी आली. अशा गोष्टींमुळे स्वतःचा प्राण पणाला लावून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचे नैतिक खच्चीकरण होते. युद्ध जिंकण्यासाठी सर्वात  महत्वाचे असते सैनिकांना बळ देणे . वैद्यकीय सैनिक आज लढण्यास तयार आहेत, लढत आहेत. गरज आहे त्यांना युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे हत्यार देण्याची.हॉस्पिटल्स सील करण – चुकीचे धोरण

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा

टी झोन मध्ये हात लावणे टाळा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा कोरोना टाळण्यासाठी हात धुणे जितके महत्वाचे आहे तितकेच गरज नसताना चेहऱ्याला हात न लावणे महत्वाचे आहे. चेहऱ्याला, केसांना हात लावणे ही आपल्याला अजाणतेपणाने लागली सवय आहे. वागणुकीचे शास्त्र असे सांगते कि ज्या प्राण्यांपासून आपली उत्क्रांती झाली तेव्हा पासून ही सवय मानवाला चीटकलेली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना टाळण्यासाठी टी झोन मध्ये हात लावणे टाळा चेहऱ्याला हात लावणे, केसांमधून हात फिरवणे हे तणावापासून मुक्ती देणारी कृती असते. अनेकांना नखे खाणे किंवा वारंवार नाकाच्या शेंड्याला हात लावणे अशा सवयी ही लागलेल्या असतात. मुलींना केस वारंवार निट करण्याची सवय लागलेली असते. सरासरी प्रत्येक जन एका तासात १५ ते २४ वेळा चेहऱ्याला हात लावतो. पण कोरोना टाळण्यासाठी ही सवय आपल्याला मोडावी लागणार आहे. याचे कारण हात धुतले तरी हात धुतल्यावर आपला हात कोरोना बाधित जागेला लागला व तोच हात आपण चेहऱ्या वरून फिरवला तर आपल्याला कोरोनाची बाधा होऊ शकते. चेहऱ्याच्या ज्या भागांना हात लावायचा नाही त्याला टी झोन असे म्हणतात. यात दोन्ही डोळे, नाक आणि तोंड येते. हे टी झोन महत्वाचे असले तरी पूर्ण चेहऱ्यालाच हात लावणे टाळावे. तसेच केसांना ही उगीच हात लावणे टाळावे. घरात प्रत्येकाचा कंगवा ही वेगळा असावा. ही सवय मोडण्यासाठी आम्ही  डॉक्टरांनी एक शक्कल लढवली आहे.  हाताच्या कोपराला घट्ट चीगटपट्टी रोमन लेटर II म्हणजे  लिहितात तशा घट्ट चीगट पट्ट्या उभ्या आणि दोन आडव्या लावायच्या. यामुळे ठरवल तरी हात चेहऱ्या पर्यंत जाऊ शकत नाही. डॉक्टरच नाही तर पोलीस व फिल्ड वर वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी हे करायला हव. वारंवार चेहऱ्याला हात लावणे टाळण्यासाठी आता काही अॅप्स ही आले आहेत. तुमचा हात चेहऱ्याला जवळ गेला कि हे अॅप्स तुम्हाला एक विशिष्ट आवाजाने सिग्नल देतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज

Corona-about-common-misconception

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज कोरोना माशांमुळे पसरतो – मध्यंतरी अमिताभ बच्चन यांनी विष्टेतून व माशांमुळे कोरोना पसरतो असे विधान केले होते. विष्टेत कोरोना आढळू शकतो पण तो या द्वारे पसरू शकतो हे अजून सिध्द झालेले नाही. तसेच माशांमुळे कोरोना पसरतो याला अजून शास्त्रीय आधार नाही. माशी इतरत्र कुठे कोरोना बाधित जागेवर बसेल व ती आपल्या त्वचेवर बसून त्यातून कोरोना होईल हे शक्य नाही. म्हणून कोरोना हा माशांमुळे पसरत नाही. इतर आजारांसाठी माशी वाहक ठरू शकते . म्हणून मात्र स्वच्छता ठेवणे व माशांचा रादुर्भाव रोखणे फायदेशीर असते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना डासांमुळे पसरतो – कोरोना शरीरात जाण्याचा मुख्य स्त्रोत हा कोरोना बाधित व्यक्ती कडून व काना तोंडातून श्वसन मार्गात जाण्याचाच आहे. डेंग्यू , मलेरिया प्रमाणे तो डासांच्या माध्यमातून पसरत नाही.टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नाहीसा होतो – हात वाजवल्यावर १ ते १० khz इतकी कमी फ्रिक्वेन्सी निर्माण होते. विषाणू , बॅक्टेरीओया नष्ट करण्यासाठी ३० khz च्या पुढे फ्रिक्वेन्सी आवश्यक असते . म्हणून टाळ्या वाजवल्याने हातावरचा कोरोना नष्ट होणे शक्य नाही.घरगुती उपायांनी कोरोना पासून संरक्षण मिळेल – कुठले ही घरगुती औषध , नाकात तेल टाकणे , गरम पाणी पिणे याने कोरोना टाळणे शक्य नाही.

उपवास केल्याने कोरोना होणार नाही – उपवास केल्याने उलट शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल. म्हणून या काळात कोणीही उपवास करू नये. चांगला आहार घ्यावा.

कोरोना विषयी सर्वसाधारण गैरसमज भारतातील उष्ण हवामाना मुळे आपल्याला कोरोना होणार नाही. – ५६ डिग्री च्या पुढे पाणी उकळल्याने  कोरोना नष्ट होतो पण बाहेरचे तापमान जास्त आहे किंवा उष्ण हवामान आहे म्हणून कोरोना नष्ट होईल असे नाही. भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने भारतीयांना कोरोना होणार नाही – परदेशात राहणाऱ्या भारतीयांना ही कोरोना ची बाधा झाली आहे. भारतीय वेगळे आहेत व त्यांना कोरोना होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल असे मानण्यास सध्या काही शास्त्रीय अडह्र नाही .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा

मास्क घालताना चुका टाळा सध्या सर्वांना मास्क घालण्यास सांगितले आहे. पण अनेकांना मास्क कसा घालावा हे अजून माहित नाही. मास्क घालताना व काढताना दोरीला धरूनच वापरावा. तो मास्कच्या तोंड झाकण्याच्या भागावर हात लावून वापरू नये. घालताना नाकाच्या शेंड्याच्या वर पर्यंत म्हणजे नाक सुरु होते तिथे वर पर्यंत यायला हवा. खाली हनुवटी पूर्ण झाकली जाऊन खालचा भाग पूर्ण ह्नुवटीच्या मागे जायला हवा.मास्क घालताना चुका टाळा कानाच्या मागे दोऱ्या लावताना किंवा बांधताना इतक्या घट्ट लावाव्या की चेहऱ्या वर दोन्ही बाजूला मास्क येईल तिथे फार मोकळी जागा सुटायला नको. मास्क काढत असताना परत मधल्या भागाला हात न लावता काढावा. एकदा मास्क काढल्यावर तो थोडा वेळ इतरत्र घरात ठेवला, परत वापरला – असे करू नये. घरात वापरलेला मास्क काढून ठेवल्यावर सगळ्यात मोठा धोका, लहान मुलांनी त्याला हात लावण्याचा आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मास्क लावताना पुढील चुका टाळा –

  • मास्क घालताना चुका टाळा मास्क नाकाखाली म्हणजे नाकपुड्या उघड्या राहतील असे लावू नका
  • .  मास्क हनुवटीच्या वर ठेवू नका. मास्क लावल्यावर हनुवटी दिसता कामा नये
  • मास्क लावताना सैल लावल्यामुळे दोन्ही बाजूंना तो मोकळा , हवेची ये जा होऊ शकेल असा लावू नका.
  • नाकाच्या शेंड्यावर किंवा त्याच्या थोडेसे वर ठेवू नका. जितका शक्य होईल तितका शेंड्याच्या वर म्हणजे नाक सुरु होते तिथपर्यंत घ्या.
  • चष्मा नको असल्यावर जसे डोक्यावर ठेवतात तसा मास्क थोडा वेळ नको आहे म्हणून खाली ओढून मानेच्या पुढे लटकू दिला आणी नंतर परत घातला , असे करू नका .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ए.सी.वापरू शकतो कि नाही?

ए. सी. चालू करू शकतो की नाही

ए.सी.वापरू शकतो कि नाही? यावर बरीच चर्चा चालू आहे. एका रूम मधील ए.सी. असेल तर त्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो या विषयी कुठला ही पुरावा नाही व याची शक्यता नाही. पण सेन्ट्रल ए.सी ज्यातून सगळी कडे फिरून हवा जाते , या विषयी अजून निश्चित माहिती नाही. पण सेन्ट्रल पेक्षा वयक्तिक रूम साठीचा ए.सी. चांगला . पण वापरण्या अगोदर हा ए.सी. ही स्वच्छ करून घ्यावा.  अस्वच्छ ए.सी मुळे दमा, ॲलर्जीक खोकला, ॲलर्जीक सर्दी वाढते व ताप–सर्दी–खोकला व त्यातच लीजोनेल्ला , असीनॅटोबॅक्ट हे  निमोनिया करणारा बॅक्टीरीया ए.सी मधून पसरतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ए.सी.वापरू शकतो कि नाही? उन्हाळा नुकताच सुरु झाल्याने या दिवसात अचानक अनेक महिने बंद असलेले ए.सी. चालू होतात. बऱ्याचदा हे ए.सी. स्वच्छता न करता चालू केले जातात. यात अनेक दिवस अडकलेले ॲलर्जीन्स ही बाहेर पडतात. आणि दमा, ॲलर्जी बळावते. वैद्यकीय संशोधनात असे सिध्द झाले आहे कि अस्वच्छ ए.सी. मध्ये लीजनेल्ला, असीनॅटोबॅक्टर हे निमोनियाची लागण करणारे जंतू असतात .

ए.सी. ची स्वच्छता घरीच पुढील प्रमाणे करा –

ए.सी.चालू करू शकतो कि नाही? आधी ए.सी. चे स्वीच बंद असल्याची खात्री करून घ्या. ए.सी. उघडण्या अगोदर चेहरा , डोके झाकून घ्या. मास्क व गॉगलचा वापर करा .   ए.सी. उघडा. त्यातील जाळी काढून पाण्यामध्ये दोन तास भिजवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने ती स्वच्छ घासून घ्या. त्यानंतर एक दिवस उन्हात ही जाळी वाळू द्या. ए.सी चा आतील भाग हेअर ड्रायर ने गरम हवा मारून ५ ते १० मिनिटे स्वच्छ करून घ्या. या वेळी चेहरा शक्यतो दुसऱ्या बाजूला घ्या व हेअर ड्रायर फिरवताना उडणारी धूळ डोळे, नाका तोंडात जाणार नाही याची काळजी घ्या. या साठीच मास्क व गॉगलचा वापर करा.  मग ती परत बसवूनच या उन्हाळ्याचा पहिला-पहिला ए.सी चालू करा. या नंतर दर महिन्याला एकदा जाळी काढून झटकून स्वच्छ करायला विसरू नका.

सदरील माहिती आपण लोमत मध्येही वाचू शकता

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी

सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी सध्या राज्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईटची फवारणी तसेच अशी फवारणी सुरु असलेले चेम्बर्स बनवून त्यातून माणसांनी जायचे असे प्रकार सुरु आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फवारणी करून कोरोनाला अटकाव करणे अवघड तर आहेच याशिवाय त्याचे दुष्परिणाम ही आहेत. कोरोना हवेतून दूरवर पसरत नाही. तो ८ मीटर हवेत उडून नंतर खाली बसतो. म्हणून हवेत फवारणीचा उपयोग नाही. सार्वजनिक आरोग्यात उपाय योजना करताना परिणामकारकता – खर्च – दुष्परिणाम हे त्रैराशिक मांडावे लागते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना ची कॅरीअर व्यक्तीने नेमके कुठे हात लावले हे माहित नसताना अख्खे गाव , विभाग फवारणी करणे उपयोगाचे तर नाहीच पण याने आर्थिक निधी चा अपव्यय ही होतो आहे. फवारणी करायचीच असेल तर फक्त ज्या बिल्डींग मध्ये रुग्ण सापडला किंव एखादा छोटा भाग जिथे खूप रुग्ण सापडले असे हॉट स्पॉट मध्ये त्या मानाने याचा थोडा फार उपयोग तरी होईल.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगीवयक्तिक पातळीवर घर स्वच्छ करण्यासाठी ग्लव्ज, गॉगल, मास्क घालून  घरात सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छता करण्यास हरकत नाही.सार्वजनिक फवारणी आणि निर्जंतुकीकरण कक्ष निरुपयोगी तसेच ज्या रुग्णालयात रुग्ण सापडला तिथे ही फवारणी करण्यास हरकत नाही. सार्वजनिक रीत्या फवारणी केल्याने डोळे , त्वचा, नाकात चुरचुरणे , घसा खवखवणे / दुखणे , खोकला असे दुष्परिणाम होऊ शकतात .  निर्जंतुकीकरण कक्ष बनवून त्यातून माणस जात आहेत , त्याबद्दल ही असेच आहे. संसर्गाचा सगळ्यात मोठा धोका हा कोरोना बाधित व्यक्ती शी संपर्क येऊन त्याच्या खोकण्या, शिकण्यातून  आहे. तसेच त्याने हात लावला त्याच ठिकाणी हात लावण्यातून आहे. फक्त निर्जंततूकीकरण कक्षातून जाऊन हा धोका कसा टळेल. काहींनी चक्क हँड सॅनीटायझरची ही या कक्षातून पूर्ण अंगावर फवारणीची सोय केली आहे. या सर्व गोष्टींचे कक्षातून जाणाऱ्या व्यक्तीवर दुष्परिणाम आहेत. जागतिक आरोग्य संघटना व सीडीसी ने ही अशा कक्षांना मान्यता दिलेली नाही. तमिळ नाडू राज्याच्या आरोग्य विभागाने शासनाचा परिपत्रक काढून असे कक्ष बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त दाढी ठेवणे हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडी – निवडीचा प्रश्न असू शकतो. पण सीडीसी म्हणजे सध्या कोरोना विषयी अधिकृत माहितीचा स्त्रोत असलेल्या जागतिक संघटनेचे म्हणणे आहे की कोरोना टाळण्यासाठी सध्या दाढी व मिशा ची फॅशन बाजूला ठेवून गुळगुळीत चेहरा ठेवणे तुमचा व इतरांचा कोरोना पासून बचाव करेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दाढी व मिशा  नसल्यामुळे एक तर एन ९५ मास्क तसेच इतर मास्क तुमच्या चेहऱ्याला फिट बसेल. मास्क लावल्यावर दाढी असलेल्या चेहऱ्यातून गुळगुळीत चेहऱ्याच्या तुलनेत २०० ते १००० पट अधिक श्वासाची गळती सिध्द झालेली आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल या नामांकित जर्नलने डॉक्टरांच्या संदर्भात या विषयाला घेऊन चर्चा केली आहे .गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त किमान डॉक्टरांनी तसेच सर्वसामान्यांनी ही  मास्क नीट बसण्यासाठी, स्वतः व इतरांच्या च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  दाढी – मिशा काढण्याचा विचार करावा असा सल्ला ब्रिटेन मध्ये देण्यात आला आहे. यात दुसरी शक्यता अशी आहे कि कोरोना बाधित किंवा लक्षणे नसलेली कोरोनाची कॅरीअर व्यक्ती शिंकली, खोकलली तसेच हसताना व बोलताना तोंडा भोवतीच्या केस कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू शकता. कोरोना बाधित व्यक्तीचा दाढी मिशांना हात लागल्यास व तोच हात परत इतरत्र लागल्यास कोरोना चा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता वाढते . हात धुण्यासोबतच वारंवार तोंडाला हात न लावणे हा कोरोना टाळण्यासाठीचा महत्वाचा उपाय आहे . दाढी मिशा असल्यास वारंवार तोंडाला व चेहऱ्याला हात लावण्याचे प्रमाण वाढते . त्यामुळे ही इतरांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कोरोना बाधित व्यक्तीला ही दाढी मिशा असल्यास धोका वाढतो. विषाणू मिश्रीत स्त्राव दाढी – मिशांमध्ये बोलताना , खोकताना अडकत असल्याने याचे परत स्व – संक्रमण होऊन वायरल लोड वाढू शकतो व बरे होण्यास उशीर होऊ शकतो .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता