व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. बऱ्याच जणांना हाच सर्वोत्तम मास्क असल्याचा ही गैरसमज झाला आहे. या मास्कचे नीट निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल कि श्वास आत घेताना हा व्हॉल्व बंद होतो व श्वास बाहेर सोडताना व्हॉल्व आपोआप उघडतो. त्यामुळे या मास्कच्या व्हॉल्व मधून कोरोना तसेच इतर विषाणू सहज बाहेर जाऊ शकतात. या मास्क मुळे मास्क घालणाऱ्या व्यक्तीला कदाचित संसर्ग मिळेल पण समोरच्या बाधित व्यक्तीला ही व्हॉल्व असलेल्या मास्कचा धोका माहित नसेल व तो हा मास्क वापरत असेल तर अशा कोरोना संसर्गित व्यक्ती पासून इतरांचे संरक्षण होणार नाही. मास्क वापरण्याचा हेतू फक्त स्वतःचेच संसर्ग नाही तर माझ मास्क तुला आणि तुझा मास्क मला संसर्ग देईल असे हे प्रतिबंधाच्या सहजीवनाचे तत्त्व आहे त्यामुळे हे मास्क कोणीही वापरू नये. तसेच शासनाने ही या मास्क वर बंदी घालावी. इतर कुठला ही नाकाच्या वरच्या टोका पासून हनुवटी च्या खाल पर्यंत व दोन्ही बाजूने तोंड व नाक पूर्ण झाकणारा व्हॉल्व नसलेला मास्कचा वापर करण्यास हरकत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्हॉल्व नसलेला मास्क वापरल्यास श्वास घेण्यास काही त्रास होईल का ?

व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका मुळात व्हॉल्व असलेले मास्क हे जिथे जागा पूर्ण बंद आहे व हवेचा दाब कमी आहे अशा जागेत काम करणाऱ्यांसाठी बनवले गेले होते. खाणी मध्ये व खोदकामात , बोगद्यात काम करणाऱ्या कर्मचार्यांचा श्वास गुदमरू नये व त्यांच्या शरीरात C02 हा प्राणवायू साठून त्यांचा जीव गुदमरू नये  यासाठी ही मास्क मध्ये व्हॉल्वची योजना. कारण अशा खोलवर व पूर्ण बंद असलेल्या जागेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. बाहेर मोकळ्या वातावरणात किंवा ऑफिस मध्ये वातावरण पूर्ण बंद नसते व ऋण तापमानात ऑक्सिजनची पातळी पुरेशी असते. म्हणून तिथे व्हॉल्व नसलेले मास्क वापरले तरी श्वास घेण्यास त्रास होण्याची / जीव गुदमरण्याची भीती नाही. पण मात्र व्हॉल्व मधून कोरोना संसर्ग इतरांना होण्याची शक्यता आहे. म्हणून मास्क श्वास घेण्यास त्रास होण्याची भीती बाजूला ठेवून व्हॉल्व नसलेले मास्कच वापरावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *