होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग १

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग १ जर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला व सौम्य लक्षणे / लक्षणविरहीत असाल तर डॉक्टरांकडून होम आयसोलेशनचा सल्ला दिला जाऊ शकतो. असे रुग्ण व नातेवाईकांसाठी पुढील सूचना –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 • होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग १ रुग्णाने वेगळी खोली वापरावी व उपलब्ध असल्यास वेगळे स्वच्छता गृह वापरावे. खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या.
 • रुग्णाने सतत मास्क वापरावा व तो दर ८ तासाने बदलावा. वापरून झाल्यावर १ % सोडियम हायपोक्लोराईट मध्ये तो बुडवावा किंवा एक छोटे भांडे ठेवून त्यात जाळावा. हे करत असताना सावधानता बाळगावी.
 • रुग्णाला जेवण / सामान देण्यासाठी घरातील सगळ्यात तरूण आणि स्वस्थ व्यक्तीने जबाबदारी स्वीकारावी.
 • रुग्णाने घरातील ५० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीशी किंवा इतर जोखीम वाढवणारे आजार असणाऱ्यांसाठी संपर्कात राहू नये.
 • रुग्णाने एकटे असले तरी वाचन करणे, फोन वर चित्रपट बघणे / इतर आवडतील अशा गोष्टी कराव्या. आराम करावा व झोपताना शक्यतो पालथे झोपावे.
 • रुग्णाने या काळात जास्त थकवणारा व्यायाम करू नये.
 • रुग्णाने रोज किमान ६ ते ८ ग्लास किंवा २ ते ३ लिटर पाणी प्यावे.
 • थोड्या थोड्या वेळाने हात धुवावे व हँड सॅनिटायझरचा वापर करावा.
 • खाण्यासाठी शक्यतो ताट वाट्यांपेक्षा डिस्पोजेबल वस्तूंचा वापर करावा व एक एक दिवसाने हे एका बंदिस्त बॅग मध्ये दाराजवळ म्हणजे कोरोना रुग्ण राहते त्या खोलीत आतून  ठेवून द्याव्या. घरातील व्यक्तीने ग्लोव्हज घालून या वस्तू घेऊन  घराबाहेर नेऊन त्या जाळाव्या.
 • रुग्णाने आपल्या डॉक्टर / हॉस्पिटलशी संपर्कात राहावे व पुढील त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांना कळवावे –
 • श्वास घेण्यास त्रास.
  छातीत सतत दुखणे / छातीत दाब जाणवणे.
 • झोपेतून उठण्यास खूप वेळ लागणे / रुग्णाला गोंधळल्या सारखे वाटणे.
 • ओठ / चेहरा/ हाता / पायाची बोटे  निळी पडणे.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *