कोरोना भीतीचा मानसिक आजार सध्या अनेकांना मला कोरोना होईल का? किंवा कोरोना ने माझा मृत्यू तर होणार नाही ना? या भीतीने ग्रासले आहे. काही प्रमाणात या भावना मनात येणे नॉर्मल आहे. म्हणून थोड्या फार प्रमाणात असे विचार मनात असल्यास मुळीच काळजी करण्याचे कारण नाही. पण हे विचार वारंवार येणे व आपल्या दैनंदिन आयुष्यावर याचा परिणाम होणे मात्र आपण ओळखायला हवे . आपल्याला पुढील लक्षणे आहेत का हे तपासून पाहा –
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- जास्त वेळा / सतत कोरोना विषयी मनात विचार येणे व मृत्यूची भीती वाटणे.
- यामुळे चिडचिड होणे किंवा एकदम शांत होणे किंवा नेहमी पेक्षा कमी बोलणे.
- जेवण व झोप कमी होणे.
- आपल्या प्रियजनांची , कुटुंबाचे काय होईल ही सतत काळजी सतावने.
- बातम्या किंवा टी.व्ही. मधून कोरोना विषयी जास्त माहिती मिळवण्याचा सतत प्रयत्न करणे.
- कोणीही भेटले किंवा फोन आला तरी फक्त कोरोनाची व त्या भीती विषयी चर्चा करणे.
यावर उपाय काय –
- कोरोना भीतीचा मानसिक आजार यासाठी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कि मला खूप काळजी करून भयभीत व्हायचे किंवा मी मुळीच काळजी करणार नाही , जे व्हायचे होऊ दे – या दोन्हीचा मध्यबिंदू काढून विचार करणे गरजेचे आहे.
- यासाठी हो , प्रत्येकाला कोरोना होण्याची शक्यता आहे याचा स्वीकार करणे व यासाठी माझ्या हातात काय आहे हे स्वतःला विचारणे.
- हातात असलेल्या हा आजार टाळण्यासाठीचे उपाय जाणून त्याचे पालन करणे.
- जर झोपेवर व जेवणावर जास्त परिणाम होत असेल तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यावा.
- कोरोना विषयी सध्या काय सुरु आहे याची दिवसातून एखाद दोन वेळा माहिती घ्यावी पण दिवसभर सतत त्याच बातम्या बघत बसू नये .