कोरोना हवेतून पसरतो का?

कोरोना हवेतून पसरतो का? पूर्वी मानले जायचे की, संसर्गित व्यक्तीतून बाहेर पडणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा व्यास हा ५ ते १० मायक्रोमीटर असल्याने तो १ मीटरपेक्षा जास्त जागेत उडत नाही व ३ ते ४ तासांत खाली बसतात. असे होऊ शकते की कोरोनाबाधित व्यक्तीच्या श्वसनातून बाहेर पडणारे काही (५ ते १० टक्के ) संसर्गकण हे ५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असतील आणि म्हणून ते १ मीटरपेक्षा जास्त अंतरावर उडून लांबवर जातील आणि ८ तासांपर्यंत हवेत तरंगत राहतील.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना हवेतून पसरतो का? कमी व्यास असलेले संसर्गकण १ मीटरच्या पुढे जाऊन इतरांना संसर्ग करण्याच्या या प्रक्रियेला हवेतून संसर्ग म्हटले आहे.हवेतून संसर्गाची जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता वर्तवल्याची बातमी आल्यापासून अनेकांचा गैरसमज झाला आहे की, कोरोना काही किलोमीटर दूर व एका गावातून दुसºया गावापर्यंत उडून संसर्ग करू शकतो. पण असे मुळीच नाही. तो हवेतून जात असला तर आधी १ मीटरच्या थोडा पुढे कदाचित ३, ४ किंवा ५ मीटर पुढे जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता जागा किती बंद आहे यावर अवलंबून आहे.हवेतून संसर्गाची शक्यता असली तरी मुख्य संसर्गाचा स्रोत हा आधी सांगितलेला मोठ्या संसर्गकणांचा म्हणजे १ मीटरच्या अंतरावरच आहे. हवेतून प्रसाराची शक्यता ही कमी जागेत व वारे वाहण्यास फार वाव नाही अशा बंद जागेतच जास्त आहे. तसेच हवेतून संसर्गित होणाºया कणांची संसर्गक्षमता ही १ मीटरच्या आत मोठ्या संसर्गकणांपेक्षा कमी असणार आहे. म्हणून एकमेकांपासून एक मीटरपेक्षा जास्त अंतराने उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व अबाधित राहणार आहे. हवेतून संसर्गाच्या अल्पशा शक्यतेचे महत्त्व काय ?हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे.हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *