होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग २

होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग २ होम आयसोलेशन मध्ये कोरोना रुग्णापेक्षा नातेवाइकांचा रोल महत्वाचा असतो.

  • ज्या खोलीत रुग्णाचे आयसोलेशन करणार आहे त्या खोलीत कमीत कमी सामान ठेवावे व मोबाईलचे चार्जर, लॅपटॉप अशा गोष्टींची तजवीज आधीच करून ठेवावी.
  • तसेच आयसोलेशन खोलीतील इतर सदस्यांच्या गोष्टी , इतरांचे कपडे, पैसे , एटीएम अशा गोष्टी ही बाहेर काढून ठेवाव्या म्हणजे चौदा दिवस कोणाला ही या खोलीत जाण्याची गरज पडू नये.
  • आयसोलेशन खोली मध्ये शक्य झाल्यास एक बेल लावावी.
  • दर सहा तासांनी रुग्णाच्या तब्येतीची चौकशी करावी व धोका दर्शवणाऱ्या गोष्टी जाणवल्यास कुठे फोन करायचे याची नोंद करून ठेवावी व हे नंबर सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लिहून ठेवावे.
  • रुग्णाला जेवण देणे सोडले तर इतरांनी रुग्णाच्या थेट संपर्कात राहू नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • ६० वर्षावरील , गरोदर स्त्रिया , लहान मुले व इर आजर असणाऱ्यांनी शून्य संपर्क ठेवावे.
  • होम आयसोलेशन साठी मार्गदर्शक तत्वे भाग २ शून्य संपर्क येणाऱ्यांनी घरात २४ तास मास्क वापरण्याची गरज नाही पण जेवण देणे किंवा इतर गोष्टी साठी संपर्क येणाऱ्यांनी संपर्क येईल तेव्हा मास्कचा वापर करावा.
  • आयसोलेशन संपले कि ती खोली, रुग्णाने वापरलेले स्वच्छतागृह १ % सोडियम हायपोक्लोराईट पाण्यात टाकून त्याने स्वच्छता करावी, खोलीतील सगळ्या वस्तू सॅनीटायजरने पुसून घ्याव्या व सॅनीटायजर स्प्रे कपाट, फर्निचरवर मारावा.
  • घरात पाहुणे येत असल्यास किंवा भेटायला कोणी येणार असल्यास नकार द्यावा.
  • आयसोलेशन मध्ये असलेली व्यक्ती करत असलेली कामे कोण करणार याचे नियोजन ठेवावे.
  • घरातील वातावरण आनंदी ठेवावे . सर्वांनी बाहेरून म्हणजे दार बंद ठेवून अधून मधून रुग्णाशी बोलावे, गप्पा माराव्या, त्याला मनोरंजनासाठी आवडणारी गाणी, चित्रपट उपलब्ध करून द्यावे व रुग्णाचा मूड चांगला ठेवावा.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *