संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे नुकतेच सीडीसी ने कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर घातली आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • थंडी वाजून येणे
  • थंडी वाजून आल्याने वारंवार थर थर होणे
  • स्नायू दुखणे
  • डोके दुखणे
  • घशात खवखवणे
  • तोंडाची चव नाहीशी होणे
  • वास घेण्याची क्षमता कमी किंवा नाहीशी होणे

संसर्गाची नवी लक्षणे याशिवाय तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून इमर्जन्सी उपचार सुरु करण्याचे काही निकष ही सीडीसी ने संगीतले आहेत

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत सतत काही वेळ दुखणे / छातीवर दाब येणे
  • झोपेतून उठवून ही न उठणे किंवा नेहमी एवढे उठवले कि व्यक्ती लगेच उठून बसते पण आज तसे करत नाही आहे. झोपेतून उठवायला जास्त हलवावे,ओरडावे लागते आहे. भान न राहणे ,चक्कर येणे
  • चेहरा किंवा ओठ निळे पडणे

सीडीसिने सांगितलेली ही लक्षणे सोडून भारतातील डॉक्टरांना इतर ही काही लक्षणे आढळून येत आहेत –

  • ज्येष्ठ व्यक्ती सतत दिवस भर झोपेत राहणे
  • भूक पूर्ण नाहीशी होणे
  • अनियंत्रित जुलाब
  • तरुण व्यक्ती निस्तेज दिसणे
  • दोन दिवसात झपाट्याने  तब्येत खालावणे
  • सर्दी, खोकला झाल्यावर सहसा व्यक्ती कसा असतो , किती थकलेला असतो व कसा बरा होतो हा पॅटर्न घरातील व्यक्तींना माहित असतो. या वेळेला ताप , खोकला , सर्दी हि नेहमी सारखी वाटत नाही. नेहमी कुठल्या ही आजारा पेक्षा या वेळी जरा वेगळे आणी जास्त वाटते आहे . सुस्तपणा जास्त आहे. हे निरीक्षण नातेवाइकांच्या लक्षात येते. असे असल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवावे व सविस्तर सगळा वैद्यकीय इतिहास सांगावा
  • काहींना , ताप , खोकला व श्वास  घेण्यास त्रासासोबत अंगावर चट्टे ( रॅश ) ही येते आहे. हे गोवर किंवा कांजण्या सारखे अंगावर किंवा काहींना हात व पायांच्या बोटांवर ठिपक्यांसारखी रॅश येते आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *