लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने व अनेक जन घरून काम करत असल्याने रोजचा दिनक्रम व वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यात सर्वात मोठा फटका हा झोपेला बसला आहे. पुढील गोष्टींमुळे सध्या  झोपेवर परिणाम झाला आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 • शारीरिक हालचालींमध्ये कमतरता
 • घरी असल्याने कामाच्या गतीवर परिणाम
 • स्क्रीन टाईम मध्ये वाढ
 • घरचे खाणे असल्याने जास्त जेवण
 • कोरोनाची भीती व सतत कोरोनाच्या बातम्या ऐकणे
 • आर्थिक अनिश्चिततेची काळजी
 • घरी असल्याने दुपारच्या झोपेत वाढ

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या आपले शरीर व झोप एका जैविक घड्याळावर चालत असते ज्याला सरकॅडीयन रिदम असे म्हणतात. अनेकांना उशिरा झोपून उशिरा उठण्याची सवय लागत चालली आहे. सध्या ही जैविक घड्याळच विचलित झाल्याने लॉकडाऊन संपल्यावर झोपेची समस्या जास्त प्रमाणात भेडसावू शकते. तसे होऊ नये म्हणून या संदर्भात आता पासूनच काळजी घेणे आवश्यक आहे.

 • घरी असलो तरी आपले उठण्याचे व झोपण्याचे वेळापत्रक निश्चित असले पाहिजे
 • शक्यतो लवकर कामावर जाणाऱ्यांनी सकाळी त्याच वेळेत उठण्याची सवय सोडू नये. ती सवय मोडली असेल तर प्रयत्नपूर्वक आधीच्या वेळा पाळण्यास सुरुवात करावी
 • रोज किमान तीस मिनिटांचा घाम निघेल असा शारीरिक व्यायाम घरात करणे गरजेचे आहे. यात दोरीवरच्या उड्या, छतावर जॉगिंग करणे, नाचणे, पुश अप्स , सूर्यनमस्कार असा कुठला ही व्यायाम घरात करावा
 • झोपताना १० ते १५ मिनिटे खोलवर श्वास घेणे किंवा श्वास घेताना पोट बाहेर येईल व सोडताना आत जाईल या पद्धतीने अॅबडॉमीनल ब्रीदिंगचा व्यायाम करावा
 • ६ नंतर शक्यतो चहा – कॉफी टाळावी
 • घरी असलात तरी रात्री ८ पर्यंत रात्रीचे जेवण करावे
 • झोपण्याआधी २ तास फोन, टीव्ही, संगणक, लॅपटॉपचा वापर थांबवून स्क्रीन संपर्क बंद करावा
 • झोपताना तळपायांना तिळाचे किंवा एरंडाचे तेल लावून झोपावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *