ग्लोव्हज वापरण्याची गरज नाही सध्या अनेक सर्वसामान्य लोक, राजकीय नेते, पत्रकार, पोलीस ग्लोव्हज वापरताना दिसत आहेत. पण डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयात काम करणारा प्रशासकीय कर्मचारी व रूग्णालया बाहेर स्वच्छता कर्मचारी सोडल्यास इतर कोणीही हातमोजे म्हणजे ग्लोव्हज वापरण्याची गरज नाही. जर ग्लोव्हज वापरले तर वारंवार हात धुणे शक्य नाही व ते धुतले जाणार नाहीत. व न धुतलेल्या ग्लोव्हज घातलेल्या हातांनी नाक, तोंड व डोळ्यांना हात लावण्याची शक्यता खूप जास्त आहे.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
आपण किती ही प्रयत्न केला तरी मास्क नीट बसवण्यासाठी, मास्क खाली करण्यासाठी मास्कला किंवा तोंडाला हात लागतोच. अशा वेळी ग्लोव्हज घालून हात लागल्यास संसर्गाची शक्यता जास्त आहे. याउलट ग्लोव्हज न घालता वारंवार हात धुणे, बाहेर कुठे ही गेले कि आधी हात धुणे व बाहेरून घरात आले की लगेचच हात धुणे व नाका तोंडाला हात न लावने हा कोरोनाच्या प्रतिबंधाचा सर्वोत्तम आहे. ग्लोव्हज घातल्याने मात्र हा मार्ग अवलंबिला जाण्याची शक्यता कमी आहे. बाहेर असताना इकडे तिकडे, पायऱ्या चढताना कुठेही हात न लावणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. ग्लोव्हज घातल्यावर , मी ग्लोव्हज घातल्याने कुठे ही हात लावू शकतो ही भावना मनात बळावते व ग्लोव्हज घातलेले हात इतरत्र लागून तेच हात नाक व तोंडाला लागतात. ग्लोव्हज योग्य प्रकारे नेमके कसे घालावे आणि काढावे ही पद्धत किचकट असते आणि डॉक्टर अनेक वर्ष त्याला सरावलेले असल्याने त्यांना ते सहज जमते. सर्व सामान्य चुकीच्या पद्धतीने हे करण्याची शक्यता जास्त आहे .सर्वांनी ग्लोव्हज वापरण्याची दुसरी समस्या म्हणजे वापरलेल्या ग्लोव्हज हा जैविक कचरा असतो आणि त्यांची विल्हेवाट ही रुग्णालय जैविक कचऱ्या प्रमाणे करावी लागते जी घरी करणे अवघड आहे.
ग्लोव्हज वापरण्याची गरज नाही डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज का वापरायचे कारण कोरोना बाधित व्यक्तींशी व त्या सोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू , सरफेसशी जास्त वेळ व सर्वाधिक संपर्क या वर्गाचा आहे. त्यांना दर १० – १५ मिनिटांनी व्यस्तते मुळे व सतत संपर्काचा स्त्रोत कायम असल्याने शक्य नाही. म्हणून ते ग्लोव्हज चा वापर करू शकतात. ग्लोव्हज वापरून ही डॉक्टर , पॅरामेडिकल स्टाफ ने दोन रुग्ण तपासण्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे सॅनीटायजर वापरायला हवे. तसेच हॉस्पिटल मधून जाताना रंगाच्या रुग्णालयातील जैविक कचरा जमा करण्याच्या बॅग / डब्यात टाकून जायचे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता