गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त

गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त दाढी ठेवणे हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडी – निवडीचा प्रश्न असू शकतो. पण सीडीसी म्हणजे सध्या कोरोना विषयी अधिकृत माहितीचा स्त्रोत असलेल्या जागतिक संघटनेचे म्हणणे आहे की कोरोना टाळण्यासाठी सध्या दाढी व मिशा ची फॅशन बाजूला ठेवून गुळगुळीत चेहरा ठेवणे तुमचा व इतरांचा कोरोना पासून बचाव करेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दाढी व मिशा  नसल्यामुळे एक तर एन ९५ मास्क तसेच इतर मास्क तुमच्या चेहऱ्याला फिट बसेल. मास्क लावल्यावर दाढी असलेल्या चेहऱ्यातून गुळगुळीत चेहऱ्याच्या तुलनेत २०० ते १००० पट अधिक श्वासाची गळती सिध्द झालेली आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल या नामांकित जर्नलने डॉक्टरांच्या संदर्भात या विषयाला घेऊन चर्चा केली आहे .गुळगुळीत चेहरा कोरोना टाळण्यासाठी उपयुक्त किमान डॉक्टरांनी तसेच सर्वसामान्यांनी ही  मास्क नीट बसण्यासाठी, स्वतः व इतरांच्या च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  दाढी – मिशा काढण्याचा विचार करावा असा सल्ला ब्रिटेन मध्ये देण्यात आला आहे. यात दुसरी शक्यता अशी आहे कि कोरोना बाधित किंवा लक्षणे नसलेली कोरोनाची कॅरीअर व्यक्ती शिंकली, खोकलली तसेच हसताना व बोलताना तोंडा भोवतीच्या केस कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू शकता. कोरोना बाधित व्यक्तीचा दाढी मिशांना हात लागल्यास व तोच हात परत इतरत्र लागल्यास कोरोना चा संसर्ग इतरांना होण्याची शक्यता वाढते . हात धुण्यासोबतच वारंवार तोंडाला हात न लावणे हा कोरोना टाळण्यासाठीचा महत्वाचा उपाय आहे . दाढी मिशा असल्यास वारंवार तोंडाला व चेहऱ्याला हात लावण्याचे प्रमाण वाढते . त्यामुळे ही इतरांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. कोरोना बाधित व्यक्तीला ही दाढी मिशा असल्यास धोका वाढतो. विषाणू मिश्रीत स्त्राव दाढी – मिशांमध्ये बोलताना , खोकताना अडकत असल्याने याचे परत स्व – संक्रमण होऊन वायरल लोड वाढू शकतो व बरे होण्यास उशीर होऊ शकतो .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *