स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या लॉकडाऊन सैल झाल्या पासून अनेक दुकान उघडली आहेत. किराणा , कपडे , दागिने अशा अनेक ठिकाणी स्त्रिया निवांत खरेदी करत असताना दिसायला लागले आहेत. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही कि कोरोनाची साथ पूर्ण संपलेली नाही  पुढील किमान सहा महिने आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. आणि प्रतिबंधक उपायांचा एक महत्वाचा भाग असणार आहे, गर्दीच्या ठिकाणावरून लवकरात लवकर काम संपवून काढता पाय घेणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या घरातील महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीची जबाबदारी गृहिणींवर असते. या आवश्यक वस्तू खरेदी करताना तसेच कपड्यांसारख्या इतर गोष्टी खरेदी करतांना पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त वेळ लावतात. स्त्रिया हे मुद्दाम करत नसतात तर याला काही मानसशास्त्रीय कारण असतात. स्त्रियांचा टेम्पोरलं व परायटल लोब हा मेंदूचा भाग पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतो. त्यामुळे रंग, हाताला लागणारे संवेदना, वास, एखाद्या वस्तूतील विविधता हे स्त्रियांना लवकर कळते व त्याविषयी त्या जास्त जागरूक असतात. तसेच कुठल्या ही वस्तूच्या खोलात जाऊन ति गोष्ट पाहणे हा स्त्रियांच्या मेंदूचा गुणधर्म असतो. म्हणून कुठली ही खरेदी करताना त्या जास्त चौकस असतात. तसेच त्यांना त्यातले वैविध्य अपेक्षित नसल्याने त्यांना खरेदी करतांना निर्णय घेण्यास वेळ लागतो. पण ही गोष्ट कोरोनाच्या या साथीच्या काळात तापदायक ठरू शकते. याचे कारण कोरोनाची लागण तुमच्या संपर्का पेक्षा ही  किती वेळ संपर्क येतो यावर अवलंबून असते. म्हणूनच आहे. यासाठी पुढील स्त्रियांना या सवयीला काही काळ तरी मुरड घालायला हवी. व ही सवय लावून घेतल्यास शक्य गोष्टी पाळाव्या

  • खरेदी ला जातानाचा आपल्याला दुकानाच्या आत जाताना बाहेर येण्याचा वेळ निश्चित करून घ्यावा. हा वेळ अर्ध्या तासापेक्षा कमी असावा.
  • कुठल्या ही ठिकाणी ४५ मिनिटा पेक्षा जास्त वेळ घालवल्यास जोखीम वाढते.
  • काय खरेदी करायचे आहे हे यादी करून आधीच ठरवून ठेवावे.
  • कपड्यांना सारख्या गोष्टी बघण्यासाठी फोन वर मागवून घ्याव्या.
  • जेव्हा शक्य होईल तेव्हा फोन वर / ई कॉमर्स च्या माध्यमातून खरेदी करावी.
  • दुकानांनी त्यांच्या संकेतस्थळावर थ्रीडी गॅलरी तयार करून वस्तू / कपडे सर्व बाजूंनी बघता येतील अशी सोय करावी म्हणजे ग्राहक घरी बघून काय खरेदी करायचे आहे हा निर्णय दुकानात येण्या आधीच नक्की करू शकतील.
  • छोट्या गावांमध्ये ही फोन नंबर देऊन स्थानिक पातळीवर वस्तू घरपोच देण्याची सोय करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *