” क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको अनेक वर्षांच्या सवयीप्रमाणे अनेक कारणांसाठी थुंकीचा वापर करण्याची आपल्याला सवय लागली आहे. पण कोरोनानंतर आता ही सवय बदलावी लागणार आहे. याचे कारण थुंकीतून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि ज्या गोष्टीसाठी थुंकी वापरली ती कोरोना पसरवण्यासाठी वाहक ठरू शकते. पुढील गोष्टी करताना थुंकीचा वापर थांबवा.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- क्रिकेट बॉल, नोटा व पान उलटताना थुंकीचा वापर नको क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या ओव्हर्स संपल्यावर चेंडू प्रभावी पणे रिवर्स स्विंग व्हावा म्हणून खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी घाम किंवा थुंकीचा वापर करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. या ऐवजी ओव्हर संपल्यावर अम्पायर समोर चेंडू चमकवन्यासाठी कृत्रिम पदार्थ उपलब्ध करून देण्याची तयारी आयसीसीने केली आहे. त्यामुळे खेळाडूंनी असा थुंकी व घामाचा वापर चेंडू चमकावण्यासाठी बंद करावे. अंतरराष्ट्रीयच नव्हे तर स्थानिक व गल्लीत मुले खेळत असलेल्या क्रिकेट मध्येही हा नियम पाळला जावा. अंतरराष्ट्रीयच क्रिकेट मध्ये मोठ्या खेळाडूंनी हे करणे थांबवले की इतर ठिकाणी हे अपोआप थांबेल. कारण बऱ्याचदा छोट्या प्रमाणावर खेळताना असे नक्कल म्हणून केले जाते.
- बँके मध्ये किंवा घरात नोटा मोजताना थुंकीचा वापर करू नका.
- पाकिटे, पोस्ट स्टॅम्प, कोर्टातील फी स्टॅम्प चिटकवण्यासाठी थुंकीचा वापर नको. दिल्ली हायकोर्टाने कोर्टात थुंकीचा वापर न करण्या विषयी आदेश काढला आहे.
- यासाठी बँकेत, कोर्टात, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत, वाचनालये उघडल्यावर तिथे ही प्रत्येक टेबल समोर स्पंजचे तुकडे ओले करून ठेवायला हवे. हे स्पंज ओले करण्यासाठी पाण्याऐवजी हँड सॅनीटायजर चा वापर करता येईल.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता