विमान प्रवासात घ्या काळजी आंतरदेशीय हवाई वाहूक टप्प्यात सुरु होत असल्याने आता हवाई प्रवास करणाऱ्या सगळ्यांना काही नियम समजावून घ्यावे लागणार आहेत. विमानात बसल्यावर ६ फुट हा सोशल डीस्टन्सिंगचा नियम पाळणे शक्य नसले तरी इतर अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे संसर्ग टाळला जाऊ शकतो.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- लक्षणे असलेल्या किंवा ताप असलेल्यांना विमान प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. म्हणून असे असल्यास माहिती लपवून प्रवास करण्यापेक्षा हवाई प्रवास टाळा.
- विमानतळाच्या आत जाण्या आधी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करून घ्या कारण हे अनिवार्य आहे.
- तापमान जास्त आढळल्यास किंवा लक्षणे आढळल्यास इंस्टीट्युशनल किंवा घरी विलगीकरणाचा सल्ला दिल्यास वाद घालू नका. दिलेल्या सल्ल्याचे पालन करा.
- वेब चेक इन करा म्हणजे विमानतळावर संपर्क कमी येईल.
- काही विमान कंपन्या त्यांच्या अॅप मधूनच बोर्डिंग पास व त्याचा क़्युआर कोड देतात. हे शक्य झाल्यास सेक्युरिटी चेक व पुढे ही इतरांशी संपर्क कमी येईल.
- कमीत कमी सामानासह प्रवास करा.
- सेक्युरिटी चेकच्या वेळी ट्रे चा वापर करण्या पेक्षा सर्व सामान स्वतःच्या बॅगेत टाका
- सेक्युरिटी चेक झाल्यावर क्यूआर कोड असलेला पास असल्यास स्वतःच्या हाताने स्कॅन करा
- विमानतळाच्या आत गेल्या पासूनपूर्ण प्रक्रिया झाल्यावर विमानात बसण्या आधी साबणाने स्वच्छ हात धुउन घ्या.
- विमान प्रवासात घ्या काळजी विमानतळाच्या आत गेल्या पासून हात मागे एकमेकात बांधून किवा कुठे ही हात लावायचा नाही हे लक्षात राहील अशा प्रकारे घडी घालून फिरा
- विमानतळावर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर इकडे तिकडे खरेदी करत फिरू नका.
- विमानाला वेळ असल्यास बसताना एकमेकांपासून लांब बसा. जागा भरपूर असल्याने हे शक्य आहे.
- सीट घेताना शक्यतो खिडकी जवळची जागा घ्या. या जागेवर बसणाऱ्यांचा इतरांशी आणि दोन रांगेतून जाणाऱ्यांशी कमी संबंध येतो. ही सीट मिळाली नाही तरी काळजी करू नका.
- विमानात बसण्या आधी विमानतळावरच शौचालयाचा उपयोग करून घ्या. कमी वेळेचा प्रवास असल्यास विमानातील शौचालयाचा उपयोग करू नका
- हात दोन सीट मधल्या आर्म रेस्ट वर ठेवू नका. हात दोन्ही मांड्यांवर समोर ठेवा.
- विमान प्रवासा दरम्यान पाण्यासाठी किंवा उगीचच केबिन कृला बोलवू नका. प्रवासा दरम्यान १०० एमएल पाणी सोबत ठेवण्यास परवानगी असते. म्हणून संपर्क टाळण्यासाठी स्वतःचे १०० एमएल पाणी सोबत ठेवा.
- सोबत हँड सॅनीटायजर ठेवावा पण तो ३५० एमएल पेक्षा जास्त नसावा. प्रवास करतांना हँड सॅनीटायजर व मास्क अनिवार्य आहे.
- उतरताना एकमेकांच्या मागे उभे राहून उतरू नये. दोन प्रवाशांमध्ये ६ फुट अंतर ठेवत उतरावे. शक्य असल्यास बसून राहावे व सगळे उतरल्यावर उतरावे.
- प्रवासा दरम्यान नाक व तोंडाला हात लावणे टाळावे.
- हवाई प्रवासात ग्लोव्हज अनिवार्य केले आहेत. पण या साठी महागडे सर्जिकल ग्लोव्हजची गरज नाही. विमान प्रवासात घ्या काळजी साधे प्लास्टिक डिस्पोजेबल ग्लोव्हज चालतील. हे स्वस्त असतात. बाहेर निघतांना हे विमानतळाच्या कचरा पेटीत काढून टाकले जाऊ शकतात. ग्लोव्हज काढल्यावर हात धुवावे.
- हवाई प्रवासा दरम्यान शिंक आल्यास एका प्लास्टिकच्या पिशवीत शिंकावे. ही पिशवी खिशात ठेवावी व नंतर डीस्पोज करावी. विमान कंपन्यांनी सीट समोर स्नीज बॅग्जची सोय करावी. त्या कशा वापरायच्या याचे प्रशिक्षण सुरुवातीला केईन कृ माहिती सांगतात त्यात करावे .
- घरी गेल्यावर सामान सोडियम हायपोक्लोराईट मध्ये बुडवलेल्या कपड्याने धुवून घ्यावे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता