ऑफिसची रचना आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागणार

ऑफिसची रचना आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागणार आता कोरोना सोबत जगायला शिकताना आपल्याला अनेक गोष्टींची पुनर्रचना करावी लागणार आहे. यात ऑफिसची बसण्याची रचना कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत कदाचित बदलावी लागेल. यात पुढील बदल गरजेचे ठरतील

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 • सिक्स फीट ऑफिस ही नवी संकल्पना आणावी लागणार ज्यात रचना अशी केलेली असेल कि दोन काम करणाऱ्यांमध्ये ६ फुटाचे अंतर राहील.
 • ऑफिस १० ते ५ या वेळेतच हा हट्ट सोडून गर्दी टाळण्यासाठी कर्मचार्यांना सकाळ, दुपार , संध्याकाळ अशा तिन्ही शिफ्ट मध्ये बोलवावे.
 • ऑफिसची रचना आणि काम करण्याची पद्धत बदलावी लागणार ऑफिस मध्ये सेन्ट्रल एसी न वापरता वैयक्तिक वेगळे एसी वापरावे. दर महिन्याला ते स्वच्छ करावे. हॉस्पिटल व आयसीयू ची स्वच्छतेचे व इन्फेक्शन कंट्रोलचे एक धोरण असते व त्याचा एक प्रमुख नेमून दर महिन्याला या विषयी बैठक होते. हे ऑफिस मध्ये ही सुरु करा.
 • ऑफिसच्या बाहेर आत येताना दारावर हात धुण्यासाठी बेसिन, पायाने ऑपरेट होईल असे पातळ साबण देणारे स्टँड ठेवावे.  
 • मुख्य दार हे हात न लावता अपोआप उघडणारे असावे किंवा ते ऑफिसच्या वेळेत उघडेच ठेवावे . अंतर्गत रचनेत दारे कमी असावे किंवा केबिन्स ची दारे उघडी ठेवावी.
 • मुंबई , पुणे सोडून इतर ठिकाणी जागा उपलब्ध असेल तिथे ऑफिस हवेशीर असावे. 
 • प्रत्येक बसण्याच्या जागी खुर्च्या समोर न ठेवता उजव्या , डाव्या बाजूला ठेवावे.
 • लिफ्ट मध्ये व डेस्क समोर कुठे उभे राहायचे हे लाल रंगाने वर्तुळ मार्क करावे.
 • ऑफिस मध्ये अंतर्गत एका दिशेने चालण्याचे , आत आणि बाहेर जाण्याच्या रांगा निश्चित कराव्या म्हणजे माणसे समोरासमोर येणार नाहीत.
 • रोज कामावर आल्यावर आपले वर्क स्टेशन म्हणजे आपला लॅपटॉप, कम्प्युटर , कि बोर्ड, इंटरकॉम हे सॅनीटायजर वाइप्स ने स्वच्छ करून घ्या.
 • साधा सर्दी खोकला असणाऱ्यांना शक्य असल्यास  वर्क फ्रॉम होमची सोय किंवा वेगळ्या विभागात बसून काम करण्याची पद्धत सुरु करावी लागेल म्हणजे इतरांचा त्यांच्याशी संपर्क येणार नाही.
 • जेवणाच्या सुट्टीची वेळ एकाच वेळी ठेवण्याऐवजी ती ही विभागून द्यावी लागेल.
 • ज्या ऑफिस मध्ये जास्त लोकांचा संपर्क येथे , उदाहरणार्थ बँक तिथे बाहेरून येणारे  आणि सेवा देणाऱ्यांना काचेने पूर्ण वेगळे करून दोघांना मल्टिप्लेक्स थेटरच्या तिकीट काऊन्टर  प्रमाणे माईक वर संवादाची सोय करावी.
 • बैठका घेताना सर्वांनी पुढे येऊन बसण्यापेक्षा सगळ्यांच्या खुर्च्या या भिंतीला टेकून म्हणजे शक्य तितक्या लांब ठेवाव्या
 • ऑफिस मध्ये कर्मचाऱ्यांच्या हाताचा संपर्क कमीत कमी यावा म्हणून हजेरी साठी फोनमधून कोड स्कॅन करणे , सेन्सर्स चा वापर करणे. तसेच ऑफिस मध्ये आणलेले अनावश्यक सामान बाहेरच ठेवाव
 • सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *