ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सध्या राज्यातील काही भाग हा ऑरेंज व ग्रीन झोन आला असला तरी या भागासाठी आता कोरोनाचा धोका १०० % टळला असे अनेकांना वाटते आहे. या विषयी आपला भाग अमुक अमुक झोन मध्ये आल्या बद्दल शुभेच्छा, अभिनंदनाच्या  इमेजेस ही समाज माध्यमांवर काही जणांनी प्रसारित केल्या. पण ऑरेंज म्हणजे गेल्या १४ दिवसात १५ केसेस पेक्षा कमी केसेस अढळल्या नाहीत आणी ग्रीन झोन म्हणजे गेल्या २८ दिवसात एक ही रुग्ण अढळला नाही एवढाच आहे. रुग्ण संख्या कमी असल्याने स्थानिक उद्योगांना चालना मिळावी म्हणून काही गोष्टींना परवानगी दिली आहे. पण याचा अर्थ इतर भागातून आत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीतून आपला कोरोना बाधिताशी संपर्क येणारच नाही म्हणून साजरीकरण करू नये व नियम धुडकावून लावू नये. या दोन्ही झोन मधील लोकांनी पुढील गोष्टी पाळाव्या –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! ज्या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी मिळतात, नित्य सेवा, खरेदी तिथेच कराव्या, गरज नसताना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये.
  • परवानगी असली तरी अनावश्यक प्रवास टाळावा.
  • कुठल्याही झोन मध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी आहे या सूक्ष्म गोष्टीचा विसर पडू देऊ नये.
  • परवानगी असली तरी गरज नसलेल्या गोष्टी, कपडे, चैनीच्या गोष्टी उगीचच ई कॉमर्सच्या माध्यमातून मागवू नये.
  • कुरिअर व पोस्ट सेवा ही सर्व झोन मध्ये सुरु झाल्या असल्या तरी उगीचच या सेवेचा लाभ घेऊ नये. अत्यावश्यक गोष्टींसाठीच याचा वापर करावा. कागदपत्रे उगीचच पोस्टाने पाठवू नये. त्यासाठी इ- मेलचाच वापर करावा.
  •  ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सोशल डीस्टन्सिंगच्या नियमाची सर्वात जास्त तुडवणूक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर होण्याची शक्यता आहे व अचानक या दुकानां भोवती मोठी गर्दी उसळते आहे. या साठी मद्य विक्रेत्यांनी स्वतःला शिस्त लावून सोशल डीस्टन्सिंग व दुकानांभोवती लोक एकमेकांपासून लांब उभे राहतील याची काळजी घ्यावी .
  •  कुठल्या ही झोन मध्ये असले तरी ताप, सर्दी, खोकल्याच्या व्यक्तीने घरा बाहेर निघायचे नाही आहे व स्वतःला कटाक्षाने इतरांपासून १४ दिवस लांब ठेव्याचे आहे.
  • डॉ. अमोल अन्नदाते

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

चाचणीचे निकष बदला

चाचणीचे निकष बदला महाराष्ट्रात करोना चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, यापलीकडे जात तपासणीचा गुणात्मक दर्जा कसा सुधारता येईल आणि तपासणीचे निकष सीमित असल्याने आपण निदान करण्यात कमी पडतो आहोत का, हे पाहायला हवे. याचे कारण उशिरा निदानामुळे मृत्यूचे प्रमाण खूप आहे. आमची तपासणी जास्त म्हणून केस जास्त, या युक्तिवादापेक्षा आपण कुठे सुधारणा करू शकतो, हे जाणून घेणे योग्य ठरेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

चाचणीचे निकष बदला सध्या मुंबई ही देशाची करोना राजधानी आहे; म्हणून मुंबईत करोना कसा रोखला जाईल, ही लिटमस टेस्ट असेल. करोनाचे ६९ टक्के रुग्ण लक्षणहीन असतात. तेच ‘सुपर स्प्रेडर’ म्हणजे, जास्त लोकांना व झपाट्याने संसर्ग देणारे ठरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या चाळणीत तपासणीचे निकष बदलले असल्याने हे रुग्ण निसटून जात आहेत. मुंबईमध्ये संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी न करता, ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसतात, त्यांचीच तपासणी होत आहे. यामुळे संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण की होम क्वारंटाइन, हा निर्णय घेण्याचा पायाच खिळखिळा झाला आहे. होम क्वारंटाइन हा प्रकार दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अपयशी ठरूनही, संपर्कात आलेल्या सर्वांना न तपासण्याची जोखीम का घेतली जाते? राज्यात वेगळाच प्रश्न आहे. तपासणीसाठी ‘सारी’ म्हणजे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास हा निकष शासकीय यंत्रणेत पाळला जातो आहे. आता करोनाचे रुग्ण या मर्यादित लक्षणांसह येत नाहीत. इतर विविध लक्षणे आढळणारे रुग्ण रुग्ण तपासणीसाठी शासकीय यंत्रणेत पाठवले, तर संशयिताच्या व्याख्येत बसत नाहीत, म्हणून सरकारी करोना तपासणी केंद्रात त्यांची तपासणी नाकारली जाते. त्या रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतरच्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळतात. यामुळेच संशयितांची तपासणी अधिक व्यापक करणे आवश्यक आहे. केसचे निदान हुकणे या घडीला अजिबात परवडणारे नाही. तपासणी व्यापक केल्यास ‘उशिरा निदान’ या मृत्यूच्या प्रमुख कारणाला अटकाव करता येईल.
संशयित ही व्याख्या कशी बदलते, हे काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल. महाडचे डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पहिला रुग्ण पाहिला. त्याला अनियंत्रित जुलाबांचा त्रास होता व बऱ्याच उशिरा श्वसनाचा त्रास झाला. या रुग्णाचा पुढे मृत्यू झाला. उपचाराला प्रतिसाद न देणारे अनियंत्रित जुलाब, हे नेहमीपेक्षा वेगळे लक्षण दिसल्याने, त्यांना तो रुग्ण करोना संशयित असल्याचे जाणवले. रुग्णाच्या पतीला फक्त भूक लागत नव्हती. पत्नीचा मृत्यू झाल्यावर तपासणी केली असता तोही करोनाग्रस्त आढळला. खारघरचे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांमधील थकवा येणे आणि सतत झोपेत राहणे, या दोन लक्षणांचे रुग्ण पुढे करोनाग्रस्त आढळू शकतात. संशयित रुग्ण ठरवताना, नातेवाइकांच्या मताला महत्त्व देणे आवश्यक आहे. नेहमी आजारी पडल्यास आपला नातेवाइक कसा असतो, कसा प्रतिसाद देतो, हे घरात माहीत असते. ‘आधी सर्दी-खोकला असताना इतका आजारी वाटायचा नाही आणि दोन दिवसांत झपाट्याने कोसळणारी तब्येत,’ हे नातेवाइकांचे मत तपासणी करण्यास पुरेसे आहे.

चाचणीचे निकष बदला कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे घ्राणशक्ती कमी झाल्याचे, करोनाचे पहिले लक्षण घेऊन रुग्ण येत आहेत. अर्धांगवायू व मेंदूशी संबंधित लक्षणे करोनामध्ये दिसत आहेत. हा नवा आजार आहे. ‘सारी’ हे सर्वाधिक आढळणारे लक्षण असले, तरी अशा एकाच पॅटर्नमध्ये करोना येणार नाही, हे सरकारने समजून घ्यायला हवे. ‘हाय क्लिनिकल सस्पिशन,’ म्हणजे ‘लक्षणांवरून संशय गडद होणे,’ हे डॉक्टरांचे मत तपासणी करताना ग्राह्य धरावे, असे शासनाला ठरवावे लागेल. करोना निदान झालेले रुग्ण पहिल्या दिवसापासून नेमकी कुठली लक्षणे घेऊन आले आहेत, याची माहिती संकलित करून, ती डॉक्टरांना उपलब्ध करून दिल्यास, करोना कसा वागतो आहे, या ज्ञानात भर पडून, त्याचे निदान लवकर होईल. एका अॅपद्वारे ही माहिती संकलित करून, डॉक्टरांना त्यांच्याकडील करोनारुग्ण कसा आला, हेही सांगण्याची सोय करता येईल.
तपासणी किती वेळा केली आहे, याबरोबर तपासणी कशी केली जाते आहे, यावर सध्या कुठलेही नियंत्रण नाही; म्हणून सुरुवातीला करोनामुक्त आलेले रुग्ण, नंतर मृत्युशय्येवर असताना करोनायुक्त आढळतात किंवा लक्षातही येत नाहीत. तपासणी करताना नाकातून द्राव घेतल्यास तो युक्त येण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे, तर घशातून घेतल्यास ३२ टक्के आहे. निदानाची शक्यता वाढविण्यासाठी हे दोन्ही द्राव घेणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरचे निर्देश आहेत; पण बऱ्याच ठिकाणी फक्त घशातून द्रावनमुना घेतला जातो आहे. हा ग्राउंड रिपोर्ट शासनापर्यंत पोहोचत नाही; त्यामुळे रुग्णांचा खरा आकडा समोर येत नाही. याचे कारण नाकातून स्वॅब घेताना, शिंक येण्याची शक्यता जास्त असते; म्हणून तो घेणाऱ्याला धोका वाढवतो. तुलनेने, घशातून स्वॅब घेणे सोपे आहे. स्वॅब घेणारे सुरक्षित राहावेत, यासाठी काचेच्या चेम्बरमधून स्वॅब घेण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. अजूनही ती शासनापर्यंत पोहोचलेली नाही. सध्या अनेक खासगी ठिकाणी तपासणी सुरू आहे. यात कुठल्याही नव्या व्यक्तीला जाहिरात देऊन स्वॅब घेण्यासाठी नेमले जाते आहे, म्हणून याची सुसूत्रता अधूनमधून तपासून पाहणे गरजेचे आहे. स्वॅब घेतल्यावर त्याची वाहतूक थंड डब्यातून होते का आणि तपासणी केंद्रात त्यांची तपासणी चार तासांत होते की नाही, याची दक्षता खासगी निदान केंद्रांनी घेणे गरजेचे आहे. तपासणी करतानाच्या प्रात्यक्षिकाचे केवळ चित्रण पाठवून भागणार नाही, तर त्याचे वारंवार प्रात्यक्षिक (मॉक) करून, तपासणीत काटेकोरपणा आणावा लागेल.

चाचणीचे निकष बदला शासकीय पातळीवर स्वॅब घेताना, रिपोर्ट येईपर्यंत सर्व संशयितांना एकाच कक्षात ठेवले जाते. त्यानंतर युक्त व मुक्त वेगळे केले जातात; पण तपासणी अहवाल येईपर्यंत, या दोन्हींचा संपर्क येऊन, या समूहातील करोना नसणाऱ्यांना संसर्गाचा धोका आपण वाढवत असल्याचे सूक्ष्म निरीक्षण लक्षात येत नाही. सर्वांचे तपासणी अहवाल एकाचवेळी येत असल्याने, निगेटिव्ह रुग्ण घरी जातात. निश्चित संपर्कामुळे ते पुढे लक्षणविरहीत करोना पसरवणारे ठरू शकतात; म्हणूनच तपासणी अहवाल येईपर्यंत या सर्वांचे आठ ते दहा तास विलगीकरण काटेकोरपणे, शक्यतो वेगळ्या खोल्यांमध्ये व संपर्कविरहीत असायला हवे. मुंबई आणि पुणे ही मोठी शहरे सोडून इतरत्र जागेचा प्रश्न फार कळीचा नाही. तेथे वेगळ्या खोल्या वापरल्या जाऊ शकतात. प्रत्येक पायरीवर तपासणी आणि केसचा शोध परिपूर्ण कसा करता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. या काही गोष्टी पाळल्यास करोनाविरोधातील लढ्यास त्या अतिशय उपयुक्त ठरतील.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको

नियमित बीसीजी सोडून घाई नको ज्या देशांमध्ये सार्वत्रिक बी.सी.जी लसीकरण अनेक वर्षांपासून केले गेले त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव इतर देशांच्या मानाने कमी प्रमाणात झाला असे एक निरीक्षण आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

नियमित बीसीजी सोडून घाई नको बीसीजी शरीरातील इनेट इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती बळकट करते व कोरोना टाळण्यास व झाला तरी शरीराला त्या विरुद्ध लढण्यास सक्षम बनवते  असा एक कयास आहे. त्यातूनच आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोनाचा थेट संपर्क आलेल्यांना बीसीजी लस द्यावी का असा एक विचार जगभरात पुढे आला. पण लॅन्सेट या वैद्यकीय मासिकात ३० एप्रिल रोजी कोरोना टाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी व इतरांना बीसीजी देण्याविषयी सतर्कतेचा इशारा दिला. तसेच या बद्दल अजून पुरेसा संशोधनात्मक पुरावा नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हे जाणून घेणे महत्वाचे यासाठी आहे कि माध्यमांमध्ये बीसीजी मुळे कोरोना टाळण्यास मदत होऊ शकण्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातमी आल्या असल्याने अनेक जन आम्ही ही लस परत घ्यावी का ? असे प्रश्न डॉक्टरांना विचारत आहेत. याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. नियमित बीसीजी सोडून घाई नको लहान मुलांना ही जन्माच्या वेळी लस दिलेलीच असते. त्यांना ही लस परत ज्ञाची गरज नाही. कोरोना टाळण्यासाठी जर बीसीजीने  काही फायदा व्हायचा असेलच तर तो जन्माच्या वेळी आपण सगळ्यांनी घेतलेल्या बीसीजीनेच होईल.  १९७८ पासून देशात सार्वत्रिक बीसीजी लसीकरण सुरु झाले. म्हणून त्या आधी जन्म झालेल्यांनी बीसीजी घेण्याची घाई करू नये. मात्र सध्या जन्मानंतर लहान मुलांना नियमित बीसीजी लसीकरण मात्र सुरु ठेवावे. सिद्ध झालेले नसताना उगीचच बीसीजी घेतल्याने त्याचा उपयोग होणार नाहीच व तुटवडा निर्माण होऊन नियमित लसीकरणासाठी बीसीजी उपलब्ध होणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम

कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम सध्या अनेक कंपन्यांचे हँड सॅनीटायझर उपलब्ध आहेत. तसेच जाहिरातीतून ९९.९ % हातावरील विषाणू व जीवाणू नष्ट करत असल्याचे दावे हे केले जात आहेत. पण इतक्या अचूकतेने असे दावे करणे चुकीचे आहे व कुठले ही सॅनिटायझर ९९ % विषाणू, जीवाणू नष्ट करेल हे खात्रीशीर रित्या सांगता येणार नाही. यासाठी साबणाने हात धुणे याला पर्याय नाही व हँड सॅनिटायझर ही केवळ एक लग्झरीआहे. सांगण्याचे तात्पर्य साबणाने हात धुण्याची जागा हँड सॅनिटायझर र घेऊ शकत नाही. पण पाण्याची उपलब्धता व बाहेर गेल्यावर हात धुण्याची सोय नसल्यास हँड सॅनिटायझर चांगला पर्याय ठरतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पैकी चांगला हँड सॅनिटायझर कुठला हे आपल्याला ओळखता आले पाहिजे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

       कुठले हँड सॅनिटायझर सर्वोत्तम अल्कोहोल हा हँड सॅनिटायझरचा मुख्य घटक असतो. पण कुठले व किती टक्के अल्कोहोल वापरेल आहे त्यावरून हँड सॅनिटायझरची उपयुक्तता सिध्द होते. साधारण तीन ते चार प्रकारचे व टक्केवारी मध्ये अल्कोहोल वापरेल जाते. प्रोपेनेलॉल, डी नेचर्ड अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, आयसो प्रोपील अल्कोहोल हे ते चार प्रकारचे अल्कोहोल असतात. त्यांची परीणामकारकता वरील नावे लिहिली आहेत  क्रमाने जास्त ते कमी अशी असते. यात ७५ % प्रोपेनेलॉल असलेले सर्वाधिक परिणामकारक असते. हे कोरोना साठीच नव्हे तर इतर सर्व विषाणू – जीवाणूला हा क्रम लागू पडतो. ज्या हँड सॅनिटायझर मध्ये प्रोपेनेलॉल सोबत मेसेट्रोनियम इथिल सल्फेट असते त्याची परिणाम कारकता सर्वाधिक वेळ म्हणजे ३ ते ५ तास टिकून राहते. सर्वात परिणामकारक हँड सॅनिटायझर वापरला तरी त्याचा परिणाम ४ ते ६ तासच राहतो. सध्या उपलब्ध असलेल्या जेल आणि पातळ हँड सॅनिटायझर पैकी पातळ हँड सॅनिटायझर जास्त परिणामकारक असतो कारण तो हातांच्या सूक्ष्म भेगां पर्यंत पोहोचू शकतो. जेलच्या स्वरूपातला मात्र त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर बनून राहतो. अनेकांना जास्त हँड सॅनिटायझरच्या वापरामुळे जास्त झोप येणे / गुंगल्या सारखे वाटणे हा त्रास होतो आहे. त्यातच डॉक्टरांना सध्या हँड सॅनिटायझर जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यासाठी हातावर हँड सॅनिटायझरचा घेताना एका बाजूला म्हणजे सॅनिटायझर समोर चेहरा येणार नाही असे बघाव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा मऊ लागले म्हणून कोपराने खणणे किंवा कोपरा पासून नमस्कार करणे म्हणी आपण नेहमी ऐकत आलो आहोत. पण कोरोनामुळे मात्र आता आपल्याला कोपराचा वापर अनिवार्य झाला आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे कोपराचा वापर करणे सुरु करावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा हात हे कोरोना आपल्या शरीरात प्रवेश करण्याचे मुख्य वाहन आहे. कोरोना फक्त कोरोना ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कानेच येतो असे नाही. अनेक वस्तूंवर कोरोना तीन दिवसांपर्यंत राहतो. पुढील तीन दिवसात कोरोना ग्रस्त माणसाच्या संपर्कात आलेल्या वस्तूने ही हा पसरू शकतो. पण याला आपला हात लागला नाही तर धोका नाही. म्हणून दार उघडणे, लाईट चालू / बंद करणे, लिफ्ट चे बटन दाबणे, नळ चालू करण्यासाठी त्यातच शौचालयाचा नळ चालू / बंद करण्यासाठी , खुर्ची सरकवणे, टेबला वरील एखादी गोष्ट सरकवणे, फ्रीज उघडणे / बंद करणे  यासाठी  कोपराचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय दिवसभर निरीक्षण करून जिथे जथे कोपराचा वापर करणे शक्य आहे तिथे करणे सुरु करावे. घरी आल्यावर किंवा दिवसातून तीन चार वेळा वाइप्स वर हँड सॅनीटायझर टाकून, त्याने कोपरा स्वच्छ करून घ्यावा. कोपरा प्रमाणेच करंगळी आणि त्यातच जो हात आपण सहसा वापरत नाही त्या करंगळीचा वापर करायला शिकव. आपल्या नॉन – डॉमिनंट ( जो जास्त वापरात येत नाही असा ) हाताची करंगळी आणी चेहऱ्याचा सगळ्यात कमी संपर्क येतो. त्यामुळे दार दांड्याला पूर्ण हात लावून ओढ्ण्यापेक्षा जास्त वापरत नसलेल्या  करंगळीने ओढा. तसेच फोन ची बटनेची बटने दाबण्यासाठी  किंवा कोपराने चालू बंद करणे शक्य नाही अशी उंची वरची बटने या करंगळी ने दाबा. याने कुठे हात लागला तरी त्याचा चेहऱ्याशी संपर्क येणार नाही. वापरात नसलेल्या हाताची करंगळी वापरल्याने अजून एक फायदा होईल. याने तुमचा वापरात असलेल्या हाताच्या बाजूचा मेंदू सक्रिय होईल व याचे मानसिक पातळीवर फायदे असतात.  अर्थात कुठून ही आल्यावर आणि हात लागल्यावर हात मात्र पूर्ण धुवावे. हात ऐवजी कोपराचा आणि करंगळीचा वापर करा आपल्या नॉन – डॉमिनंट ( जो जास्त वापरात येत नाही असा ) हाताची करंगळी आणी चेहऱ्याचा सगळ्यात कमी संपर्क येतो. त्यामुळे दार दांड्याला पूर्ण हात लावून ओढ्ण्यापेक्षा जास्त वापरत नसलेल्या  करंगळीने ओढा. तसेच फोन ची बटनेची बटने दाबण्यासाठी  किंवा कोपराने चालू बंद करणे शक्य नाही अशी उंची वरची बटने या करंगळी ने दाबा. याने कुठे हात लागला तरी त्याचा चेहऱ्याशी संपर्क येणार नाही. वापरात नसलेल्या हाताची करंगळी वापरल्याने अजून एक फायदा होईल. याने तुमचा वापरात असलेल्या हाताच्या बाजूचा मेंदू सक्रिय होईल व याचे मानसिक पातळीवर फायदे असतात.  अर्थात कुठून ही आल्यावर आणि हात लागल्यावर हात मात्र पूर्ण धुवावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन कोरोना संकट काळात लहान मुलांच्या मानसिकतेसंबंधी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या काळात आपली ही चिडचिड, मुलांना रागवणे स्वाभाविक आहे कारण मुले घरात फार काळ घरात राहिली कि बरेच उपदव्याप करतात . अशा वेळी त्यांना घरात बिनधास्त खेळू द्यावे. फक्त त्यांच्या सुरक्षिततेला धोका नसेल अशी काळजी घ्यावी व तेव्हाच रागवावे.
  • चुकून. मुलांना जास्त रागवण्यात आल्यास त्यांना लगेच जवळ घ्यावे व त्यांना तुम्ही का रागावले हे सांगून तीच गोष्ट परत शांतेत समजून सांगावी.
  • मुलांना सकारात्मक गोष्टी सांगाव्या व गोष्टींमध्ये कोरोनाचे संदर्भ टाळावे. रात्री झोपताना मुलांना झोप येत नसल्यास कोरोनाच्या नावाने घाबरवू नये.
  • मुलांना गोष्टी सांगायला लावून, चित्र काढायला लावून त्यांच्या मनात लपून राहिलेल्या भावना बाहेर येऊ द्या .
  •  मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकाच पालकावर टाकण्याऐवजी त्या दोघांमध्ये वाटून घ्या.
  • मुलाला भीती वाटत  असल्यास त्यांना जवळ घ्या व त्यांची भीती कमी करा.
  •  जर आपल्या सोसायटीत कोरोनाचा एक ही रुग्ण नसल्यास व कोणाच्या ही घरात सर्दी खोकल्याचा त्रास नसल्यास काही घरातील मुलांनी एकत्र येऊन खेळण्यास हरकत नाही.
  • या काळात मुलांना घरातील कामे, भांडी घासणे, सामान आणून देणे यात सहभागी करून घ्याव.

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या निमित्ताने आपण कुटुंब म्हणून जवळ आलो आहोत व मुलांच्या संपर्कात आलो आहोत तर विविध वयात मुलांच्या भावनिक गरजा काय असतात ते ही जाणून घेणे गरजेचे आहे

  • 0 – ५ वर्ष
  • मिठी मारणे व जवळ घेणे.
  • हसणे व त्यांच्या सोबत खेळणे.
  • प्रेम आणि काळजी
  • डोळ्यात बघणे व त्यांच्या लक्ष देणे कडे  
  • ६ – ९ वर्ष
  • त्यांच्याशी बोलणे व त्यांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकणे
  • त्यांच्या खेळत सहभागी होऊन आपण मजा घेतोय हे दाखवणे
  • त्यांच्या प्रश्नांना उत्तरे
  • त्यांच्या खेळत किंवा उपक्रमात सक्रीय सहभाग
  • १० – १२ वर्ष
  • आधार व मार्गदर्शन
  • प्रेरणा व त्यांच्या मतांना होकार
  • नियमांसाठी कारणे सांगावी लागतात
  • जबाबदारी देणे  आणी त्यांची मते न रागावता स्वीकारणे
  • १३ – १८ वर्ष
  • चर्चा व शांतेत वाद विवाद
  • दिशा देणे व
  • कडक नियम न सांगता सर्वमान्य मार्गदर्शक तत्व सांगणे
  • मान देणे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य देणे  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन कोरोनामुळे जसे आपले सर्वांचे आयुष्य बदलले आहे तसेच लहान मुलांचे ही आयुष्य बदलले आहे. शाळा बंद आहेत आणि खेळायला बाहेर, बागेत ही जाता येत नाही म्हणून मुलांची चिडचिड होते. एका मर्यादे पलीकडे त्यांना नियंत्रित करणे अवघड होऊन जाते. मुलांच्या खेळण्यात कोरोनाचा उल्लेख येऊ लागला आहे. मुल कोरोनाचे चित्र काढत आहेत. यामुळे लहान मुलांचे भावनिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी पुढील गोष्टी करूया –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन मुलांच्या या विषयी भावना ओळखणे किंवा त्या त्यांना बोलून दाखवण्यास प्रेरित करणे. ते बोलत असल्यास त्यांना न रोखणे
  • या भावना भीती, मृत्यूची भीती, मजा, उस्तूकता, चिडचिड , नैराश्य अशा संमिश्र आहेत
  • यासाठी जर मुलांनी माहिती विचारली तर कोरोना विषयी स्पष्ट व खरी माहिती सांगणे व आजार टाळण्याच्या उपायांची माहिती देणे
  • मुलांनी कोरोना विषयी विचारलेले प्रश्न टाळू नका किंवा “तुम्ही लहान आहात आणी यात पडू नका” असे त्यांना म्हणून त्यांचे प्रश्न  धुडकावून लावू नका
  • मुलांना सांगितलेली माहिती फार जास्त किंवा कमी नसावी. संतुलित असावी व आशादायी असावी
  • कोरोनाचा मृत्यू दर खूप जास्त आहे अशा गोष्टी मुलांना न सांगता, कोरोना पासून बचाव करणे अत्यावश्यक आहे कारण सर्वांसाठी ती चांगली नाही अशा सकारत्मक पद्धतीने माहिती सांगावी 
  • घरात परत परत या विषयी चर्चा करू नका
  • मुलांसोबत कोरोना संबंधित बातम्या फार वेळ बघू नका
  • सगळ्या कुटुंबाने सोबत करायच्या अशा काही गोष्टी आणि त्यांच्या वेळा ठरवा उदाहरणार्थ बुद्धीबळ , कॅरम, व्यायाम, घरात बॉल खेळणे
  • या काळात मुलांना स्क्रीन व मोबाईलच्या व्यसना पासून लांब ठेवा
  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन तुम्ही स्वतः जर निराश, चिंताग्रस्त,  चीडचीडे असाल तर मुलांवर त्याचा परिणाम होईल. म्हणून मुलांचे भावनिक अस्थर्य टाळण्यासाठी तुमचे भावनिक व्यवस्थापन ही महत्वाचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे नुकतेच सीडीसी ने कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर घातली आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • थंडी वाजून येणे
  • थंडी वाजून आल्याने वारंवार थर थर होणे
  • स्नायू दुखणे
  • डोके दुखणे
  • घशात खवखवणे
  • तोंडाची चव नाहीशी होणे
  • वास घेण्याची क्षमता कमी किंवा नाहीशी होणे

संसर्गाची नवी लक्षणे याशिवाय तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून इमर्जन्सी उपचार सुरु करण्याचे काही निकष ही सीडीसी ने संगीतले आहेत

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत सतत काही वेळ दुखणे / छातीवर दाब येणे
  • झोपेतून उठवून ही न उठणे किंवा नेहमी एवढे उठवले कि व्यक्ती लगेच उठून बसते पण आज तसे करत नाही आहे. झोपेतून उठवायला जास्त हलवावे,ओरडावे लागते आहे. भान न राहणे ,चक्कर येणे
  • चेहरा किंवा ओठ निळे पडणे

सीडीसिने सांगितलेली ही लक्षणे सोडून भारतातील डॉक्टरांना इतर ही काही लक्षणे आढळून येत आहेत –

  • ज्येष्ठ व्यक्ती सतत दिवस भर झोपेत राहणे
  • भूक पूर्ण नाहीशी होणे
  • अनियंत्रित जुलाब
  • तरुण व्यक्ती निस्तेज दिसणे
  • दोन दिवसात झपाट्याने  तब्येत खालावणे
  • सर्दी, खोकला झाल्यावर सहसा व्यक्ती कसा असतो , किती थकलेला असतो व कसा बरा होतो हा पॅटर्न घरातील व्यक्तींना माहित असतो. या वेळेला ताप , खोकला , सर्दी हि नेहमी सारखी वाटत नाही. नेहमी कुठल्या ही आजारा पेक्षा या वेळी जरा वेगळे आणी जास्त वाटते आहे . सुस्तपणा जास्त आहे. हे निरीक्षण नातेवाइकांच्या लक्षात येते. असे असल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवावे व सविस्तर सगळा वैद्यकीय इतिहास सांगावा
  • काहींना , ताप , खोकला व श्वास  घेण्यास त्रासासोबत अंगावर चट्टे ( रॅश ) ही येते आहे. हे गोवर किंवा कांजण्या सारखे अंगावर किंवा काहींना हात व पायांच्या बोटांवर ठिपक्यांसारखी रॅश येते आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने व अनेक जन घरून काम करत असल्याने रोजचा दिनक्रम व वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यात सर्वात मोठा फटका हा झोपेला बसला आहे. पुढील गोष्टींमुळे सध्या  झोपेवर परिणाम झाला आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • शारीरिक हालचालींमध्ये कमतरता
  • घरी असल्याने कामाच्या गतीवर परिणाम
  • स्क्रीन टाईम मध्ये वाढ
  • घरचे खाणे असल्याने जास्त जेवण
  • कोरोनाची भीती व सतत कोरोनाच्या बातम्या ऐकणे
  • आर्थिक अनिश्चिततेची काळजी
  • घरी असल्याने दुपारच्या झोपेत वाढ

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या आपले शरीर व झोप एका जैविक घड्याळावर चालत असते ज्याला सरकॅडीयन रिदम असे म्हणतात. अनेकांना उशिरा झोपून उशिरा उठण्याची सवय लागत चालली आहे. सध्या ही जैविक घड्याळच विचलित झाल्याने लॉकडाऊन संपल्यावर झोपेची समस्या जास्त प्रमाणात भेडसावू शकते. तसे होऊ नये म्हणून या संदर्भात आता पासूनच काळजी घेणे आवश्यक आहे.

  • घरी असलो तरी आपले उठण्याचे व झोपण्याचे वेळापत्रक निश्चित असले पाहिजे
  • शक्यतो लवकर कामावर जाणाऱ्यांनी सकाळी त्याच वेळेत उठण्याची सवय सोडू नये. ती सवय मोडली असेल तर प्रयत्नपूर्वक आधीच्या वेळा पाळण्यास सुरुवात करावी
  • रोज किमान तीस मिनिटांचा घाम निघेल असा शारीरिक व्यायाम घरात करणे गरजेचे आहे. यात दोरीवरच्या उड्या, छतावर जॉगिंग करणे, नाचणे, पुश अप्स , सूर्यनमस्कार असा कुठला ही व्यायाम घरात करावा
  • झोपताना १० ते १५ मिनिटे खोलवर श्वास घेणे किंवा श्वास घेताना पोट बाहेर येईल व सोडताना आत जाईल या पद्धतीने अॅबडॉमीनल ब्रीदिंगचा व्यायाम करावा
  • ६ नंतर शक्यतो चहा – कॉफी टाळावी
  • घरी असलात तरी रात्री ८ पर्यंत रात्रीचे जेवण करावे
  • झोपण्याआधी २ तास फोन, टीव्ही, संगणक, लॅपटॉपचा वापर थांबवून स्क्रीन संपर्क बंद करावा
  • झोपताना तळपायांना तिळाचे किंवा एरंडाचे तेल लावून झोपावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

How To Improve Immune System

How To Improve Immune System 10 most effective immunity boosters in day to day routine A most important factor in the fight against corona or any illness is Immunity. In this chronicle, Dr. Amol Annadate talks about 10 most effective lifestyle practices that are very simple to follow and help improve individual immunity. Watch these easy to adopt practices in daily routine to be strong healthy and safe in a vulnerable environment.

How To Improve Immune System कोरोना या किसी बीमारी के खिलाफ लड़ाई में सबसे महत्वपूर्ण बात इम्युनिटी है। इस विडिओ में डॉ अमोल अन्नदाते 10 सबसे प्रभावी जीवन शैली प्रथाओं के बारे में बात करते हैं जो व्यक्तिगत रोग प्रतिकार शक्ती में सुधार करने में मदद करने के लिए बहुत सरल हैं। कमजोर वातावरण में मजबूत स्वास्थ और सुरक्षित रहने के लिए दैनिक दिनचर्या में इन प्रथाओं को अपनाने के लिए जरूर देखे

https://youtu.be/0Yy5PbAsVzc

How To Improve Immune System कोरोना किंवा कोणत्याही आजाराविरूद्धच्या लढाईतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती. या विडिओ मध्ये डॉ. अमोल अन्नदाते 10 सर्वात प्रभावी जीवनशैली प्रथा बद्दल बोलतात ज्या अनुसरण करणे आणि वैयक्तिक रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. या असुरक्षित वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी दररोजच्या या पद्धती जाणून घ्या … नक्की पहा

For regular updates from Dr. Amol Annadate like announcements, youtube videos, and articles stay tunned.