कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी? कोरोनाची जोखीम वाढवणारे काही आजार / इतर घटक आहेत. पण हे नेमके तपासून जोखीम किती आहे हे ओळखण्यासाठी खालील तक्त्याचा उपयोग करता येईल –
जोखीम वाढवणारे घटक | मार्क |
वय ५० – ५९ वर्षे | १ |
वय ६० च्या पुढे | २ |
पुरुष | १ |
गरोदर असल्यास | १ |
ह्रदयाचा आजार – उच्च रक्तदाब / ह्रदयाचे ठोके अनियमित असणे – एट्रीयल फिब्रीलेशन / हार्ट फेल्यर /आधी ह्र्दय विकाराचा झटका आलेला असणे / अर्धांगवायू / तात्कालिक मेंदूला रक्त प्रवाह कमी झाल्याचा पूर्व इतिहास ( ट्रांन्झीयंट इशेमिक अॅटॅक) | १ |
मधुमेह टाईप १ व २ | १ |
दीर्घकालीन फुफ्फुसाचे आजार ( दमा / सीओपीडी / इंटरस्टीशियल लंग डिसीज ) | १ |
दीर्घकालीन किडनीचे आजार / डायालिसीस चालू असणे ( कुठलीही स्टेज ) | १ |
सिकल सेल / थॅलॅसीमिया / इतर तत्सम रक्ताचे आजार | १ |
लठ्ठपणा – बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त / पोटाचा घेर पुरुष – ९० सेमी , स्त्रिया – ८८ सेमी पेक्षा जास्त असणे. | १ |
कॅन्सर | १ |
एकूण मार्क |
- 0- ३ – जोखीम आहे पण कमी
- ४ – ६ – जास्त जोखीम
- ७ पेक्षा जास्त – खूप जास्त जोखीम
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
टीप –
- कोरोना होण्याची जोखीम कशी तपासावी? वरील तक्ता देशातील ६ महिन्याच्या साथीच्या अभ्यासावरून काढला आहे व पुढे यात बदल होऊ शकतील.
- जे यात बसत नाहीत त्यांना जोखीम नाहीच असे समजण्याचा कारण नाही व त्यांनी ही प्रतिबंधक उपाय वापरायचे आहेतच.
- जोखीम आहे हे घाबरण्यासाठी नाही तर अधिक काळजी घेण्यासाठी व सावध होण्यासाठी आहे.
- जोखीम असली तरी कमी करता येण्यासारखे व नियंत्रित करता येण्यासारखे आजार नियंत्रित केले तर जोखीम कमी होते.
- गरोदर असणे जोखीम वाढवणारे असले तरी या काळात गर्भधारणेस हरकत नाही.
- वरील जोखीम वाढवणारे घटक नाही म्हणजे कोरोना होणारच नाही असे नाही.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता