झटके आणि औषधोपचार

झटके आणि औषधोपचार झटक्यांचे निदान झाल्यावर त्यावर त्याचा प्रकार बघून योग्य औषध सुरू करावे लागते. गोळ्या सुरू झाल्यावर पालकाला एक डायरी करावी लागते. सुरुवातीला उपचार ठरलेल्या डोसपासून सुरू करूनही झटके येत असल्यास डोस वाढवावा लागतो किंवा एकापेक्षा जास्त झटक्यांचे औषध सुरू करावे लागते. बालरोगतज्ज्ञ किंवा लहान मुलांचे झटक्याचे तज्ज्ञाच्या (पिडीयाट्रीक न्यूरॉलोजीस्टच्या) सल्ल्याने उपचार पूर्ण केल्यास झटके पूर्ण बरे होतात.

उपचार किती काळ घ्यावे लागतात
सहसा उपचार २ वर्ष झटके बंद होईपर्यंत घ्यावे लागतात. काही झटक्यांच्या प्रकारामध्ये २ वर्षांपेक्षा जास्त काळ औषधे देण्याची गरज पडू शकते. औषधे अचानक बंद करता येत नाही. हळूहळू बंद करावी लागतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

उपचार न घेण्याची मुख्य कारणे

  • अनेकदा उपचार सुरू केल्यावर झटके बंद होतात. ते बंद झाल्याने पुढे उपचारांची गरज नाही असे पालकांना वाटते व उपचार थांबविले जातात. काही काळानंतर परत झटके येतात. म्हणून आपल्या डॉक्टरांच्या परवानगी शिवाय झटक्यांची औषधे बंद करू नये. 
  • काही पालक औषधांचे दुष्परिणाम होतील या भीतीने औषधे बंद करतात. 

औषधांच्या दुष्परिणामांचे काय?
आता झटक्याची नवी औषधे आहेत त्यांचे दुष्परिणाम खूपच तुरळक आहेत. काही  दुष्परिणाम जाणवले, तर औषध बदलून देता येते. म्हणून साइट इफेक्टपेक्षा इफेक्ट महत्त्वाचा मानून दुष्परिणामांना घाबरू नये. दुष्परिणामांपेक्षा झटके आल्यास ते जास्त घातक ठरू शकतात. 

मुलांनी काय काळजी घ्यावी

  • झटके येत असलेल्या मुलांनी पाणी, उंची, आग यांपासून सावध राहावे. कारण अशा गोष्टींच्या जवळ असताना झटके आल्यास ते घातक ठरू शकते. 
  • अशा मुलांनी सहसा पोहणे टाळावे, नॉर्मल मैदानी खेळ ते खेळू शकतात. 
  • झटके येत असल्याची माहिती शाळेत द्यावी. शाळेत झटके आल्यास काय करायचे व कुठल्या क्रमांकावर फोन करायचा ही माहिती दिलेली असावी.
  • अशा मुलांनी रात्री उशिरा जास्त वेळ टीव्ही, फोन बघणे किंवा जास्त वेळ व्हिडिओ गेम खेळणे टाळावे. 

झटक्यांसाठी शस्त्रक्रिया
झटके आणि औषधोपचार झटक्यांसाठी शस्त्रक्रियेचा पर्याय असला तरी प्रत्येकाला शस्त्रक्रियाची गरज नसते. काही विशिष्ट प्रकारचे झटके आणि त्यातच मेंदूच्या विशिष्ट भागातून झटक्यांच्या लहरी येत असल्यासच करता येते. कुठल्याही झटक्यांना शस्त्रक्रिया करता येत नाही व यात विशेष प्रशिक्षण घेतलेले न्यूरोसर्जन अनेक गोष्टी बघून शस्त्रक्रियेला लायक रुग्ण निवडतात. बहुतांश झटके औषधोपचाराने बरे होतात.

गैरसमज – झटके आल्यावर कानात चांदी, लोखंडाची बाळी घालणे हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसते. हा गैरसमज असून औषधोपचाराशिवाय कोणत्याही इतर उपायांनी झटके कमी होत नाहीत.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *