बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे

बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे भारतात लहान मुलांमध्ये कोरोना अगदी सौम्य स्वरूपाचा असून घातक नसला तरी काही ठिकाणी कावासाकी या आजारासारखी लक्षणे कोरोना संसर्गाच्या ३ ते ४ आठवड्यांनंतर दिसून आली आहेत.

कावासाकी डीसिज् काय आहे?
कावासाकी हा ५ वर्षाखालील मुलांना होणारा व रक्तवाहिन्या, हृदयावर परिणाम करणारा आजार आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनामध्ये नेमके काय होते ?
कोरोनामध्ये कावासाकी डीसिज होत नाही पण त्या आजारासारखी लक्षणे येतात आणि या आजाराप्रमाणे काही काळासाठी हृदयाभोवती सूज येऊन उपचारांची गरज पडू शकते. याचे प्रमाण खूप कमी म्हणजे १ लाखात १ असले तरी हे लवकरात लवकर ओळखता आले आणि त्वरित उपचार सुरु करता आले तर त्याचा फायदा होतो व गुंतागुंत टळते. म्हणून हे सर्र्वाना माहित असणे आवश्यक आहे.

कोरोनामध्ये कावासाकी सदृश्य आजार नेमका कधी होतो ?
हा आजार कोरोना संसर्ग सुरु असताना नव्हे तर कोरोना संपून गेल्यावर तीन ते ४ आठवड्यांनंतर होतो.

कोरोनानंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची लक्षणे काय ?
बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे ताप, अंगावर लालसर चट्टे, चिडचिड करणे, अस्वस्थ वाटणे ही कोरोना नंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची मुख्य लक्षणे आहेत. मुलाला कोरोना संसर्ग झाल्यावर ३ ते ४ आठवड्यांनंतर ही लक्षणे आली तर त्वरित आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. कोरोना संसर्ग नसेल व घरातील कोरोना संसर्गित व्यक्तीशी संपर्क आला व ही लक्षणे आली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाबरून जाऊ नये. हा आजार कावासाकी नसून कावासाकीसारखा आहे, म्हणून मुलांवर कोरोना संसर्गानंतर लक्ष ठेवावे. याचे प्रमाण खूप कमी आहे व झाले तरी यावरउपचार करता येतात म्हणून मुळीच घाबरून जाऊ नये

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *