सक्तीने नको, मना पासून गोड बोला


Dr. Amol Annadate Articles in Lokmat on Sankranti

वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते.

तिळगुळ घेऊन गोड बोलण्याचा कोणी आग्रह केला कि एखादा रोख ठोक व्यक्ती विचारतो मी तुझ्याशी कधी कडू बोललो ? .कुठून बुद्धी सुचली आणी  याला गोड बोलण्याचा आग्रह केला अशी परिस्थिती होते. पण समोरचा आपला बिचारा निरागसपणे आठवून बघत असेल कि खरच मी याच्याशी कधी कडू बोललो. पण आपल्याला ही शक्यता लक्षात येत नाही. गुड आणि गोड न बोलण्याचे बर्याच वेळा हेच कारण असते कि इतरां बद्दल आपल्या मनात बरेच भ्रम असतात. आज काही तरी कारण असताना किव्हा ज्याला आपण प्रोफेशनल असा हल्ली गोंडस शब्द वापरतो, अशा कारणांनी आपल्याला सक्तीने गोड बोलावेच लागते . मी पहिल्यांदा विमान प्रवास केला तेव्हा हवाई सुंदरी कडे सहज बघितले तरी ती उगीचच हसायची , काही मागीतले कि खूपच हसून गोड बोलायची. शेवटी न राहवून मी तिला विचारले कि आपली ओळख आहे का ? ती नाही म्हंटली. मग तिला विचारले तू एवढे गोड का बोलते आहेस माझ्याशी. ती उत्तरली सर त्याचेच आम्हाला पैसे मिळतात . ते माझे कामच आहे. असे सगळ्यांनाच गोड बोलण्याचे शासकीय अनुदान मिळाले असते तर किती बरे झाले असते ना?  पण काही कारण नसताना , एखाद्या कडे कुठलाही स्वार्थ नसताना गोड बोलण्यात खरे आव्हान असते. आज मात्र गोड बोलण्याची परिस्थिती काय आहे याची गम्मत कवी अशोक नायगावकर त्यांच्या कार्यक्रमात सांगत असतात . नायगावकर सांगतात तिळगुळ देताना म्हणे एका ठिकाणी मारामारी झाली … गोड बोलायला कोणाला शिकवता ? अशी आजची गोड बोलण्याविषयी परिस्थिती आहे.

                       वैद्यकीय क्षेत्रात गोड बोलण्याला खूप महत्व आहे. बर्याचदा रुग्ण, त्यांचे नातेवाईक वैतागलेले असतात. असे म्हणतात कि डॉक्टरच्या बोलण्याने अर्धा आजार बरा होतो. पण त्याच वेळी डॉक्टर ही नातेवाईकांमध्ये त्याला समजून घेणारा गोड बोलणारा कोणीतरी शोधत असतो. मला प्रॅक्टिस सुरु करताना एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले – तुला काही आले नाही तरी चालेल पण तुला गोड बोलता आले पाहिजे . पण एकाच महिन्यात एका रुग्णाने सांगितले सर तुम्ही नवीन प्रॅक्टिस सुरु केली आहे – माझा अनुभव सांगतो, गोड बोलणारा डॉक्टर म्हणजे फसवणारा. मला नेमके काय करावे ते कळेना . पण काहीही झाले तरी गोड आणी गुड बोलण्याने आपले आरोग्य चांगले राहते. एवढा एक स्वार्थी हेतू ही गोड बोलण्यास पुरेसा आहे. पण चला तब्येतीचे जाऊ द्या गोड बोलण्याने आपल्याला बरे वाटते. गोड बोलण्या साठी एवढे कारण ही पुरेसे नाही का ?

This was one of the Dr. Amol Annadate Articles published in Lokmat. For more articles you can browse the Articles Tab.

amolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *