एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार?

एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार? सध्या रुग्णालयांसह सगळी कडे एन ९५ मास्क चा तुटवडा आहे. पण जर तुमच्या कडे ५ एन ९५ मास्क असतील तर तुम्ही घरच्या घरी निर्जंतुकीकरण करून एका व्यक्ती साठी वारंवार वापरू शकता. अनेक डॉक्टर ही अशा प्रकारे मास्क वापरत आहेत. हे पुढील प्रमाणे करता येईल-

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  •  एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार? ५ मास्क ला १ ते ५ असे नंबर द्यावे.
  •  गॅलरी मध्ये / मोकळ्या हवेत  ४ कागदी पिशव्या दोरीला लटकवून ठेवा व त्यांना १ ते ४ नंबर द्या.
  • शक्यतो जिथे या पिशव्या लटकवलेल्या असतील तिथे फार धूळ नसेल असे बघा.
  • पहिल्या दिवशी मास्क वापरून झाल्यावर तो १ नंबरच्या पिशवीत टाका , दुसऱ्या दिवशी नवीन मास्क वापरा व वापरून झाल्यावर  २ नंबर च्या पिशवीत टाका  अशा प्रकारे चौथा दिवस येईल तेव्हा  पाचवा मास्क वापरा व तो वापरून झाल्यावर १ नंबर च्या पिशवीत टाका व १ नंबरच्या पिशवीतील मास्क वापरा .
  • याचा अर्थ एक मास्क घातलेला असेल व चार सदैव पिशवीत असतील.
  • मोकळ्या वाऱ्यात मास्क ७२ तासात निर्जंतुक होतो यासाठी त्याला दिवस ( एक दिवस अधिक ) वापरण्या आधी मिळतो आहे.
  • या मास्कचा सूर्य प्रकाशाशी संबंध येऊ देऊ नका. कारण सूर्य प्रकाशात एन ९५ मास्क ची उपयुक्तता नष्ट होते.

 एन-९५ मास्क निर्जंतुक करून कसे वापरणार? जर मास्क एकच असेल तरी तो घरी निर्जंतुक करता येतो पण याची प्रक्रिया जरा किचकट व करायला अवघड आहे. यासाठी स्वयंपाक घरातील ओव्हनचा वापर केला जाऊ शकतो. ओव्हन मध्ये इतर कुठे ही मेटल शी मास्कचा संपर्क न येता , लाकडी क्लिपच्या सहाय्याने ती लटकवून ठेवावी. ओव्हन बंद करून ७० डीग्री तापमानावर ३० मिनिटे ओव्हन चालू ठेवावे. एवढा वेळ व तापमान एन ९५ मास्क ला निर्जंतुक करण्यास पुरेसा आहे. यासाठी प्लास्टिकची क्लिप वापरू नये.

( निर्जंतुकीकरणाच्या या दोन्ही पद्धती फक्त एन ९५ मास्क साठीच आहेत व कापडी, सर्जिकल व इतर मास्क साठी नाहीत याची नोंद घ्यावी )

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *