मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी

मधुमेह रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी मधुमेह असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते . त्यामुळे मधुमेह असलेल्यांना कोरोना चा धोका किंवा कोरोना झाल्यास गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अशा रुग्णांनी सर्वप्रथम आपली साखर नियंत्रणात आहे का या साठी नियमित साखर तपासली पाहिजे. सध्या रक्त तपासण्यासाठी लॅब मध्ये जाऊ नये. घरीच ग्लुकोमीटरने तपासणी करावी. जर इन्सुलिन घेत असाल तर आठवड्यातून २ वेळा आणि गोळ्या चालू असल्यास व साखर नियंत्रणात असल्यास पंधरा दिवसातून एकदा तपासणी करावी. त्यासाठी साखरेची तपासणी कधी करू नये.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मधुमेह, रक्तदाब रुग्णांना कोरोना विषयी काळजी. सकाळी उपाशी पोटी व जेवल्यावर दोन  तासाने तपासणी करावी . उपाशी पोटी साखर – ९० ते १३० व जेवणा नंतरची १४० – १७० या रेंज मध्ये असावी याची काळजी घ्यावी . तसेच मागील तीन महिन्यांची साखरेची पटली दाखवणारे एचबी ए १ सी हे तीन महिन्यातून एकदा केले नसेल तर करावे. ते ७ च्या आसपास असावी. सध्या घरात असल्याने व्यायाम कमी झाल्याने मधुमेही रुग्णांची साखर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी काही लोक सकाळी बाहेर जाऊन  चालण्याची  सवय टाळेबंदी मध्ये तशीच चालू ठेवली आहे .

कृपया अशा मधुमेही रुग्णांनी फिरायला बाहेर जाऊ नये. त्यासाठी घरातच किंवा छतावर जाऊन चालण्याची सवय सोडू नये. तसेच नियमित औषधांचा डोस नियमित घ्यावा . रुग्णांनी आठवड्यातून एकदा ५०० mg विटामिन सी पुढील २ महिने घेण्यास हरकत नाही तसेच शक्य असल्यास विटामिन डी ६०,०००० IU आठवड्यातून एकदा ८ आठवडे घेण्यास हरकत नाही. घरतील समान आणण्यास घरातील मधुमेही रुग्ण सोडून इतरांनीच  बाहेर  जावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

COVID-19 कोरोना भीतीचा मानसिक आजार

कोरोना भीतीचा मानसिक आजार सध्या अनेकांना मला कोरोना होईल का? किंवा कोरोना ने माझा मृत्यू तर होणार नाही ना? या भीतीने ग्रासले आहे. काही प्रमाणात या भावना मनात येणे नॉर्मल आहे. म्हणून थोड्या फार प्रमाणात असे विचार मनात असल्यास मुळीच काळजी करण्याचे कारण नाही. पण हे विचार वारंवार येणे व आपल्या दैनंदिन आयुष्यावर याचा परिणाम होणे मात्र आपण ओळखायला हवे . आपल्याला पुढील लक्षणे आहेत का हे तपासून पाहा –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • जास्त वेळा / सतत  कोरोना विषयी मनात विचार येणे व मृत्यूची भीती वाटणे.
  • यामुळे चिडचिड होणे किंवा एकदम शांत होणे किंवा नेहमी पेक्षा कमी बोलणे.
  • जेवण व झोप कमी होणे.
  • आपल्या प्रियजनांची , कुटुंबाचे काय होईल ही सतत काळजी सतावने.
  • बातम्या किंवा टी.व्ही. मधून कोरोना विषयी जास्त माहिती मिळवण्याचा सतत प्रयत्न करणे.
  • कोणीही भेटले किंवा फोन आला तरी फक्त कोरोनाची व त्या भीती विषयी चर्चा करणे.

यावर उपाय काय

  •  कोरोना भीतीचा मानसिक आजार यासाठी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कि मला खूप काळजी करून भयभीत व्हायचे किंवा मी मुळीच काळजी करणार नाही , जे व्हायचे होऊ दे – या दोन्हीचा मध्यबिंदू काढून विचार करणे गरजेचे आहे.
  • यासाठी हो , प्रत्येकाला कोरोना होण्याची शक्यता आहे याचा स्वीकार करणे व यासाठी माझ्या हातात काय आहे हे स्वतःला विचारणे.
  • हातात असलेल्या हा आजार टाळण्यासाठीचे उपाय जाणून त्याचे पालन करणे.
  • जर झोपेवर व जेवणावर जास्त परिणाम होत असेल तर मानसोपचारतज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • कोरोना विषयी सध्या काय सुरु आहे याची दिवसातून एखाद दोन वेळा माहिती घ्यावी पण दिवसभर सतत त्याच बातम्या बघत बसू नये .

भावनिक हाताळणीच्या पलीकडे..

भावनिक हाताळणीच्या पलीकडे सध्या शक्य असलेला असा एक मार्ग आहे- संसर्ग होऊनही लक्षणे न आलेल्या व सौम्य लक्षणे येऊन प्रतिकारशक्ती आलेल्यांची संख्या काढणे. सार्वत्रिक, जागतिक साथीच्या या काळात नेतृत्वाने आपल्याला भावनिक आधारर नक्कीच दिला; पण सार्वत्रिक भीती टाळण्यासाठी अनेक शक्यता पडताळून पाहता आल्या असत्या. त्यांची चर्चा करणारे टिपण..

सध्या करोनाच्या उपाययोजनेसाठी साथसोवळे (सोशल डिस्टन्सिंग), टाळेबंदी (लॉकडाऊन), विभक्तीकरण (आयसोलेशन), विलगीकरण (क्वारंटाइन), पंतप्रधान वा मुख्यमंत्र्यांची भावनिक आवाहने, कुणालाही मोबाइल संभाषणापूर्वी ऐकू येणारा ध्वनिमुद्रित संदेश आणि सर्वसामान्यांना नेत्यांनी केलेले फोन अशा गोष्टींभोवती देशात नियोजन फिरते आहे. पण यात साथरोगशास्त्राच्या (एपिडेमॉलॉजीच्या) मूलभूत संकल्पना समजून न घेतल्याने प्रत्येक पातळीवर नियोजनाचा मोठा गोंधळ उडालेला दिसतो आहे. काय करायला हवे होते, काय करता येते आहे आणि प्राप्त परिस्थितीत काय करता येईल या गोष्टी उच्च-सर्वोच्च पदांवरील धोरणकर्त्यांपासून देशातील सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाने समजून घेतल्या, तर करोना या जटिल बनून राहिलेल्या शब्दाभोवतीचा गुंता सुटसुटीत होईल.


डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख
वाचा

करोनाच्या साखळीमध्ये चार महत्त्वाचे घटक आहेत. पहिला ‘अ’ – जो परदेशातून थेट संसर्गित होऊन भारतात आला. दुसरा ‘ब’ – ज्याचा ‘अ’शी थेट संपर्क आला, तिसरा ‘क’ – ज्याचा ‘अ’ आणि ‘ब’शी संपर्क आला, पण त्याला ते माहिती नाही; तर चौथा ‘ड’ (जो आज बहुसंख्य आहे) – ज्याचा अद्यापपर्यंत वरीलपैकी कोणाशीही संपर्क आलेला नाही, पण करोना होऊन मृत्यू होईल का, या भीतीच्या सावटाखाली ते आहेत.

सध्या सगळ्या उपाययोजना या ‘परदेशात काय झाले, तसे आपल्याकडे होईल का’ या भीतीभोवती आणि इतरांनी केलेल्या उपाययोजनांचे अनुकरण यावर आधारलेल्या आहेत. त्याही तळागाळापर्यंत नीट पोहोचलेल्या नसल्याने आरोग्य खात्यात गोंधळ उडालेला नसेल तरच नवल.

मुळात करोनाच्या उपाययोजनांच्या सुरुवातीला उडालेल्या गोंधळामुळे हजारो भारतीय परदेशांतून १५ मार्चपर्यंत (राज्यातील लॉकडाऊनच्याही आधी) आले, त्यांना विलगीकरणाच्या पुरेशा सूचना देण्यात आल्या नाहीत. यापैकी काही ‘अ’ असू शकतात, त्यांच्या दिल्ली/ मुंबई-पुणे या ‘ग्राऊंड झिरो’वरून इतर भागात झालेल्या प्रवासामुळे आता जवळपास पंधरवडय़ानंतर या साखळीतील ‘क’ नेमके कोण आहेत व किती ‘ड’चा इतरांशी संपर्क येऊन तेही ‘क’ झाले आहेत हे कोणालाही कळायला मार्ग नाही. या साखळीतील ‘अ’ला परदेशातून आल्यावर विलगीकरण केले असते तर पहिल्या पायरीवर आजार रोखणे सहज शक्य झाले असते. पण अमेरिका व अन्य प्रगत देशांतून आलेल्यांच्या तपासण्याच सौम्य ठेवण्यात आल्या आणि पळवाट शोधण्यात आली सोयीचे ‘घरीच विलगीकरण’. केंद्र व राज्य सरकार याविषयी गाफील राहिल्याने ‘क’ – ज्यांचा करोनाबाधितांशी संपर्क आला आहे, पण त्यांना माहीत नाही- अशांची संख्या खूप आहे. हा झाला एक मुद्दा.

भावनिक हाताळणीच्या पलीकडे दुसरा मुद्दा ‘सामूहिक प्रतिकारशक्ती’चा. खरे तर साथ सुरू झाल्यापासून इतक्या लोकांचे परदेश, देश, राज्यांतर्गत स्थलांतर झाले आहे, की त्यामुळे टाळेबंदी, साथसोवळे यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. हे शोधण्यासाठी सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणजे काय ते समजून घेणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग झाला तरी ३० टक्के लोकांना काहीच लक्षणे न येता संसर्ग झाल्याच्या चौथ्या दिवशी त्यांना प्रतिकारशक्ती येते व लक्षणे नसूनही हा वर्ग इतरांना १४ दिवस संसर्ग करत राहतो. ५५ टक्के लोकांमध्ये साधी लक्षणे येतात व दहाव्या दिवशी त्यांना प्रतिकारशक्ती येते. हे लोकदेखील २० दिवसांच्या कालावधीत, इतरांना संसर्ग करत राहतात. चौथ्या वा दहाव्या दिवशी प्रतिकारशक्ती आलेले हे दोन भाग्यवान ठरलेले घटक इतरांना जेव्हा संसर्गित करतात तेव्हा त्यांची प्रतिकारशक्तीसुद्धा ते यासोबत वाटत असतात. अशी प्रतिकारशक्तीयुक्त करोना होऊन गेलेल्या लोकांची संख्या किती आहे हे आज कोणालाही माहीत नाही आणि हे सहज शक्य आहे की, यापैकी तुम्ही असू शकता. हे अतक्र्य वाटेल, पण आपल्याकडील कमी चाचणी (टेस्टिंग) क्षमतेमुळे एक हजार रुग्ण हा आकडा कदाचित ‘हिमनगाचे टोक’ असू शकतो. १३८ कोटी लोकसंख्येत फक्त ५८६ चाचण्या रोज करून बाधितांचा व मृतांचा खरा आकडा कळणे शक्यच नाही. हा खरा आकडा हवा असल्यास देशभर चाचणी करण्याची क्षमता युद्धपातळीवर वाढवावी लागणार आहे. भारतीय वैद्यकशास्त्र संशोधन परिषदेने (‘आयसीएमआर’ने) १७ मार्च रोजीच, श्वसनाच्या खालच्या मार्गाचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग असल्याची तक्रार करणाऱ्या प्रत्येकाच्या चाचणीचे निर्देश दिलेले आहेत. मात्र अशा प्रत्येकाची तपासणी शासकीय/ खासगी रुग्णालयात होते कुठे आहे? कारण रोज अनेक कारणांनी येणाऱ्या या रुग्णांची तपासणी करायची ठरवले तरीही, देशाची सध्याची (२९ मार्चपर्यंत) सरासरी चाचणी क्षमता आहे ५८६ चाचण्या दररोज. या दराने व कमी किटच्या संख्येमुळे ते शक्यच नाही. यामुळे उर्वरित १५ टक्के- ज्यांना तीव्र स्वरूपाचा त्रास होऊन मृत्यूचा खरा धोका आहे- त्या सर्वाच्या पूर्ण चाचण्या होतातच असे नाही. मग यातून मार्ग कसा काढायचा?

भावनिक हाताळणीच्या पलीकडे सध्या शक्य असलेला असा एक मार्ग आहे- संसर्ग होऊनही लक्षणे न आलेल्या व सौम्य लक्षणे येऊन प्रतिकारशक्ती आलेल्यांची संख्या काढणे. हा प्रयोग केवळ संशयित वा बाधित नव्हे, तर देशातील १३८ कोटी लोकसंख्येसाठी करावा लागेल, कारण यापैकी अनेक जण ‘नकळत बरे झालेले’देखील असतील. अशा अभ्यासासाठी चाचण्या आणि सांख्यिकीतील ‘ठिकठिकाणी ३० जणांचे नमुना सर्वेक्षण’ पद्धत या दोहोंवर आधारित प्रारूप वापरावे लागेल. ‘३० क्लस्टर सॅम्पिलग’ अर्थात निवडक ३०-३० जणांच्या गटाची तपासणी करून अगदी आठवडय़ाभरात हा अभ्यास पूर्ण होईल. यासाठी देशातील अगदी निवडक व अत्यंत कमी लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांच्या शरीरातील करोनाविरोधी अँटिबॉडीज म्हणजे प्रतिकारशक्ती दर्शवणाऱ्या पेशी दोन वेळा मोजायच्या. प्रतिकारशक्ती आलेली ही संख्या मोठी निघाली तर ‘लॉकडाऊन’पासून आपली निर्णायक सुटका होईल आणि गरिबांच्या पोटापाण्याचे, स्थलांतराचे प्रश्नही निकाली निघतील. सारेच देश आज आतुरतेने करोना लसीची वाट पाहतो आहे. पण ही लस चीन वा अमेरिकेतून आलीच, तरी सध्या असलेला करोना पुढे ‘प्रगत’ होणार असल्याने वर्षभरानंतर उपयोगाची नसणारच. याउलट, देशात नैसर्गिक प्रतिकारशक्ती आलेल्यांचे थेट पुरावे हातात असल्यास लसीवरील काही हजार कोटींचा खर्च व जनसामान्यांची तगमग मिटवता येईल, असे समाजवैद्यकशास्त्र विषयातील तज्ज्ञ (माजी प्राध्यापक) डॉ. अशोक काळे यांचेही मत दिसून येते.

भावनिक हाताळणीच्या पलीकडे साथींचा अभ्यास अगदी १४ व्या शतकापासून केला तरी तो हेच सांगतो की, साथ सुरुवातीच्या काळात काही बळी घेऊन स्थिर होते. म्हणजे त्या आजाराचे रुग्ण सुरूच राहतात, पण ती स्थिर व सौम्य होते व मृत्यूचे प्रमाण कमी होते. याचे कारण लोकसंख्येत ‘सामूहिक प्रतिकारशक्ती’ निर्माण होते. प्रश्न हा आहे की, ही प्रतिकारशक्ती किती बळी घेऊन निर्माण होणार आहे. यासाठीच, साथीचे पहिले चार महिने महत्त्वाचे असतात. करोनाबद्दल बोलायचे, तर परत ‘अ’ आणि ‘ब’ या दोन घटकांकडे येऊ. ‘अ’ची निश्चित माहिती आहे व ही संख्या १५ लाख इतकी आहे. यापैकी बहुतेकांना ‘होम क्वारंटाइन’चे शिक्के मारून आपण सोडून दिले. यापैकी बरेच जण आठ ते १० दिवसांपूर्वी भारतात आले आहेत. तसेच हे ज्यांच्या संपर्कात आले किंवा अजूनही येत आहेत अशांच्या संपर्कात आलेले सारे जण शोधले तर (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले तर), या दोन घटकांतील ज्यांना ताप येतो त्यांना विभक्तीकरण व इतर सर्वाना विलगीकरण (घरी नव्हे) अद्यापही शक्य आहे. परंतु हे आपण करीत नाही, कारण यापैकी लक्षणे आलेले रुग्ण हे शेवटच्या स्टेजला चाचणीसाठी येतात व उपचार सुरू करून प्रवासाचा इतिहास कळल्यावर ‘टेस्ट’ होते व ती ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर अख्खा डॉक्टरांचा चमूच ‘घरी विलगीकरणा’साठी पाठवला जातो. किमान हे १५ लाख प्रवासी व त्यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा, त्यांना पहिले लक्षण आले की ‘टेस्ट’ करून लगेच विलगीकरणाचे ‘विभक्तीकरणा’मध्ये रूपांतर यासाठी अत्यंत वेगाने हलणारी व प्रत्येक मिनिटाला जागरूक असणारी यंत्रणा अपेक्षित आहे, पण ती कुठेही नजरेस पडत नाही.

अखेरचा मुद्दा एवढाच की, पहिल्या रुग्णाचे निदान होऊन दोन महिने होत आले तरी डॉक्टरांकडे अजून ही वैयक्तिक सुरक्षेचे कवच (पीपीई किट) उपलब्ध नाहीत. हजारो कोटींचा निधी जाहीर होतो आहे, पण या गोष्टी अनुपलब्धच. या स्थितीत, डॉक्टर व रुग्णालय हे संसर्ग करणारी मोठी केंद्रे ठरू शकतात.

वरील लिखाणात व्यक्त केलेल्या किंवा गृहीत धरलेल्या शक्यता, सुचविलेले मार्ग कुणाला भीतीदायक वाटू शकतात; परंतु भावनिक न होता वैद्यकीयदृष्टय़ा परिस्थितीची हाताळणी करावी, हा त्यामागील हेतू आहे. भावनिक आधार देशाला गरजेचा असला तरी त्यापलीकडे अशी विज्ञानाची कास धरून बरेच काही करण्याचे अजून राहिले आहे.

सदरील माहिती आपण लोकसत्ता मध्येही वाचू शकता

COVID-19 मोबाईल फोनची स्वच्छता

COVID-19 मोबाईल फोनची स्वच्छता कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी मोबाईल फोनची योग्य पद्धतीने स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. मोबाईल फोनची स्वछता पुढीलप्रमाणे करावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख

1. कोरोना पसरवण्यासाठी आपला मोबाईल कारणीभूत ठरू शकतो. 2. शक्यतो बाहेर जाताना मोबाईल सोबत घेऊन जाऊ नये. 3. शक्यतो आपला मोबाईल आपणच वापरावा. 4. घरी कोणी बाहेरून इतर व्यक्ती आली असल्यास त्यांना मोबाईल देऊ नये. 5. COVID-19 मोबाईल फोनची स्वच्छता करताना शक्यतो मोबाईल कव्हर किंवा केस सध्या वापरू नका कारण त्याने विषाणू जमा होण्यासाठी सरफेस वाढतो. 6. बाजारात मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारचे अँटिबॅक्टेरिअल लिक्विड मिळतात पण या साठी साधा घरगुती हँड सॅनीटायझर किंवा सर्जिकल स्पिरीट वापरण्यास ही हरकत नाही.

7. अँटिबॅक्टेरिअल मायक्रो फायबर कापडावर हे हँड सॅनीटायझर / स्पिरीट घ्या. 8. मोबाईल स्वच्छ करण्यासाठी अँटिबॅक्टेरिअल लिक्विड वापरत असल्यास स्प्रे बॉटलमधूनदेखील या लिक्विडचा वापर तुम्ही करू शकता. मात्र ते थेट मोबाईलवर स्प्रे करण्याऐवजी कापडावर घ्या. 9. या कापडाने तुमचा मोबाईल फोन स्वच्छ पुसून घ्या. लिक्विडचे प्रमाण अधिक घेऊ नका ज्यामुळे तुमचा मोबाईल जास्त ओला होणार नाही. 10. फोन व्यवस्थित कोरडा होईपर्यंत तो पुसून घ्या. 11. दिवसातून दोनदा तुमचा फोन नीट स्वच्छ करून मगच त्याचा वापर करा. 12. मोबाईल स्वच्छ केल्यावर हात धुवायला विसरू नका. 13. या काळात शक्यतो मुलांना मोबाईल पासून लांब ठेवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी

हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी कोरोनाची साथ सुरु असताना डॉक्टर कडे जावे की जाऊ नये. या विषयी स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने रुग्ण गोंधळून गेले आहेत. यासाठी पुढील मार्गदर्शक तत्व लक्षात घ्यावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१. साधे आजार असतील तर शक्यतो आपल्या डॉक्टरला फोन वर संपर्क करावा व आपली लक्षणे सांगावी. २. सध्या महाराष्ट्र मेडिकल काऊन्सील ने फोन वर औषधे देण्याची परवानगी दिली आहे. म्हणून जर लक्षणे साधी असली आणि डॉक्टरांना वाटले की हा आपोआप बरा होणारा आजार आहे तर ते फोन वर प्रिस्क्रिप्शन देतील. ३. जर त्रास जास्त असेल तर डॉक्टरांची वेळ घेऊन त्यांच्याकडे जावे. ४. डॉक्टर कडे जाताना कमीत कमी लोकांनी सोबत जावे. ५. जर सर्दी, खोकला किंवा श्वसन संबंधित कुठला ही त्रास असेल तर तोंडावर मास्क लावून हॉस्पिटल मध्ये जावे. ६. हॉस्पिटलच्या आत जाताना हात धुण्याची व्यवस्था असेल तर हात धुवा किंवा हँड सॅनीटायजर चा वापर करा. ७. डॉक्टरांच्या केबिन मध्ये जाताना शक्यतो आजारी व्यक्तीनेच आत जावे.

८. हॉस्पिटल मध्ये जाताना घ्यावयाची काळजी डॉक्टरशी बोलताना ही सोशल डीस्टन्सिंग म्हणजे १ मीटर पेक्षा जास्त अंतरावरून माहिती सांगावी. ९. डॉक्टर तपासणी करत असताना चेहरा डॉक्टर उभे आहेत त्याच्या दुसऱ्या बाजूला वळवून ठेवावा. १०. डॉक्टर तपासत असताना खोकला आल्यास लांब होऊन किंवा आपल्या बाजू वर खोकला करा. ११. हॉस्पिटल मध्ये कुठल्या गोष्टीला फार हात लावू नका. १२. हॉस्पिटल मधून घरी गेल्यावर परत हात धुवावे. १३. या काळात सहज भेटायला म्हणून हॉस्पिटल ला जाऊ नये. १४. दाखल असलेल्या रूग्णा सोबत ही कमी नातेवाईकांनी थांबावे. १५. गरोदर महिला यांनी निर्मित प्रसूती पूर्व तपासणी काही त्रास नसल्यास लांबणीवर टाकावी. १६. लहान मुलांचे लसीकरण सध्या काही काळ लांबणीवर टाकावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या कोरोना नोटांमुळे पसरतो की नाही या विषयी विवाद असेल तरी जागतिक आरोग्य संघटनेने या विषयी इशारा दिला आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या वस्तू वर काही तास राहते म्हणून नोटांमधून संसर्ग होऊ शकतो. यासाठी काही सोपे मार्ग आहेत. जिथे शक्य आहे तिथे सरळ कॅशलेस व्यवहार करायचा. हे शक्य नसेल आणी नोटा हाताळाव्याच लागल्या तर त्या दुसऱ्या कडून प्लास्टिक च्या एखाद्या छोट्या बॅग मध्ये हात न लावता स्वीकारायचे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

COVID-19 नोटा कश्या हाताळायच्या किराणा व्यापारी, भाजी विक्रेते ज्यांना रोज खूप नोटा हाताळाव्या लागतात त्यांनीस सरळ ग्लोज वापरावे. इतर कमी प्रमाणात रोज ची घरगुती कॅश हाताळणाऱ्यांसाठी एक पर्याय आहे. घरी आल्यावर ग्लोज घालावे, त्यावर असेल तर थोडा हँड सॅनीटायझर घ्यावा. आणि इस्त्री ने नोटांना दोन्ही बाजूने इस्त्री करून घ्यावी. कोरोना विषाणू ५६ डिग्री सेल्सियस च्या वर जिवंत राहत नाही आणि इस्त्रीचे तापमान त्या पेक्षा जास्त असते. नंतर या नोटा घरात कोणीही हाताळल्या तरी काही प्रोब्लेम नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

क्वारंटाइन न समजल्याने घात

क्वारंटाइन न समजल्याने घात कोरोना ची साथ महाराष्ट्रात प्रवेश करून आता २ महिने होऊन गेले तरी अजून साथ शास्रातील, इपिडीमीऑलोजीतील काही मुलभूत व्याख्या धोरण आखणी करणारे शासन, प्रशासन आणि सर्व सामान्य समजून घेण्यास तयार नाही हा वैद्यकीय अज्ञानाचा कळस आहे. या साठी सर्व प्रथम क्वारंटाइनचा इतिहास आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ. चौदाव्या शतकात प्लेग ची साथ आली व जेव्हा बहुतांश प्रवास हा जहाजाने व्हायचा तेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जहाजाने येणाऱ्या प्रवाशांना ४० दिवस वेगळे व एकत्र ठेवून त्यांची राहण्या, जेवणाची सोय केली जायची. ४० ला ग्रीक मध्ये quaranta giorni म्हणतात म्हणून क्वारंटाइन. ४० दिवस का तर प्लेग सह इतर सर्व आजार बाधित व्यक्ती पासून होण्यास किमान १ व कमाल ४० दिवस लागतात म्हणून तो पर्यंत या प्रवाशांपैकी कोणाला लक्षणे आली तर उपचारार्थ पुढे त्याला वेगळे ठेवून उपचार करता यायचे व तसेच इतर देशातील आजार पसरायचे नाही. चौदाव्या शतकात आजारांचे उपचार, औषधे अजून विकसित झालेले नव्हते. म्हणून आजार आपल्या देशात येऊ न देणे हाच मुख्य उपाय होता. पुढे एखाद्या प्रांतात हा आजार झाला तर इतर प्रांता साठी व त्या पुढे गावासाठी ही क्वारंटाइन ही संकल्पना रुजली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१८७८ ची यलो फिवर व एकोणिसाव्या शतकातली कोलेरा ची साथ रोखण्यात गांभीर्याने राबवलेल्या क्वारंटाइनचा मोठा वाटा होता. पुढे तर अनेक देशात ही साथ सुरु असे पर्यंत क्वारंटाइनच्या सुरक्षेच्या जबाबदारी साठी पोलिसांची वेगळी तुकडीच निर्माण करण्यात आली. पण चौदाव्या शतकात जे कळले ते आज कोरोना या निश्चित उपचार नसलेल्या व जगभर थैमान घालत असलेल्या आजारा विषयी आपल्याला कळेनासे झाले आहे. इतर देशात जिथे अर्धे देशच्या देश शासकीय क्वारंटाइन मध्ये ठेवून काळजी घेण्यात आली तिथे आधी पासूनच हे आपल्याला शक्यच नाही म्हणून हात टेकले व होम क्वारंटाइन ही संकल्पना आपल्या सोयीसाठी आपण जन्माला घातली. खर तर होम क्वारंटाइन हा शब्दच एक विरोधाभासी शब्द आहे. होम क्वारंटाइन हा शब्द रागीट, शांत गृहस्थ किंवा विवाहित लिव्ह इन जोडपे या सारखा आहे. जो व्यक्ती बाधित देशातून आला आहे त्याला वेगळे ठेवण्यासाठी आपण ” जा तुझ्या घरी तू वेगळा राहा ” असा हातावर शिक्का मारून सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत आपण परत पाठवतो या सारखा दुसरा विनोद या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासात घडणार नाही. क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे बरे होम क्वारंटाइन मध्ये नेमके काय करायचे आहे या विषयी नेमकी माहिती आपण संबंधित व्यक्तीला देतो आहे का ? या व्यक्तीचे घर कशाने पुसायचे हे ही ठरलेले आहे. तरच कदाचित ही होम क्वारंटाइनची संकल्पना काही प्रमाणात यशस्वी होऊ शकली असती. त्या पलीकडे ज्या लोकशाहीला एवढ्या वर्षात शिस्त लागू शकली नाही, तिथे एक स्वस्थ व्यक्ती स्वतःला एका खोलीत चौदा दिवस कोंडून घेईल ही अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे. होम क्वारंटाइन पाळला जातोय का यासाठी सिंगापूर सारखी लक्ष ठेवणारी सक्षम व्हिजिलन्स आपल्या कडे आहे का ? मुंबई सारख्या ठिकाणी काही प्रमाणात ती सुरु झाली आहे पण ती ही सदोष आणि जुजबीच आहे. हातावर शिक्का दिसल्यास पोलिसांना फोन करा एवढ्या वर विषय संपायला ही काही रात्री वाजणाऱ्या डी जे एवढी साधी गोष्ट आपल्याला वाटते आहे का? याची परिणीती अशी झाली कि विद्यापीठांचे कुलगुरू, कॉलेजेस चे अधीक्षक,आय.ए.एस अधिकारी अशा शिक्षित उच्चभ्रू लोकांनी कोण कुठला होम क्वारंटाइन म्हणून ही संकल्पना धुडकावून लावली. पुण्यात होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्यांनी मुलांचे वाढदिवस गर्दी बोलवून साजरे केले . या पुढे ग्रामीण निम्न शिख्सित लोकांकडून तरी काय अपेक्षा करता येईल ? झाले ही तसेच . सांगली, इस्लामपूर मध्ये तर परदेश व धार्मिक स्थळांवरून आलेल्या काहींनी जेवणावळी दिल्या आणि आज पुणे, मुंबई, नागपूर नंतर सांगली, इस्लामपूर च्या रूपाने कोरोनाची नवी राजधानी निर्माण होताना दिसते आहे.

खरेतर अजून ही वेळ गेलेली नाही. आज घडीला ११ हजार लोकांना होम क्वारंटाइनचे हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून आपण एक प्रकारे कोरोना पसरवण्याचे लायसन्सच दिले आहे क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे . साडेबारा कोटी लोकसंख्येच्या राज्याला ११ हजार लोकांना वेगळे ठेवून त्यांची १४ दिवस व्यवस्था ठेवणे एवढे अवघड आहे का ? खरे तर सव्वाशे कोटीच्या देशात परदेशातून येणाऱ्या सगळ्यांना जानेवारी , फेब्रुवरी महिन्यात शिस्तबद्ध क्वारंटाइन केले असते तर आज आपण जगा पुढे एक उदाहरण घालून दिले असते. पण अजून ही महाराष्ट्राला ही संधी आहे. प्रत्येक जिल्ह्यात १०८ शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, शासकीय विश्राम गृहे, धार्मिक तीर्थ क्षेत्रांचे भक्त निवास अशा किती तरी वास्तू सहज उपलब्ध होतील. यांच्या आहार व्यवस्थेसाठी शासनाकडे पैसे नसतील तर स्वयंसेवी संस्था पुढे येतील. लाखांच्या सभांचे उत्तम नियोजन करणारे राजकीय पक्ष सत्तेत असताना इथे त्यांचे नियोजन कौशल्य का दिसत नाही. एवढ्या मोठ्या राज्यात हे शक्य व प्रॅक्टीकल नाही अशी उत्तरे दिली जात आहेत.

क्वारंटाइन मधील व्यक्तीला कुठली ही लक्षणे नसतात. त्याचा फक्त कोरोना बाधित देशात प्रवास झालेला असतो किंवा सध्या देशातील कोरोना ग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क आलेला असतो. कोरोना चा संपर्क येऊन त्याचा संसर्ग होतो पण काहीच लक्षणे दिसत नाहीत असा हा कोरोना पसरवणारा छुपा घटक या साखळीत सगळ्यात महत्वाचा असतो. कोरोना ग्रस्तांची संख्या सांखिक पद्धतीने ( exponentially ) म्हणजे एकाचे चार, सोळा, बत्तीस अशी झपाट्याने वाढवण्यासाठी कोरोना पोझीटीव नव्हे तर हा कोरोना असून ही लक्षणे नसल्याने समजून न येणारा घटक जबाबदार असतो. कारण कोरोना निश्चित निदान झालेला आयसोलेशन मध्ये असतो. एकीकडे हा घटक आपण क्वारंटाइन मोडीत काढत समाजात कोरोना पसरवण्यासाठी मोकळे सोडत आहोत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करून कोरोना बाधित व्यक्तीचा शोध ही आपण घेत नाही आहोत. या पुढे जाऊन कॉन्टॅक्ट म्हणजे थेट संपर्कात आलेले आणि कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आलेले अशी सगळी साखळी एक केस सापडल्यावर शोधावी लागते.

आपण मात्र अजून ही कमी टेस्टिंग मुळे कोरोना चे आपले आकडे त्या मानाने कमी आहेत या आनंदात स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. हे सर्व कॉन्टॅक्ट शोधण्याची प्रक्रिया करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असायला हवी . ही सगळी प्रक्रिया केवळ पुढील एक महिन्यासाठी राबवायची आहे. सध्या लॉक डाऊन मुळे तशी ती सोपी ही आहे. पण ही यंत्रणेला थकवणारी असल्याने होम क्वारंटाइनची फसवी पळवाट शासनाने स्वीकारलेली दिसते आहे. एक तर शासकीय इमारती आरोग्य खात्याने अधिग्रहीत करून तातडीने होम क्वारंटाइन मोडीत काढून थेट क्वारंटाइन सुरु करावे. किंवा किमान सिंगापूर प्रमाणे होम क्वारंटाइन मध्ये प्रत्येका ला थोड्या थोड्या वेळाने मेसेज करून त्याचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करणे, त्यांच्या घरी भेटी देऊन ते घरी आहेत का याची चाचपणी करणे व होम क्वारंटाइन चे नियम मोडल्यास स्पेन मध्ये ३०,००० डॉलर चा दंड आहे तसा दंड आकारणे अशा गोष्टी तरी कराव्या. क्वारंटाइन किंवा कडक नियमांचे होम क्वारंटाइन या दोन्ही पैकी काही ही न केल्यास पुढे आपल्या देशाचा एका साथीने कसा घात केला हा इतिहास भावी पिढी साठी तेवढा उरेल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

COVID- 19 घर कसे स्वच्छ करावे

COVID -19 घर कसे स्वच्छ करावे ज्यांना क्वारंटाइन चा सल्ला देण्यात आला आहे व सांगितलेला नसला तरी कोरोना चा कॅरीअर असलेली व्यक्ती घरात येऊन गेली किंवा असे सामान घरात आले असेल तर कोरोना चा धोका टाळण्यासाठी घर कसे स्वच्छ करावे हे समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

COVID -19 घर कसे स्वच्छ करावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेली गोष्ट म्हणजे १% सोडियम हायपोक्लोराईट आपण स्वच्छतेसाठी वापरायला हवे. आपल्याला घरगुती ब्लिचिंग सोल्युशन कुठे ही सहज उपलब्ध होऊ शकते. ५% सोडियम हायपोक्लोराईट असते. त्यामुळे हे ब्लिचिंग सोल्युशन १:९ यासोबत स्वच्छ पाण्यासोबत मिसळावे. म्हणजे १ लिटर ब्लिचिंग सोल्युशन घेतले तर ९ लिटर पाणी घ्यावे. हातात साधे प्लास्टिकचे ग्लोज घालावे. स्वच्छ कपडा या पाण्यात बुडवून त्याने घर व इतर समान पुसून घ्यावे. इतर कोणी येत नसेल तर एक दोन तीन दिवसातून एकदा केले तरी चालेल. घर या पाण्याने स्वच्छ करत असताना डोळ्यांना गॉगल किवा चष्मा घालावा कारण या पाण्याने डोळे व त्वचेला त्रास होऊ शकतो. शक्यतो ब्लिचिंग सोल्युशन व पाण्याचे मिश्रण बनवताना ते प्लास्टिक च्या भांड्यात बनवावे .


सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे

कोरोना व्हायरस ची सविस्तर लक्षणे

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढील लक्षणे कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे आहेत . पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी – थोडे थकल्या सारखे वाटेल तिसऱ्या दिवशी – ताप, थोडा खोकला आणि घशात खाजवल्या सारखे वाटणे किंवा खवखवणे. चौथ्या दिवशी – डोकेदुखी पाचव्या दिवशी – पोटाशी निगडीत लक्षणे , पोट दुखी , क्वचित जुलाब , खोकला थोडा वाढेल, ताप तेवढाच राहील किंवा वाढेल. सहाव्या, सातव्या दिवशी – अंगदुखी , थकवा वाढेल, डोकेदुखी कमी होईल, पोटाच्या तक्रारी राहतील, भूक कमी होईल. आठव्या , नवव्या दिवशी – सगळी लक्षणे ताप , अंगदुखी कमी होईल , खोकला मात्र तसाच राहील किंवा वाढू ही शकतो पण आठव्या किंवा नवव्या दिवशी मात्र जर त्रास वाढला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मात्र इथे उपचारांची किंवा लक्ष ठेवण्याची. तसेच तपासणी करण्याची ही गरज वरील लक्षणांसोबत त्यातच सातव्या दिवशी नंतर किंवा या लक्षणांमध्ये कुठे ही ताप वाढत गेला किंवा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल तरच आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी

कलम १४४ संसर्ग रोखण्यासाठी काळजी

कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी –

१. जीवनावश्यक वस्तू आणायला बाहेर जाण्यापेक्षा ते १० घरांनी एक यादी करून एकाच प्रतिनिधी ने त्या वस्तू आणाव्या. २. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला नसावा. ३. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने सामान आणायला गेल्यावर १ मीटर पेक्षा जास्त अंतरावरून बोलावे व व्यवहार करावा. ४. नोटा, नाणी, पैसे हे अशा वेळी संसर्गाची महत्वाची वाहन असतात . म्हणून दुकानात पैसे देऊन झाल्यावर लगेचच हात धुवून घ्यावे. ५. परत घरात येताना घरा बाहेरच हात, पाय धुवूनच घरात यावे.

https://www.youtube.com/watch?v=YHBY4FWQTrw
Effective Hand Washing Techniques by Dr. Amol Annadate

६. बाहेर जाल तेव्हा शक्यतो इकडे तिकडे हात अनावश्यक हात लावणे टाळावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

७. या काळात कुठल्याही औषधाचा साठा करू नये कारण औषधे उपलब्ध राहणार आहेत. ८. बाहेरून आल्यावर आपला मोबाईल स्पिरीट / हँड व कापसाचा वापर करून स्वच्छ करावा. ९. बाहेर जाण्यासाठीचे कपडे शक्यतो वेगळे ठेवावे आणी बाहेर जाऊन आले कि आल्या आल्या पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवावे. १०. फक्त जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांनी व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच बाहेर पडावे, इतर कुठल्या ही कारणाने बाहेर पडू नये. ११. जीवनावश्यक सेवेतील ताप, खोकला असणाऱ्यांनी बाहेर पडू नये. १२. कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी आपल्या सोसायटीत किंवा शेजारी कोणी एकटे वृध्द व्यक्ती राहात असतील व त्यांच्या कडे येणारे स्वयंपाकी व इतर सेवा देणारे येणार नसतील तर त्यांची काळजी घ्या व त्यांना तब्येतीचा त्रास असल्यास मदत करा.

Watch Amol Annadate Interviews on CoronaVirus Prevention and Care

https://www.youtube.com/playlist?list=PL9bO6h-fFoNgMdrfWBGtXtP0uLD3KC5yl
Amol Annadate’s videos on CORONAVIRUS Disease in India COVID-19