कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन कोरोना संकट काळात लहान मुलांच्या मानसिकतेसंबंधी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या काळात आपली ही चिडचिड, मुलांना रागवणे स्वाभाविक आहे कारण मुले घरात फार काळ घरात राहिली कि बरेच उपदव्याप करतात . अशा वेळी त्यांना घरात बिनधास्त खेळू द्यावे. फक्त त्यांच्या सुरक्षिततेला धोका नसेल अशी काळजी घ्यावी व तेव्हाच रागवावे.
  • चुकून. मुलांना जास्त रागवण्यात आल्यास त्यांना लगेच जवळ घ्यावे व त्यांना तुम्ही का रागावले हे सांगून तीच गोष्ट परत शांतेत समजून सांगावी.
  • मुलांना सकारात्मक गोष्टी सांगाव्या व गोष्टींमध्ये कोरोनाचे संदर्भ टाळावे. रात्री झोपताना मुलांना झोप येत नसल्यास कोरोनाच्या नावाने घाबरवू नये.
  • मुलांना गोष्टी सांगायला लावून, चित्र काढायला लावून त्यांच्या मनात लपून राहिलेल्या भावना बाहेर येऊ द्या .
  •  मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकाच पालकावर टाकण्याऐवजी त्या दोघांमध्ये वाटून घ्या.
  • मुलाला भीती वाटत  असल्यास त्यांना जवळ घ्या व त्यांची भीती कमी करा.
  •  जर आपल्या सोसायटीत कोरोनाचा एक ही रुग्ण नसल्यास व कोणाच्या ही घरात सर्दी खोकल्याचा त्रास नसल्यास काही घरातील मुलांनी एकत्र येऊन खेळण्यास हरकत नाही.
  • या काळात मुलांना घरातील कामे, भांडी घासणे, सामान आणून देणे यात सहभागी करून घ्याव.

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन या निमित्ताने आपण कुटुंब म्हणून जवळ आलो आहोत व मुलांच्या संपर्कात आलो आहोत तर विविध वयात मुलांच्या भावनिक गरजा काय असतात ते ही जाणून घेणे गरजेचे आहे

  • 0 – ५ वर्ष
  • मिठी मारणे व जवळ घेणे.
  • हसणे व त्यांच्या सोबत खेळणे.
  • प्रेम आणि काळजी
  • डोळ्यात बघणे व त्यांच्या लक्ष देणे कडे  
  • ६ – ९ वर्ष
  • त्यांच्याशी बोलणे व त्यांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकणे
  • त्यांच्या खेळत सहभागी होऊन आपण मजा घेतोय हे दाखवणे
  • त्यांच्या प्रश्नांना उत्तरे
  • त्यांच्या खेळत किंवा उपक्रमात सक्रीय सहभाग
  • १० – १२ वर्ष
  • आधार व मार्गदर्शन
  • प्रेरणा व त्यांच्या मतांना होकार
  • नियमांसाठी कारणे सांगावी लागतात
  • जबाबदारी देणे  आणी त्यांची मते न रागावता स्वीकारणे
  • १३ – १८ वर्ष
  • चर्चा व शांतेत वाद विवाद
  • दिशा देणे व
  • कडक नियम न सांगता सर्वमान्य मार्गदर्शक तत्व सांगणे
  • मान देणे व मत मांडण्याचे स्वातंत्र्य देणे  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन

कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन कोरोनामुळे जसे आपले सर्वांचे आयुष्य बदलले आहे तसेच लहान मुलांचे ही आयुष्य बदलले आहे. शाळा बंद आहेत आणि खेळायला बाहेर, बागेत ही जाता येत नाही म्हणून मुलांची चिडचिड होते. एका मर्यादे पलीकडे त्यांना नियंत्रित करणे अवघड होऊन जाते. मुलांच्या खेळण्यात कोरोनाचा उल्लेख येऊ लागला आहे. मुल कोरोनाचे चित्र काढत आहेत. यामुळे लहान मुलांचे भावनिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी पुढील गोष्टी करूया –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन मुलांच्या या विषयी भावना ओळखणे किंवा त्या त्यांना बोलून दाखवण्यास प्रेरित करणे. ते बोलत असल्यास त्यांना न रोखणे
  • या भावना भीती, मृत्यूची भीती, मजा, उस्तूकता, चिडचिड , नैराश्य अशा संमिश्र आहेत
  • यासाठी जर मुलांनी माहिती विचारली तर कोरोना विषयी स्पष्ट व खरी माहिती सांगणे व आजार टाळण्याच्या उपायांची माहिती देणे
  • मुलांनी कोरोना विषयी विचारलेले प्रश्न टाळू नका किंवा “तुम्ही लहान आहात आणी यात पडू नका” असे त्यांना म्हणून त्यांचे प्रश्न  धुडकावून लावू नका
  • मुलांना सांगितलेली माहिती फार जास्त किंवा कमी नसावी. संतुलित असावी व आशादायी असावी
  • कोरोनाचा मृत्यू दर खूप जास्त आहे अशा गोष्टी मुलांना न सांगता, कोरोना पासून बचाव करणे अत्यावश्यक आहे कारण सर्वांसाठी ती चांगली नाही अशा सकारत्मक पद्धतीने माहिती सांगावी 
  • घरात परत परत या विषयी चर्चा करू नका
  • मुलांसोबत कोरोना संबंधित बातम्या फार वेळ बघू नका
  • सगळ्या कुटुंबाने सोबत करायच्या अशा काही गोष्टी आणि त्यांच्या वेळा ठरवा उदाहरणार्थ बुद्धीबळ , कॅरम, व्यायाम, घरात बॉल खेळणे
  • या काळात मुलांना स्क्रीन व मोबाईलच्या व्यसना पासून लांब ठेवा
  • कोरोनामध्ये मुलांचे भावनिक व्यवस्थापन तुम्ही स्वतः जर निराश, चिंताग्रस्त,  चीडचीडे असाल तर मुलांवर त्याचा परिणाम होईल. म्हणून मुलांचे भावनिक अस्थर्य टाळण्यासाठी तुमचे भावनिक व्यवस्थापन ही महत्वाचे आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे

संसर्गाची नवी लक्षणे नुकतेच सीडीसी ने कोरोनाच्या लक्षणांमध्ये भर घातली आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • थंडी वाजून येणे
  • थंडी वाजून आल्याने वारंवार थर थर होणे
  • स्नायू दुखणे
  • डोके दुखणे
  • घशात खवखवणे
  • तोंडाची चव नाहीशी होणे
  • वास घेण्याची क्षमता कमी किंवा नाहीशी होणे

संसर्गाची नवी लक्षणे याशिवाय तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून इमर्जन्सी उपचार सुरु करण्याचे काही निकष ही सीडीसी ने संगीतले आहेत

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत सतत काही वेळ दुखणे / छातीवर दाब येणे
  • झोपेतून उठवून ही न उठणे किंवा नेहमी एवढे उठवले कि व्यक्ती लगेच उठून बसते पण आज तसे करत नाही आहे. झोपेतून उठवायला जास्त हलवावे,ओरडावे लागते आहे. भान न राहणे ,चक्कर येणे
  • चेहरा किंवा ओठ निळे पडणे

सीडीसिने सांगितलेली ही लक्षणे सोडून भारतातील डॉक्टरांना इतर ही काही लक्षणे आढळून येत आहेत –

  • ज्येष्ठ व्यक्ती सतत दिवस भर झोपेत राहणे
  • भूक पूर्ण नाहीशी होणे
  • अनियंत्रित जुलाब
  • तरुण व्यक्ती निस्तेज दिसणे
  • दोन दिवसात झपाट्याने  तब्येत खालावणे
  • सर्दी, खोकला झाल्यावर सहसा व्यक्ती कसा असतो , किती थकलेला असतो व कसा बरा होतो हा पॅटर्न घरातील व्यक्तींना माहित असतो. या वेळेला ताप , खोकला , सर्दी हि नेहमी सारखी वाटत नाही. नेहमी कुठल्या ही आजारा पेक्षा या वेळी जरा वेगळे आणी जास्त वाटते आहे . सुस्तपणा जास्त आहे. हे निरीक्षण नातेवाइकांच्या लक्षात येते. असे असल्यास लगेचच डॉक्टरांना दाखवावे व सविस्तर सगळा वैद्यकीय इतिहास सांगावा
  • काहींना , ताप , खोकला व श्वास  घेण्यास त्रासासोबत अंगावर चट्टे ( रॅश ) ही येते आहे. हे गोवर किंवा कांजण्या सारखे अंगावर किंवा काहींना हात व पायांच्या बोटांवर ठिपक्यांसारखी रॅश येते आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने व अनेक जन घरून काम करत असल्याने रोजचा दिनक्रम व वेळापत्रक कोलमडून गेले आहे. त्यात सर्वात मोठा फटका हा झोपेला बसला आहे. पुढील गोष्टींमुळे सध्या  झोपेवर परिणाम झाला आहे –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • शारीरिक हालचालींमध्ये कमतरता
  • घरी असल्याने कामाच्या गतीवर परिणाम
  • स्क्रीन टाईम मध्ये वाढ
  • घरचे खाणे असल्याने जास्त जेवण
  • कोरोनाची भीती व सतत कोरोनाच्या बातम्या ऐकणे
  • आर्थिक अनिश्चिततेची काळजी
  • घरी असल्याने दुपारच्या झोपेत वाढ

लॉकडाऊन दरम्यान व नंतर झोपेच्या समस्या आपले शरीर व झोप एका जैविक घड्याळावर चालत असते ज्याला सरकॅडीयन रिदम असे म्हणतात. अनेकांना उशिरा झोपून उशिरा उठण्याची सवय लागत चालली आहे. सध्या ही जैविक घड्याळच विचलित झाल्याने लॉकडाऊन संपल्यावर झोपेची समस्या जास्त प्रमाणात भेडसावू शकते. तसे होऊ नये म्हणून या संदर्भात आता पासूनच काळजी घेणे आवश्यक आहे.

  • घरी असलो तरी आपले उठण्याचे व झोपण्याचे वेळापत्रक निश्चित असले पाहिजे
  • शक्यतो लवकर कामावर जाणाऱ्यांनी सकाळी त्याच वेळेत उठण्याची सवय सोडू नये. ती सवय मोडली असेल तर प्रयत्नपूर्वक आधीच्या वेळा पाळण्यास सुरुवात करावी
  • रोज किमान तीस मिनिटांचा घाम निघेल असा शारीरिक व्यायाम घरात करणे गरजेचे आहे. यात दोरीवरच्या उड्या, छतावर जॉगिंग करणे, नाचणे, पुश अप्स , सूर्यनमस्कार असा कुठला ही व्यायाम घरात करावा
  • झोपताना १० ते १५ मिनिटे खोलवर श्वास घेणे किंवा श्वास घेताना पोट बाहेर येईल व सोडताना आत जाईल या पद्धतीने अॅबडॉमीनल ब्रीदिंगचा व्यायाम करावा
  • ६ नंतर शक्यतो चहा – कॉफी टाळावी
  • घरी असलात तरी रात्री ८ पर्यंत रात्रीचे जेवण करावे
  • झोपण्याआधी २ तास फोन, टीव्ही, संगणक, लॅपटॉपचा वापर थांबवून स्क्रीन संपर्क बंद करावा
  • झोपताना तळपायांना तिळाचे किंवा एरंडाचे तेल लावून झोपावे

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

How To Improve Immune System

How To Improve Immune System 10 most effective immunity boosters in day to day routine A most important factor in the fight against corona or any illness is Immunity. In this chronicle, Dr. Amol Annadate talks about 10 most effective lifestyle practices that are very simple to follow and help improve individual immunity. Watch these easy to adopt practices in daily routine to be strong healthy and safe in a vulnerable environment.

How To Improve Immune System कोरोना या किसी बीमारी के खिलाफ लड़ाई में सबसे महत्वपूर्ण बात इम्युनिटी है। इस विडिओ में डॉ अमोल अन्नदाते 10 सबसे प्रभावी जीवन शैली प्रथाओं के बारे में बात करते हैं जो व्यक्तिगत रोग प्रतिकार शक्ती में सुधार करने में मदद करने के लिए बहुत सरल हैं। कमजोर वातावरण में मजबूत स्वास्थ और सुरक्षित रहने के लिए दैनिक दिनचर्या में इन प्रथाओं को अपनाने के लिए जरूर देखे

https://youtu.be/0Yy5PbAsVzc

How To Improve Immune System कोरोना किंवा कोणत्याही आजाराविरूद्धच्या लढाईतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती. या विडिओ मध्ये डॉ. अमोल अन्नदाते 10 सर्वात प्रभावी जीवनशैली प्रथा बद्दल बोलतात ज्या अनुसरण करणे आणि वैयक्तिक रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. या असुरक्षित वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी दररोजच्या या पद्धती जाणून घ्या … नक्की पहा

For regular updates from Dr. Amol Annadate like announcements, youtube videos, and articles stay tunned.

गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या 'नशे' वर अर्थदृष्टीची मात्रा

गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा कोरोनामुळे देशालाच नव्हे तर जगाला अर्थ शास्त्रज्ञांना अर्थ शास्त्राचे विश्लेषण आरोग्याच्या दृष्टीकोनातून करावे लागते आहे. नुकतेच राज ठाकरेंनी राज्याला आर्थिक गती देण्यासाठी मद्य विक्री सुरु करा अशी मागणी केली आहे. या मागणी कडे फक्त आता कोरोना संकटाच्या दृष्टीकोनातून नव्हे तर पुढे आरोग्य अर्थशास्त्राच्या मापात तोलून बघायाल हवे. मद्य विक्रीच्या महसुलाची चर्चा आज वर या दृष्टीकोनातून कधी झालीच नाही. सक्तीची दारू बंदी या पुढे मद्य व्यवसायाबद्दल चर्चा कधी पुढे जातच नाही. अनायासे कोरोनामुळे समाजाचे प्रत्येक अंग आपण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याच्या सवयीप्रत आलोच आहेत. म्हणून या निमित्ताने मद्य महसूला कडे निकोप आरोग्य अर्थ दृष्टी समाजाला देणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा महाराष्ट्र राज्याला मद्यातून महसूल सोडला तर इतर कुठला ही मोठा उत्पन्नाचा स्त्रोत नाही.  गेल्या वर्ष भरात हा महसूल १३ हजार कोटी आहे आणि सहसा १६ – १८  हजार कोटीं पर्यंत ही जातो. याला महत्व यासाठी आहे की मद्य विक्री हा राज्याच्या अखत्यारीत असतो व राज्य सरकारचे यावर नियंत्रण असते. केंद्र या महसुलात हस्तक्षेप करत नाही. व्यसन व अपायकारक गोष्टींवर जो उत्पादन खर्चाच्या सव्वापट अधिक कर लावला जातो त्याला ‘सीन टॅक्स’ म्हणजे पाप करण्यावर लादलेला कर असे म्हंटले जाते. लोकशाहीत पाप करण्यापासून रोखण्याला घटनात्मक मर्यादा आहेत तर किमान त्यावर ज्यादा कर लादून त्यातून लोक कल्याणकारी योजना राबवून पाप भिरुंचे आयुष्य सुसह्य करता येईल अशा विचाराने मद्य, तंबाखू, बिडी – सिगारेट व्यवसायला प्रोत्साहन देण्यात आले. अर्थात इतरांचे आयुष्य या महसूला मधून सुसह्य होते का ? हा विषय अलाहिदा. एवढ्या वर्षात व्यसन पूरक पदार्थ सोडून इतर सकारत्मक उत्पादकता, उद्योग, कारखाने असे महसुलाचे पर्याय उभे न राहिल्याने राज्याला महसूला साठी मद्य, तंबाखूच्या स्त्रोता वर अवलंबून राहण्याचे एक प्रकरे व्यसन लागेल. यामुळे याची मोजावी लागणारी सामाजिक आणि आरोग्य समस्यांच्या रूपाने आर्थिक किंमत हे आर्थिक त्रेराशिकच कोणी मांडलेले नाही. अर्थात याचा अर्थ सक्तीची दारू बंदी किंवा मद्य पिण्याविषयी नैतिकतेचे निकष या पलीकडे व्यसनमुक्तीसाठी ठरवून व नियोजन बद्ध प्रयत्न या विचारा चा अर्थ शास्त्राच्या दृष्टीने आपण किती विचार करतो या प्रश्नांचे उत्तर शोधण्यास हे चांगले निमित्त आहे.

       गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा वैद्यकीय शास्त्रात  कुठल्या ही आजार व सवयीची आर्थिक किंमत मोजण्याची एक पद्धत आहे. कोरोनामुळे तर आजारांमुळे आर्थिक नुकसानीची व्याख्याच बदलून टाकली आहे. तशीच इतर आजार व सवयीमुळे होणाऱ्या तात्पुरत्या शारीरिक नुकसाना पलीकडे त्यामुळे होणारे disability associated life years म्हणजे त्यामुळे सर्व स्तरावर येणाऱ्या अधूपणा पायी खर्ची पडणारी आयुष्याची वर्षे व loss of man hours म्हणजे माणसाचे कार्यक्षमतेचे बुडणारे तास असे दोन निकष आजारामुळे होणर्या अर्थ हानीला लावले जातात. प्रत्येक आजार व सवयी साठी हे निकष लावून होणारे आर्थिक नुकसान याची गणना केली जाते. त्यावर उपाय योजनेचे प्राधान्य ठरवले जाते. मद्य व्यवसायाची आर्थिक समज मात्र १६ हजार ते १८ हजार कोटी या एकाच आकड्या भोवती व महसूलाचा  महत्वाचा स्त्रोत या निकषा पलीकडे गेलीच नाही. एक मद्यपी त्याच्याशी संबंधित १६ जणांचे आयुष्य बेचिराख करतो. ग्रामीण भागात कुटुंबावर भार बनून राहिलेला घरतील मद्यपी कर्ता असण्याची अपेक्षा असलेला पुरुष प्रत्येक घरात सापडेल. थेट मद्यपानामुळे होणाऱ्या आजारांची संख्या ६१ आहे आणि इतर २०० आजारांमध्ये मद्यपान हे भर घालणारा महत्वाचा घट आहे. देशात ३१ % लोक नियमित मद्यपान करतात. अधून मधून मद्यपान करणाऱ्यांची संख्या अजून जास्त आहे. आर्थिक गणित मांडायचे  झाल्यास एक जरी व्यक्ती मद्यपान करत असली तरी त्या घरातील ४५ टक्के हे मद्य व मद्य संबंधित समस्यांवर खर्च होते. आकडेवारी चा अभ्यास करून मद्यातून येणारे उत्पन्न व मद्यामुळे होणारे नुकसान हे गणित मांडण्यासाठी राज्यात आकडेवारी जमवण्याची तसदी ही आजवर आपण घेतलेली नाही. या उलट मद्यपान करणाऱ्या तरुण व कुमारवयीन मुलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने आपले राज्य मात्र या विषयात संशोधनासाठी अंतर राष्ट्रीय संस्थांना मात्र आकर्षित करते. मद्यपानामुळे होणारे मानसिक आजार , आत्महत्या याची तर काही मोजदादच नाही. देशात दर वर्षी १ लाख रस्त्यावर होणाऱ्या अपघातातील मृत्यू मध्ये चालकाने मद्यपान केलेले असते. आजारांच्या पलीकडे बहुतांश बलात्कार,  निर्भया सारख्या अमानुष  खून व बलात्कार , घरगुती मारहाणीच्या समस्या, इतर गुन्हे हे मद्याच्या अमला खाली केल्या जातात. आजारावर होणारा खर्च व कामाचे बुडणारे तास सोडून या सर्व समाजिक असंतुलनाची किंमत आपण मद्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानात पकडायची कि नाही हे ठरवावे लागेल.

                  गैरसमजाच्या ‘नशे’ वर अर्थदृष्टीची मात्रा प्रत्येक युद्धात शत्रू धारातीर्थी पडल्यावर किंवा जखमी अवस्थेत असल्यास त्याला मृत्यू शय्येवर शेवटचे पाणी पाजण्याची एक युध्द नैतिकता अनंत काळा पासून युद्ध शास्त्रात अस्तित्वात आहे. राज्याला भरमसाठ महसूल देणाऱ्या बहुतांश मद्यपींना मात्र मृत्युच्या वेळी उपचार , पाणी देण्यास कोणीही नसते. केसरी या अक्षय कुमार अभिनित चित्रपटात शेवट पर्यंत शत्रूला पाणी पाजणारा सहकारी उत्तम चित्रित केला आहे. तरीही शेवटी शत्रू पक्षातील सरदार त्याची क्रूर हत्या करतो. महसुलाचे कारण पुढे करून मद्य विक्रीचे समर्थन करणारे शासन कित्येक वर्ष या क्रूर सरदाराच्या भूमिकेत मद्यपींची कत्तल करतेच आहे. किंबहुना त्या पाणी पाजणाऱ्या छोट्या सैनिका सारखे आपण व्यसनमुक्ती साठी काही शास्त्रीय प्रयत्न तरी करत आहोत का ? सक्तीची मद्य बंदी नकोच पण किमान या १६ हजार कोटींपैकी थोडा तुकडा तरी आपण व्यसनमुक्तीसाठी खर्ची घालणार आहोत का ? मुळात व्यसनमुक्ती वैद्यक मानस शास्त्रातील अशी अंधारी खोली आहे जिथे कोणाला ही प्रवेश करण्यात रस नाही. मद्यपान हा नैराश्य, मधुमेह , ह्र्दय रोग असा एक शारीरिक  – मानसिक आजार आहे आणि त्याला उपचारांची गरज आहे हे सत्य समजून घेण्याची कोणाची ही तयारी नाही. अल्कॉहॉलिक अॅनॉनिमस सारख्या संघटना यासाठी वर्षानूवर्षे झटत आहेत. आज शासकीय सोडाच पण खाजगीत ही एखाद्या मद्यपीला मद्य सोडण्याची इच्छा असेल तरी उपचार , सुविधा सहज उपलब्ध नाहीत. त्यावर निधीची तरतूद सोडाच पण चर्चा ही नाही. धर्मा सारखेच  बहुतांश जनता मद्याच्या अमला खाली राहणे हे राजकीय पक्ष , मद्य उद्योग व्यावसायिक, विक्रेते या सर्वांच्याच सोयीचे आहे. याचे समर्थन करताना महसुलाचे कारण आहेच. पापाचा कर वसूल केल्यावर हा कर पचवताना  व्यसनमुक्तीच्या प्रयत्नांच्या रूपाने प्रायश्चीताचा विचार मनात आला तरी आर्थिक गणिते बदलण्यास सुरुवात होईल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान 'कोविड' मुक्त ठेवण्यासाठी

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी नुकताच रमजान चा पवित्र महिना सुरु झाल्याने रोजे ही सुरु झाले आहेत. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दृष्टीने रमजान मध्ये काय बदल करावे व काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून मौलवी व डॉक्टरांनी याला मान्यता दिली आहे .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • कोरोना चे निदान झालेले, निदान होऊन बरे झालेले व निश्चित निदान झालेल्या केस च्या संपर्कात  येऊन सध्या होम क्वारनटाइनचा सला दिलेल्यांनी रमजान चा रोजा ठेवू नये.
  • साठ वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्यांनी तसेच ६० पेक्षा कमी वय असले तरी मधुमेह, ह्रदयरोग, कॅन्सरचा त्रास असलेल्यांनी शक्यतो रोजा टाळावा.
  • ६० वर्षा खालील काही त्रास नसणाऱ्यानी रोजा ठेवण्यास हरकत नाही.

पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी पवित्र कुरानमध्ये ही आजारी व्यक्तींना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. या संकेतां शिवाय अजून काही गोष्टी रमजान दरम्यान  पाळण्यास हरकत नाही. मधुमेह नियंत्रित असणारे काही जण या काळात रोजा ठेवतात. अशांनी  रक्तातील साखर  ७० च्या खाली व ३०० च्या वर जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्वस्थ व्यक्तींनी रोजा करत असताना खोकला, ताप, सर्दी असल्यास लगेचच रोजा बंद करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वर्षी रमजान दरम्यान प्रार्थना, नमाज घरीच कराव्या व सणा दरम्यान एकमेकांच्या घरी जाणे व एकत्रित इफ्तारचे कार्यक्रम  टाळावे.पवित्र रमजान ‘कोविड’ मुक्त ठेवण्यासाठी रमजान दरम्यान रोजा पाळता आला नाही. तरी पवित्र कुरानमध्ये कफारा ही तरतूद सांगितली आहे. कफारा म्हणजे पैसे किंवा जेवणाचे दान. कोरोना साथी साठी आवश्यक दान करून आपण रोजा न करता कफाराचे पालन करु शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी

वास घेण्याची क्षमताही होते कमी कोरोनामध्ये ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, सर्दी ही लक्षणे सोडून अजून एक महत्वाचे लक्षण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे ते म्हणजे अचानक वास घेण्याची क्षमता कमी होणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वास घेण्याची क्षमताही होते कमी कुठल्या ही व्हायरल संसर्गामध्ये चव आणि घ्राणशक्ती या दोन्ही विशेष इंद्रिय क्षमता ( स्पेशल सेन्सेस ) वर थोडा परिणाम होत असतो. पण तो न जाणवण्या इतपत असतो. कोरोनाच्या संसार्गात मात्र तो प्रकर्षाने जाणवतो आहे. ही घ्राणशक्ती चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीं वासांसाठी कमी होते.   यात सर्व प्रथम जेवण करताना त्याचा सुवास न जाणवणे, अंघोळ करताना साबणाचा किंवा टालकम पावडर चा वास न जाणवणे असे हे लक्षण आपल्या ध्यानी येते. यात वास येणे पूर्ण बंद होणे किंवा वास येणे कमी होणे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. काही रुग्णांमध्ये हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते. पण या सोबत ताप, खोकला ही लक्षणे असतातच. परदेशात मात्र काही रुग्ण हे इतर कुठले ही लक्षण सोडून फक्त घ्राणशक्ती कमी होणे एवढे एकच लक्षण असलेले कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतात यावर अजून माहिती येण्यास वेळ लागेल. तसेच वास घेण्याची क्षमता कोरोना बरा झाला की पुरवत होते. हे लक्षण महत्वाचे यासाठी वाटते कि सर्दी , खोकला, तापाच्या कोरोना सोडून इतर व्हायरल आजार व फ्लू मध्ये हे जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. म्हणून ताप , सर्दी, खोकला  या पैकी कुठल्या ही लक्षणा सोबत वासाची क्षमता कमी झाली असल्यास आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. वास घेण्याची क्षमताही होते कमी नाकामध्ये पॉलीप म्हणजे लटकणारे गुच्छ असणे, अलर्जी मुळे असणारी दीर्घकालीन सर्दी, नाकातील हाड वाढलेले असणे, नाकाच्या मधला पट वाकडा असणे या आजारांमध्ये ही घ्राणशक्ती कमी होते. पण यात कुठल्या ही आजारामध्ये ताप नसतो.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना

ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना काही ठिकाणी ऑनलाईन खाण्याचे पदार्थ विक्री करणारे अॅप्स सुरु झाले आहेत. काही काळा नंतर इतरत्र ते सुरु होतील. शक्य असल्यास पुढील काही महिने बाहेरून व ऑनलाईन खाद्य पदार्थ मागवणे टाळावे. जेवणातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. पण वस्तूच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणून  असे ऑनलाईन मागवलेल्या खाद्य पदार्थ स्वीकारताना कोरोना पासून बचाव करण्यासाठी पुढील काळजी घ्यावी –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • डिलिवरी देणाऱ्या व्यक्ती कडून थेट खाद्य पदार्थाचे पॅकेज स्वीकारण्यापेक्षा त्याला ते बाहेरच ठेवून जायला सांगावे.
  • पैसे देताना शक्यतो डिजिटल पेमेंट ला प्राधान्य द्यावे.
  • शक्य असेल तर पॅकेज घरात आणूच नये. प्लास्टिक चे साधे ग्लव्ज घालावे.
  • त्यावर थोडे सॅनीटायजर ओतावे.
  • ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना एका वाइप किंवा कपड्यावर टाकून सॅनीटायजरने पॅकेज बाहेरून स्वच्छ करून घ्यावा. हे करत असताना आतील अन्नाचा सॅनीटायजरशी संपर्क येणार नाही हयाची काळजी घ्यावी.
  • गवळ्या कडून दुध घेतो तसे दारातच खाद्यपदार्थ घरच्या भांड्यात / ताटात काढून घ्यावे.
  • ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना पॅकेज व नंतर ग्लव्ज घरा बाहेरच डस्टबिन मध्ये वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकावे. यामुळे नंतर हे स्वच्छ करणाऱ्याला ही याचा धोका राहणार नाही. तसेच ते आपण सॅनीटायजरने स्वच्छ ही केले आहे.
  • सगळे झाल्यावर हात साबण व पाण्यान धुवून घ्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

उपवास नकोच

उपवास नकोच

 उपवास नकोच कोरोना मुळे अनेक धार्मिक चाली रीतींना छेद देऊन विज्ञानवादी आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त काय याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्यातली सध्या आपण सोडून द्यावी अशी गोष्ट म्हणजे उपवास. उपवास आणि मानवी शरीरावर होणारे परिणाम यावर बरेच संशोधन झाले आहे. त्यात एका विशिष्ट पद्धतीने व काही गोष्टी खाऊन केलेल्या जास्त दिवस उपवासाचे फायदे ही दिसून आले आहेत. पण त्यासाठी आदर्श वातावरण व रोज ठरलेल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजे. सध्याच्या साथ सुरु असताना तसेच अस्थिर वातावरणात उपवास करणे हे तुमच्या प्रतिकारशक्ती वर नकारत्मक परिणाम करू शकते. म्हणून रोज नियमित व उच्च प्रथिने युक्त आहार घेणे सध्या खूप महत्वाचे आहे. उपवास नकोच घरातील वृध्द व्यक्तींना, मधुमेह असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त असतो. नेमक्या घरातील अशा वृद्धांनी विविध वार व देवांचा उपवास वर्षानुवर्षे धरलेला असतो. त्यामुळे या लोकांना कोरोनाचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो. म्हणून किमान साथ सुरु असे पर्यंत अशा लोकांना काही काळ उपवास न करता नियमित आहार घ्यावा. आजारी असलेल्या व्यक्तींनी जितकी इच्छा होईल तितके खावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता