संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब

संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब ‘कोरोना’चे बरेच रुग्ण हे जुलाब व उलट्या हे पहिले लक्षण घेऊनही येत आहेत; पण हे उलट्या-जुलाब कसे असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजे. साधारणत: उलट्या या जेवल्यावर किंवा पोटात काहीतरी अन्न असताना होतात. पण कोरोनामध्ये मात्र पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात. जुलाब हे दोन प्रकारचे असतात. पहिला ज्याचा उगम छोट्या आतड्यांमध्ये अन्न न पचल्याने होतो. हे छोट्या आतड्यांच्या कार्यातील बिघाडामुळे होणारे जुलाब पाण्यासारखे, कुठल्याही प्रयत्नाशिवाय अपोआप होणारे व रक्त किंवा शेम नसलेले असतात. जे जुलाब पाण्यासारखे नसतात, घट्ट असतात, जुलाब होताना दुखते आणि शेम पडते, असे जुलाब मोठ्या आतड्याची कार्यक्षमता घटल्यामुळे होतात. शक्यतो कोरोनासारख्या व्हायरसचा परिणाम छोट्या आतड्यांवर होतो व बॅक्टेरियाचा परिणाम हा मोठ्या आतड्यांवर होतो. म्हणून कोरोनामुळे पाण्यासारखे पातळ, वेदना न होता, शेम नसलेले जुलाब होतात. हे जुलाब पातळ असले तर कोलेरासारखे एकाच वेळी जास्त प्रमाणात होत नसून त्या मानाने कमी प्रमाणात असतात. दिवसातून ४ ते ५ वेळा होतात आणि ५ ते ७ दिवस चालतात. यासोबत ताप, पोटदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही असतात. बऱ्याचदा श्वासाशी निगडित लक्षणे जुलाब असलेल्या रुग्णांमध्ये उशिरा येतात. जुलाब कोरोना सोडून इतर कारणांमुळेही असू शकतात व कोरोना रुग्णाचा संपर्क जुलाब कोरोनामुळे आहेत का, याची शहानिशा करण्यास महत्त्वाचे ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

जुलाब असल्यास

  • आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
  • संसर्गानंतरच्या उलट्या-जुलाब शौचालय भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावे.
  • दिवसातून एकदा शौचालयात ब्लिचिंग सोल्यूशन किंवा सोडियम हायपोक्लोराइटयुक्त पाणी टाकावे.
    शौचालयाच्या नळावर व दाराचे हँडल दिवसातून काहीवेळा सॅनिटायजर स्प्रे मारून पुसून घ्यावे.
  • कमोड वापरत असल्यास शौचालयाचे झाकण फ्लश केल्यावर बंद करावे.
  • एक लिटर पाणी, सहा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी तहान लागेल तसे वारंवार प्यावे व दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाचे पाणी प्यावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या

स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या लॉकडाऊन सैल झाल्या पासून अनेक दुकान उघडली आहेत. किराणा , कपडे , दागिने अशा अनेक ठिकाणी स्त्रिया निवांत खरेदी करत असताना दिसायला लागले आहेत. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही कि कोरोनाची साथ पूर्ण संपलेली नाही  पुढील किमान सहा महिने आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. आणि प्रतिबंधक उपायांचा एक महत्वाचा भाग असणार आहे, गर्दीच्या ठिकाणावरून लवकरात लवकर काम संपवून काढता पाय घेणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

    स्त्रियांनो, खरेदी आटोपती घ्या घरातील महत्वाच्या गोष्टींच्या खरेदीची जबाबदारी गृहिणींवर असते. या आवश्यक वस्तू खरेदी करताना तसेच कपड्यांसारख्या इतर गोष्टी खरेदी करतांना पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त वेळ लावतात. स्त्रिया हे मुद्दाम करत नसतात तर याला काही मानसशास्त्रीय कारण असतात. स्त्रियांचा टेम्पोरलं व परायटल लोब हा मेंदूचा भाग पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतो. त्यामुळे रंग, हाताला लागणारे संवेदना, वास, एखाद्या वस्तूतील विविधता हे स्त्रियांना लवकर कळते व त्याविषयी त्या जास्त जागरूक असतात. तसेच कुठल्या ही वस्तूच्या खोलात जाऊन ति गोष्ट पाहणे हा स्त्रियांच्या मेंदूचा गुणधर्म असतो. म्हणून कुठली ही खरेदी करताना त्या जास्त चौकस असतात. तसेच त्यांना त्यातले वैविध्य अपेक्षित नसल्याने त्यांना खरेदी करतांना निर्णय घेण्यास वेळ लागतो. पण ही गोष्ट कोरोनाच्या या साथीच्या काळात तापदायक ठरू शकते. याचे कारण कोरोनाची लागण तुमच्या संपर्का पेक्षा ही  किती वेळ संपर्क येतो यावर अवलंबून असते. म्हणूनच आहे. यासाठी पुढील स्त्रियांना या सवयीला काही काळ तरी मुरड घालायला हवी. व ही सवय लावून घेतल्यास शक्य गोष्टी पाळाव्या

  • खरेदी ला जातानाचा आपल्याला दुकानाच्या आत जाताना बाहेर येण्याचा वेळ निश्चित करून घ्यावा. हा वेळ अर्ध्या तासापेक्षा कमी असावा.
  • कुठल्या ही ठिकाणी ४५ मिनिटा पेक्षा जास्त वेळ घालवल्यास जोखीम वाढते.
  • काय खरेदी करायचे आहे हे यादी करून आधीच ठरवून ठेवावे.
  • कपड्यांना सारख्या गोष्टी बघण्यासाठी फोन वर मागवून घ्याव्या.
  • जेव्हा शक्य होईल तेव्हा फोन वर / ई कॉमर्स च्या माध्यमातून खरेदी करावी.
  • दुकानांनी त्यांच्या संकेतस्थळावर थ्रीडी गॅलरी तयार करून वस्तू / कपडे सर्व बाजूंनी बघता येतील अशी सोय करावी म्हणजे ग्राहक घरी बघून काय खरेदी करायचे आहे हा निर्णय दुकानात येण्या आधीच नक्की करू शकतील.
  • छोट्या गावांमध्ये ही फोन नंबर देऊन स्थानिक पातळीवर वस्तू घरपोच देण्याची सोय करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

घटवा वजन, संसर्ग हटवा

घटवा वजन, संसर्ग हटवा

घटवा वजन, संसर्ग हटवा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर जास्त भीती व जास्त मृत्युदर हा इतर जीवनशैलीचे आजार असलेल्यांना आहे. यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाच्या वाहिन्या रुंद असण्याचा आजार (इशेमिक हार्ट डिसीज), कॅन्सर, किडनीचे आजार जे मधुमेहामुळेच जास्त प्रमाणात होतात. कोरोना संसर्ग झाला तर तो गंभीर व जीवघेणा होण्याची शक्यता ज्या या मुख्य पाच आजारांमध्ये आहे, त्या सर्वांच्या मुळाशी लठ्ठपणा हा प्रमुख आजार आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

घटवा वजन, संसर्ग हटवा आजार नसलेल्या व लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्येही कोरोना झाल्यावर मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. आज आपण प्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि त्यासाठीची औषधे शोधत आहोत. पण याचा सगळ्यात चांगला मार्ग हा आपले वजन नियंत्रणात ठेवणे हा आहे. मुळात कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांसाठी लठ्ठपणा हे एक कल्पवृक्षच असते.आपल्या शरीरात लठ्ठपणा सुरू झाला आहे हे कसे ओळखायचे याचे प्रत्येकाला सहज मोजता येईल, असे एक माप बुलडाणा येथील लठ्ठपणा तज्ज्ञ (ओबेसिटी कन्सल्टंट) डॉ. विनायक हिंगणे सांगतात. डॉ हिंगणे यांच्या मते नाभीच्या खाली १ इंच म्हणजे २.५ सेंटिमीटर खाली पोटाचा घेर पुरुषांसाठी ९० सेंटीमीटर व स्त्रियांसाठी ८० सेंटिमीटर लठ्ठपणा आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज दर्शवते.खरे तर हे प्रमाण पुरुषांसाठी ७८ व स्त्रियांसाठी ७२ च्या पुढे गेले की जागरूक व्हायला हवे आणि जीवनशैली तपासून पाहायला हवी. पण आधीचीपुरुष : ९० व स्त्री : ८० ही मर्यादा मात्र जीवनशैलीत मोठे बदल करणे तातडीने आवश्यक ठरेल. कोरोनापासून बचावासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. हे खरी असले तरी घाबरून जाऊन एक महिन्यात अघोरी पद्धतीने वजन घटवणेही चुकीचे ठरेल. त्यासाठी टप्प्याने प्रयत्न करून जीवनशैलीत बदल आवश्यक असतो. यात प्रामुख्याने आहार, व्यायाम, बैठी जीवनशैली सोडून हालचाल करणे, योग्य प्रमाणात झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन असे अशा अनेक गोष्टी असतात.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी

मानसिक आरोग्याची स्वयंचाचणी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच व्यावसायिक क्षेत्र अनिश्चिततेचा सामना करत आहेत . त्यामुळे नैराश्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच प्रत्येकाला स्वतःची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे  व गरज वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञ – यासाठी पुढील प्रश्नावली वापरता येईल –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

                                                            प्रश्न             कधीही नाही बरेच दिवस महिन्यातून अर्धे दिवस जवळपास प्रत्येक दिवस
कुठल्याही कामात / गोष्टीत फार रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे.         २
  निराश वाटणे / उदास वाटणे.     
झोप लागण्यास वेळ लागणे / सतत झोपमोड होणे / खूप जास्त झोप येणे / सतत झोपावे वाटणे.
 थकलेले वाटणे / शरीरात उर्जा नसल्या सारखे वाटणे.
भूक नाहीशी होणे/ खूप खाणे.
स्वतः बद्दल कृतक भावना मनात येणे / वाईट वाटणे / स्वतः अपयशी असल्या सारखे वाटणे / कुटुंबाला आपल्यामुळे नुकसान / हिरमोड झाला असे वाटणे.
कामावर लक्ष केंद्रित न होणे / पेपर वाचणे / टीव्ही बघण्यासारख्या गोष्टी करताना ही लक्ष न लागणे.
 इतके हळू बोलणे की इतरांना नीट ऐकू येत नाही किंवा खूप मोठ्याने बोलणे व सतत इकडून तिकडे चकरा मारणे / नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ असणे.
आपण नसलेलो / मेलेलोच बरे असे विचार मनात येणे / स्वतःला इजा करणे / स्वतःला इजा करण्याची इच्छा होणे.

                                                                                                                                        +              +

Total Score Depression Severity
१-४ अगदी सुरुवातीचे थोडे नैराश्य – minimal depression
५-९ सौम्य नैराश्य – mild minimal depression
१०-१४ मध्यम नैराश्य – moderate depression
१५-१९  मध्यम स्वरूपाचे तीव्र नैराश्य – moderately severe depression
२०-२७ तीव्र नैराश्य – severe depression

वरील सुरुवातीचे नैराश्य असले तरी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची

संसर्गासाठी संपर्काची वेळ महत्वाची संसर्ग होण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्ती सोबत फक्त संपर्कच नव्हे तर संपर्काची  वेळ आणि व्यक्ती पासून अंतर  हे  संसर्गाची शक्यता ठरवणारी महत्वाची घटक आहेत. या विषयी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे भूतपूर्व प्रती कुलगुरू व  मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषधवैद्यक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शेखर राजदेरकर सांगतात की जर कोरोना रुग्णाशी मास्क न घालता तुमचा  अर्धा तास बोलण्यासारख्या  स्वरुपात जवळचा संपर्क आला तर संसर्ग होईल पण ही संपर्काची  वेळ २५ मिनिटे झाली तर संसर्गाची  शक्यता ९० % इतकी कमी होईल. जर  हीच संपर्काची वेळ १५ मिनिटे इतकी कमी झाली तर मात्र संसर्ग झाला तरी तो लक्षणविरहीत  किंवा अत्यंत सौम्य लक्षणे असलेला असेल. जर संपर्काचा हाच कालावधी गृहीत धरून यात नाक व तोंड पूर्ण झाकणारा मास्क, ६ फुटा पेक्षा जास्त शारीरिक अंतर आणि संपर्कानंतर हात धुणे या प्रतिबंधक उपायांची भर पडली तर संसर्गाची शक्यता खूपच कमी होते. म्हणजेच कोरोना संसर्गित रुग्णाचा १५ मिनिटांपेक्षा कमी संपर्क आणि हे प्रतिबंधक उपाय कोरोना टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरू शकते . कमी संपर्काच्या वेळेने झालेल्या संसर्गातून रुग्ण गंभीर होण्याची शक्यता कमी असेल. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वेळे सोबतच पुढील काही गोष्टी संसर्गाची शक्यता ठरवतील –

  • बंद जागेत / खुल्या हागेत
  • छोट्या जागा / मोठी जागा
  • कमी  जागेत जास्त लोक /  कमी लोक

वरील गोष्टी गृहीत धरल्यास पुढील गोष्टींमध्ये संसर्गाची शक्यता जास्त कि कमी हे सांगता येईल.

जागा संसर्गाची शक्यता
कोरोनबाधित व्यक्तीशी मास्क वापरून व ६ फुट पेक्षा जास्त अंतर राखून समोरा समोर बोलल्यास  –संपर्क  वेळ ५ मिनिटा पेक्षा कमी असल्यास खूप कमी  
चालताना / जॉगिंग / सायकलिंग करतना  दोघांनीही मास्क घातला असल्यास नाही
हवेशीर व मोकळ्या जागेत संपर्क आल्यास व ६ फुट अंतर राखल्यास कमी
किराणा दुकान व इतर दुकाने शक्यता
छोट्या जागेत जास्त लोक जास्त
सार्वजनिक शौचालय / बाथरूम जास्त
कमाच्या बंदिस्त जागा / शाळा  जास्त
लग्न समारंभ / इतर अनेक लोक जमतील असे सार्जनिक समारंभ जास्त
धार्मिक स्थळे जास्त
सिनेमा गृहे / नाट्य गृहे / शॉपिंग मॉल जास्त

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे

कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे

कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे “ज्या कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले जाते त्यांच्यासाठी पालथे झोपणे हा उपचाराचा एक भाग आहे. पण जे लक्षणविरहीत कोरोना संसर्गित आहेत व ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आहेत व रुग्णालयात दाखल झालेले नसून घरीच उपचार घेत आहेत अशांनी ही पालथे म्हणजेच पोटावर झोपावे. पालथे झोपल्याने कोरोना झाल्यावर शरीरात ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता कमी होते व ऑक्सिजन कमी पडत असेल तर ते भरून निघते व व्हेंटिलेटरची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. अर्थात पालथे झोपून ही शरीरात ऑक्सिजनची पातळी मेंटेन राहत नसेल तर व्हेन्टीलेटरचा वापर करावा लागतो. लक्षणविरहीत व सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवले जाते व फारसे उपचार नसतात. अशांसाठी पालथे झोपण्याचे विशेष महत्त्व आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पालथे झोपल्याने नेमके काय होते?
कोरोना संसर्ग असल्यास पालथे झोपावे पालथे झोपल्याने फुफ्फुसाचा मागच्या बाजूचा व झोपल्यावर वरच्या म्हणजे पाठच्या बाजूला येणारा भाग खुला होता व फुफ्फुसाच्या इतर भाग अधिक खुला होतो व याला ही ऑक्सिजन मिळू लागते. उभ्याने किंवा पाठीवर झोपून हा खालच्या व मागच्या बाजूला जाणारा फुप्फुसाचा भाग फारसा उपयोगात येत नाही. म्हणून पालथे झोपल्याने फुप्फुसाच्या जास्तीत जास्त भाग काम करू लागतो व ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.अजून एका कारणाने पालथे झोपल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. २०% लोकांना घोरण्याचा आणि झोपेत श्वसन मार्गाच्या वरच्या भागात अडथळा निर्माण झाल्याने शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासण्याचा आजार असतो. याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा त्रास असतो. हे लठ्ठपणा व मधुमेह असणाऱ्यांमध्ये जास्त आढळते. नेमके हेच कोरोना होण्याची जोखीम जास्त असणारे आजार आहेत. पालथे झोपल्याने पडजीभ व जीभ झोपेत मागे न पडून झोपेत ऑक्सिजन कमी पडण्याचा हा आजार ही कमी होतो आणि शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढते. पालथे झोपताना एक काळजी घ्यावी. खरे आदर्श पालथे झोपणे म्हणजे कपाळ हे बिछान्याला लागलेले असे आहे ज्या साठी आपण नियमित वापरतो ते बिछाने वापरून असे झोपणे शक्य नाही. म्हणून आपल्याला मान एका बाजूला करून झोपावे लागेल. अशा वेळी सवय नसल्याने मानेला कळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक दिवस आड मान एक एका बाजूला करून झोवे. झोपण्या आधी व उठल्यावर ब्रम्ह मुद्रा म्हणजे मान दोन्ही बाजूला व वर खाली हलवण्याचा व्यायाम ५ ते १०० वेळा करावा .कोरोना नसलेल्यांनी ही सध्या साथ सुरू असल्याने पालथे झोपावे का?ज्यांना कोरोना नाही अशांनी पालथे झोपण्याची गरज नाही. कारण आपल्याला नियमित असे झोपण्याची सवय नसते

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

झटके मेंदूतील शॉर्टसर्किट

झटके मेंदूतील शॉर्टसर्किट

झटके मेंदूतील शॉर्टसर्किट झटक्यांना आकडी, फिट, फेफरे अशा अनेक नावांनी संबोधले जाते. वैद्यकीय भाषेत याला इपिलेप्सी म्हणतात. झटके येत असण्याच्या प्रक्रियेला सीजर किंवा कन्वर्जनअसे म्हणतात.

1) झटके म्हणजे काय?
झटके म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे, तर मेंदूमध्ये होणारे शॉर्टसर्किट. हे शॉर्टसर्किट कसे होते आणि का होते हे जाणून घेण्यासाठी मेंदू कसा काम करतो हे समजून घ्यायला हवे. 
2) झटके का येतात?
शॉर्टसर्किटसाठी तीन घटक महत्त्वाचे असतात, तसेच झटके येण्यासाठी तीन घटक शोधावे लागतात. हे तीन घटक म्हणजे बिघाड झालेले बटन, वायर किंवा लूज कनेक्शन. म्हणजे मेंदूतून सिग्नल तयार होतात त्या भागात बिघाड होतो किंवा सिग्नल वाहून नेणाऱ्या नसा खराब असू शकतात किंवा हे मेंदूतील सूक्ष्म पेशींच्या पातळीवरील शॉर्टसर्किट असू शकते, जे तपासण्यांमध्ये लक्षात येत नाही.
3) झटके आनुवंशिक असतात का?
झटके शक्यतो आनुवंशिक नसतात व एखाद्या मुलाला झटके येत असल्यास पुढे त्याच्या पाल्यांनाही झटके येतीलच असे नाही. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

नॉर्मल मेंदू कसा काम करतो? 
मेंदू हा शरीराचा रिमोट कंट्रोल असतो. टीव्ही रिमोट कंट्रोलने चालतो, तसे शरीर मेंदूच्या रिमोट कंट्रोलने चालते. रिमोट कंट्रोलप्रमाणेच मेंदूमध्ये बटन व वायर्स असतात. मेंदूचा डावा व उजवा असे दोन भाग असतात. मेंदूचा उजवा भाग डाव्या भागावर व डावा भाग उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो. आपल्याला डावा हात हलवायचा असल्यास मेंदूच्या उजव्या भागात हाताचे बटन असते, तिथे एक सिग्नल तयार होतो. हात उचलण्याची मनात आलेली इच्छा किंवा विचार हा सिग्नल मेंदूत तयार करते. हा सिग्नल शरीरातील वायरने म्हणजे नसांनी (नर्व्ह) हातापर्यंत येतो आणि हात हलतो. आपल्या नकळत, इच्छेशिवाय आपला हात, पाय किंवा शरीराचा कुठलाही भाग हलत असेल, याचा अर्थ आपल्या नकळत मेंदूमध्ये त्या जागी सिग्नल तयार झाला, म्हणजे तिथे शॉर्टसर्किट झाले आणि हात, पाय किंवा शरीराचा भाग हलायला लागला. यालाच झटके असे म्हणतात.

 बिघाड शोधण्यासाठीच्या तपासण्या
हृदयाच्या लहरी तपासण्यासाठी ईसीजी केला जातो, तसेच मेंदूतून निघणाऱ्या लहरी तपासण्यासाठी ईईजी केला जातो. झटके किंवा इपिलेप्सीच्या निदानासाठी ईईजी म्हणजे मेंदूतून निघणारे सिग्नल जास्त प्रमाणात निघत आहेत का, हे पाहण्यासाठी केले जाते. दरवेळी इपिलेप्सीचे निदान करताना ईईजीमध्ये बिघाड दिसून येईलच असे नाही. तसेच, एमआरआय करून मेंदूमध्ये झटके निर्माण करणारे इतर कुठले कारण आहे का, हे पाहण्यासाठी एमआरआय केला जातो. काही कारण निघाल्यास त्या त्या कारणाचे उपचार करावे लागतात. ‘ईईजी’प्रमाणेच एमआरआय नॉर्मल आला, तरी कुठल्याही करणाशिवाय येणारे झटके, असे निदान करून उपचार केले जातात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का?

फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का?

फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का? सध्या अनेक जण फेस शिल्ड वापरावा कि नाही या संभ्रमात आहे. मास्कने नाक व तोंड झाकले तरी डोळ्यातून काही प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अर्थात हा कोरोना बाधित व्यक्ती ६ फुटापेक्षा कमी अंतरात असेल व शिंकलाच व खोकलला तरच होईल. पण यासाठी ज्यांना चष्मा आहे , त्यांना फेस शिल्डची गरज नाही. जे चष्मा वापरत नाहीत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी नंबर नसलेला साधा चष्मा / गॉगल वापरला तरी चालेल. म्हणून सर्वांनी फेस शिल्ड वापरावाच असे काही नाही. प्रतिबंधाच्या गोष्टी जितक्या साध्या, सोप्या आणि कमी ठेवल्या जातील तितक्या त्या अवलंबिल्या जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून उगीचच फेस शिल्डची त्यात भर घालण्याची गरज नाही.
पण काही जन असे आहेत ज्यांना फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे व फेस शिल्ड मुळे प्रतिबंधात भर पडू शकेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • डॉक्टर , पॅरामेडिकल स्टाफ , स्वच्छता कर्मचारी
  • बँक , पोस्ट ऑफिस , विमानतळ , दुकान जिथे लोक काउन्टर वर समोर येऊन बोलतात.
  • पोलीस
  • कमी जागेत जास्त लोकांशी संपर्क येतो व सोशल डीस्टन्सिंग पाळणे अवघड आहे अशी ठिकाणे – उदाहरणार्थ हवाई सुंदरी, विमानातील प्रवासी , धार्मिक स्थळे
  • तळागाळात अनेक जणांमध्ये जाऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते
  • फिल्ड वरून वार्तांकन करणारे पत्रकार
  • निवासी बिल्डींग , कार्यलया बाहेर दारावर उभे असणारे सुरक्षा कर्मचारी ( सिक्युरिटी गार्ड ) .

फेस शिल्ड वापरणे गरजेचे आहे का? फक्त वरील काही मोजक्या व्यक्ती सोडून इतरांनी फेस शिल्ड वापरण्याची गरज नाही. वरील जे व्यक्ती फेस शिल्ड वापरतील त्यांनी दर ४ ते सहा तासांनी तो आतून व बाहेरून नीट सॅनीटायजर स्प्रे मधून फेस शिल्डच्या दोन्ही बाजूच्या काचांवर शिंपडून तो स्वच्छ निर्जंतुक कापसाने किंवा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावा. घरात फेस शिल्ड ठेवू तेव्हा तो लहान मुलांच्या हाती लागणार नाही याची दक्षता घ्यावी .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना साथीत लैंगिक संबंधांचे काय?

कोरोना साथीत लैंगिक संबंधांचे काय?

कोरोना साथीत लैंगिक संबंधांचे काय? कोरोना साथीच्या काळात नव विवाहित दाम्पत्यांपासून ते इतर सर्वच जोडप्यांना लैंगिक संबंध ठेवण्याविषयी अनेक प्रश्न पडले आहेत. एका अभ्यासात विर्या मध्ये कोरोनाचे विषाणू सापडल्याचे आढळून आले पण विर्यातून मात्र लैंगिक संबंधांनंतर कोरोनाचा प्रसार होत नाही असे सिद्ध झाले. कोरोना बाधित स्त्रियांमध्ये योनीतील स्वॅब मध्ये मात्र कोरोनाचे विषाणू आढळून आले नाही. असे असले तरी कोरोनाग्रस्त व्यक्ती व संपर्कात असल्यास पुढील मार्गदर्शक तत्वे सांगता येतील –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • विर्यातून संसर्ग होत नसला तरी लैंगिक संबंधात जवळचा संपर्क  येत असल्याने निदान झाल्यापासून १४ दिवस व शक्य असल्यास महिना भर शारीरक संबंध टाळावे.
  • निदान होण्याच्या आठवडा भर आधी जर इतर कोणाशी लैंगिक संबंध ठेवले असतील तर ती व्यक्ती ही हाय रिस्क कॉनटॅक्ट म्हणजे जोखीम जास्त असलेली व जवळून संपर्क आलेली व्यक्ती ठरते. अशा व्यक्तीने चौदा दिवस स्वतःला क्वारंटाइन करावे व पुढील चौदा दिवस,म्हणजे निदान झाल्यापासून  शक्य असल्यास महिना भर लैंगिक संबंध टाळावे.
  • कोरोना बाधित व्यक्तीशी थेट संपर्कात आलेल्यांनी लैंगिक संबंध चौदा दिवस टाळावे.
  • कोरोना साथीत लैंगिक संबंधांचे काय? इतर सर्व जणांनी म्हणजे ज्यांचा कोरोनाशी संपर्क आलेला नाही अशांनी लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही.
  • जर जोडप्या पैकी कोणीही कामा साठी बाहेर जात असल्यास लैंगिक संबंध ठेवण्यास हरकत नाही.
  • नव विवाहित दाम्पत्यांसाठी वधू किंवा वरापैकी कोणीही हॉट स्पॉट असलेल्या शहरातून आलेले असल्यास किंवा कन्टेनमेंट झोन मधून आले असल्यास १४ दिवस संयम ठेवावा व त्यानंतर लैंगिक संबंध सुरु करावे.
  • साथीच्या काळात देहविक्रय करणार्यांशी लैंगिक संबंध किंवा पूर्वइतिहास किंवा कुठली ही माहिती नसलेल्याशी लैंगिक संबंध हे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढवणारे ठरू शकते.
  • कोरोना मुळे लैंगिक क्षमते वर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो असा गैरसमज व अफवा पसरली आहे. हा गैरसमज असून असा कुठला ही परिणाम कोरोना मुळे होत नाही.
  • साथीच्या काळात व जास्त वेळ घरात राहावे लागते अशा नैसर्गिक आपत्तीं मध्ये संतती नियमनाच्या साधनां कडे दुर्लक्ष होते व अशा संकटांनंतर अनियोजित गर्भधारणेचे प्रमाण वाढते म्हणून या काळात संतीती नियमना कडे विशेष लक्ष असू द्यावे.
  • कोरोनाचा संसर्ग झाला असण्याच्या आणू लक्षणे दिसल्याच्या चार ते पाच दिवसांच्या विंडो पिरोड मध्ये लैंगिक संबंधांतून गर्भधारणा झाली असल्यास गर्भ पाडण्याची गरज नाही. या गोष्टीचा अर्भकावर कुठला ही परिणाम होणार नाही.  

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता

शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता

शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता “कोरोनाची साथ देशात सुरूहोऊन ४ महिने होत आहेत; पण तरीही हा आजार पसरण्याचा मुख्य स्रोत शिंक असताना योग्य प्रकारे शिंकावे कसे, हे अजूनही अनेकांना माहीत नसल्याचे दिसून येते. शिंकण्यामुळे नाकातील जंतू १०० मैल प्रतितास या वेगाने पुढे जातात. आपल्याला शिंकताना नाकासमोर हात धरा किंवा एका बाजूला होऊन हाताच्या वरच्या भागावर म्हणजे बाहू वर शिंका, असे सांगण्यात येते. कुठल्या प्रकारे शिंकल्यास त्यातून किती दूरवर जंतू जाऊ शकतात हे पाहूया..

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता कुठल्याही अडथळ्याशिवाय शिंकल्यास शिंकेतील जंतू ११ फुटांपर्यंत जातात.
  • समोर हात पकडला, तर शिंकेतील जंतू ३.५ फुटांपर्यंत जातात. पण यात हातावर शिंक येते आणि ते हात इतरत्र लागल्यास संसर्गाचा एक मार्ग खुला होतो.
  • सध्या सांगितल्याप्रमाणे बाहूवर शिंकले, तरी ही शिंक एका बाजूला ८.५ फुटांपर्यंत जाते म्हणून यासाठी भोवतीच्या लोकांना संसर्ग होणार नाही, यासाठी पुढील गोष्टी केल्या जाऊ शकतात.
  • शिंकताना पूर्ण चेहरा मोठा टिश्यू पूर्ण चेहरा झाकेल असा नाकाच्या भोवतीचा भाग झाकेल, असानाकासमोर पकडावा.
  • शिंकताना शक्य असल्यास खाली बसावे व बसने शक्य नसल्यास खाली जमिनीकडे बघावे.
  • टिश्यू नाकासमोर पकडताना नाक दाबू नये, टिश्यू हा मास्क ज्या जागेवर घट्ट बसतो त्या भागात दाबून पकडावा.
  • टिश्यू पर्याय असू शकतो चेहरा मावेल असा स्टेपलरच्या मदतीने बनवलेला कागदाचा छोटा त्रिकोण बनवून वरच्या खिशात ठेवता येईल. यासाठी छोट्या कागदी बॅग्सचाही वापर करता येईल. आॅफिसमध्ये प्रत्येकाच्या टेबलवर असे त्रिकोण / कागदी बॅग्स बनवता येतील. थोडे इनोव्हेशन करून खास शिकण्यासाठी स्निझिंग बॅग्स बनवता येतील.
  • शिंकताना आधी ३० सेकंद शिंक येणार आहे ही जाणीव होते, अशा वेळी खिडकीजवळ जावे.
  • शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता तसेच सर्वांनी अशी भावना जाणवली की हात वर करावा. ही शिंक आल्याची एक जागतिक सांकेतिक भाषा बनावी. हात वर केला की आॅफिसमध्ये सोबत बसलेले, सार्वजनिक ठिकाणी लोक शिंकणाऱ्यापासून तोंड दुसऱ्या बाजूला करतील.
  • एसी खोली असेल तर खिडकीचा एक कोपरा उघडता येईल असा ठेवावा व त्यानंतर ५ मिनिटे खिडकी उघडी ठेवून एसी बंद ठेवावा.
  • शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता गाडीत शिंक आल्यास चालक सोडून इतरांनी फक्त आपली खिडकी उघडून नाकासमोर टिश्यू ठेवून खिडकीकडे तोंड करून शिंकावे, त्या वेळी इतरांनी खिडकी उघडू नये. शिंकून झाले की मात्र सर्वांनी५ मिनिटे खिडकी उघडी ठेवावी.
  • चालकाला शिंक आल्यास त्याला हाताला लागेल असे डाव्या बाजूला हँडब्रेक असतो, तिथे टिश्यू ठेवावे व त्याने टिश्यूचा वापर करावा.
  • शिंकून झाल्यावर कधीही हात धुवावे, हात धुणे शक्य नसल्यास हातावर सॅनिटायजर घ्यावा.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता