सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण

सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण सध्या सरकारी रुग्णालयात पहिल्या ५ वर्षांपर्यंतच्या मोफत लसीकरणासाठी जाणे अवघड झाले आहे. एक तर यातील काही शासकीय हॉस्पिटल्स ही कोविड हॉस्पिटल्स आहेत. तर बऱ्याच ठिकाणी कोरोना संशयित तपासले जातात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सरकारीऐवजी खासगी रुग्णालयात करा लसीकरण याशिवाय सरकारी आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावा खाली आहेत. त्यामुळे शक्यतो नियमित लसीकरण सध्या पुढील तीन ते चार खाजगी रुग्णालयात घ्यायला हरकत नाही. ज्या लसी सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात त्या खाजगी रुग्णालयात अत्यंत स्वस्त आहेत. गोवर , बीसीजी , एमएमआर स्वस्त आहेतच पण पेन्टा म्हणजे ट्रिपल , मेंदूज्वर , कावीळ ही लस रु  ३९५ /- एवढ्या किमतीची आहे. याचे दीड , अडीच, साडेतीन व अठरा महिने असे चारच डोस असतात. खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या बालरोगतज्ञांनी यासाठी पुढील काही महिने तरी केवळ लसीची मूळ किंमतच आकारावी. त्यावर आपले कन्सल्टेशन चार्जेस व इंजेक्शन देण्याचे चार्जेस घेऊ नये. याने सरकारी रुग्णालयातील कामाचा ताण तर कमी होईलच शिवाय सरकारी रुग्णालयात जाऊन सर्दी , खोकला व कोरना संसर्ग होण्याचा धोका काही अंशी कमी होईल. यात अजून एक मधला मार्ग काढला जाऊ शकतो. सरकारी रुग्णालयात असलेल्या लसीचा स्टॉक सरकारी रूग्णालयाने बालरोगतज्ञांकडे द्यावा. त्या लसी बालरोगतज्ञांनी टोचून द्याव्या. या मोफत लसी खाजगी रुग्णालयात मिळत आहेत या जन जागृतीसाठी आशा सेविकांची मदत घेता येईल. याने लसीकरणाचे प्रमाणही वाढेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *